Our aim is to generate 175 GW of renewable energy by 2022, of which 100 GW will be from solar power: PM Modi
PM Modi calls for harnessing solar energy, points towards developing latest technology and innovation in the domain
PM Modi lays out ten action points to promote solar power
PM Modi calls for developing low cost solar energy and increasing scope of solar in energy mix
PM Modi lays stress on promoting solar energy based innovations



महामहीम राष्ट्राध्यक्ष मक्रोन

महामहीम राष्ट्रपती महोदय आणि पंतप्रधान महोदय

सन्माननीय अतिथी वर्ग आणि मान्यवर,

नमस्कार,

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या स्थापना परिषदेत, मी दिल्लीत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

नोव्हेंबर 2015 मध्ये पँरिसमधल्या 21 व्या परिषदेत आजच्या ऐतिहासिक दिनाचे बीज रोवले गेले.आज या बीजातून हिरवेगार अंकुर फुटू लागले आहेत.

या रोपट्यासाठी फ्रान्सने मोलाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे हे छोटेसे रोप, आपणा सर्वांचे एकत्रित प्रयत्न आणि कटीबद्धता याशिवाय रुजले नसते. यासाठी मी फ्रान्सचा आणि आपणा सर्वांचा आभारी आहे. 121 देशांपैकी 61 देश या आघाडीत सहभागी झाले आहेत. 32 देशांनी तर कराराच्या चौकटीलाही मंजूरी दिली आहे. या आघाडीतल्या सहकारी देशांशिवाय आपला सर्वात मोठा साथीदार आहे तो म्हणजे सूर्यदेवता,जो सृष्टीला प्रकाश आणि आपल्या संकल्पाला बळ देत आहे.

मित्रहो,

पृथ्वीवर जीवन सुरु व्हायच्या करोडो वर्ष आधीपासून सूर्य प्रकाश देत आहे. जपान पासून पेरू पर्यंत,ग्रीस असो वा रोम, वा ईजिप्त, प्रत्येक संस्कृतीने सूर्याला महत्व दिले आहे. मात्र भारतीयांनी हजारो वर्षापूर्वी सूर्याला केंद्रस्थानी ठेवले आहे ते अद्वितीय असेच आहे.भारतात हजारो वर्षापूर्वी सूर्याला जगाचा आत्मा मानला आहे.भारतात सूर्याला संपूर्ण जीवसृष्टीचा पोषक मानले गेले आहे.आज आपण हवामान बदला सारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्ग शोधत आहोत यासाठी प्राचीन समग्र दृष्टीकोनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

मित्रहो,

आपण सर्व एकत्र येऊन काय करू शकतो यावर आपले हरित भविष्य अवलंबून आहे.महात्मा गांधींच्या शब्दांचे मला स्मरण होते, ते म्हणत असत, आपण काय करतो आणि आपली काय करण्याची क्षमता आहे यातला फरक हा जगातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा आहे.

मानव जातीची उर्जेची गरज निरंतर भागवण्यासाठी सौर उर्जा हा प्रभावी आणि किफायतशीर पर्याय आहे याचीच प्रचीती संपूर्ण जगातल्या नेत्यांच्या इथल्या उपस्थितीमुळे येते.

मित्रहो,

भारतात आम्ही नवीकरणीय उर्जेचा जगातला सर्वात मोठा विस्तार कार्यक्रम सुरु केला आहे. 2022 पर्यंत नवीकरणीय उर्जेतून आम्ही 175 गिगावॅट वीज निर्मिती करणार असून त्यापैकी 100 गिगावॅट वीज सौर उर्जेतून निर्माण केली जाणार आहे.

यापैकी 20 गिगावॅटचे स्थापित सौर उर्जेचे लक्ष्य आपण आधीच साध्य केले आहे.भारतात उर्जेतली वाढ ही पारंपारिक उर्जा स्त्रोताऐवजी नवीकरणीय स्त्रोतातूनच जास्त होत आहे.

वीज अपुरी असणाऱ्या क्षेत्रात सौर उर्जेवर आधारीत पथ दिवे बसवणे हे अटल ज्योती योजनेचे उद्दिष्ट आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी सौर अध्ययन दिवे योजनेचा 7 दशलक्ष विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.

सौर ऊर्जेशी आणखी एखादे तंत्रज्ञान जोडल्यास आणखी लाभ होतो.उदाहरणच द्यायचे झाले तर सरकारने 28 कोटी एलईडी बल्ब वितरीत केल्याने गेल्या तीन वर्षात 2 अब्ज डॉलर पेक्षा जास्त बचत झाली आहेच त्याच बरोबर 4 गिगावॅट विजेची बचत झाली आहे.एव्हढेच नव्हे तर 30 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडची कमी निर्मिती झाली आहे.

मित्रहो,

आम्ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सौर क्रांती आणू इच्छितो.भारतात प्रशिक्षित सौर कवींचे गीत आता आपण ऐकले, त्यांचे भाषण ऐकले,चित्रफीत पहिली.आता आपण त्यांच्याशी उत्तम रीतीने परिचित झाला असाल.त्यांची कथा प्रेरणादायी आहे.

आंतर राष्ट्रीय सौर आघाडीच्या कॉर्पस निधीत योगदान देण्या बरोबरच या आघाडीच्या सचिवालय स्थापने साठी 62 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या योगदाना बद्दल आम्हाला आनंद आहे.या आघाडीच्या सदस्यांना दर वर्षी 500 प्रशिक्षण स्लॉट आम्ही प्रदान करू हे जाहीर करू.

संपूर्ण जगभरात आम्ही 143 दशलक्ष अमेरिकी डॉलरचे 13 सौर प्रकल्प पूर्णत्वाला नेले आहेत अथवा त्यांचे काम सुरु आहे. भारत इतर विकसनशील देशांना आणखी प्रकल्पांसाठी 1.4 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे सहाय्य देणार आहे.

बँका मदत करू शकतील असे प्रकल्प तयार करण्यासाठी भागीदार देशांना सल्ला विषयक सहाय्य करण्यासाठी आम्ही प्रकल्प तयारी सुविधा निर्माण केली आहे.

सौर तंत्रज्ञानातली पोकळी भरण्यासाठी भारत सौर तंत्रज्ञान मिशन सुरु करेल अशी घोषणा करताना मला आनंद होत आहे.हे मिशन आंतर राष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित करणार असून, आपल्या सर्व सरकारी,तांत्रिक आणि शैक्षणिक संस्था मिळून सौर उर्जा क्षेत्रात संशोधन आणि विकास प्रयत्नाचे नेतृत्व करेल.

मित्रहो,

हवेप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या सौर उर्जेचा विकास आपल्या भरभराटी बरोबरच पृथ्वीवरचा कार्बनचा भारही कमी करणार आहे.

मित्रहो,

आपल्याला काही बाबींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्या याप्रमाणे आहेत,एकीकडे वर्षभर तळपणारा सूर्य आहे पण संसाधने आणि तंत्रज्ञानाचा अभाव हा सौर उर्जेच्या वापरातला अडथळा ठरतो.

दुसरीकडे अशी बेटे आणि देश आहेत ज्यांच्या अस्तित्वालाच, हवामान बदलामुळे थेट धोका आहे. तिसरी बाब अशी आहे सौर उर्जा केवळ प्रकाशासाठी नव्हे तर प्रवास,धूर विरहीत स्वयंपाक,शेतीसाठी सौर पंप,आणि आरोग्य सेवा क्षेत्रातही उपयुक्त ठरू शकते.

सौर उर्जा विषयक प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विकास, आर्थिक संसाधने,किफायतशीर किंमत, व्यापक उत्पादन आणि कल्पकता यासाठी संपूर्ण परिरचना आवश्यक आहे.

मित्रहो,

पुढच्या मार्गाविषयी आपल्याला विचार करायचा आहे. माझ्या मनात दहा कृती सूत्रे आहेत जी मी आज सांगू इच्छितो,सर्वप्रथम आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की उत्तम आणि किफायतशीर सौर तंत्रज्ञान सर्वांसाठी सहज आणि सुलभ असावे.

उर्जेमधला सौर उर्जेचा वाटा आपल्याला वाढवावा लागेल.वेगवेगळ्या गरजांची सौर उर्जे द्वारे पूर्तता करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन द्यावे लागेल.

सौर प्रकल्पांसाठी आपल्याला सवलतीच्या दरात आणि कमी जोखीम असलेला वित्त पुरवठा उपलब्ध करावा लागेल. नियामक पैलू आणि मानके विकसित करायला हवीत ज्यामुळे सौर विषयक विकासाला एक नवी गती प्राप्त होईल.विकसनशील देशात बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळण्याजोग्या सौर प्रकल्पासाठी सल्लाविषयक सहकार्य विकास आवश्यक आहे.

आपल्या प्रयत्नात अधिक समावेशकता आणि भागीदारीवर भर द्यायला हवा.स्थानिक परिस्थिती लक्षात घेणाऱ्या सर्वोत्कृष्टता केंद्रांचे आपल्याला व्यापक जाळे उभारायला हवे.आपले सौर उर्जा धोरण सर्वंकष दृष्टीकोनातून पाहायला हवे ज्यामुळे शाश्वत विकास उद्दिष्ट पुर्तीमध्ये जास्तीत जास्त योगदान राहील.आपल्याला सौर उर्जा आघाडी सचिवालय आणखी मजबूत आणि व्यावसायिक बनवले पाहिजे.

मित्रहो,

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून आपण या सर्व कृती कलमांवर गतिमान विकास साध्य करत आगेकूच करू असा मला विश्वास आहे.

मित्रहो,

आजचा हा क्षण म्हणजे आपल्या प्रवासाची सुरवात आहे.आपली ही आघाडी,आपले जीवन सूर्य प्रकाशाने आणखी उजळू शकते. ही आघाडी, ‘सूर्याला अधिक उजळवू या’, ही उक्तीही सार्थ ठरवू शकते. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे अवघे जग हे एक कुटुंब आहे ही भारताची प्राचीन काळापासूनची धारणा आहे.

पृथ्वी आणि मानवजातीचे कल्याण आपण इच्छित असू तर वैयक्तिक कोषातून बाहेर येऊन एक कुटुंब म्हणून आपले उद्दिष्ट आणि प्रयत्न यात एकता आणून आपण एकजुटीने कार्य करू.

मित्रहो,

हा तोच मार्ग आहे,जो प्राचीन काळात ऋषी मुनींनी सांगितला आहे, ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करा. या मार्गावरून वाटचाल केल्याने आपला चरितार्थ सुरु राहील.

खूप-खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi