The expressways will greatly benefit people of Delhi NCR by reducing pollution and will bring down traffic jams: PM Modi
To uplift the lives of 125 crore Indians, it is necessary that we develop modern infrastructure: PM Modi
We are promoting domestic manufacturing through Make in India initiative, says PM Modi
We are working to empower the women. Through Ujjwala and Mudra Yojana, a positive change has been brought in the lives of women: PM Modi
We are developing five places associated with Dr. Babasaheb Ambedkar as Panchteerth; we are strengthening the Dalits and the marginalised: PM Modi
Opposition mocks the steps we undertake to empower the weaker sections and women. What they do well is spreading lies among people: PM

भारत माता की जय!

एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो ,

चार वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पाठींबा देत संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मला दिली. मे महिन्यातल्या या उकाड्यात आणि रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात हे याचीच साक्ष देत आहे की, चार वर्षात आमचे सरकार,देशाला योग्य दिशेने नेण्यात यशस्वी ठरले आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने कार्य काळाची चार वर्ष पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर, आपला हा प्रधान सेवक आपणा सर्वांसमोर नतमस्तक होऊन सव्वाशे कोटी देशवासियांना नमन करत आहे.

मित्रहो,बागपत पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआर इथल्या जनतेसाठी महत्वाचा दिवस आहे.दोन मोठ्या रस्ते योजनांचे आज लोकार्पण झाले. एक दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा आणि दुसरा, पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्ग.

पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गावर 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले.तर दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गावरच्या आतापर्यंतच्या भागासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले.हा संपूर्ण प्रकल्प साधारणतः 5000 कोटी रुपयांचा आहे.आज या रस्त्यावरून प्रवास करण्याची संधी मला मिळाली तेव्हा या 14 मार्गीकांचा प्रवास दिल्ली एनसीआर मधल्या जनतेचे जीवन अधिक सुगम करणार आहे याचा प्रत्यय मला आला.कुठेही अडथळा नाही.एकापेक्षा एक आधुनिक तंत्रज्ञानाच वापर आणि काँक्रीटबरोबरच हिरवळीचा मेळ.

बंधू-भगिनीनो,केवळ 18 महिन्यात हे काम पूर्ण झाले आहे.आज 14 पदरी 9 किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण झाले आहे.मात्र हे 9 किलोमीटर किती महत्वाचे आहेत हे दिल्लीतल्या पटपडगंज,मयूर विहार,गाझियाबाद,इंद्रपुरम, वैशाली आणि नोएडातील लोक जाणतात. मित्रहो, ज्या वेगाने हा रस्ता बनला आहे,त्याच वेगाने मेरठ पर्यंत संपूर्ण द्रुतगती महामार्गाचे काम लवकर पूर्ण करून त्याचा दुसरा टप्पाही जनतेला अर्पण करण्यात येईल.जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा मेरठ आणि दिल्ली यांच्यातले अंतर केवळ 40-45 मिनिटांचेच राहील.

मित्रहो,दिल्ली एनसीआर मधे केवळ वाहतूक कोंडीचाच प्रश्न नाही तर प्रदुषणाचाही मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न विक्राळ रूप धारण करत आहे.आमच्या सरकारने याकडे गांभीर्याने पाहत दिल्लीला चारही बाजूंनी द्रुतगती मार्गाने वेढण्याचा निश्चय केला.हा मार्ग दोन टप्प्यात तयार केला जात आहे. यातला पहिला टप्पा म्हणजे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्ग, ज्याचे लोकार्पण करण्याची संधी मला काही वेळापूर्वी लाभली. बंधू-भगिनीनो, आज दिल्लीत जेवढ्या गाड्या येतात त्यांची संख्या 30 टक्क्याने घटेल.त्या गाड्या परस्पर बाहेरून जातील. केवळ मोठ्या गाड्या आणि ट्रक नव्हे तर 50 हजारपेक्षा जास्त गाड्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची गरज भासणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्सीस कंट्रोल रॉ ग्रीन फिल्ड द्रुत गती महामार्ग आहे.हा रस्ता केवळ 500 दिवसात तयार झाला आहे. हे दोन मोठे प्रकल्प आज आपणा सर्वांच्या सेवेला तयार आहेत.हे प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत.इथे विजेची गरजही सौर उर्जेने पूर्ण केली जाईल.म्हणजेच वेळेची बचत,प्रदूषण कमी, इंधन बचत. पश्चिम उत्तरप्रदेशातून दिल्लीत दुध,भाजीपाला आणि अन्नधान्य पोहोचवणे आता अधिक सुलभ होणार आहे.

बंधू- भगिनीनो,सव्वाशे कोटीजनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी देशाची आधुनिक पायाभूत सुविधांची महत्वाची भूमिका आहे आणि हाच ‘सबका साथ सबका विकास’ याचा मार्ग आहे.कारण पायाभूत सुविधा,जात-पात,पंथ,संप्रदाय,गरीब श्रीमंत,असा भेदभाव ठेवत नाहीत.यामुळे सर्वांसाठी समान संधी निर्माण होतात.म्हणूनच आमच्या सरकारने महामार्ग,रेल्वेमार्ग,हवाई मार्ग आणि विजेशी सबंधित पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष दिले आहे.मित्रहो , गेल्या चार वर्षात आम्ही,तीन लाख कोटी पेक्षा अधिक निधी खर्चून 28 किलोमीटर पेक्षा जास्त नवे महामार्ग तयार केले आहेत.चार वर्षापूर्वी, आपण ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकावी, माझ्या देशाच्या नागरिकांनी ऐकावी असे मला वाटते, चार वर्षापूर्वी जिथे एका वर्षात केवळ 12 किलोमीटरचा महामार्ग बनत असे, आज सुमारे 27 किलोमीटरचा महामार्ग एक दिवसात तयार होतो.या वर्षीच्या अर्थ संकल्पात भारतमाला प्रकल्पासाठी पाच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या अंतर्गत सुमारे 35 हजार किलोमीटरचा महामार्ग तयार होत आहे. महामार्गच नव्हे तर रेल्वे क्षेत्रामधेही अभूतपूर्व काम होत आहे. जिथे रेल्वे नव्हती तिथे वेगाने रेल्वे मार्ग जाळे निर्माण करण्यात येत आहे.एकेरी मार्ग दुहेरी करणे,मीटर गेजचे ब्रॉडगेजमधे रुपांतर तर ही कामे आम्ही जलद गतीने करत आहोत.रेल्वेची गती आम्ही वाढवत आहोत. गेल्या चार वर्षात आम्ही साडेपाच हजार मानव रहित रेल्वे क्रॉसिंग आम्ही हटवली. बंधू-भगिनींनो, हवाई वाहतूक सेवा स्वस्त करण्यासाठी आणि देशात नवे हवाई मार्ग निर्माण करण्यासाठी आम्ही उडान योजना सुरु केली आहे.गेल्या वर्षी सुमारे दहा कोटी लोकांनी हवाई प्रवास केला म्हणजेच रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यामध्ये जितक्या लोकांनी प्रवास केला त्यापेक्षा जास्त लोकांनी विमान प्रवास केला.ही मी गेल्या चार वर्षातली गोष्ट सांगत आहे. हवाई चप्पल घालणारी व्यक्तीही विमान प्रवासाची स्वप्ने पाहू लागली आहे.

देशाच्या जलशक्तीचाही पुरेपूर वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.देशात शंभरहून जास्त नवे जलमार्ग बनवण्यात येत आहेत.इथे उत्तरप्रदेशातही गंगा नदीत जहाजे चालू लागली आहेत.गंगा नदीच्या माध्यमातून उत्तरप्रदेश सरळ समुद्राशी जोडले जाणार आहे.उत्तरप्रदेशात तयार झालेले सामान मोठ्या-मोठ्या बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच मालवाहक जहाज सज्ज होईल. गंगा नदीप्रमाणे यमुना नदीबाबतही एकामागोमाग एक नव्या योजना तयार करण्यात येत आहेत.

मित्रहो, जिथे जिथे वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत तिथे तिथे उद्योगांच्या संधीही निर्माण करण्यात येत आहेत.हाच विचार ठेवून या वर्षीच्या अर्थसंकल्पात, उत्तरप्रदेशात,संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे.आग्रा,अलिगढ़,लखनौ,कानपुर,झाशी आणि चित्रकूट पर्यंत या कोरिडॉरचा विस्तार करण्यात येईल. केवळ या कॉरिडॉरमुळे सुमारे अडीच लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

मित्रहो, नव भारताच्या नव्या व्यवस्था देशाच्या युवा,मध्यम वर्गीयांच्या आशा- आकांक्षावर उभ्या करण्यात येत आहेत.देशातले प्रत्येक गाव इंटरनेटने जोडण्यासाठी, भारत नेट योजनेअंतर्गत वेगाने काम सुरु आहे.आमच्या सरकारच्या कामाच्या वेगाचा आपण अंदाज लावू शकता,काँग्रेस सरकारच्या राजवटीतला आणि आमच्या सरकारच्या चार वर्षातल्या महामार्ग निर्मितीची आकडेवारी मी दिली .आता हा आकडाही लक्षात ठेवण्यासारखा आहे.काँग्रेसच्या यूपीए राजवटीत चार वर्षात 59 पंचायत म्हणजे साधारणतः 60 पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या.तर आम्ही एक लाखाहून अधिक पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या.चार वर्षात 60 पेक्षा कमी गावे कुठे आणि चार वर्षात एक लाख गावे कुठे.काम कसे होते ते पहा आणि माझा देश हा अनुभव घेत आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून देशात उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.याचा परिणाम म्हणजे चार वर्षांपूर्वी देशात मोबाईल फोन तयार करणारे केवळ दोन कारखाने होते .आता आपण अंदाज लावू शकता की आपण कुठे पोहोचलो आहोत.आपल्याला ऐकून आनंद होईल की आज 120 कारखाने मोबाईल फोन तयार करत आहेत.यातले अनेक तर इथे एनसीआर मध्ये आहेत. ज्यात अनेक युवकांना रोजगारही मिळाला आहे,त्यातले काहीजण इथे उपस्थितही आहेत.

मित्रहो, रोजगार निर्मितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे मोठे योगदान आहे.शेतीनंतर या क्षेत्रातून रोजगाराच्या सर्वात जास्त संधी उपलब्ध होतात.उत्तर प्रदेशात तर 50 लाख लघु उद्योगाचे जाळे आहे.या उद्योगाचा आणखी विस्तार होण्यासाठी, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार एकत्र काम करत आहेत. केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु,मध्यम उद्योग क्षेत्राला करातही मोठी सवलत दिली आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ ही योजना महत्वपूर्ण आहे.उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेसाठी, केंद्र सरकारच्या स्किल इंडिया,स्टँड अप इंडिया,स्टार्ट अप इंडिया,प्रधान मंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेबरोबरच सहयोग देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मित्रहो, सुरक्षा व्यवस्था योग्य असेल तर व्यापार उत्तम होतो.पश्चिम उत्तर प्रदेशात काय परिस्थिती होती याचे आपण स्वतः साक्षीदार आहात.मात्र योगी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कार्यकाळात अपराधी स्वतः शरण येत आहेत.यापुढे गुन्हे करणार नाही अशी शपथ अपराधी घेत आहेत.योगी आणि मनोहरलाल या दोघांचेही मी अभिनंदन करतो. त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणा या दोन्ही मधे कायदा सुव्यवस्था क्षेत्रात परस्परांत उत्तम संपर्क राखला आहे. पहिल्यांदा गुन्हेगार एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या ठिकाणी पळ काढत आता त्यांचे सर्व रस्ते या दोघांनी बंद केले आहेत. या दोघांचेही मी अभिनंदन करतो.

बंधू-भगिनींनो, महिला सन्मान आणि सबलीकरण याला आम्ही प्राधान्य देत आहोत.स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशात निर्माण करण्यात आलेली साडेसात कोटी स्वच्छता गृहे असोत किंवा उज्ज्वला योजने अंतर्गत देण्यात आलेल्या चार कोटी गॅस जोडण्या असोत, यामुळे महिलांचे जीवन सुकर करण्यासाठी मोठी मदत केली आहे. मुद्रा योजने अंतर्गत 13 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले त्यामध्ये 75 टक्क्यापेक्षा जास्त लाभ महिला उद्योजिकांना झाला आहे. कोणी कल्पना करू शकते का की हिंदुस्तान मधे मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेणाऱ्या 13 कोटी पैकी 75 टक्के, माझ्या देशातल्या कन्या आहेत,बहिणी आहेत आणि माता आहेत. गेल्या चार वर्षात आम्ही मुलींना सन्मान दिला,त्यांना सबळ केले. मित्रहो, महिलांच्या बरोबरच दलित आणि मागास वर्गाच्या सबलीकरणासाठी,त्यांच्या सन्मानासाठी गेल्या चार वर्षात आम्ही एकापाठोपाठ एक अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलली.मग तो स्वयंरोजगार असो किंवा सामाजिक सुरक्षा, आज अनेक योजना या दिशेने काम करत आहेत.मुद्रा योजनेच्या माध्यमातून जे कर्ज दिले गेले त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कर्ज दलित आणि मागास वर्गातल्या लोकांना मिळाले आहे. स्टँड अप इंडिया च्या माध्यमातूनही दलितांना, महिलांना उद्योजकांसाठीच्या नव्या योजनेचा लाभ मिळत आहे. आमच्या सरकारचे हे भाग्य आहे की आम्ही, बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पाच स्थाने पंच तीर्थ म्हणून विकसित केली आहेत. मित्रहो, मी अनुभवाच्या आधारावर सांगतो की ज्यांच्या मनात स्वार्थ आहे ते केवळ नकली अश्रूच्या आधारावर राजकारण करतात.लोकरंजक राजकरण करतात मात्र जो खरेपणाने दलित,पिडीत, वंचित ,उपेक्षितांच्या हिताचा विचार करतो तो लोकहित साधणारे राजकारण करतो, लोकरंजक राजकारण नव्हे. दलित आणि मागास वर्गातल्या बंधू-भगिनींसाठी संधी बरोबरच त्यांची सुरक्षा आणि न्यायासाठीही गेल्या चार वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले.

दलित, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अत्याचारासंदर्भातले कायदे आम्ही अधिक कठोर केले आहेत.दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबतच्या सूचिमधे 22 वेगवेगळ्या अपराधाचा समावेश करून 47 पर्यंत त्याचा विस्तार करण्यात आला आहे.दलित अत्याचाराशी संबंधित प्रकरणाच्या जलदगती सुनावणीसाठी विशेष न्यायालय गठीत करण्यात येत आहे.

बंधू-भगिनींनो, मागास वर्गीयांच्या उप वर्गवारीसाठी एक आयोग गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.इतर मागास वर्गीयांमध्ये जे अधिक मागास आहेत त्यांना सरकार आणि शिक्षण संस्थात, निर्धारित सीमेत राहून आरक्षणाचा आणखी फायदा व्हावा अशी सरकारची इच्छा आहे.यासाठी इतर मागास वर्गीयांत उप वर्गवारी करण्यासाठी आम्ही आयोग निर्माण केला आहे.मित्रहो, सरकार, इतर मागास वर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देऊ इच्छित होते,या वर्गाची ही मागणी गेली वीस पंचवीस वर्षापासूनची होती. मात्र युपीए सरकारला त्याची पर्वा नव्हती. आम्ही त्यासाठी कायदा आणला. इतर मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक अधिकार मिळावा यासाठी आम्ही संसदेत महत्वाचा कायदा आणला. मात्र काँग्रेसला हे रुचले नाही ,त्यांच्या सहकारी पक्षांना हे रुचले नाही,म्हणून हा पक्ष त्यामध्ये अडथळा बनून उभा राहिला आणि हा कायदा अद्याप रखडला आहे.मात्र मी इतर मागासवर्गाला आश्वस्त करतो,की जे पाऊल उचलले आहे, ते मोदी पूर्ण करतीलच. बंधु-भगिनीनो, सत्य असे आहे की गरिबांसाठी, दलितांसाठी, आदिवासींसाठीच्या कार्यात, काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष त्यात अडथळे आणतात, देशाचा विकास म्हणजे त्यांना चेष्टा वाटते. स्वच्छ भारतासाठी केलेले काम त्यांना चेष्टा वाटते, गरीब महिलांसाठी बनवलेले स्वच्छतागृह त्यांना थट्टेचा विषय वाटतो.गरीब महिला आमचे सरकार मोफत गॅस जोडणी देते त्याचीही थट्टा उडवतात. गरिबांसाठी बँक खाते उघडले जाते तेव्हा, गरीब विरोधी मानसिकतेचे हे लोक त्याचीही चेष्टा करतात. पिढ्यांनपिढ्या सतत उपभोगलेले हे लोक, गरिबांसाठी करण्यात येणारे प्रत्येक काम चेष्टा समजतात.मंत्रीमंडळाचे दस्तऐवज फाडणारे लोक,संसदेत सर्व संमतीने मंजूर झालेल्या कायद्याची प्रतिष्ठा राखणेही उचित मानत नाही. आज देशात लोक पाहत आहेत की आपल्या राजनैतिक फायद्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरही खोटे बोलण्याची हिंमत हे लोक करतात.त्यांच्या खोटे बोलण्याने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊ शकते याचा विचारही हे लोक करत नाहीत. दलितांवरच्या अत्याचाराशी संबंधित कायदा असू दे, आरक्षण असू दे, असत्य सांगून, अफवा पसरवून लोकांना संभ्रमित करण्याचा यांचा डाव आहे.मी तर ऐकले आहे की आणखी एक अपप्रचार हे लोक आणत आहेत.या भागातल्या लोकांपर्यंत कदाचित तो पोहोचलाही असेल. शेतकऱ्यामध्ये पसरवत आहेत की,जो शेतकरी ठेक्यावर शेत देईल त्यावर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर द्यावा लागेल.निवडणुकीत पराभूत झालेल्या लोकांनो, राजकारण करताना काही सीमा तरी बाळगा.इतके असत्य,माझ्या देशाची दिशाभूल करत आहात,आपल्याला माहित नसेल आपण किती मोठे पाप करत आहात. मी शेतकरी बांधवाना सांगू इच्छितो की अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका,उलट अशा अफवा पसरवणाऱ्या विरोधात तक्रार करा.मी आश्वासन देतो की असे खोटे पसरवणाऱ्या विरोधात कायदा आपले काम करेल.

मित्रहो, ‘ग्रामोदय ते भारत उदय’ हे ब्रीद घेऊन त्यावर आमचे सरकार काम करत आहे. जेव्हा आम्ही ग्रामोदय बाबत बोलतो तेव्हा त्याचा केंद्र बिंदू माझ्या देशाचा अन्नदाता, माझा शेतकरी आहे.गावाकडचा छोटा कारागीर आहे,गावातला शेत मजूर आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात गाव आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 14 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय युरियावर शंभर टक्के नीम लेपन, प्रधानमंत्री सिंचन परियोजना,प्रधानमंत्री पीक विमा योजनांची व्याप्ती वाढवल्यानेही शेतकऱ्यांना लाभ झाला याची मी खात्री देतो. शेतकऱ्याला लागवडीच्या दीडपट समर्थन मूल्य सुनिश्चित करण्याचे आमच्या सरकारने ठरवले आहे. मी दोन्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एमएसईच्या नव्या नियमाअंतर्गत शेतकऱ्यांकडून जितका माल खरेदी करता येईल तितका खरेदी करण्यासाठी योजना तयार केली आणि भूतकाळातले सगळे विक्रम मोडले. शेतकऱ्यांना समर्पित या दोन्ही सरकारच्या मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन करतो.

शेतातून बाजारपर्यंत पोहोचण्या आधीच शेतकऱ्याचे पीक वाया जाऊ नये यासाठी 6 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रधान मंत्री किसान संपदा योजनेवर काम सुरु आहे.पश्चिम उत्तर प्रदेशात बटाट्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना जास्त उपयुक्त आहे.या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेले ऑपरेशन ग्रीन,नव्या पुरवठा श्रृंखलेशी संबंधित आहे. फळे,फुले आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

बंधू-भगिनीनो,सेंद्रिय शेती,मधमाशा पालन,सोलर फार्म,अशा आधुनिक पर्यायांना प्रोत्साहन दिले जात आहे.शेतीच्या या उपविभागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक सुलभ पणे कर्ज मिळावे यासाठी विस्तृत योजना तयार करण्यात आली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठीही आमचे सरकार निरंतर काम करत आहे.मागच्या वर्षातच ऊसाचा हमी भाव सुमारे 11 टक्क्यांनी वाढवला.5 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ झाला.इथेनॉल बाबतच्या धोरणात मोठा बदल करत आता पेट्रोल मधे 10 टक्के इथेनॉल मिश्रणाला परवानगी देण्यात आली आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांकडून थकीत बाकी मिळण्यासाठी उशीर होऊ नये या संबंधित एक मोठा निर्णय आम्ही नुकताच घेतला.ऊसाला प्रती क्विंटल साडेपाच रुपयांची आर्थिक मदत साखर कारखान्यांना दिली जाईल. मात्र साखर कारखानदारांच्या हातात ही रक्कम जाणार नाही.याच्यातही काय केले जाते हे आम्हाला माहित होते म्हणूनच आम्ही ठरवले की ही रक्कम साखर कारखानदारांना देण्याऐवजी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल.यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचा पैसा साखर कारखान्यात अडकून पडणार नाही. इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की, त्यांच्या समस्यांप्रती सरकार संवेदनशील आहे आणि या समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटी बद्ध आहोत.

बंधू-भगिनीनो, गावांच्या विकासाबरोबरच आम्ही शहरेही एकविसाव्या शतकाच्या दृष्टीने तयार करत आहोत.स्मार्ट सिटी,अमृत योजना यांच्या माध्यमातुन शहरांच्या पायाभूत सुविधा आम्ही मजबूत करत आहोत.शहरात राहणाऱ्या गरीब आणि मध्यम वर्गाला स्वतःच्या मालकीचे घर मिळावे यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत. काँग्रेस सरकारच्या तुलनेत आम्ही हे कामही वेगाने करत आहोत.2004 ते 2014 या दहा वर्षात, शहरात सुमारे साडे तेरा लाख घरांच्या निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली.तर गेल्या चार वर्षात आम्ही 46 लाख घरांच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली. पन्नास लाखाच्या जवळ आम्ही पोहोचलो आहोत.कॉंग्रेसच्या तुलनेत दहा वर्षात आम्ही तिप्पट काम केले आहे. काँग्रेसने 10 वर्षात साडे पाच लाख घरांच्या चाव्या शहरातल्या नागरिकांकडे सोपवल्या तर आमच्या सरकारने केवळ चार वर्षात 8 लाखाहून अधिक शहरी लाभार्थींना राहण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही किल्ल्या सोपवल्या.

बंधु-भगिनींनो, वाढत्या लोकसंख्येची समस्या निपटण्याच्या दृष्टीने शहरांची व्यवस्था तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.एका परिवारच्या 38 वर्षाच्या राजवटीत शहरांची कशी अस्ताव्यस्त वाढ झाली,योजनेशिवाय शहरे कशी वाढत गेली, या समस्यांचे मूळ काय आहे हे देशाने पाहिले आहे.ना सांडपाण्याची व्यवस्था, ना पाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था. आपल्या नद्यांचे काम काय झाले होते तर शहरातला कचरा, अस्वच्छता समुद्रापर्यंत वाहून नेणे. विशेषकरून आपली गंगा माता तर वाढते औद्योगिक प्रदूषण आणि वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांनी त्रस्त झाली होती.यासाठी आमच्या सरकारने ‘नमामि गंगे’ हा उपक्रम हाती घेतला.केवळ गंगेच्या सफाईला प्राधान्य दिले एवढेच नव्हे तर शहरातली अस्वच्छता गंगा नदीत जाऊ नये याकडे लक्ष पुरवण्यात येत आहे. सरकारकडून आतापर्यंत 21 हजार कोटी रुपयांच्या 200 पेक्षा जास्त योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय गंगा नदीच्या काठावरच्या गावांना खुल्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त करण्यात येत आहे. ज्या पाच राज्यातून गंगा नदी वाहते त्या उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधे गंगा नदीच्या काठावरच्या अनेक गावात हे अभियान यशस्वी झाले आहे.

मित्रहो, गंगा नदीच्या स्वच्छते बाबत आतापर्यंत खूप मोठ-मोठ्या गप्पा करण्यात आल्या. मात्र हे सरकार केवळ बोलण्यावर नव्हे तर काम करून ते सिध्द करण्यावर विश्वास ठेवते. हीच आमची कार्य संस्कृती आहे.जनतेच्या कमाईचा एक एक पैसा जनतेवरच खर्च झाला पाहिजे यावर आमचा कटाक्ष आहे.म्हणूनच आम्ही सांडपाणी प्रकल्प तयार झाल्यावर तो ठीकपणाने चालतो की नाही याकडेही लक्ष पुरवतो. काँग्रेसच्या काळात प्रकल्प तयार करण्यात येत होते मात्र ते पूर्ण क्षमतेने चालत नसत आणि दीर्घ काळापर्यंत टिकतही नसत.गंगा नदीशी संबंधित योजनातून काँग्रेस संस्कृती हटवण्यात येत आहे.

मित्रहो, आता जे प्रकल्प तयार होत आहेत ते 15 वर्षानंतरच्या गरजा लक्षात घेऊनच तयार करण्यात येत आहेत. केवळ सांडपाणी प्रकल्प बनवण्यावरच आमचा भर नाही तर चालवण्यावरही आहे.

बंधू-भगिनीनो,ज्यांनी 70 वर्षे देशाला, गरिबांना,मध्यम वर्ग, शेतकरी,युवा वर्गाला धोका दिला ते आता रालोआ सरकारवरचा जनतेचा विश्वास पाहून संभ्रमित झाले आहेत. चार वर्ष नंतरही एव्हढ्या उकाड्यात एवढा मोठा जनसमुदाय पाहून त्यांची झोप उडाली आहे.खरे तर यांचा कधी लोकशाहीवर विश्वास नव्हता आणि संविधानानुसार चालणाऱ्या संस्थावरही यांचा विश्वास नाही. गेल्या चार वर्षात त्यांची ही मानसिकता उघड झाली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही या लोकांनी विश्वासाबाबत संकट कसे उभे केले हे देशाने गेल्या काही दिवसात पहिले.

देशाच्या निवडणूक आयोगाला, इलेक्ट्रॉनिक, मतदान यंत्राबाबतही त्यांनी कसा संशय व्यक्त केला हे देश जाणतो. देशाची रिझर्व बँक, या बँकेची धोरणे, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. विश्वासाबाबत शंका निर्माण करण्याचे पाप केले. देशाच्या ज्या एजंसी यांच्या काळ्या कारनाम्याचा तपास करत आहे त्यांनाही यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. आणखी म्हणजे त्यांना आता देशातली प्रसार माध्यमेही पक्षपाती दिसू लागली आहेत.

बंधू- भगिनीनो, एका परिवाराची पूजा करणारे लोकशाहीचे पूजक असू शकत नाही. लक्ष भेदी हल्ला करणाऱ्या सैन्याचे साहस ही हे लोक नाकारतात.आंतरराष्ट्रीय एजंसी, भारताची स्तुती करू लागल्या तर हे त्यांच्या मागेही लागतात. देशाच्या ज्या एजंसी,यांच्या काळात विकासाची आकडेवारी देत होत्या त्याच एजंसी त्याच पद्धतीने नव्या सरकारच्या काळात आकडेवारी देतात आणि देशात वेगाने विकास होत असल्याचे सांगतात तेव्हा हे त्यांच्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित करतात. परदेशातून आलेल्या एखाद्या पाहुण्याने सरकारची स्तुती करणारे वक्तव्य केले तर साऱ्या मर्यादा ओलांडून हे लोक त्याबाबतही सवाल उपस्थित करतात आणि टीकाही करतात.

मित्रहो, देशातल्या जनतेचा ज्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे ते इतके खवळले आहेत, त्याच्या मागचे कारण आपण जनता आणि मी ही जाणतो. मोदींना विरोध करतांना देशाला विरोध करू लागतील असे मला तरी वाटले नव्हते. मात्र ज्याच्या जवळ आपणा सर्वांचा विश्वास आहे,आपला आशीर्वाद आहे, देशाच्या सव्वाशे कोटी जनतेचा विश्वास आहे, तो या लोकांच्या आक्रमणाने ना कधी डगमगतो, ना थांबतो, ना थकतो.

मित्रहो, माझ्या देशवासियांनो, प्रत्येक बाब नीट पारखून घ्या आणि पहा त्या बाजूला कोण आहे आणि या बाजूला कोण लोक आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा परिवार म्हणजेच देश आहे आणि माझ्यासाठी माझा देशच माझा परिवार आहे.देशातले सव्वाशे कोटी लोक, माझ्या परिवाराचे सदस्य आहेत. कमाईसाठी फक्त आपला आशीर्वाद, आपला स्नेह आणि आपला विश्वास आहे. करण्यासाठी माझ्याकडे फक्त सव्वाशे कोटी जनतेची सेवा आहे. आपणा सर्वांच्या सह्कार्याने, सव्वाशे कोटी देशवासीयांनी खांद्याला खांदा भिडवून वाटचाल केल्याने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा आमचा संकल्प अधिक दृढ होईल. मोठ्या संखेने आपण आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला अनेक अनेक धन्यवाद. आज ज्या रस्त्याचे लोकार्पण झाले आहे त्याचे महत्व केवळ या भागासाठी नव्हे तर 21 व्या शतकातला हिंदुस्थान कसा असेल याची ही झलक आहे आणि ती आपल्या घराजवळ आहे.

खूप-खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles passing away of former Prime Minister Dr. Manmohan Singh
December 26, 2024
India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji: PM
He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic policy over the years: PM
As our Prime Minister, he made extensive efforts to improve people’s lives: PM

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the passing away of former Prime Minister, Dr. Manmohan Singh. "India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji," Shri Modi stated. Prime Minister, Shri Narendra Modi remarked that Dr. Manmohan Singh rose from humble origins to become a respected economist. As our Prime Minister, Dr. Manmohan Singh made extensive efforts to improve people’s lives.

The Prime Minister posted on X:

India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic policy over the years. His interventions in Parliament were also insightful. As our Prime Minister, he made extensive efforts to improve people’s lives.

“Dr. Manmohan Singh Ji and I interacted regularly when he was PM and I was the CM of Gujarat. We would have extensive deliberations on various subjects relating to governance. His wisdom and humility were always visible.

In this hour of grief, my thoughts are with the family of Dr. Manmohan Singh Ji, his friends and countless admirers. Om Shanti."