QuoteEven in the midst of struggle, Shivaji Maharaj remained a torchbearer of good governance: PM
QuoteDevelopment is the solution to all problems, it is the way ahead: PM
QuoteThe strength of 125 crore Indians will bring about change in this nation: PM Modi

व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विशाल संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधूभगिनिनो,

तुम्ही कल्पना करू शकता की मी आज किती आनंदाचा अनुभव घेतो आहे. भारतीय जनता पार्टीने जेव्हा २०१४ सालच्या निवडणुकीत मला प्रचाराची जबाबदारी दिली तेव्हा मी पहिल्यांदा  रायगड किल्ल्यावर आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर बसून मी विचार केला की या पराक्रमी महापुरुषाने, हिंदुस्थानच्या इतिहासात सुशासन आणि प्रशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आणि आपल्या योग्यतेच्या आणि क्षमतेच्या आधारावर त्यांनी हा इतिहास रचला होता. चहुबाजूनी संकटानी घेरलेले असताना, संघर्षमय जीवन जगताना त्यांनी हा इतिहास निर्माण केला कदाचित इतिहासात असे दुसरे व्यक्तिमत्व सापडणार नाही ज्याने सततच्या संघर्षमय जीवनातही सुशासानाच्या उज्ज्वल परंपरेला कायम ठेवलं , नव्हे अधिकच मजबूत बनवले. ही परंपरा पुढे नेली.

इतिहासकारांच्या, शिवाचरित्रकारांच्या, रंगकर्मीच्या नजरेतून जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बघतो, तेव्हा ते घोड्यावर स्वार आणि हातात तलवार असे असते, ते पाहून आपल्या मनात शिवरायांची केवळ एकच प्रतिमा तयार झाली आहे. मात्र शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. जर आपण भगवान रामचंद्राचे मूल्यांकन फक्त रावण वधाने केले, श्रीकृष्णाचे मूल्यांकन केवळ कंसवधाने केले किंवा महात्मा गांधींचे मूल्यांकन फक्त इंग्रजाना भारतातून पळवून लावले, याच घटनेने केले तर, आपण या महापुरुषांचे संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घेण्यात अपयशी ठरू, हे आपल्याला मान्य करावे लागेल. प्रभू रामचंद्रानी केलेला रावणाचा वध ही घटना त्यांच्या आयुष्यातल्या अनेक पैलूपैकी एक पैलू होता, मात्र त्यांच्या आयुष्यात असे इतर अनेक पैलू होते जे आजही भारतीय समाजमनाला प्रभावित करतात. श्रीकृष्णाच्या आयुष्यात कंस ही केववध ही केवळ एक घटना होती. युध्दाच्या मैदानावर कृष्णाने जो गीतेचा संदेश जगाला दिला, त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही, की ही भूमी अशा व्यक्तीना जन्म देते, जे युध्दाच्या मैदानावरही शतकानुशतके प्रेरणादायी ठरेल असे चिंतन जगाला देऊ शकतात. माहात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले, मात्र त्यासोबत गांधीजीनी समाजातल्या दुष्प्रवृत्तीविरोधाताही लढा दिला, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चेतना भरण्याचा प्रयत्न केला, आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. या कार्याला आपण कधीच कमी लेखू शकत नाही. तशाच प्रकारे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व केवळ घोडा, तलवार, युध्द, लढाई यापुरते मर्यादित नाही. ते एक पराक्रमी वीर होते. पुरुषार्थाने संपन्न होते, आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत होते. मात्र आपण कल्पना करा, शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात चेतना जागवण्याचा प्रयत्न केला, आत्मसन्मान जागवण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण कमी लेखू शकत नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ तलवार, घोडा, युध्द, लढाई इतपर्यंत मर्यादित राहत नाही.ते पराक्रमी वीरपुरुष होते, आपल्या सगळयांचे प्रेरणास्त्रोत होते. जशी प्रभू रामचंद्रानी लहान लहान वानरांची सेना बनवली, वानरसेना बनवली. त्यांच्या भरवशावर युध्द जिंकले.त्यामागे  किती मोठे संघटन कौशल्य होते ! छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील छोट्या छोट्या मावळ्यांना एकत्र केले आणि युद्धासाठी तयार केले. यातूनच त्यांनी खूप मोठ्या संघटन कौशल्याचा प्रत्यय आपल्याला दिला.

|

आजही भारतातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना जर जलव्यवस्थापनाचे धडे विचारले, पाण्यासाठीच्या मूलभूत सुविधा काय असतात, हे विचारले, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांपर्यंत पाणी कसे पोहोचवावे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास करावा लागेल. शिवाजी महाराजांनी त्याकाळात पाण्याची जी व्यवस्था तयार केली होती ती आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे मुद्राधोरणही अभ्यासनीय आहे. स्वराज्याची नाणी बनवण्याचे काम करायला परदेशी लोक तयार होते. मात्र शिवरायांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी विचार केला की जर चलनावर इतर कोणाचा अधिकार निर्माण झाला तर राज्याला पराजित करण्यास त्याना काही वेळ लागणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःच मुद्रा बनवण्याची व्यवस्था केली. कधीही विदेशात चलन बनवण्याची व्यवस्था स्वीकारली नाही.

आज सगळ्या जगात सागरी सुरक्षा हा एक महत्वाचा विषय बनला आहे. सगळे देश सागरी सुरक्षेबाबत सजग झाले आहेत. प्रत्येकाला आपल्या सामुद्रिक अधिकारांची चिंता आणि व्यापारी संबंधांना सुरक्षाकवच मिळवण्याची धडपड असते. मात्र इतक्या वर्षांपूर्वी एक असा वीर पुरुष तयार जन्माला आला होता, ज्यांनी प्राचीन काळात नौदलाची स्थापना केली होती. सागरी सामर्थ्य ओळखले होते. आपण जेव्हा सिंधुदुर्ग आणि इतर गडकिल्ले बघतो, तेव्हा आपल्याला जाणवते की त्यांनी नौदलाच्या आवश्यकतेवर भर दिला होता. ही खरी गोष्ट आहे की जगभरात जिथे जिथे पुरातन व्यवस्था आहेत,तिथे तिथे पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी आयकॉनिक गोष्टी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आजही जगात जेव्हा भारतातल्या पर्यटनावर चर्चा होते, तेव्हा ताजमहालाचा विषय निघाला तर लोकांना वाटते की आपण ते बघायला हवे. प्रत्येक युगात अशा संस्मरणीय वास्तूंची निर्मिती झाली आहे, जी शतकानुशतके देशाची ओळख बनल्या आहेत. मात्र जगात असेही अनेक देश आहेत, जिथे फक्त किल्ल्यांच्या पर्यटनासाठी विशेष व्यवस्था आहे. भारतातही अनेक राजा महाराजांच्या काळात बांधले गेलेले असे अनेक किल्ले कानाकोपर्यात आहेत. या किल्ल्ल्यांची स्वतःची रचनेची वैशिष्ट्ये आहेत, सुरक्षेसाठीचे विज्ञान आहे, स्थापत्यशास्त्र आहे. त्यावेळी कशा प्रकारच्या वस्तूंचा वापर होता असे, त्याचीही अनेक वैशिष्टये आहेत. मात्र दुर्दैवाने आपण ताजमहालाच्या बाहेर कधी निघालोच नाही. या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जगाला आकर्षित करण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. भारताच्या या सौंदर्याला जर जगासमोर नीट मांडले गेले, तर अख्या जगाला पर्यटनासाठी आकर्षित करण्याची शक्ती भारतात नक्कीच आहे. आज जगात सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र कुठले असेल तर ते पर्यटन आहे. जगातल्या प्राचीन परंपरा अस्तित्वात असलेला आणि त्या सांभाळणाऱ्या देशात पर्यटनाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे. पर्यटनात कोट्यावधींचा व्यापार होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची जर आपण नीट निगा राखली आणि जगासामोर त्याना पर्यटनासाठी खुले केले, तर आपण जगाला हे किल्लेवैभव दाखवू शकू.

|

देशातल्या विद्यापीठांना जर आपण सांगितले की आम्हाला किल्ल्यांवर साहसी पर्यटन करायचे आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना किल्ले चढायला सांगा, त्याना घोड्यावरून जायचे असेल तर आपण तशीही व्यवस्था करू शकतो. मी भारतीय पुरातत्व खात्यालाही विनंती करू शकतो ,की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून सुरुवात करुया, आणि देशभरात किल्ल्यांच्या पर्यटनासाठीचे वातावरण बनवूया. सर्वसामान्य लोक आकर्षित होतील असे, अशी त्या किल्ल्यांची निगा राखायला हवी. बंधू भगिनीनो माझ्यासाठी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे, आणि त्यासाठी मी महाराष्ट्र सरकार आणि जनतेचा आभारी आहे. राज्यात जे शिवस्मारक बनणार आहे, त्याचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्याचे सौभाग्य मला मिळाले. अशी संधी जेव्हा मिळते तेव्हा ती आयुष्य धन्य झाल्याची अनुभूती देते. मला विश्वास आहे, की शिवस्मारकाची जी संकल्पना महाराष्ट्र सरकारच्या फडणवीस सरकारने साकारली आहे, ती नक्कीच प्रत्यक्षात येईल. जेव्हा हे शिवस्मारक बांधून पूर्ण होईल, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटेल, देशातली जनता त्या स्मारकाचा अभिमान बाळगेल आणि जगासमोर ताठ मानेने उभे राहून भारतीय लोक सांगतील की जगातले सर्वात मोठी आयकोनिक इमारत आमच्या देशात आहे. आणि ते ही अशा महापुरुषाचे स्मारक आहे, ज्याने सर्वसामान्यांच्या सुखासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याची संधी आज मला मिळाली.

बंधू भगिनीनो, आपल्या देशात विविध प्रकारचे राजकारण झाले आहे. विविधातानी संपन्न असलेल्या या देशात अनेक प्रकारचे मार्ग अनुसरले गेले आहेत. मात्र आता ७० वर्षानंतर आपण ही गोष्ट स्वीकारायला हवी, की जर स्वातंत्र्यानंतर आपण जर केवळ विकासाचा पंथ स्वीकारला असता, तर भारतात आज ज्या समस्यांचा आपण सामना करतो आहोत, ज्या प्रश्नाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, ती तशी रुजली नसती. या समस्या उग्र झाल्या नसत्या. विकास हाच देशातल्या सर्व समस्यांचे समाधान आहे. देशातील युवकांना रोजगार देण्याची शक्यता विकासातच आहे. देशातल्या गरीबांना त्यांचा हक्क देण्याची ताकदही विकासातच आहे. मध्यमवर्गीय जनतेची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मोठी झेप घेऊन पुढे जायचे आहे, विकास त्याना ती संधी देईल. सन्मानाने जगण्याचा एकमेव मार्गही विकासाच आहे. आणि म्हणूनच बंधू भगिनीनो, जेव्हापासून तुम्ही आम्हाला ही जबाबदारी दिली, तेव्हापासून आम्ही विकास हा एकमेव केंद्रबिंदू ठेवला आहे. आणि हा विकास शाश्वत असावा, हे आमचे ध्येय असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. विकास असा असायला हवा की ज्यातून गरीबाना आपल्या आयुष्यात बदल करण्याची संधी मिळायला हवी. त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती मिळायला हवी, सक्षम करण्याची ताकद या विकासात हवी. आणि म्हणूनच, आमच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू गरीबांचे कल्याण हाच असायला हवा. सरकारी कामांसाठी ज्याना निवृत्तीवेतन मिळत होते, त्यांची माहिती मला मिळाली तेव्हा मी थक्क झालो. काही लोकांना ७ रुपये निवृत्तीवेतन मिळत होते , तर काही लोकांना ५१ रुपये. काही लोकांना ८० रुपये पेन्शन मिळत होती. अगदी १०० दीडशे रुपयांच्या आसपासही कोणी नव्हते. आता ज्याना ७ रुपये पेन्शन मिळते अशी ८० वर्षांची वृध्द व्यक्ती रिक्षा करून टपाल कार्यालयात कशाला जाईल ? त्यामुळेच आम्ही आल्याबरोबर निर्णय घेतला, सध्या ज्या अशा व्यक्ती आहेत, ज्याना कमी पेन्शन मिळते, त्यांना किमान एक हजार रुपये तरी मिळायला हवेत. यामुळे सरकारी तिजोरीवर ताण तर पडेल, कारण अशा लोकांची संख्या ३५ लाखाहून अधिक आहे. हा सगळ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याने सरकारवर ताण तर येणार होताच, मात्र तरीही, आम्ही हा निर्णय घेतला, कारण त्यातून या वयोवृद्धांना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळणार होती, ती संधी त्याना मिळावी म्हणून आम्ही हा महत्वाचा निर्णय घेतला. आता औषधे महाग झाली आहेत. त्यावर उपाय म्हणून देशभरात जेनेरिक औषधे मिळावीत यावर आम्ही भर दिला आहे. देशभरात जन औषधालये बनवण्याचा विडा उचलला, कारण त्यातून गरीबाना माफक दरात औषधे मिळणार होती. त्याना योग्य औषधे स्वस्त दरात आणि वेळेत मिळावीत असा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून एकाही गरीबाचे औषधाच्या नावाखाली शोषण होऊ शकणार नाही. एखादी गरीब माता चुलीवर सैपाक करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत असे.मात्र हे करताना त्या मातेच्या शरीरात एका दिवसात चारशे सिगारेट इतका धूर जात असे. अशी आई आजारी पडणार नाही तर काय ? तिची मुले आजारी पडणार नाही का? सरकारने निर्णय घेतला की दारिद्रय रेषेखाली असलेल्या, झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या लोकाना चुलीच्या धुरापासून मुक्त करायचे. आणि देशातल्या कोट्यावधी कुटुंबाना गॅस सिलेंडर पुरवण्याचा विडाच आम्ही उचलला आहे. आतापर्यंत अनेक लोकाना हे सिलेंडर मिळाले आहेत. येत्या तीन वर्षात दारिद्रयरेषेखालच्या पाच कोटी कुटुंबाना गॅस सिलेंडर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हे काम आम्ही सुरुही केले आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झालीत. मात्र आजून देशातली १८ हजार गावे अशी होती, जी आजही अठराव्या शतकात राहत होती. तिथे अद्याप विजेचा खांबही पोचला नव्हता, ताराही लागल्या नव्हत्या आणि वीजही नव्हती. ७० वर्षात जे या गावात वीजही पोहोचवू शकले नाहीत अशाना जनता माफ करेल का ? या सत्ताधाऱ्यांनी स्वतंत्र भारतातील १८ हजार गावातल्या जनतेला ७० वर्षे अंधारात राहण्यास भाग पाडले. त्यांनी कधी विजेचा उजेड पाहिलाच  नव्हता, कायम अंधारातच दिवस काढले. अशा १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गावात आम्ही हे काम पूर्णही केले आहे. उरलेल्या गावात अतिशय वेगाने काम सुरु आहे. एक हजार दिवसात आम्हाला हे काम पूर्ण करायचेच आहे. 

|

बंधू भगिनीनो, कोण म्हणते की देश बदलू शकत नाही? मी विश्वासाने सांगू शकतो , सवाशे कोटी भारतीयांच्या भरवशावर सांगू शकतो की देश बदलू शकतो, आणि माझे शब्द लिहून ठेवा की देश बदलेलही आणि पुढेही जाईल. आपला देश जगापुढे ताठ मानेने उभा राहिल. तीन वर्षांच्या माझ्या अनुभवांच्या आधारावर मी आज हे बोलतो आहे. तुम्ही कल्पना करू शकता, आज याच व्यासपीठावर ज्या प्रकल्पांचा शुभारंभ झाला त्यावरून विकासाच्या गतीची तुम्हाला कल्पना येईल. यास आगळ्या प्रकल्पांचा एकत्रित निधी लक्षात घेतला, तर तो आहे एक लाख सहा हजार कोटी रुपये! या व्यासपीठावर आज मी जितक्या प्रकल्पांच्या बटन दाबून त्यांचा शुभारंभ केला , त्या सगळ्यांची किंमत आहे, १ लाख ६ हजार कोटी रुपये. एकट्या मुंबईतच, एकाच कार्यक्रमात आपण एक लाख ६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणे, ही कदाचित इतिहासातली खूप मोठी घटना असेल. आणि आपण त्याची सुरुवात केली आहे.

बंधू भगिनीनो, मी आज इथे मुंबईच्या भूमीत आलो आहे, तर आज याप्रसंगी मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर नतमस्तक होऊन त्यांचे अभिनंदन करायचे आहे, आभार मानायचे आहेत. आपल्या देशात आपण काही चांगले करा किंवा वाईट करा, लोकाना एक सवय जडली आहे. की तुम्ही काही चांगले करत असाल, तर त्याचा पुरावा काय?जर तुम्ही निवडणुका जिंकलात तर लोक मानतात की तुम्ही काहीतरी चांगले केले. जर तुम्ही हरलात तर समजले जाते की तुमचा निर्णय चुकीचा होता. जेव्हापासून आमचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून आम्ही भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढाई सुरु केली. त्यादृष्टीने एकापाठोपाठ एक पावले उचललीत. मात्र आठ नोव्हेंबरच्या रात्री आम्ही या दोन्ही विरोधात मोठा हल्ला केला.बनावट नोटा, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढा करण्याचा बिगुल आम्ही वाजवला. आणि माझ्या बंधू भगिनीनो, सव्वाशे कोटी भारतीय जनतेने या काळात अतिशय कष्ट झेलेले , त्रास सहन केला मात्र एका क्षणासाठीही माझी साथ सोडली नाही. त्यांचा बुद्धीभेद करण्याचे अनेक प्रयत्न झालेत. जनतेला घाबरवण्यासाठी अफवा पसरवल्या गेल्या. मात्र आपण ज्याना अशिक्षित, खेडवळ समजतो अशा लोकांनी त्यांच्या, कॉमन सेन्सचा वापर केला आणि कुठल्याही थापांना, अफवांना बळी पडणे टाळले, कोणाच्याही सांगण्याला ते भुलले नाहीत. देशाच्या भल्यासाठी असलेल्या या निर्णयाच्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले. आणि आताच महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातल्या जनतेने या निर्णयावर मोहोर लावली. त्यामुळे पूर्ण देशात हा संदेश गेला की जनता कोणासोबत आहे. देशाला कोणत्या दिशेने जायचे आहे?

 बंधू भगिनीनो, मी गोव्यातच सांगितले होते की हा लढा सोपा नाही, ७० -७० वर्षे ज्यानी ही मलई खाल्ली आहे, असे तगडे मासे हा निर्णय यशस्वी न होण्यासाठी काहीही करतील, वाटेल त्या कल्पना लढवतील. आपली पूर्ण शक्ती त्यासाठी खर्च करतील. आणि खरच, कोणीही आपली शक्ती लावण्यात कुठलीच कसूर केली नाही. ज्याला जे जमले ते सगळे करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. मात्र सव्वाशे कोटी भारतीयांच्या दृढ संकल्पासमोर ७० वर्षांपासून मलई खाणारे हे लोक कधीच टिकू शकत नाहीत आणि आपला देश कधीही हरू शकत नाही माझ्या मित्रांनो ! अशा मूठभर लोकांसमोर देश कधीही झुकणार नाही. काही लोकाना वाटत होते , की बँकेतल्या लोकाना पटवले, तर काळा पैसा पांढरा करता येईल. अरे, काळ्या- पांढऱ्याचा खेळ खेळणाऱ्या या लोकांनी स्वतःसोबतच बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही अडचणीत आणले. आता लक्षात येतंय की कसे कसे लोक या जाळ्यात अडकत आहेत. एकापाठोपाठ एक पडदा उघडला जातोय. त्याना वाटतेय की बँकेत पैसे जमा झाले , आता आपले काम झाले. अरे, बँकेत आल्यावरच तर खरे काम सुरु झाले आहे. माझ्या देशाबंधावाना मी सांगू इच्छितो, मी आधी सांगितले होते , पन्नास दिवस त्रास होईल, आणि माझ्या देशाबंधावानी हा त्रास सहन केला, आता जेवढे दिवसा उरले आहेत, तेवढे दिवसही ते त्रास सहन करतील, असा मला विश्वास आहे. मात्र बंधू भगिनीनो, पन्नास दिवसानंतर प्रामाणिक लोकांचा त्रास कमी होणार आहे, तर बेईमान लोकांचा त्रास वाढणार आहे. आताही मी जे बेईमान लोक आहेत, त्याना सांगतो आहे , आवाहन करतो आहे, त्यांनी भानावर यावे आणि देशाचा कायदा स्वीकारावा, त्याचे पालन करावे, आणि इतर सर्व नागरिकांप्रमाणे सुखी शांत आयुष्य जागा. मी तुम्हाला निमंत्रण देतो आहे. हे सरकार तुमचे काही वाईट करण्यासाठी कारवाई करत नाहीये. सरकार तुम्हाला फाशी देणार नाही. मात्र गरीबांचा जो हक्क आहे, तो त्याना मिळायलाच हवा, तो हक्क तुम्हाला त्याना द्यावाच लागेल. असे नं करणाऱ्याळा कुठलीही माफी नाही. जर कोणाला वाटत असेल, की आधीप्रमाणेच काहीतरी मार्ग काढून बाहेर निघता येईल, तर तो त्याचा गैरसमज आहे. तुम्हाला माहित असायला हवे की देशाचे सरकार बदलले आहे. तुम्हाला माहित असायला हवे की ३० वर्षानंतर भारताच्या जनतेने पूर्ण बहुमताचे सरकार बनवले आहे.भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला संपवणारे सरकार निवडून दिले आहे. आणि हे सरकार ते काम करणारच ! 

आणि म्हणूनच माझ्या बंधू भगिनीनो, आता येणारा काळ बेईमान लोकांच्या विनाशाचा काळ असेल. देशाच्या भल्यासाठी स्वच्छता अभियानाचा काळ असेल. देशाचे कल्याण व्हायचे असेल, तर सार्वजनिक जीवनात शुचिता असायला हवी. प्रशासन स्वच्छ असावे, देशात विश्वासाचे वातावरण असायला हवे, घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे महत्व असायला हवे. त्याचा सन्मान ठेवायला हवा. बंधू भगिनीनो, बेईमानीचे पाप करण्याची सवय मूठभर लोकाना आहे , मात्र त्याची शिक्षा देशातल्या कोट्यावधी लोकांना भोगावी लागते. अशा बेईमान लोकांना मोदींची भीती वाटत नसेल तर हरकत नाही, सरकारचीही भीती नसेल तरीही हरकत नाही. मात्र या बेईमान लोकांना सव्वाशे कोटी देशावासियांना तर घाबरावेच लागेल. त्यांच्या सध्याच्या विचारांना कमी लेखू नका. देशातल्या जनतेचा स्वभाव, विचार बदलले आहेत. आता ते अन्याय सहन करायला तयार नाहीत, बेईमानी, भ्रष्टाचार सहन करायला तयार नाही.काळ्या पैशाविरोधात लढा लढण्यासाठी ते सेनापती बनून सज्ज झाले आहेत. आणि म्हणूनच बंधू भगिनीनो, हा लढा जिंकण्यासाठी तुम्ही जे सहकार्य मला केले आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आज ह्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या भूमीत जिथे आज शिवस्मारकाचा शुभारंभ झाला त्या मंगलक्षणी मी सर्व देशवासियांना वाचन देतो की ही लढाई तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत आपण ती जिंकत नाही.

मी पुन्हा एकदा या कामांसाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माह्राराष्ट्राला एक विकासाला समर्पित असं सरकार मिळाले आहे. मग ते शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणारे जलयुक्त शिवार असो किंवा मग शहरात पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असो, युवकांसाठी कौशल्य विकास किंवा मग शिक्षणाचे क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनिशी वाटचाल करतो आहे. मी त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे खूप खूप अभिनंदन करतो.

माझ्या सोबत तुम्ही सगळे म्हणा , छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय!

खूप खूप धन्यवाद !!  

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Modi’s India hits back: How Operation Sindoor is the unveiling of a strategic doctrine

Media Coverage

Modi’s India hits back: How Operation Sindoor is the unveiling of a strategic doctrine
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address at Sikkim@50 event
May 29, 2025
QuotePM lays foundation stone, inaugurates multiple development projects in Sikkim
QuoteSikkim is the pride of the country: PM
QuoteOver the past decade, our government has placed the Northeast at the core of India's development journey: PM
QuoteWe are advancing the 'Act East' policy with the spirit of 'Act Fast': PM
QuoteSikkim and the entire Northeast are emerging as a shining chapter in India's progress: PM
QuoteWe endeavour to make Sikkim a global tourism destination: PM
QuoteIndia is set to become a global sports superpower, with the youth of the Northeast and Sikkim playing a key role: PM
QuoteOur dream is that Sikkim should become a Green Model State not only for India but for the entire world: PM

सिक्किम के राज्यपाल श्री ओपप्रकाश माथुर जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री, मेरे मित्र प्रेम सिंह तमांग जी, संसद में मेरे साथी दोरजी शेरिंग लेपचा जी, डॉ इंद्रा हांग सुब्बा जी, उपस्थित अन्य जनप्रतिनिधिगण, देवियों और सज्जनों,

कंचनजंगाको शितल छायाँमा बसेको हाम्रो प्यारो सिक्किमको आमा-बाबु, दाजु-भाई अनि दीदी-बहिनीहरु। सिक्किम राज्यको स्वर्ण जयंतीको सुखद उपलक्ष्यमा तपाईहरु सबैलाई मंगलमय शुभकामना।

आज का ये दिन विशेष है, ये अवसर सिक्किम की लोकतांत्रिक यात्रा की गोल्डन जुबली का है। मैं स्वयं आप सबके बीच रहकर के इस उत्सव का, इस उमंग का, 50 वर्ष की सफल यात्रा का साक्षी बनना चाहता था, मैं भी आपके साथ कंधे से कंधा मिलाकर इस उत्सव का हिस्सा बनना चाहता था। मैं बहुत सुबह दिल्ली से निकलकर बागडोगरा तो पहुंच गया, लेकिन मौसम ने मुझे आपके दरवाजे तक तो पहुंचा दिया, लेकिन आगे जाने से रोक लिया और इसलिए मुझे आपके प्रत्यक्ष दर्शन का अवसर नहीं मिला है। लेकिन मैं यह दृश्य देख रहा हूं, ऐसा भव्य दृश्य मेरे सामने है, लोग ही लोग नजर आ रहे हैं, कितना अद्भुत नजारा है। कितना अच्छा होता, मैं भी आपके बीच होता, लेकिन मैं नहीं पहुंच पाया, मैं आप सबकी क्षमा मांगता हूं। लेकिन जैसे माननीय मुख्यमंत्री जी ने मुझे निमंत्रण दिया है, मैं आपको विश्वास दिलाता हूं, जैसे ही राज्य सरकार तय करेगी, मैं सिक्किम जरूर आऊंगा, आप सबके दर्शन करूंगा और इस 50 वर्ष की सफल यात्रा का मैं भी एक दर्शक बनूंगा। आज का ये दिन बीते 50 वर्षों की अचीवमेंट्स को सेलिब्रेट करने का है और आपने काफी अच्छा कार्यक्रम आयोजित किया है। और मैं तो लगातार सुन रहा था, देख रहा था, खुद मुख्यमंत्री जी इस आयोजन को यादगार बनाने के लिए काफी ऊर्जा के साथ लगे रहे हैं। वो दिल्ली में भी मुझे दो बार आकर के निमंत्रण देकर गए हैं। मैं आप सभी को सिक्किम राज्य के 50 वर्ष होने की बहुत-बहुत बधाई देता हूं।

|

साथियों,

50 साल पहले सिक्किम ने अपने लिए एक डेमोक्रेटिक फ्यूचर तय किया था। सिक्किम के लोगों का जनमन geography के साथ ही भारत की आत्मा से जुड़ने का भी था। एक भरोसा था, जब सबकी आवाज़ सुनी जाएगी, सबके हक सुरक्षित होंगे, तो विकास के एक जैसे मौके मिलेंगे। आज मैं कह सकता हूं कि सिक्किम के एक-एक परिवार का भरोसा लगातार मजबूत हुआ है। और देश ने इसके परिणाम सिक्किम की प्रगति के रूप में देखे हैं। सिक्किम आज देश का गर्व है। इन 50 वर्षों में सिक्किम प्रकृति के साथ प्रगति का मॉडल बना। बायोडायवर्सिटी का बहुत बड़ा बागीचा बना। शत-प्रतिशत ऑर्गेनिक स्टेट बना। कल्चर और हैरिटेज की समृद्धि का प्रतीक बनकर सामने आया। आज सिक्किम देश के उन राज्यों में है, जहां प्रतिव्यक्ति आय सबसे अधिक है। ये सारी उपलब्धियां सिक्किम के आप सभी साथियों के सामर्थ्य से हासिल हुई हैं। इन 50 वर्षों में सिक्किम से ऐसे अनेक सितारे निकले हैं, जिन्होंने भारत का आसमान रोशन किया है। यहां के हर समाज ने सिक्किम की संस्कृति और समृद्धि में अपना योगदान दिया है।

साथियों,

2014 में सरकार में आने के बाद मैंने कहा था- सबका साथ-सबका विकास। भारत को विकसित बनाने के लिए देश का संतुलित विकास बहुत जरूरी है। ऐसा नहीं होना चाहिए कि, एक क्षेत्र तक तो विकास का लाभ पहुंचे और दूसरा पीछे ही छूटता चला जाए। भारत के हर राज्य, हर क्षेत्र की अपनी एक खासियत है। इसी भावना के तहत बीते दशक में हमारी सरकार, नॉर्थ ईस्ट को विकास के केंद्र में लाई है। हम 'Act East' के संकल्प पर 'Act Fast' की सोच के साथ काम कर रहे हैं। अभी कुछ दिन पहले ही दिल्ली में नॉर्थ ईस्ट इन्वेस्टमेंट समिट हुई है। इसमें देश के बड़े-बड़े इंडस्ट्रियलिस्ट, बड़े इन्वेस्टर शामिल हुए। उन्होंने सिक्किम सहित पूरे नॉर्थ ईस्ट में बहुत बड़ी इन्वेस्टमेंट्स की घोषणा की है। इससे आने वाले समय में सिक्किम के नॉर्थ ईस्ट के नौजवानों के लिए यहीं पर रोजगार के अनेक बड़े अवसर तैयार होने वाले हैं।

साथियों,

आज के इस कार्यक्रम में भी सिक्किम की फ्यूचर जर्नी की एक झलक मिलती है। आज यहां सिक्किम के विकास से जुडे अनेक प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। इन सारे प्रोजेक्ट्स से यहां हेल्थकेयर, टूरिज्म, कल्चर और स्पोर्ट्स की सुविधाओं का विस्तार होगा। मैं आप सभी को इन सारे प्रोजेक्ट्स के लिए ढेर सारी बधाई देता हूं।

साथियों,

सिक्किम समेत पूरा नॉर्थ ईस्ट, नए भारत की विकास गाथा का एक चमकता अध्याय बन रहा है। जहाँ कभी दिल्ली से दूरियां विकास की राह में दीवार थीं, अब वहीं से अवसरों के नए दरवाज़े खुल रहे हैं। इसका सबसे बड़ा कारण है, यहां की कनेक्टिविटी में जो बदलाव आ रहा है, आप लोगों ने तो अपनी आंखों के सामने ये परिवर्तन होते देखा है। एक समय था जब पढ़ाई के लिए, इलाज के लिए, रोजगार के लिए कहीं पर भी आना-जाना बहुत बड़ी चुनौती था। लेकिन बीते दस वर्षों में स्थिति काफी बदल गई है। इस दौरान सिक्किम में करीब चार सौ किलोमीटर के नए नेशनल हाईवे बने हैं। गांवों में सैकड़ों किलोमीटर नई सड़कें बनी हैं। अटल सेतु बनने से सिक्किम की दार्जिलिंग से कनेक्टिविटी बेहतर हुई है। सिक्किम को कालिम्पोंग से जोड़ने वाली सड़क पर भी काम तेज़ी से चल रहा है। और अब तो बागडोगरा-गंगटोक एक्सप्रेसवे से भी सिक्किम आना-जाना बहुत आसान हो जाएगा। इतना ही नहीं, आने वाले समय में हम इसे गोरखपुर-सिलीगुड़ी एक्सप्रेसवे से भी जोड़ेंगे।

|

साथियों,

आज नॉर्थ ईस्ट के हर राज्य की राजधानी को रेलवे से जोड़ने का अभियान तेज़ी से आगे बढ़ रहा है। सेवोक-रांगपो रेल लाइन, सिक्किम को भी देश के रेल नेटवर्क से जोड़ेगी। हमारा ये भी प्रयास है कि जहां सड़कें नहीं बन सकतीं, वहां रोपवे बनाए जाएं। थोड़ी देर पहले ऐसे ही रोपवे प्रोजेक्ट्स का लोकार्पण किया गया है। इससे भी सिक्किम के लोगों की सहूलियत बढ़ेगी।

साथियों,

बीते एक दशक में भारत नए संकल्पों के साथ आगे बढ़ रहा है। और इसमें बेहतर हेल्थकेयर का लक्ष्य हमारी बहुत बड़ी प्राथमिकता रहा है। पिछले 10-11 साल में देश के हर राज्य में बड़े अस्पताल बने हैं। एम्स और मेडिकल कॉलेजों का बहुत विस्तार हुआ है। आज यहां भी 500 बेड का अस्पताल आपको समर्पित किया गया है। ये अस्पताल गरीब से गरीब परिवार को भी अच्छा इलाज सुनिश्चित करेगा।

साथियों,

हमारी सरकार एक तरफ अस्पताल बनाने पर बल दे रही है, वहीं दूसरी तरफ सस्ते और बेहतर इलाज का भी इंतज़ाम कर रही है। आयुष्मान भारत योजना के तहत सिक्किम के 25 हजार से ज्यादा साथियों का मुफ्त इलाज किया गया है। अब पूरे देश में 70 वर्ष से ऊपर के सभी बुजुर्गों को 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज मिल रहा है। अब सिक्किम के मेरे किसी भी परिवार को अपने बुजुर्गों की चिंता नहीं करनी पड़ेगी। उनका इलाज हमारी सरकार करेगी।

साथियों,

विकसित भारत का निर्माण, चार मजबूत पिलर्स पर होगा। ये पिलर्स हैं- गरीब, किसान, नारी और नौजवान। आज देश, इन पिलर्स को लगातार मजबूत कर रहा है। आज के अवसर पर मैं सिक्किम के किसान बहनों-भाइयों की खुले दिल से प्रशंसा करुंगा। आज देश, खेती की जिस नई धारा की तरफ बढ़ रहा है, उसमें सिक्किम सबसे आगे है। सिक्किम से ऑर्गेनिक प्रोडक्ट्स का एक्सपोर्ट भी बढ़ रहा है। हाल में ही यहा की मशहूर डैले खुरसानी मिर्च, ये पहली बार एक्सपोर्ट शुरु हुआ है। मार्च महीने में ही, पहला कन्साइनमेंट विदेश पहुंच गया है। आने वाले समय में ऐसे अनेक उत्पाद यहां से विदेश निर्यात होंगे। राज्य सरकार के हर प्रयास के साथ केंद्र सरकार कंधे से कंधा मिलाकर चल रही है।

साथियों,

सिक्किम की ऑर्गेनिक बास्केट को और समृद्ध करने के लिए केंद्र सरकार ने एक और कदम उठाया है। यहां सोरेंग जिले में देश का पहला ऑर्गेनिक फिशरीज़ क्लस्टर बन रहा है। ये सिक्किम को, देश और दुनिया में एक नई पहचान देगा। ऑर्गेनिक फार्मिंग के साथ-साथ सिक्किम को ऑर्गेनिक फिशिंग के लिए भी जाना जाएगा। दुनिया में ऑर्गेनिक फिश और फिश प्रोडक्ट्स की बहुत बड़ी डिमांड है। इससे यहां के नौजवानों के लिए मछली पालन के क्षेत्र में नए मौके मिलेंगे।

|

साथियों,

अभी कुछ दिन पहले ही दिल्ली में नीति आयोग की गवर्निंग काउंसिल की बैठक हुई है। इस बैठक के दौरान मैंने कहा है, हर राज्य को अपने यहां एक ऐसा टूरिस्ट डेस्टिनेशन डवलप करना चाहिए, जो इंटरनेशनल लेवल पर अपनी पहचान बनाए। अब समय आ गया है, सिक्किम सिर्फ हिल स्टेशन नहीं, ग्लोबल टूरिज्म डेस्टिनेशन बने! सिक्किम के सामर्थ्य का कोई मुकाबला ही नहीं है। सिक्किम टूरिज्म का complete package है! यहाँ प्रकृति भी है, आध्यात्म भी है। यहाँ झीलें हैं, झरने हैं, पहाड़ हैं और शांति की छाया में बसे बौद्ध मठ भी हैं। कंचनजंगा नेशनल पार्क, UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट, सिक्किम की इस धरोहर पर सिर्फ भारत नहीं, पूरी दुनिया को गर्व है। आज जब यहां नया स्कायवॉक बन रहा है, स्वर्ण जयंती प्रोजेक्ट का लोकार्पण हो रहा है, अटल जी की प्रतिमा का अनावरण किया जा रहा है, ये सभी प्रोजेक्ट, सिक्किम की नई उड़ान के प्रतीक हैं।

साथियों,

सिक्किम में एडवेंचर और स्पोर्ट्स टूरिज्म का भी बहुत पोटेंशियल है। ट्रेकिंग, माउंटेन बाइकिंग, हाई-एल्टीट्यूड ट्रेनिंग जैसी गतिविधियाँ यहां आसानी से हो सकती हैं। हमारा सपना है सिक्किम को कॉन्फ्रेंस टूरिज्म, वेलनेस टूरिज्म और कॉनसर्ट टूरिज्म का भी हब बनाया जाए। स्वर्ण जयंती कन्वेंशन सेंटर, यही तो भविष्य की तैयारी का हिस्सा है। मैं चाहता हूँ कि दुनिया के बड़े-बड़े कलाकार गंगटोक की वादियों में आकर perform करें, और दुनिया कहे “अगर कहीं प्रकृति और संस्कृति साथ-साथ हैं, तो वो हमारा सिक्किम है!”

साथियों,

G-20 समिट की बैठकों को भी हम नॉर्थ ईस्ट तक इसलिए लेकर आए, ताकि दुनिया यहाँ की क्षमताओं को देख सके, यहां की संभावनाओं को समझ सके। मुझे खुशी है कि सिक्किम की NDA सरकार इस विज़न को तेज़ी से धरातल पर उतार रही है।

साथियों,

आज भारत दुनिया की बड़ी आर्थिक शक्तियों में से एक है। आने वाले समय में भारत स्पोर्ट्स सुपरपावर भी बनेगा। और इस सपने को साकार करने में, नॉर्थ ईस्ट और सिक्किम की युवा शक्ति की बहुत बड़ी भूमिका है। यही धरती है जिसने हमें बाईचुंग भूटिया जैसे फुटबॉल लीजेंड दिए। यही सिक्किम है, जहाँ से तरुणदीप राय जैसे ओलंपियन निकले। जसलाल प्रधान जैसे खिलाड़ियों ने भारत को गौरव दिलाया। अब हमारा लक्ष्य है, सिक्किम के हर गाँव, हर कस्बे से एक नया चैम्पियन निकले। खेल में सिर्फ भागीदारी नहीं, विजय का संकल्प हो! गंगटोक में जो नया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बन रहा है, वो आने वाले दशकों में चैम्पियनों की जन्मभूमि बनेगा। ‘खेलो इंडिया’ स्कीम के तहत सिक्किम को विशेष प्राथमिकता दी गई है। टैलेंट को पहचान कर, ट्रेनिंग, टेक्नोलॉजी और टूर्नामेंट – हर स्तर पर मदद दी जा रही है। मुझे पूरा विश्वास है, सिक्किम के युवाओं की ये ऊर्जा, ये जोश, भारत को ओलंपिक पोडियम तक पहुंचाने का काम करेगा।

साथियों,

सिक्किम के आप सभी लोग पर्यटन की पावर को जानते हैं, समझते हैं। टूरिज्म सिर्फ मनोरंजन नहीं है, ये डायवर्सिटी का सेलिब्रेशन भी है। लेकिन आतंकियों ने जो कुछ पहलगाम किया, वो सिर्फ भारतीयों पर हमला नहीं था, वो मानवता की आत्मा पर हमला था, भाईचारे की भावना पर हमला था। आतंकियों ने हमारे अनेक परिवारों की खुशियां को तो छीन लिया, उन्होंने हम भारतीयों को बांटने की भी साजिश रची। लेकिन आज पूरी दुनिया देख रही है कि, भारत पहले से कहीं ज़्यादा एकजुट है! हमने एकजुट होकर आतंकियों और उनके सरपरस्तों को साफ़ संदेश दिया है। उन्होंने हमारी बेटियों के माथे से सिंदूर पोछकर उनका जीना हराम कर दिया, हमने आतंकियों को ऑपरेशन सिंदूर से करारा जवाब दिया है।

|

साथियों,

आतंकी अड्डे तबाह होने से बौखलाकर पाकिस्तान ने हमारे नागरिकों और सैनिकों पर हमले की कोशिश की, लेकिन उसमें भी पाकिस्तान की पोल ही खुल गई। और हमने उनके कई एयरबेस को तबाह करके दिखा दिया, कि भारत कब क्या कर सकता है, कितना तेजी से कर सकता है, कितना सटीक कर सकता है।

साथियो,

राज्य के रूप में सिक्किम के 50 वर्ष का ये पड़ाव हम सभी के लिए प्रेरणा है। विकास की ये यात्रा अब और तेज़ होगी। अब हमारे सामने 2047 हैं, वो साल जब देश की आजादी के 100 साल पूरे होंगे

और यही वो समय होगा, जब सिक्किम को राज्य बने 75 वर्ष कंप्लीट हो जाएंगे। इसलिए हमें आज ये लक्ष्य तय करना है, कि 75 के पड़ाव पर हमारा सिक्किम कैसा होगा? हम सभी किस प्रकार का सिक्किम देखना चाहते हैं, हमें रोडमैप बनाना है, 25 साल के विजन के साथ कदम कदम पर कैसे आगे बढ़ेंगे ये सुनिश्चित करना है। हर कुछ समय पर बीच-बीच में उसकी समीक्षा करते रहना है। और लक्ष्य से हम कितना दूर हैं, कितना तेजी से आगे बढ़ना है। नए हौसले, नई उमंग, नई ऊर्जा के साथ आगे बढ़ना है, हमें सिक्किम की इकॉनॉमी की रफ्तार बढ़ानी है। हमें कोशिश करनी है कि हमारा सिक्किम एक वेलनेस स्टेट के रूप में उभरे। इसमें भी विशेष रूप से हमारे नौजवानों को ज्यादा अवसर मिले। हमें सिक्किम के यूथ को स्थानीय जरूरतों के साथ ही दुनिया की डिमांड के लिए भी तैयार करना है। दुनिया में जिन सेक्टर्स में यूथ की डिमांड है, उनके लिए यहां स्किल डवलपमेंट के नए मौके हमें बनाने हैं।

साथियों,

आइए, हम सब मिलकर एक संकल्प लें, अगले 25 वर्षों में सिक्किम को विकास, विरासत और वैश्विक पहचान का सर्वोच्च शिखर दिलाएँगे। हमारा सपना है— सिक्किम, केवल भारत का नहीं, पूरे विश्व का ग्रीन मॉडल स्टेट बने। एक ऐसा राज्य जहां के हर नागरिक के पास पक्की छत हो, एक ऐसा राज्य जहां हर घर में सोलर पावर से बिजली आए, एक ऐसा राज्य जो एग्रो- स्टार्ट अप्स, टूरिज्म स्टार्ट अप्स में नया परचम लहराए, जो ऑर्गैनिक फूड के एक्सपोर्ट में दुनिया में अपनी पहचान बनाए। एक ऐसा राज्य जहां का हर नागरिक डिजिटल ट्रांजेक्शन करे, जो वेस्ट टू वेल्थ की नई ऊंचाइयों पर हमारी पहचान को पहुंचाए, अगले 25 साल ऐसे अनेक लक्ष्यों की प्राप्ति के हैं, सिक्किम को वैश्विक मंच पर नई ऊंचाई देने के हैं। आइए, हम इसी भावना के साथ आगे बढ़ें और विरासत को, इसी तरह आगे बढ़ाते रहें। एक बार फिर, सभी सिक्किम वासियों को इस महत्वपूर्ण 50 वर्ष की यात्रा पर, इस महत्वपूर्ण अवसर पर देशवासियों की तरफ से, मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं, बहुत बहुत धन्यवाद!