आदरणीय डॉ. एम एस स्वामिनाथनजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी राधा मोहन सिंगजी आणि उपस्थित सर्व महनीय,
जेव्हा मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होतो, तेव्हा डॉ. स्वामिनाथन यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यावेळी आम्ही एका मृदा आरोग्य कार्ड योजनेचा शुभारंभ केला होता. जेव्हा मी यावर विचार करत होतो, तेव्हा मला इथेही खूप नोकरशाही विरोधाचा सामना करावा लागलाकीकाय करत आहात वगैरे, मात्र जेव्हा स्वामिनाथन यांनी जनतेसाठी एक निवेदन दिले, बहुधा चेन्नईतून दिले होते आणि हे किती मोठे महत्वाचे पाऊल आम्ही उचलले आहे आणि पुढे जाऊन किती फायदा होणार आहे आणि जी गोष्ट मी माझ्या सरकारमधील माझ्या सहकाऱ्यांना समजावू शकत नव्हतो, मला खूप मेहनत करावी लागत होती, कीनाही नाही, हे करायचेच आहे, काय करायचे आहे, मात्र जेव्हा डॉ. स्वामिनाथन यांचे निवेदन आले वृत्तपत्रांमध्ये, नोकरशाहीचा जणू काही मूडच बदलून गेला, सर्वाना वाटले अरे, हे खूप महत्वाचे काम करत आहेत, आता करायचेच. हे मी अशासाठी सांगत आहे कीत्यांची जी तपश्चर्या आहे, साधना आहे याचे किती मोल आहे ते मी तेव्हा स्वतः अनुभवले, आणि आता तर ती योजना संपूर्ण देशात लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आता आता त्यांना कृषी शास्त्रज्ञ म्हटले जाते मात्र मला कधी-कधी वाटते कीते शेतकरी शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या अंतरंगात एक शेतकरी जिवंत आहे, केवळ प्रयोगशाळा वाला कृषी, उत्पादन, दर्जा यापेक्षाही अधिक त्यांचे प्रबंध पाहिले तर ते भारतीय संदर्भात आहेत. भारताच्या शेती संदर्भात आहेत. भारताच्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवलेले आहेत, या सर्व गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्या सुसंगत वाटतात. कधी-कधी जमिनीच्या खूप वर अनेक गोष्टी येतात, पण मग ती मधली दरी सांधली जात नाही. डॉ. स्वामिनाथन यांचे वैशिष्ट्य आहे कीत्यांनी ज्या गोष्टी जेव्हा सादर केल्या त्या जमिनीशी निगडित होत्या आणि त्याचा परिणाम असा झाला कीत्या सुसंगत वाटल्या आणि बहुतांश उपयोगातही आणल्या गेल्या.
आजच्या तरुणांना डॉ. स्वामिनाथन कशा प्रकारे प्रेरणा देऊ शकतात, आपल्या देशाची एक समस्या आहे कीराजकीय नेत्यांना सगळे ओळखतात, मात्र वैज्ञानिकांना खूप कमी लोक ओळखतात. प्रत्येक गल्ली बोळ्यात राजकीय नेत्यांचे नाव माहित असते मात्र एवढे मोठे योगदान देणाऱ्या लोकांची ओळख आपल्याकडे होत नाही, बहुधा यंत्रणेचा दोष असावा किंवा स्वभावाचा दोष असेल, जे काही असेल, मात्र दीर्घ काळापासून उणीव भासत आहे आणि त्यामुळे बहुधा आजच्या तरुण पिढीला एका खेळाडूकडून प्रेरणा मिळत असेल, एका ज्येष्ठ कलाकाराकडून मिळत असेल, कुणा राजकीय नेत्यापासून प्रेरणा मिळत असेल, एखाद्या मोठ्या उद्योग घराण्याकडून मिळत असेल मात्र मोठ्या स्तरावर तरुणांचे वैज्ञानिकांकडे लक्ष जात नाही.
तुम्ही कल्पना करा की एका वैज्ञानिकाच्या कल्पनेतील भारतात, भारत उपाशी मरेल, भारत तर संपेल, निराशेचे वातावरण असेल, भारताला जणू काही असे गृहित धरले असेल कीहा तर संपला.अशा वेळी एक तरुण वैज्ञानिक संकल्प करतो कीनाही, परिस्थिती बदलता येऊ शकते आणि आपण बदलून दाखवू. संपूर्ण हरितक्रांतीच्या वातावरणात एक तरुण वैज्ञानिकाचा तो संकल्प आहे,जो डॉ. स्वामिनाथन यांच्या रूपाने आपल्या समोर आहे. या गोष्टी आजच्या तरुण पिढीला माहित नाहीत. आजच्या तरुणांसमोर देखील स्टार्टअपचे जग आहे, त्यांच्यासमोर कुपोषणाचे एक आव्हान आहे. तेलबिया, डाळी, आपल्या डाळींमध्ये उत्पादकता देखील कमी आहे, त्यातील प्रथिनांचे मूल्य वाढवण्याची आवश्यकता आहे. आता हीआव्हाने आजच्या तरुण पिढीने जर मनात आणले, तर कुपोषणाची स्थिती बदलता येईल. आपण देशाच्या कृषी क्रांतीमध्ये अशा प्रकारच्या बाबी आणू आणि महात्मा गांधी देखील म्हणायचे कीउपाशी माणसाचा देव तर भाकरी असते आणि हीच गोष्ट आपण वैज्ञानिक पद्धतीने कशी पुढे नेऊ शकू, काही गोष्टी मला व्यक्तिगत जीवनात खूप भावतात. जसे मला वाटते, बहुधा भारताच्या सर्व पंतप्रधानांबरोबर तुम्ही काम केलेले आहे, पहिल्या पंतप्रधानांपासून माझ्यापर्यंत. तुम्ही जगभरात पाहिले आहे, कुणाकडेही एखाद्या पंतप्रधांनाबरोबर उभे असलेला फोटो असेल तर तो माणूस 2 फूट वर चालत असतो. हा एवढा साधेपणा, एवढा सरळपणा, या गोष्टी कधी स्वामिनाथन यांच्यात प्रतिबिंबित झालेल्या मी पाहिल्या नाहीत आणि या गोष्टी मी पुस्तकाच्या आधारे सांगत नाहीये, माझ्या अनुभवातून सांगतो. मी गुजरातमध्ये होतो, तेव्हा असेच साधेपणाने यायचे, भेटायचे आणि जेव्हा भेटायचे तेव्हा कळतही नसायचे कीहा एवढा मोठा माणूस आहे, समजायचेच नाही. सार्वजनिक जीवनात यश कसे पचवायचे हे यातून शिकण्यासारखे आहे. एक व्यक्ती म्हणून चेहऱ्यावर समाधान, क्वचितच कुणी त्यांचा चेहरा उदास पाहिला असेल, नाहीतर बहुतांश वैज्ञानिक (मला क्षमा करा) जे इथे बसलेले आहेत, ते 21 व्या शतकातही असे जगतात जसे 18 व्या शतकात राहत आहेत, सगळ्या जगाचे ओझे त्यांच्यावर आहे, गप्प राहतात, कुटुंबातील लोकही वैतागलेले आहेत कीहे बोलत का नाहीत. यांचे आयुष्य अगदी उलट आहे, नेहमी आनंदी असतात, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि हे तेव्हाच होते जेव्हा आयुष्यातील काही गोष्टी आत्मसात केलेल्या असतात, डोक्यातील ज्ञानाने हे शक्य नाही, या गोष्टी रक्तातच असतात तेव्हा हे शक्य होते आणि मला वाटते काही ना काही ईश्वराची कृपा असेल, त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारांमुळे असेल, ते आयुष्यात इथवर पोहोचले आहेत.
आपल्या देशात कृषी क्षेत्रामध्ये आजही आव्हाने तशीच्या तशी आहेत, हरितक्रांतीपासून दुसऱ्या हरितक्रांतीची चर्चा होते, मात्र सदाहरितक्रांती भारतासारख्या देशासमोर उद्दिष्ट आहे आणि सदाहरितक्रांती हेच आपले उद्दिष्ट असेल तर भारताची क्षमता कशात आहे ते एकदा जाणून घेण्याची गरज आहे, काही प्रमाणात असते. आता भारताचा पूर्वेकडील भाग आर्थिक दृष्ट्या आपल्याला खूप असमतोल दिसतो. पश्चिम भारताची आर्थिक स्थिती एक, पूर्व भारताची आर्थिक स्थिती दुसरी, कोणताही देश अशा असमतोल स्थितीत लांबचा पल्ला गाठू शकत नाही, कुठे ना कुठे तो अडखळणार. दोन्ही पायांमध्ये समान ताकद असणे, दोन्ही हातांमध्ये समान ताकद असणे गरजेचे आहे. आता ज्याप्रमाणे पश्चिम भारतात गव्हाच्या द्वारे धान्यांद्वारे पहिल्या कृषी क्रांतीचे नेतृत्व केले, सदाहरित क्रांतीच्या नेतृत्वाची ताकद पूर्व भारताच्या तांदळात आहे आणि मला वाटते पाणी आहे, जमीन आहे, मेहनत घेणारे लोक आहेत, वैज्ञानिक हस्तक्षेपाची गरज आहे, तंत्रज्ञान हस्तक्षेपाची गरज आहे. हे जर आपण केले आणि सरकार त्या दिशेने काम करत आहे. डॉ. साहेबांकडूनही आम्ही अनेक सूचना घेत असतो. आता अलिकडेच मी भेटलो, तेव्हा याच विषयावर मी त्यांच्याशी चर्चा केली, मला जरा यात मार्गदर्शन करा. आज ते आले आणि आमच्या टीमला दिवसभर त्यांनी मार्गदर्शन केले, हे बघा, असे होऊ शकते. तर आमचा हा प्रयत्न आहे कीया क्षेत्रात कसे काम करायचे. आता हि गोष्ट खरी आहे कीलोकसंख्या वाढत आहे, जमीन वाढणार नाही कमी होणार आहे, त्यामुळे मृदा व्यवस्थापन हीप्रमुख गरज आहे.
सर्वांगीण दृष्टिकोन कसा असावा, यासाठी आपली उत्पादकता कशी वाढेल, आपल्याकडे 85 % छोटे शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत आपला शेतकरी कमी जमिनीतही जास्त उत्पादन आणि उत्पादक वस्तू देखील केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी नाही. त्याची स्वतःचे बाजार मूल्य असे असावे, दर्जा असा असावा जेणेकरून तो स्वतःचा उदर निर्वाह करू शकेल. या दिशेने आपण कशा प्रकारे भर देऊ शकतो. त्याच प्रमाणे पाण्याचे संकट आहे. जगभरात याची चर्चा आहे. आपण पुनर्वापर करू, जल संवर्धन करू. हे सगळे करूनही पाणी हे एक आव्हान आहे असे धरून चालायला हवे. पाणी हा असा विषय नाही कीजेव्हा येईल तेव्हा पाहू. नाही, जर 20 वर्षे 50 वर्षे आधी विचार करून एक-एक गोष्ट आतापासून करायला सुरुवात केली तर कुठे होईल. या विषयावर समाजात ती जागरूकता लगेच येत नाही. उदा. वायू प्रदूषण. कितीही शिकले सवरलेलीव्यक्ती असलीतरी हे संकट किती मोठे असेल ते समजून घेईपर्यंत उशीर झालेला असतो.
सामान्य माणसाला पाण्याचे संकट काय असते त्याचा अनुभव करून देणे खूप कठीण आहे. आणि म्हणूनच जल संवर्धनाबरोबरच आपण पाण्याचा उपयोग कशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीने करता येईल, प्रत्येक थेंबामागे अधिक पीक हे तत्वज्ञान घेऊन काम करण्याचा सध्या प्रयत्न सुरु आहे. नद्यांना जोडण्याचे अभियान सुरु आहे. जर किफायतशीर शेतीकडे जायचे असेल तर आपल्याला पाणी पोहचवावे लागेल. त्याच प्रकारे मृदा व्यवस्थापन हा एक भाग आहे. आपण रसायनांचा जो भरमसाठ वापर करत आहोत, खतांचा वापर करत आहोत, जे आपल्या जमिनीला हानी पोहचवत आहेत. नदी किनारी जी शेती आहे, तेथील लोकांना वाटते कारखान्यांमुळे प्रदूषण होते. चिंतेचा विषय आहे, त्याच्या आजूबाजूच्या दोन चार किलोमीटर परिसरात जी शेती आहे, जिथे रसायनांचा वापर केला जातो, आणि ते पाणी पावसानंतर जेव्हा जमिनीवरून वाहून नदीत जाते, तेव्हा त्याच्याबरोबर किती भयंकर रसायने जातात. आणि म्हणूनच आपल्या नद्यांचे संरक्षण करणे, नदीच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करणे, या दिशेने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हे एक खूप मोठे अभियान स्वरूपात काम सुरु आहे.
त्याचप्रमाणे आपल्याकडे कधी-कधी कशावरून तरी सहज गप्पा मारताना विषय निघतो, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सामाजिक जीवनात अनेक दशकांपासून शतकांपासून जे चर्चेचे विषय आहेत त्यामध्ये एक खूप मोठी ताकद असते. आणि प्रयोगशाळांमध्ये जाऊन चर्चेतील त्या गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा. माझा एक अनुभव आहे, गुजरातमध्ये एक भाग आहे ज्याला भाल म्हणतात. समुद्रकिनारी आहे, खंभात खाडी परिसरात, आम्ही लहानपणापासून ऐकत आलो होतो भालिया गव्हाबद्दलआणि तिथे भालिया गावात उच्च वर्गातील लोक राहायचे. गहू खरेदी करणे आणि साठवणे हा त्यांचा स्वभाव होता. आणि खूप चढ्या दरात घ्यायचे. तेव्हा आमच्या मनात असायचे हे भालिया गाव. याचे काय कारण असेल, काही तरी असेल. तर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हा मी त्यात रस घ्यायला सुरुवात केली. आणि असे आढळले कीसाधारण गहू कार्बनयुक्त असतो. आश्चर्य म्हणजे हा गहू प्रथिनांनी समृद्ध आहे आणि खूप कमी भागात आहे. तर मी एकदा स्वित्झरलँडला गेलो होतो, तेव्हा मी नेस्टले वगैरेंच्या लोकांना भेटलो. मी म्हटले पोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी याचा कसा वापर करता येईल. इथे मी एका विद्यापीठाला हे काम दिले. याच्या जनुकांबाबत संशोधन केले. बरेच काम झाले आहे. जसे आपण बासमती शब्दाबद्दल ऐकून होतो. मात्र आम्ही पाहिले याची ताकद काय आहे. मला आठवतेय, अमरेली जिल्हा, गुजरातमध्ये एक भाग आहे, समुद्र किनाऱ्यावरील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीला जर बाजरी हवी असेल तर त्याला ती तिथूनच घ्यायची असते. तर मी विचारले, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री बनलो, तेव्हा तेथील जे आमदार होते ते माझ्यासाठी बाजरी एका पिशवीत भरून भेट स्वरूपात घेऊन आले. तेव्हा मलाही माहित नव्हती त्या भागातील बाजरीची ताकद. नंतर मी काही वैज्ञानिकांना म्हटले जरा याबाबत विचार करा. भारतातील कानाकोपऱ्यात अशा धान्याच्या जातींची चर्चा लोकांच्या तोंडी होत असते, ते कसे शोधायचे आणि त्याचे जनुकीय मूल्य काय आहे.
जर खरोखरच त्या अतिरिक्त ताकद असलेल्या गोष्टी असतील किंवा त्याच्या उत्पादकतेची ताकद असेल, किंवा असे काही जे शरीरासाठी उपयुक्त असेल किंवा मानव जातीसाठी उपयुक्त असेल, तर त्यावर संशोधन व्हायला हवे, या पारंपारिक गोष्टी आणि विज्ञान दोन्हीचा मेळ आपण लवकर घालायला हवा. आणि म्हणूनच मी आता आमच्या विभागातील लोकांना म्हटले कीप्रत्येक जिल्ह्याचे आपले एक कृषी वैशिष्ट्य असते, ओळख असते, त्या जिल्ह्यात प्रवेश केल्यावर हा जिल्हा तांदळाचा जिल्हा आहे, आणि तांदळाचे नाव व्हावे, ओळख व्हावी, हा जिल्हा इसबगुलचा जिल्हा आहे, हा जिल्हा जिरे पिकवतो, आपल्या परिसराची ओळख शेतीद्वारे ओळख कशी करायची याची आपल्याकडील लोकांना सवय नाही, यातून एक जागरूकता निर्माण होते. अमूक जिल्हा.आता जसे माझ्या लक्षात आहे, आपल्या हिमाचलमध्ये धुमाळजींचे सरकार आहे, मी तेव्हा हिमाचलमध्ये राहत होतो, त्यावेळी मी म्हटले होते कीया सोलन जिल्ह्यात मशरूमचे एवढे काम होते, आपण त्याचा लाभ का नाही घेत, त्याचे ब्रॅण्डिंग का नाही करत आणि आज आपण पाहिले असेल,कधी सोलनला गेलात तर तिथे फलक लावलेले दिसतील कि मशरूमच्या शहरात तुमचे स्वागत आहे. आता हळूहळू त्यांनी बहुधा सुरु केले आहे, सफरचंदाचा फलक लावला आहे, किवीचा फलक लावला आहे. आपल्या देशातील सामान्य लोकांना याच्याशी कसे जोडता येईल, यातून एक ओळख बनतेआणि तो शेतकरी देखील ओळखता येतोआणि जे बाजारपेठेशी जोडलेले लोक आहेत त्यांच्याकडेही लक्ष द्या. हे सोळा जिल्हे आहेत जे तांदळासाठी प्रसिद्ध आहेत, व्यापार करायचा असेल, खरेदीसाठी तर हे 20 जिल्हे आहेत तेलबियांसाठी प्रसिद्ध आहेत, तेथील ओळख आहे. एक कृषी समूह, एक संकल्पना विकसित होईल. जशी औद्योगिक समूहाची संकल्पना आहे त्याप्रमाणे कृषी समूह विकसित करण्याची गरज आहे. त्याचे कारण आहे उत्पादन. उत्पादनाबरोबर त्याची प्रक्रिया आणि प्रक्रियेमुळे मूल्य वाढण्याची शक्यता वाढते. जर आपण अशा प्रकारे साखळी व्यवस्था उभी केली, जर फळे असतील तर त्यांची साठवणूक वेगळ्या प्रकारे, धान्य असतील तर त्यांची वेगळ्या प्रकारे, फळे असतील तर त्याचे परिवर्तन वेगळे असेल, धान्याचे संवेष्टन वेगळे असेल, वाहतूक होईल, त्यात विशिष्ट ओळख निर्माण होईल. आपल्या या एवढ्या मोठ्या विशाल देशाला या गोष्टींची जितकी लवकर ओळख करून देता येईल, कारण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत असताना आपल्या देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढायला हवे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. काही दिवसांपूर्वी मी जेव्हा स्वामिनाथन यांना भेटलो होतो, तेव्हा मी त्यांना म्हटले होते, काही कृषी अर्थतज्ञांना बोलवा आणि चर्चा करा. त्यांनी मला एका कागदावर लिहून पाठवले कीया या गोष्टी आहेत ज्यावर लक्ष द्या. तर मी त्यावर काम करत आहे. सांगायचे तात्पर्य हे आहे कीआपण एका उद्दिष्टासह काम करायला हवे. खर्च कसा कमी होईल आणि उत्पादन कसे वाढेल आणि उत्पादनाचे मूल्य कसे वाढेल या तीन गोष्टीवर भर द्यायला हवा. आता उदा. कडुनिंबाचे विलेपन असलेले युरिया, आता हे काही आकाशातून खाली आलेले विज्ञान नव्हते. मात्र आपण या गोष्टी लागू करण्याला महत्व देत नव्हतो. आज कडुनिंबाचे विलेपन असलेल्या युरियाचा परिणाम असा झाला आहे कीयुरियाची चोरी बंद झाली, त्याचबरोबर अप्रामाणिकपणा बंद झाला आणि त्याचबरोबर युरियाची मागणीही कमी होत आहे. असे आढळून आले आहे कि गहू आणि तांदळाचे उत्पादन वाढले आहे, युरियाचा कमी वापर करूनही उत्पादन वाढले आहे. तर या साध्या सरळ गोष्टींचा आपण जितक्या सोप्यापद्धतीने प्रचार करू तेवढा त्याचा लाभ होईल. या दिशेने भारताचे प्रयत्न सुरु आहेत. स्वामिनाथनजींचा सक्रिय सहभाग, त्यांचे हे प्रयत्न आणि भारताला सदाहरित क्रांतीकडे, एका शाश्वत कृषी व्यवस्थेकडे घेऊन जाण्याच्या दिशेने वैज्ञानिक प्रयोगांचा वापर करायला हवा. कारण आपली सर्वात मोठी समस्या आहे लॅब टू लँड, प्रयोगशाळा ते शेती. त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. लॅब टू लँड हे आपले उद्दिष्ट असायला हवे. वैज्ञानिक जी गोष्ट देशाला देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालतो, ती शेतापर्यंत पोहोचत नाही. शेतापर्यंत ती कशी पोहोचेल, जोपर्यंत ती शेतकऱ्याच्या डोक्यापर्यंत पोहोचत नाही. एका उद्योगपतीच्या डोक्यात काहीही होवो, खिशात पैसे यायला हवेत, तो करेल. शेतकऱ्याचे असे नाही. शेतकरी लवकर जोखीम पत्करत नाही. सध्या पंतप्रधान पीक विमा योजना जी आणली आहे, तिने एक खूप मोठे योगदान दिले आहे. यापूर्वी शेतीतील पीक विमा योजनेत जेवढे लोक यायचे त्यापेक्षा 7 पट अधिक लोक या नव्या पंतप्रधान पीक विमा योजनामुळे सहभागी झाले आहेत. आता तर सुरुवात आहे. प्रचारही तितकासा झालेला नाही. शेतकऱ्यांमध्येही जर-तर असते. मात्र एकाच वर्षात एकदम 7 पट झेप घेणे हा आपल्या शेतकऱ्यांना सुरक्षेची जाणीव करून देतो. एकदा का सुरक्षेची जाणीव झाली कि त्याची जोखीम पत्करण्याची क्षमता वाढते आणि जेव्हा जोखीम पत्करण्याची क्षमता वाढते तेव्हा तो वैज्ञानिकांनी सांगितलेले प्रयोग करायला तयार होतो. एक साखळी तयार होते. तर पंतप्रधान पीक विमा योजनेत एक खूप मोठी ताकद आहे. लॅब टू लॅन्ड प्रक्रियेला पुढे नेण्याच्या दिशेने काम सुरु आहे, मी पुन्हा स्वामिनाथनजींना मनापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. देशाची खूप सेवा केली आहे. देशातील शेतकऱ्यांची खूप सेवा केली आहे. देशातील गरीबांचे पोट भरण्यासाठी एखाद्या तपस्वीप्रमाणे काम केले आहे.
खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद !