PM Modi applauds DRDO scientists, says India’s missile programme is one of the outstanding programmes in the world
Govt willing to walk the extra mile with the scientific community so that it can invest time in emerging technologies and innovations for national security: PM
DRDO's innovations will play a huge role in strengthening Make in India and in promoting a vibrant defence sector in the country: PM

कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा, डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी, अपेक्स कमिटीचे सदस्य, युवा विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक,

मित्रहो,

सर्वप्रथम, आपण सर्वांना नव वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इअर ! हा योगायोग आहे की आत्ता थोड्या वेळापूर्वी मी तुमकुर मधे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात होतो आणि आता देशाचे जवान आणि संशोधन यासाठी कार्य करणाऱ्या आपणा सर्व सहकाऱ्यांसमवेत आहे. उद्या मला विज्ञान काँग्रेस मध्ये जायचे आहे. कर्नाटकचा हा माझा प्रवास आणि वर्ष 2020 मधला माझा पहिला प्रवास, ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ या नव भारताच्या भावनेला एक प्रकारे समर्पित आहे. जिथे आपणा सर्वांचे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम डीआरडीओशी जोडले गेले होते त्या एरोनॉटिकल डेव्हलमपमेंट एस्टेब्लिशमेंट मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे, ही आपण सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.

 

मित्रहो, हे दशक, नव भारताच्या रुपात महत्वपूर्ण आहेच. कारण 2020 हे केवळ एक वर्ष नव्हे तर संपूर्ण दशक आपल्यासमोर आहे. येत्या काळात भारताचे सामर्थ्य काय असेल, जगात आपले स्थान कोठे असेल, हेही हे दशक ठरवणार आहे. हे दशक पूर्णपणे युवकांच्या स्वप्नांचे आहे, आपल्या कल्पक युवापिढीचे आहे. विशेष करून असे कल्पक आणि संशोधक वृत्तीचे युवा ज्यांचा जन्म 21 व्या शतकात झाला आहे किंवा 21 व्या शतकात ज्यांनी युवावस्थेत प्रवेश केला आहे. डीआरडीओने स्वतःची पुनर्बांधणी करावी, 21 व्या शतकातल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करायला हवे, असे मी आपणाला सांगितले होते, त्यामागे माझा एक विचार होता. याचा अर्थ 36 वर्षाची व्यक्ती बेकार झाली असा नव्हे. माझी अशी भूमिका आहे की, जे 60 वर्षे, 50 वर्षे, 55 वर्षे तपस्या करून इथवर पोहोचले आहेत त्यांच्या खांद्यावर 35 पेक्षा कमी वर्षाच्या व्यक्तीला बसवले तर जगाला नव्या भारताचे दर्शन घडेल. जुन्या जाणत्या लोकांच्या मजबुतीवाचून, अनुभवाशिवाय नव्या व्यक्तीना उच्चस्थान गाठणे शक्य नाही. म्हणूनच ही सांगड आवश्यक आहे. या विचारामागे माझा एक अनुभव आहे. माझ्या राजकीय जीवनाचा लांबचा प्रवास आहे . सुरवातीला मी पक्ष संघटनेचे काम पाहत असे. निवडणूक किंवा इतर बाबी पाहत असे. गुजरातमध्ये मी सुरवात केली आणि माझ्यासमोर एक मोठ्या निवडणुकीची जबाबदारी आली. मी अगदी नवखा होतो आणि त्या वेळी वर्तमानपत्रांनीही याबाबत सविस्तर लिहिले होते. कारण त्या वेळी माझ्या कार्यालयात 90 लोक, माझ्या व्यवस्थापनाखाली काम करत होते. निवडणूक संपूर्ण राज्यात लढली जात असे मात्र कार्यालय व्यवस्थापनात 90 लोक होते.स्वयंसेवक म्हणून जे आले होते ते 2-3 महिन्यासाठी काम करणारे होते. वर्तमानपत्रांनी माहिती काढली होती. या संपूर्ण चमूचे सरासरी वय 23 आहे, सरासरी 23 वयोगटातून मी निवडणूक लढवली होती आणि आम्ही पहिल्या प्रथमच विजयी झालो होतो.

तुम्ही उत्तम कबड्डी पटू असाल, आयुष्यात 20 वर्षे कबड्डी खेळले असाल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले असाल, मात्र, 60-70 व्या वर्षी आपण कबड्डीचा सामना पाहायला गेला असाल, तिथे 18-20 वर्षाचा कबड्डीपटू वेगवान चाल करत असेल, चढाई करून प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूला लोळवत असेल, तर तुमच्या मनात येते अरे, अरे पडेल की काय, त्याला काही लागेल की काय, खरे तर तुम्हीही हा खेळ खेळला आहात. मात्र आता तुम्ही पाहू शकत नाही, वाटते, अरे कोणाला काही लागू नये, जखम होऊ नये. ही मानसिकता तयार होते. युवा मन आणि अनुभवी मन यामध्ये हा फरक असतो. म्हणूनच मनोवैज्ञानिक परिवर्तन जगातल्या आव्हानांचा स्वीकार करण्यासाठी डीआरडीओ मधे या दोन्हींची सांगड राहावी. कधी कधी मोठ्या वृक्षाखाली छोट्या रोपाची वाढ होत नाही. दोष मोठ्या वृक्षाचा नसतो. रोपालाही वाटते, वृक्षासमोर मी असेच राहायला हवे. दोष कोणाचाच नाही. मात्र या रोपाला मोकळ्या जागेत बहरायला दिले तर मोठ्या वृक्षालाही अभिमान वाटेल की माझ्या बरोबरीने हे बहरत आहे. याच भूमिकेतून या पाच प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. या प्र्योगाशाळानी काही चुका केल्या तर करू देत. संपूर्ण निधी खर्च झाला तर होऊ दे. एक वैज्ञानिक आपले आयुष्य वेचतो तेव्हा देशासाठी काही प्राप्त होते. आपण आपले आयुष्य वेचता तर निधी देण्यासाठी सरकारला काही प्रश्न नाही.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 5 प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार होऊन आज बेंगलूरू, कोलकत्ता, चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई या पाच ठिकाणी अशा पाच प्रयोगशाळा सुरु होत आहेत याचा मला आनंद आहे. या युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा, युवा आणि वैज्ञानिकाच्या विचारांना नवी झेप घेण्यासाठी बळ देतील याचा मला विश्वास आहे. डीआरडीओ- वाय म्हणून या प्रयोगशाळा ओळखल्या जातील, मात्र उच्चारताना डीआरडीओ- व्हाय असे ऐकू येईल. या पाचही प्रयोगशाळा याचे उत्तर देण्याचे सामर्थ्य बाळगतात असा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांना बळ द्यायचे आहे. या प्रयोगशाळेतून हाती येणारे परिणाम, अद्ययावत तंत्रज्ञानासाठीच्या आपल्या राष्ट्रीय प्रयत्नांची तीव्रता निश्चित करतील. या प्रयोगशाळा, देशातल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, संशोधन आणि विकासाचे स्वरूप ठरवण्यासाठी मदत करतील. आपल्या युवा वैज्ञानिक आणि त्यांचे सहकारी यांना मला एक नक्कीच सांगायचे आहे, या प्रयोगशाळात, तंत्रज्ञानाचा कस लागण्याबरोबरच, युवा वैज्ञानिकांची वृत्ती आणि चिकाटी यांचाही कस लागणार आहे, हा त्याचा सर्वात मोठा मापदंड आहे. आपले प्रयत्न आणि निरंतर अभ्यासच भारताला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल हे आपण नेहमीच स्मरणात ठेवले पाहिजे. सकारात्मकता आणि उद्देश हे आपल्या प्रेरणेचे स्त्रोत राहिले पाहिजेत. आपण हे नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे की 130 कोटी जनतेचे जीवन सुरक्षित आणि सुकर करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

मित्रहो, आजचा हा कार्यक्रम तर एक सुरवात आहे. आपल्यासमोर पुढचे केवळ एक वर्ष नव्हे तर एक दशक आहे. या एका दशकासाठी डीआरडीओचा मध्यम आणि दीर्घ काळासाठीचा पथदर्शी आराखडा काय असेल यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. मी आणखी एक सूचना करू इच्छितो. या पाच प्रयोगशाळात 35 आणि त्यापेक्षा कमी वर्षाचे चमू आहे, हा चमू 36 चा झाला तर काय होईल, मी आपणाला सांगू इच्छितो, या 5 प्र्योगशाळाना 45 किंवा 55 होण्याचीही सूट आहे. आपल्याला 35 वाल्या पाच नव्या प्रयोगशाळा करायला लागतील. 35 वाल्यांना 40 होऊ द्या, 35 वाल्यांसाठी नव्या पाच करा. त्यांनी 35 पार केले की 35 वाल्या नव्या पाच करा ही साखळी सुरु ठेवा. ही साखळी सुरु राहिली नाही तर 32 वर्षवाला हा विचार करेल की आता माझी 3 वर्षेच इथे आहेत, मग मी काय करू माझे स्वप्न अपूर्ण राहील. म्हणूनच ज्यांना या प्र्योगशाळा दिल्या आहेत ते थकेपर्यंत त्यांचे काम सुरु राहू द्या. ते पन्नास वर्षाचे होऊ द्या, 55 चे होऊ द्या नाहीतर साठचे होईपर्यंत करू द्या. 35 वाल्या नव्या 5 प्रयोगशाळा निर्माण करा. पाचचा हा क्रम सुरु राहू दे. मग पहा, नावीन्यतेचे एक क्षेत्र सातत्याने सुरु राहील आणि अखेर याचाच आपल्याला फायदा होईल. केवळ विचार करून आपण थांबता कामा नये तर वेळेवर कृती कार्यक्रमही सुरु झाला पाहिजे.

डीआरडीओने असे शिखर गाठावे, मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की, जिथे केवळ भारतातल्या वैज्ञानिक संस्थानाच मार्गदर्शन नव्हे तर जगातल्या इतर मोठ्या संस्थानाही, डीआरडीओ आणि आपल्या युवा प्रयोगशाळा, प्रेरणास्त्रोत ठराव्यात. मी असे का म्हणतो, याचे एक ठोस कारण आहे ते म्हणजे, डीआरडीओचा इतिहास, डीआरडीओची कामगिरी, डीआरडीओवरचा देशाचा विश्वास.

मित्रहो, आज देशातली उत्तम वैज्ञानिक प्रतिभा डीआरडीओमधे आहे. डीआरडीओची कामगिरी उत्तुंग आहे. मी आत्ता जे प्रदर्शन पाहिले त्यात आताच्या कामगिरीबरोबरच भविष्यासाठीचे प्रकल्प आणि आराखडे याविषयीची माहिती आहे. आपल्या युवकांनी इतक्या सोप्या भाषेत माहिती दिली की, ती सहज समजली. शालेय जीवनात हे लक्षात येत नसे. आज आपण समजावून सांगितले.भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला, आपण, जगातल्या सर्वात उत्कृष्ट कार्यक्रमात स्थान मिळवून दिले. मागचे वर्ष तर अंतराळ आणि हवाई संरक्षण क्षेत्रात भारताच्या सामर्थ्याला नवी दिशा देणारे ठरले. ए- सॅट च्या रुपात अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाची ही सफल चाचणी, 21 व्या शतकातल्या भारताच्या क्षमता नक्कीच सिद्ध करेल.

आपणा सर्वांच्या प्रयत्नामुळे आज भारत अशा मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्यांच्याकडे विमान ते विमानवाहकापर्यंत सर्व निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र केवळ इतकेच पुरेसे आहे का ? नाही, मित्रहो, घरी पाहिले असेल, जे मूल चांगले काम करते, आई-वडील त्याच्याकडून जास्त करण्याची अपेक्षा ठेवतात. त्याने पाच कामे केली तर सांगतात सात कर, सात केली तर सांगतात दहा कर आणि जो करत नाही त्याला सोडून देतात, म्हणतात, अरे तो करणार नाही. तर आपल्याला लोक कामे सांगत राहणार.

रामचरितमानस मधे एक उत्तम गोष्ट सांगितली आहे. रामचरितमानस मधे सांगितले आहे,

कवन जो काम कठिन जग माहीं।

जो नहिं होइ तात तुम्‍ह पाहीं।।

म्हणजे भूतलावर असे कोणते काम आहे जे आपल्याला शक्य नाही. सर्व काही होऊ शकते, आपल्यासाठी कोणतेही काम कठीण नाही. डीआरडीओसाठीही मी याचा पुनरुच्चार करू इच्छितो. आपल्या क्षमता अपार आहेत, आपण खूप काही करू शकता. आपल्या कक्षांचा विस्तार करा, आपल्या कामगिरीचे मापदंडात परिवर्तन करा, आपले पंख, पूर्ण क्षमतेने विस्तारून आकाशात एकछत्री अंमल करण्याची उमेद दाखवा, संधी आहे आणि मी आपल्यासमवेत आहे.

देशाचा पंतप्रधान या नात्याने मी आपणाला सांगू इच्छितो, सरकार पूर्णपणे आपल्यासमवेत आहे, देशाच्या वैज्ञानिकांच्या समवेत, संशोधकांच्या समवेत खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करण्यासाठी आज संपूर्ण देश सज्ज आहे. आपण सर्वजण हे जाणताच की येत्या काळात आकाश आणि सागर याबरोबरच सायबर आणि अंतराळ ही क्षेत्रे जगाची धोरणात्मक व्यूहरचना निश्चित करणार आहेत. याचबरोबर इंटेलीजंट मशीन, भविष्यातल्या संरक्षण सुरक्षेच्या तंत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम आहेत. भारत पाठीमागे राहू शकत नाही. आपले नागरिक, आपल्या सीमा आणि आपल्या हित रक्षणासाठी भविष्यातल्या तंत्रावर गुंतवणूक गरजेची आहे आणि नाविन्यही आवश्यक आहे.

नव भारताच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कोणतीही कसर ठेवणार नाही. आपला विस्तार केवळ भारतापर्यंत सीमित राहता कामा नये, डीआरडीओ सारख्या संस्था जगभरातल्या मानवतेसाठी खूप काही देऊ शकतात. जागतिक सुरक्षेमध्ये आपण मोठी भूमिका बजावू शकतो. आज जगात अनेक देश आहेत ज्यांना सीमेवर हल्ल्याचा धोका नाही. आजू-बाजूचे सर्व देश त्यांचे मित्र आहेत. या देशांनी कधी कल्पनाही केली नव्हती की त्यांना बंदूक हाती घ्यावी लागेल. कारण आजू-बाजूला युद्धाचा धोकाच नव्हता. सीमा सुरक्षित होत्या, शांत होत्या, बंधुभाव होता, मात्र हे देशही दहशतवादाच्या छायेत आले, त्यानाही बंदूक घ्यावी लागली.

डीआरडीओ, अशा देशातही अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकते. ज्या छोट्या- छोट्या देशांतल्या लोकांना मी भेटतो, त्यांच्या या आवश्यकता वाढल्या आहेत. मर्यादित संसाधने असूनही या धोक्यासंदर्भात त्यांना काही विचार करावा लागेल. अशा छोट्या-छोट्या देशांना आपण सुरक्षेची हमी देऊ शकतो. हे मानवतेचे कार्य होईल. आपणाकडून करण्यात आलेले असे कार्य मानवतेची मोठी सेवा ठरेल आणि जागतिक मंचावर भारताची भूमिकाही बळकट करेल.

मित्रहो, संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी डीआरडीओला नाविन्यतेसह सामोरे यावे लागेल. देशात संरक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, मेक इन इंडिया अभियानाला मजबूत करण्यात डीआरडीओच्या संशोधनाची महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच डिझाईन पासून ते विकसित करण्यापर्यंत आपण संपूर्णपणे स्वयंपूर्ण व्हावे यासाठी आपले अथक प्रयत्न राहायला हवेत. आपल्याला अशी परिसंस्था विकसित करायला हवी जिथे एकीकृत आणि नाविन्यतेवर संपूर्ण भर राहील.

मित्रहो, आज भारत, संरक्षण क्षेत्रात नव-नव्या सुधारणांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. जगात जितक्या वेगाने परिस्थिती बदलत आहे तंत्रज्ञान वरचढ ठरत आहे. केवळ जुन्या व्यवस्थांवर भारत अवलंबून राहू शकत नाही. 19 व्या शतकातल्या व्यवस्था घेवून मी 21 वे शतक पार करू शकत नाही. या आठवड्यातच सरकारने, ‘चीफ ऑफ डिफेन्स’ या पदावर माझी नियुक्ती केली. हे पद आपल्यात खूप मोठे बदल घडवणार आहे. याचा थेट संबंध डीआरडीओशी आहे. अनेक वर्षांपूर्वी या पदाची आवश्यकता व्यक्त झाली होती, भारताच्या तीनही सैन्यदलात उत्तम ताळमेळ राखण्यासाठी असे पद असायला हवे, व्यवस्था असायला हवी. हे पद, आमच्या सरकारची, देशाप्रती असलेली कटीबद्धता होती आणि आम्ही ती पूर्ण केली.

मित्रहो, परिवर्तनाच्या या काळात आपल्याला स्वतःला, सातत्याने मजबूत रहायला हवे. हीच आपल्याकडून देशाची अपेक्षा आहे. युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापनेच्या मागेही हाच दृष्टिकोन आहे. भविष्यातल्या तंत्रज्ञानविषयक आव्हानाचा मुकाबला आपण करूच, डीआरडीओ च्या कार्य प्रणालीत नवी ऊर्जा निर्माण होईल अशी आशा मी व्यक्त करतो. आपण सर्वाना माझ्या पुन्हा एकदा खूप- खूप शुभेच्छा.

आपण सर्वाना आणि आपल्या कुटुंबाला नव वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.

खूप- खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"