PM Modi inaugurates the new headquarters building of the Archaeological Survey of India in New Delhi
We need to device new ways to promote civil and social involvement in preserving and promoting our historical heritage: PM
Until we feel proud of our heritage we will not be able to preserve it, says PM Modi
PM Modi says that India must take pride in the rich history of our nation

सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी या देखण्या आणि आधुनिक भवनाच्या वास्तूसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या संस्थेचे आयुष्य 150 वर्षे झाले आहे, त्याचाच अर्थ ही संस्था स्वतःच एक आता पुरातत्वाचा विषय बनली आहे. गेल्या 150 वर्षात ही संस्था कुठून निघून, कुठल्या कुठे पोहोचली असेल, कशा पद्धतीने तिचा विस्तार झाला असेल, व्याप्ती विस्तारली असेल. या संस्थेने काय काय कमावलं असेल आणि संस्थेमध्ये कशा कशाची पाळंमुळं रोवली गेली असतील. एका संस्थेची 150 वर्षे म्हणजेच त्या संस्थेच्या आयुष्याचा विचार करता अगदी प्रदीर्घ म्हणता येईल इतका मोठा कालावधी आहे.

एएसआय म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आपल्या या प्रदीर्घ 150 वर्षांचा इतिहास दर्शवणारा काही कालपट आहे की नाही, हे मला माहीत नाही. हे सुद्धा एक पुरातत्व जतनाचेच काम आहे. जर असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे. नसेल तर ते करण्याची आवश्यकता आहे. अनेक लोकांनी आत्तापर्यंत या विभागाचा कार्यभार सांभाळला असेल. कोणत्या तरी एका विशिष्ट कल्पनेतून या विभागाचे कार्य सुरू झाले असणार. त्यानंतर कशा कशाप्रकारे त्याचा विस्तार झाला असेल, तंत्रज्ञानाने त्यामध्ये कशा पद्धतीने प्रवेश केला असेल, अशा अनेक गोष्टी असतील आणि ‘एएसआय’ने केलेल्या कामाचा तत्कालीन समाजावर प्रभाव निर्माण झाला असेल, अशा अनेक गोष्टी असू शकतील. या संस्थेने या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या विश्वातल्या इतर लोकांना कशा प्रकारे आकर्षित केले असेल. आजही संपूर्ण जगाचा विचार करताना, आपल्या देशातल्या ज्या पुरातत्वीय गोष्टी आहेत त्या विश्वाच्या अनुमानाप्रमाणे आणि त्यांच्या प्रत्यक्ष गोष्टींप्रमाणे सिद्ध करण्यासाठी खूप मोठे योगदान देत आहेत. आपल्याला माहीत आहेच अनेक प्रकारे विज्ञानाचा विकास झाला आणि आता अंतराळ तंत्रज्ञान आले आहे. ज्या प्राचीन मान्यता, गोष्टी होत्या त्या मानवी जीवनाशी निगडीत होत्या त्यामुळे वर्तमान काळातील विचार आणि प्राचीन गोष्टी यामध्ये खूप तीव्र संघर्ष सुरू होता. अजूनही आहे. दोन वेगवेगळे विचार प्रवाह निर्माण झाले आहेत. ऐतिहासिक जग जगताला उद्ध्वस्त करण्याचं काम आजच्या तंत्रज्ञानाने केले आहे. सरस्वतीच्या अस्तित्वाचा स्वीकार न करणाराही एक वर्ग होता. परंतु अंतराळ तंत्रज्ञान आता एक मार्ग दाखवत आहे. नेमके काय होते, काय नव्हते, याची माहिती हे तंत्रज्ञान देत आहे. हे काही काल्पनिक नाही, नव्हते असंही हे तंत्रज्ञान सांगत आहे. आर्य बाहेरून आले की नाही, याविषयी संपूर्ण जगामध्ये वाद-विवाद झाला आहे. आणि काही लोकांचा तर हा खूपच आवडीचा विषय आहे. विशेष म्हणजे या विषयावर वाद घालायला त्यांना फार आवडते. ज्या ज्याप्रमाणात तंत्रज्ञानाच्या मदतीने पुरातत्व विभागात काम सुरू झाले आहे, तरीही एक मोठा वर्ग नवनवीन चर्चांना आमंत्रण देत आहे.

मला असं वाटतं की, हे पुरातन शिलालेख अथवा काही पुरातन गोष्टी किंवा काही पाषाण म्हणजे हे काही निर्जीव जग नाहीए. इथं प्रत्येक पाषाण, प्रत्येक दगड बोलतोय. पुरातत्वासंबंधी जोडला गेलेला प्रत्येक कागद म्हणजे स्वतःची एक कथा सांगणारी वस्तू आहे. पुरातत्वामधून काढल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मानवाच्या पुरुषार्थाची, पराक्रमाची, स्वप्नांची, कथा आहे. एक खूप मोठा, भव्य शिलालेख अंतिमपणे स्मरणनोंद बनत असतो आणि म्हणूनच पुरातत्व क्षेत्रामध्ये काम करणारे लोक एखाद्या वीराण भूमीमध्ये कामाला प्रारंभ करत असतात. अनेक वर्षे तर त्यांच्याकडे कुणाचे लक्षच जात नाही. ज्याप्रमाणे एखादा संशोधक प्रयोगशाळेमध्ये राहून आपल्या कामामध्ये अगदी गढून जातो आणि भविष्यासाठी काही नवे शोधून काढत असतो. त्यामुळेच संपूर्ण जगासमोर काहीतरी नवीन चमत्कार येत असतो. पुरातत्व क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्तीही एखाद्या वीराण जंगलामध्ये, डोंगरांवर, तर पाषाण-दगडांमध्ये स्वतःला विसरून काम करण्यात मग्न होतात. दहा-दहा, वीस-वीस वर्षे ते सतत श्रम करीत राहतात, किती काळ लोटला हे लक्षातही येत नाही. आणि मग एकदम अचानक त्यांच्या हाती एखादी अनोखी गोष्ट लागते. ती जगासमोर ‘शोध प्रबंध’ म्हणून येते. त्यावेळी कुठे त्यांच्याकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष जाते. त्यावेळी हे नेमके काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. आपल्या इथे चंडीगढजवळच एक छोटीशी डगर आहे. सामान्य लोकांसाठी ती साधीसुधी लहानशा डोंगरासारखी डगर आहे. परंतु फ्रान्सचे काही लोक आणि आपल्या परिसरातील काही लोकांनी त्या डगरीला भेट देवून पाहणी केली. जीवशास्त्राचे अभ्यासक आणि पुरातत्व खात्याच्या काही लोकांनी त्याविषयी अभ्यास केला आणि त्यांनी शोधून काढले की, या डगरीच्या परिसरामध्ये संपूर्ण विश्वामधले सर्वात पुरातन जीवांचे अवशेष उपलब्ध आहेत. आता फ्रान्सचे राष्ट्रपती आले होते, त्यावेळी त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला होता की, ज्याठिकाणी आपल्या देशाच्या लोकांना संशोधनाचं काम केलं आहे, ते स्थान पाहण्यासाठी मला जायचं आहे, मीही त्यांना त्या स्थानी घेवून गेलो होतो. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अशा काही गोष्टी मान-मान्यतांपेक्षाही खूप वरच्या दर्जाच्या, वेगळ्या असतात. नव्या पद्धतीने विचार करण्यासाठी एखादा पुरातत्ववेत्ता, या क्षेत्रामध्ये काम करणारा पुरातत्व संशोधक म्हणून खूप मोठे परिवर्तन घडवून आणत असतो.

काही काही वेळेस तर इतिहासालाही आव्हान देण्याचं सामर्थ्‍य त्या पाषाणांमधून निर्माण होत असते. कदाचित अशा आव्हानांचा स्वीकार सुरूवातीला केला जात नाही. परंतु आपल्या देशामध्येही कधी कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अतिपरिचय झालेला असतो, त्या गोष्टींची आपल्याला खूप सवय झालेली असते, त्यामुळे त्याची आपल्याला फारशी किंमत वाटत नाही.

साधारणपणे एखाद्याकडे जर अमुक एक गोष्ट किंवा वस्तू नसेल, तर त्याला त्या गोष्टीचे खूप अप्रूप वाटत असते. तो जर ती गोष्ट मिळाली तर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवत असतो. कारण त्यालाच त्या गोष्टीचं मूल्य माहिती असतं. अमेरिकेच्या सरकारने पाठवलेल्या निमंत्रणावरून मी एकदा एका शिष्ठमंडळाबरोबर अमेरिकेला गेलो होतो, त्यावेळची एक आठवण मला इथं नमूद करावीशी वाटतेय. अमेरिकेला गेल्यानंतर तिथं आम्ही कोणकोणत्या स्थळांना भेटी देणार, आम्ही कुठं जावू इच्छितो, काय काय पाहू इच्छितो, तिथली कोणती, कोणत्या विषयाची माहिती घेण्यास आम्ही उत्सूक आहोत, अशी सगळी माहिती आमच्याकडून भरवून घेण्यात आली होती. त्यावेळी मी लिहिले होते की, अमेरिकेतल्या छोट्या गावातली रूग्णालये कशी आहेत, हे मला पहायचे आहे. अमेरिकेतल्या लहान गावातली शाळा कशी असते, हे मला पहायचे आहे. आणि त्याचबरोबर मी लिहिले होते की, आपल्याकडील सर्वात पुरातन जी गोष्ट आहे आणि ती वस्तू आपल्याकडे आहे, याचा आपल्याला अभिमान, गर्व वाटतो, ती गोष्ट मला पहायची आहे. तसे एखादे स्थान असेल तर मला त्या स्थानाला भेट द्यायची आहे, तिथे मला घेवून जावे, असे मी लिहिले होते. त्यावेळी मला बहुतेक पेनिनसिल्व्हानिया राज्यात घेवून गेले होते. तिथं एक खूप मोठा खंड होता. तो त्यांनी मला दाखवला आणि मोठ्या गर्वाने मला सांगितलं की, हा खंड चारशे वर्ष प्राचीन आहे. त्यांच्या दृष्टीने हा खंड खूप जुना- प्राचीन आणि गर्वाचा विषय होता. आणि आपल्याकडे तर दोन हजार, पाच हजार वर्षांइतक्या पुरातन गोष्टी आहेत, त्या मात्र ‘ठीक, ठीक’ आहेत. याचाच अर्थ पुरातन, प्राचीन वस्तू, वास्तू, गोष्टी यांच्यापासून आपण जे तोडले गेलेले आहोत, त्यामुळे आमचे खूप मोठे, कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

वास्तविक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण या मनःस्थितीतून बाहेर यायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने एका विशिष्ट विचाराने संपूर्ण हिंदुस्तानला अगदी जणू जखडून टाकलं होतं. या विचारामुळे आपल्या पुरातन, गर्व करण्यालायक गोष्टींना गुलाम मानण्यात आलं. जोपर्यंत आपल्याला या महान वारशाविषयी, आपल्या संस्कृतिक परंपरेविषयी गर्व, अभिमान वाटत नाही, तोपर्यंत स्वतःहून या वारशाला सजवण्याचे, नटवण्याचे, तिची काळजी घेण्याचे विचार आपल्या मनातही येणार नाहीत. एखाद्या गोष्टीविषयी, वस्तूविषयी आपल्याला जर गर्व, अभिमान असेल तरच आपण ती गोष्ट चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवत असतो. तिला सजवून, सांभाळून ठेवत असतो. आपल्या दृष्टीने तो महत्वाचा घटक असतो, म्हणून आपल्याला त्याचा गर्व वाटत असतो. इतरांच्या दृष्टीने ती अतिशय साधी, सामान्य गोष्ट असते. माझं बालपण एका लहानशा गावामध्ये गेलं. माझं भाग्य थोर म्हणून मी त्या गावामध्ये जन्माला आलो, असं मला वाटतं. माझ्या बालपणच्या गावाला एक जीवंत इतिहास आहे. त्या स्थानी अनेक शतकांपूर्वी मानव व्यवस्था विकसित झाली आहे, अशी माहिती ही यू एन त्संग यांनी लिहून ठेवली आहे. या स्थानी बौद्ध भिक्षूंचे एक मोठे विद्यापीठ अस्तित्वात होते. त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आजही तिथे आहेत. आमच्या गावांतल्या शाळेमध्ये एक शिक्षक होते, ते आम्हाला नेहमी सांगायचे की, समजा तुम्ही गावामध्ये कुठे गेलात आणि तुम्हाला काही लिहिलेला, वेगळा दगड मिळाला तर तो सांभाळून आणा आणि शाळेतल्या या कोनाड्यामध्ये ठेवून देत जा. त्या शिक्षकांनी हे वारंवार सांगितल्यामुळे आम्हाला एक सवयच लागली होती, जर कुठे काही अशी पुरातन वस्तू दिसली, एखादा वेगळा दगड दिसला, मग त्या दगडावर अगदी दोन अक्षरंही लिहिलेली असली तरी आम्ही तो दगड उचलून शाळेतल्या त्या कोनाड्यामध्ये ठेवत होतो. आता आम्ही साठवलेल्या त्या दगडांचे नंतर काय झाले मला काहीच माहीत नाही. परंतु मुलांना एक वेगळी आणि चांगली सवय मात्र त्या शिक्षकांमुळे लागली होती. रस्त्याच्या कडेला असाच पडलेल्या दगडालाही खूप महत्व आणि कितीतरी किंमत-मूल्य असते, हे मला त्या शाळकरी वयामध्ये समजले होते. एका शिक्षकाच्या जागरूकतेमुळे आमच्यावर काही गोष्टी जतन करून ठेवायच्या असतात हा संस्कार त्या वयामध्ये झाला होता. हे संस्कार मनामध्ये आत वर अगदी खोल रूजले गेले आहेत. त्यामुळे अंतर्मनात एक प्रकारची पार्श्वभूमी तयार झाली आहे, असे मला वाटते.

अहमदबादमध्ये डॉ. हरि भाई गोधानी वास्तव्य करीत होते, त्यांच्या कार्याविषयी मला चांगले स्मरण आहे. वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ. गोधानी यांच्या वैशिष्टपूर्ण स्वभावाविषयी मी आधी खूप ऐकलं होतं म्हणून मी त्यांना अगदी मुद्दाम भेटायला गेलो होतो. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने फियाट गाडी वापरली जायची. अलिकडच्या काळासारख्या नवनवीन गाड्या त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. डॉ.गोधानी यांना मी भेटायला गेलो, त्यावेळी त्यांनी मला आपली 20 वी फियाट गाडी दाखवली आणि म्हणाले मी आत्तापर्यंत 20 गाड्या अगदी मोडून-तोडून, डबडा करून टाकल्या आहेत. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी मी आपली फियाट गाडी काढतो आणि भटकायला जातो. जंगलांमध्ये फिरतो, अनेक पुरातन पाषाण, दगडं आहेत, ते पहायला जातो. सगळीकडे अतिशय कच्चे रस्ते आहेत. त्यामुळं एक वर्षापेक्षा जास्त काळ माझी गाडी टिकत नाही, चालत नाही. मी पाहलेल्यांपैकी एखाद्या एकट्या व्यक्तीने पुरातन वस्तू, गोष्टींचा केलेला इतका मोठा संग्रह डॉ. गोधानी यांचाच असावा. मी त्याकाळी पाहिले होते, तेव्हा त्यांच्याकडे प्रचंड संख्‍येने पुरातन वस्तूंचा संग्रह होता. ते स्वतः वैद्यकीय व्यावसायिक होते आणि त्यांनी मला काही चित्रफिती दाखवल्या होत्या. त्यावेळी मी वयानं तसा बराच लहान होतो. परंतु वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याची, जाणून माहिती घेण्याची जिज्ञासा माझ्याकडे खूप होती. त्यावेळी त्यांनी मला एका पाषाणामध्ये कोरलेले शिल्प दाखवले होते. एका गर्भवती महिलेचे ते शिल्प होते. त्यांच्या अभ्यासानुसार आणि माहितीनुसार ते पाषाणशिल्प आठशे वर्षांपूर्वीचे होते. त्यामध्ये गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया केलेली असल्याचे एका बाजूचे दृश्य दाखवले होते. विशेष म्हणजे पोटाच्या कातडीच्या आतमध्ये किती स्तर असतात, ते ही या पाषाणामध्ये कोरण्यात आले होते. पोटामध्ये अर्भक कशा पद्धतीने झोपलेले असते, त्याचे ते रूप कसे दिसते, याचे अगदी बारकाव्यांसहीत ते शिल्प कोरलेले होते.

मला कोणीतरी सांगत होतं की, वैद्यकीय शास्त्रामध्ये हा शोध अलिकडे काही शतकांपूर्वी लागला आहे. मात्र आमच्याकडच्या एका शिल्पकाराने जवळपास आठशे वर्षांपूर्वी ही गोष्ट पाषाणामध्ये कोरली होती. त्यानंतर विज्ञानाने कातडीच्या आत किती स्तर असतात, हे सिद्ध केले आहे. अर्भक मातेच्या गर्भामध्ये कशा पद्धतीने समावले जाते, कशापद्धतीने आत राहत असते, हेही या शिल्पामध्ये कोरले गेले होते. आता आपण कल्पना करू शकतो की, आमच्याकडे असलेले ज्ञान किती सखोल होते. त्याचबरोबर कशा पद्धतीने काम केले जाते, याची माहिती डॉ. गोधानी यांनी एका चित्रफितीव्दारे मला दाखवली होती.

याचाच अर्थ आमच्याकडे जर असा मौलिक ठेवा असेल तर त्या काळामध्ये या संदर्भातले काही ना काही ज्ञान असणारच नाहीतर कातडीच्या आतील स्तराची माहिती त्या पाषाण शिल्पामध्ये कशी काय कोरली गेली असणार, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. याचा अर्थ आमचे विज्ञान कितीतरी पुरातन, जुने असेल. त्यातूनच आपल्याला आजही ज्ञान मिळतेय. म्हणजेच सृष्टी स्वतःच एक सामर्थ्‍यवान घटक आहे आणि त्याचा गर्व, अभिमान आपल्याला असेल तरच त्यातील बारकावे शोधण्याचे काम केले जाते.

जगामध्ये एक खूप चांगली गोष्ट जाणवते, ती म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना विश्वातल्या या पुरातन गोष्टी, अवशेष यांच्यामध्ये रस असतो, आवड असते, त्याठिकाणी या क्षेत्रामध्ये लोकांच्या सहभागातून आणि जनतेच्या सहकार्यातून खूप चांगले काम केले जाते. तुम्ही जगातल्या कोणत्याही स्‍मारकाला, स्मृतिस्थळाला भेट द्या, सेवानिवृत्त लोक अगदी गणवेश घालून तिथं येतात, मार्गदर्शकाच्या रूपात काम करतात. पर्यटकांना वास्तूमध्ये घेवून जातात, तिथल्या दुर्लभ गोष्टी दाखवतात, अनेक गोष्टी जतन करून, सांभाळून ठेवतात. समाजाकडूनच ही जबाबदारी उचलली जात असते. आता आपल्या देशातही अशाच प्रकारे काम केले गेले पाहिजे. आपल्याकडच्या लोकांचा हा स्वभाव बनला पाहिजे. आपल्याकडच्या ज्येष्ठ नागरिकांचा एक समूह बनवून त्यांच्यामार्फत हे काम कशा पद्धतीने करून घेता येईल, याचा विचार केला पाहिजे. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग यांच्यापेक्षाही समाजाच्या भागीदारीतून आपल्या वारशाचे जतन करण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे होवू शकणार आहे. परंतु तिथं येणा-या नागरिकांनीही अगदी कटाक्षाने त्या बागेतली फूलं तोडली जाणार नाहीत की रोपांना त्रास दिला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लोकांना एखादी वास्तू, बगिचा अशा पद्धतीने जतन केली तर शतकानुशतके तिचे सौंदर्य कायम राहणार आहे. जनभागीदारीची एक खूप मोठी शक्ती असते आणि म्हणूनच जर आपल्या समाज जीवनामध्ये या गोष्टी अगदी चांगल्या प्रकारे रूळवल्या तर खूप लाभ होवू शकणार आहे. अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी लोकांना आमंत्रित करून त्यांचा सहभाग वाढवण्याची आज आवश्यकता आहे. जनसहभागीता वाढली तर खूप मोठे कार्य होवू शकणार आहे.

आमच्याकडे असलेल्या ‘कॉर्पोरेट’ जगताचीही यासाठी चांगली मदत घेता येवू शकणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मंडळींना जर समाजसेवा करायची असेल तर त्यांनी पुढे यावे. महिन्यामध्ये 10 तास, 15तास जर कुणाला समाजसेवा करण्याची इच्छा आणि वेळ असेल तर एखाद्या स्मारकाच्या देखरेखीचे काम करावे. समाजसेवेसाठी असे प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते. हळू -हळू अशा गोष्टींना आपोआपच मूल्य प्राप्त होत असते.

कोणत्याही स्मारकाचे जतन, देखभालीचे काम फक्त भारतीय पुरातत्व खात्यानेच करावे, हे काही मला पटत नाही. याविषयी फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटतं. या कामामध्ये पर्यटन विभाग, सांस्कृतिक विभाग संयुक्तपणाने काम करू शकतात. इतकेच नाही तर सरकार आणि इतर विभागांनी या कामामध्ये सहभागी व्हावे. राज्य सरकारांचे विभागही या कामात सहभागी होऊ शकतात.

आपल्या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, वारशा जतन करण्यासाठी 100 शहरे अतिशय महत्वाची आहेत, असे आपण आत्ता मानले. म्हणजे जतन करण्याच्या दृष्टीने ती अतिशय मौल्यवान वारसा या 100 शहरांना लाभला आहे, असे आत्ता आपण मानले तर त्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. ही 100 शहरे म्हणजे पर्यटनासाठी खूप चांगली स्थाने असणार आहेत. आता अशा वेळी त्या शहरातल्या मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमामध्येच त्या शहराचा पुरातन इतिहास, वास्तू, गोष्टी यांचा समावेश केला पाहिजे. त्या शहराचा इतिहास मुलांना शिकवला गेला पाहिजे. असे झाले तरच या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत त्या शहराच्या इतिहासाची माहिती पोहोचणार आहे. या पिढीकडून पुढच्या पिढीकडे इतिहासातली योग्य माहिती पोहोचण्यास मदत होईल. नवीन पिढीही तितक्याच क्षमतेने आणि समर्थतेने तयार होईल.

आणखी एक कार्य संस्थात्मक पातळीवर करता येईल असं मला वाटतं. आपल्याला वारसा जतन करता येईल, अशा ऐतिहासिक 100 शहरांचा विचार आम्ही करतो आहोत. अशा शहरांविषयी माहिती देणारा ‘ऑनलाईन‘ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करता येईल का, यासाठी प्रयत्न केला जावू शकतो. असा नियमित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण करणारी मंडळी शहरामध्ये आलेल्या पर्यटकांना चांगली, योग्य माहिती देवू शकतील. आपल्या शहराचा इतिहास त्यांनी बारकाईने अभ्यासलेला असल्यामुळे प्रवाशांनाही चांगली, भरपूर अगदी सनावळी, वर्षांसह माहिती मिळेल. आपण उत्तम दर्जाचे प्रवासी मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड) तयार करू शकतो का, यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते.

काही वर्षांपूर्वी मी एकदा दूरचित्रवाणी वाहिन्यांशी यासंबंधी चर्चा केली होती. अर्थात त्यावेळी मी काही पंतप्रधान नव्हतो. त्यांना मी म्हणालो होतो, चला आपण ‘टॅलेंट हंटिंग’चे काम करूया. चांगलं गाणं गात असलेली मुलं, नृत्य करणारी मुलं खूप उत्तमरितीने आपली कला सादर करत असतात. आपल्या देशातल्या या मुलांकडे खूप ‘टॅलेंट’ आहे, त्यांच्यामधली प्रतिभा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत झाली पाहिजे. अशाच प्रकारे ‘सर्वोत्कृष्ट गाईड-मार्गदर्शक-वाटाड्या अशी एक ‘टॅलेंट हंट’ स्पर्धा घेता येईल का हे पाहूया. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या स्पर्धकाने त्याच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही एका शहराची माहिती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना द्यावी. त्या गाईडने चांगली, आकर्षक वेशभूषा करावी. वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात आणि पर्यटक मार्गदर्शक बनून लोकांना चांगल्या पद्धतीने आपले शहर दाखवावे. या स्पर्धेतून अनेक फायदे होवू शकतील असे मला वाटते. यामुळे हिंदुस्तानामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, देशाचा बाहेर प्रचार चांगला होईल. हळू-हळू चांगले मार्गदर्शक तयार होतील. आणि बिना मार्गदर्शक एखादे शहर, स्मारक,ऐतिहासिक वास्तू पाहणे योग्य नाही, ही भावना पर्यटकांमध्ये रूजेल.

आपण कोणतीही वास्तू पाहिली आणि त्यामागचा इतिहास चांगल्या पद्धतीने जाणून घेतला तर आपल्या मनात ती वास्तू अगदी घर करून बसते. त्या स्मारकाविषयी, वास्तूविषयी मनामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते. इथं मी एक उदाहरण सांगतो. समजा आपल्याला कोणीतरी एखाद्या कक्षामध्ये बंद करून ठेवले आणि तुमचा फक्त हात बाहेर येवू शकेल एवढीच जेमतेम फट त्या बंद दाराला ठेवली. लोकांना सांगितले की, या बाहेर आलेल्या हाताशी ‘हस्तांदोलन’ करून पुढे जावे, तर खूप लांब रांगा लागतील असा विचार तुमच्या मनात आला असेल. पण कदाचित तसे होणार नाही. आलेले लोक नाना विचार करतील. कोणाचा हात आहे, आत एखादे प्रेत असेल आणि बाहेर त्याचा हात लटकत असेल, आपण प्रेताशी कसे काय हस्तांदोलन करायचे. परंतु तेच त्यांना सांगितले की, हा तर सचिन तेंडुलकरचा हात आहे. तर त्याच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी कोणीही सोडणार नाहीच. प्रत्येकजण सचिनचा हात हाती घेण्यासाठी धडपड करणार. हे सांगण्यामागे हेतू हा आहे की, जर आपल्याला काही माहिती असेल, तर त्याबद्दल आपुलकी वाढत जाते. म्हणूनच आपल्याला या महान वारशाची, अमूल्य ठेव्याची माहिती असणे खूप आवश्यक आहे.

एकदा मी कच्छच्या समोरच्या वाळवंटाचा विकास करण्याची इच्छा व्यक्त केली. आता वाळवंटी प्रदेशामध्ये पर्यटन क्षेत्र विकसित करणे, हे खूपच मोठे आव्हान होते. प्रारंभी तर मी तिथल्या मुलांना प्रशिक्षित केलं. त्यांनी गाईड-मार्गदर्शक म्हणून कसं काम केलं पाहिजे, याचे त्यांना प्रशिक्षण दिलं. मीठ कसं बनवलं जातं, हे आलेल्या पर्यटकाला कसं सांगायचं, मीठ बनवायला कसं शिकवायचं, वाळवंटामध्ये मिठाचं कसं महत्व आहे, याचं प्रशिक्षण मी कच्छच्या स्थानिक मुलांना आधी दिलं. आपल्याला जाणून नवल वाटेल, परंतु माझा अनुभव सांगतो, तो ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आठवी, नववी इयत्तेमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीने, सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये मीठ कसं बनवलं जातं, मिठाची शेती कशी केली जाते, ही सर्व प्रक्रिया कशी असते, केव्हा काय,काय केलं जातं. या भागात कोणत्या ब्रिटिशाने सर्वात प्रथम मिठाची शेती केली, काळानुसार त्यामध्ये कसे बदल झाले हे, ती मुलं पर्यटकांना समजावून सांगतात. आता लोकांनाही त्यामध्ये खूप रस निर्माण होवू लागला आहे. विशेष म्हणजे त्या मुलांना रोजगार मिळायला लागला आहे. त्यांचे काम पाहून मला तर खूप नवल वाटलं, इतक्या सफाईने हे विद्यार्थी आपलं काम करायचे. आता तंत्रज्ञान आलं आहे. माफ करा, मी जे काही सांगतोय, त्याबद्दल वाईट वाटून घेवू नका. विश्व, जग आता कसं चालतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज अंतराळ तंत्रज्ञानामुळे हजारो मैल उंचीवरून, अवकाशातून दिल्लीतल्या कोणत्या गल्लीमध्ये कोणती स्कूटर कशी पार्क केली आहे, तिचा क्रमांक काय आहे, त्याचे छायाचित्र आपण घेवू शकतो. परंतु स्मारकासंबंधी दिलेल्या माहितीच्या फलकाचे छायाचित्र घेण्यास मनाई आहे. आता काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, तंत्रज्ञान बदलले आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आमच्या राज्यात सरदार सरोवर धरणाचे काम सुरू होते. त्यावेळी काम पाहण्यासाठी अनेक लोक धरणस्थानाला भेट देत होते. बरेच वेळा तर धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यानंतर वेगानं पडणारे पाणी पाहण्यासाठी लोक गर्दी करीत होते. धरणाच्या परिसरामध्ये छायाचित्र घेण्यासाठी मनाई असलेले मोठ-मोठे फलक लावून ठेवले होते. त्याचबरोबर छायाचित्र घेतलेच तर दंडात्मक कारवाई केली जाईल वगैरे वगैरे सूचना त्यावर दिलेल्या होत्या. मी तर उलटीच कृती केली. अर्थात मी मुख्यमंत्री होतो, म्हणूनच ते करू शकलो. मी जाहीर केलं की, या स्थानाचे जे कोणी अतिशय सुंदर, उत्कृष्ट छायाचित्र काढेल, त्याला खास पारितोषिक देण्यात येईल. मात्र त्यासाठी अट ठेवण्यात आली की, काढलेले छायाचित्र आपल्या संकेतस्थळावर अपलोड केले पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल, लोक एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे काढून अपलोड करायला लागले. त्यानंतर मी जाहीर केलं की, आता या स्थानाला भेट देण्यासाठी, छायाचित्र काढण्यासाठी तिकीट लावण्यात येईल. त्यावर डिजिटल क्रमांक असतील. तिकिटाच्या माध्यमातून पर्यटकांची नोंदणी होईल आणि ज्यावेळी पाच लाख पर्यटक होतील, डिजिटल तिकिटावर ज्याचा पाच लाख हा क्रमांक असेल, त्याचा सत्कार करण्यात येईल. माझ्यासाठी नवलाची गोष्ट होती, ती म्हणजे काश्मीरच्या बारामुल्‍ला इथं वास्तव्य करीत असलेल्या दांपत्याला हा गौरव प्राप्त झाला. त्या काश्मीरी पर्यटक दांपत्याचा आम्ही सत्कारही केला होता. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, जनभागीदारीची ताकद किती प्रचंड असते. या सरदार धरणाच्या स्थानीही मी काही विद्यार्थ्‍यांना तयार केलं होतं. आठवी, दहावीची मुलं पर्यटकांसाठी गाईड म्हणून चांगलं काम करत होती. हे धरण बनवण्यास कधी प्रारंभ झाला. त्याला परवाना कसा मिळाला, यासाठी किती सिमेंट वापरण्यात येत आहे, किती प्रमाणात लोखंड वापरले जात आहे. धरणाची किती लक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे, त्याचा लाभ किती गावांना, किती हेक्टर शेतीला होणार आहे, याची सगळी माहिती ही आदिवासी मुलं खूप चांगल्या पद्धतीने देत होते. ते पाहून मला वाटतं की, आपल्या देशातल्या कमीत कमी शंभर ऐतिहासिक शहरांमध्ये अशाच प्रकारे नव्या पिढीतल्या मुलांना आपण तयार केलं पाहिजे. हीच मुलं पुढे ‘व्यावसायिक मार्गदर्शक’ बनू शकतील. त्यांना आपला इतिहास अगदी मुखोद्गत असेल. अशा पद्धतीने पर्यटकांसाठी चांगले, जाणकार मार्गदर्शक बनवण्याचे काम आपण करू शकलो तर पाहता पाहता भारताकडे असलेल्या या महान, अमूल्य वारसाविषयी बाहेरच्या जगाला खूप काही सांगू शकणार आहे. हजारों वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या परंपरा, आपला वारसा, आपली संस्कृती, आपला इतिहास यांची ही गाथा आहे. ही गाथा म्हणजे विश्वाच्या दृष्टीने एक आश्चर्य आहे. अनेक नवलकथा इथं आहेत. या विश्वाला आपण आणखी काही देण्याची गरज नाही. आमच्या पूर्वजांनी जे काही मागे ठेवले आहे, तो वारसा फक्त जतन करून ठेवायचा आहे आणि त्याची माहिती संपूर्ण जगाला करून द्यायची आहे. हे काम चांगल्या पद्धतीने केले तर हिंदुस्तानच्या पर्यटन क्षेत्राला कोणीही रोखू शकणार नाही. आपल्या पूर्वजांचा पराक्रम, त्यांनी केलेले महान कार्य यांचे विस्मरणात टाकून देणारे पुत्र आपण नक्कीच नाही. उलट त्यांचा वारसा चांगल्या प्रकारे जतन, संवर्धन करून तो जगासमोर मांडणारी मंडळी आपण आहोत. म्हणूनच अतिशय अभिमानाने, गर्वाने आणि मोठ्या दिमाखदारपणाने हा वारसा आपण प्रस्तुत करणार आहोत आणि विश्वाला हा महान वारसा पाहण्याची, त्याला भेट देण्याची, त्याची पूजा करण्याची इच्छा व्हावी, असे कार्य आपण करणार आहोत. या आत्मविश्वासाने आपण सर्वजण मिळून पुढे जावूया. ही अपेक्षा ठेवून या वारशाच्या भवनातून हीच भावना प्रज्वलित व्हावी, असे मला वाटते. ही भावना मनात बाळगून, मी आपल्याला खूप-खूप शुभेच्छा देतो.

खूप-खूप धन्यवाद !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report

Media Coverage

Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles passing away of former Prime Minister Dr. Manmohan Singh
December 26, 2024
India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji: PM
He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic policy over the years: PM
As our Prime Minister, he made extensive efforts to improve people’s lives: PM

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the passing away of former Prime Minister, Dr. Manmohan Singh. "India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji," Shri Modi stated. Prime Minister, Shri Narendra Modi remarked that Dr. Manmohan Singh rose from humble origins to become a respected economist. As our Prime Minister, Dr. Manmohan Singh made extensive efforts to improve people’s lives.

The Prime Minister posted on X:

India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic policy over the years. His interventions in Parliament were also insightful. As our Prime Minister, he made extensive efforts to improve people’s lives.

“Dr. Manmohan Singh Ji and I interacted regularly when he was PM and I was the CM of Gujarat. We would have extensive deliberations on various subjects relating to governance. His wisdom and humility were always visible.

In this hour of grief, my thoughts are with the family of Dr. Manmohan Singh Ji, his friends and countless admirers. Om Shanti."