गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली, मुख्यमंत्री रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीनभाई, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी भूपेंद्र चुडासमा, प्रदीप सिंह जाडेजा, गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे महासंचालक डॉ.जे.एम.व्यास, पदवीदान समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर, पदक विजेते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आज पंतप्रधानांचे खास पाहुणे शालेय विद्यार्थी जे आले आहेत, ते माझे खास पाहुणे आहेत.
बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचे गुजरातच्या न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या चौथ्या पदवीदान समारंभात मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. आणि हे स्वागत मी यासाठी करतो आहे कारण कुणाकडून चूक होऊ नये कि मी इथे पाहुणा आहे. सर्वप्रथम मी त्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, ज्यांना आज पदवी मिळत आहे आणि जे आपल्या आयुष्यात पुढचा आणि अतिशय महत्वाच्या प्रवासाची सुरूवात करत आहेत. मी सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या माता पित्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे देखील हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचे संस्कार, त्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आज त्यांची लाडकी लेक आणि लाडका लेक यशाच्या या शिखरावर पोहचले आहेत.
गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात उपस्थित राहताना मला विशेष आनंद होत आहे. हे विद्यापीठ आणि इथे शिकणारे विद्यार्थी प्रणेते आहेत. अनेक विषयांवरील अभ्यासक्रमाबाबत जिथे चर्चा होते असे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे हे विद्यापीठ नसून इथे विशेष अभ्यासक्रमांवर भर दिला जातो. तुमचा गांधीनगरला येण्याचा मार्ग सोपा नसेल. जेव्हा तुम्ही इथे येण्याचा विचार केला, तेव्हा लोकांनी तुम्हाला नक्की विचारले असेल कि तुम्हाला नक्की हेच करायचे आहे ना? तुम्ही गुन्ह्यांशी संबंधित अनेक टीव्ही शो पाहता का? किंवा तुम्ही अगाथा ख्रिस्ती किंवा फेलुदाची अनेक पुस्तके वाचता का?तरीही तुम्ही अशी शाखा निवडता जी पारंपरिक दृष्ट्या अपारंपरिक समजली जाते मात्र आजच्या काळासाठी महत्वाची आहे. यावरून असे दिसून येते की तुम्ही केवळ स्वतःवरच विश्वास ठेवत नाही तर स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी दृढनिश्चयी शक्तीदेखील तुमच्याकडे आहे. या गुणामुळे आगामी काळात तुम्हाला नेहमीच मदत होईल. मित्रांनो, ही अभिमानाची बाब आहे की, जीएफएसयूने शैक्षणिक उत्कृष्टतेचे असे निकष साध्य केले आहेत की, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने या विद्यापीठाला ‘ए’ श्रेणी दिली आहे. मला आनंद आहे की. जीएफएसयू हे भारतातील फार कमी विद्यापीठांपैकी एक आहे ज्यांनी स्थापनेनंतर लगेचच हे साध्य करून दाखवले आहे. पस्तीस अभ्यासक्रम आणि दोन हजार दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांसह, गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ न्यायवैद्यक विज्ञानाच्या विविध क्षेत्रात शिक्षण आणि संशोधन करत आहे. या विद्यापीठाचा गुजरात आणि भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून ऊर्जा आणि बांधिलकी जपणारे जीएफएसयूचे नेतृत्व, व्यवस्थापन आणि शिक्षकांचे मी अभिनंदन करतो.
मित्रांनो , पोलिस, न्यायवैद्यक विज्ञान आणि न्यायपालिका हे तिघेही फौजदारी न्याय वितरण प्रणालीचे अविभाज्य घटक असतात. कुठल्याही देशांत हे तीनही घटक जेवढे अधिक मजबूत असतील तेवढेच तेथील लोक सुरक्षित असतील आणि गुन्हेगारी कृत्ये नियंत्रणात राहतील. याच विचाराने, गेल्या काही वर्षांत या तीन स्तंभांच्या विस्ताराचे काम गुजरातमध्ये सुरु झाले. ज्यायोगे समग्र दृष्टीकोन आला. रक्षा शक्ती विद्यापीठ, राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ म्हणजे एक प्रकारे कायदा व्यवस्थेशी संबंधित सर्वांगीण पॅकेज याचाच परिणाम आहे की आज रक्षा शक्ती विद्यापीठातून पात्र, प्रशिक्षित विद्यार्थी बाहेर पडत आहेत जे, विविध सुरक्षा दलात जाऊन अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठातून बाहेर पडलेले युवक त्यांचे कौशल्य, तपास आणि न्यायिक प्रक्रियेला अधिक सशक्त करत आहेत.
मित्रांनो आजच्या बदलत्या काळात गुन्हेगार त्यांचे गुन्हे लपविण्यासाठी, वाचण्यासाठी ज्याप्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत आहेत त्या स्थितीत हे तितकेच महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीला ही जाणीव असायला हवी की जर त्याने कधी काही चुकीचे केले तर कधी ना कधी तो पकडला जाईल, शिक्षा भोगावी लागेल. पकडले जाण्याच्या भीतीची ही भावना आणि न्यायालयात त्याचा गुन्हा सिद्ध होण्याचे भय गुन्हयांवर नियंत्रण ठेवण्यात खूप सहाय्यक ठरतात आणि इथेच न्यायवैद्यक विज्ञानाची भूमिका सर्वात जास्त महत्वाची ठरते. शिक्षेची शाश्वती देखील न्यायिक प्रणालीच्या विश्वासार्हतेला अधिक नवी ताकद देतात. शास्त्रीय पद्धतीने गुन्हेगारी तपास आणि न्याय व्यवस्था मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तयार करत असल्याबद्दल मी जीएफएसयूची विशेष प्रशंसा करतो. केवळ भारतच नव्हे, तर जगभरात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था तुमच्या विद्यापीठाकडे मदत मागण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक देशातील लोकांना प्रशिक्षण आणि सल्ला प्रदान करून अनेक देशांना मदत करून तुमचे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवत आहे.
मला सांगण्यात आले आहे की, गेल्या पाच वर्षांत गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाने 6 हजार पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये, 20 पेक्षा अधिक देशांमधील 700 हून अधिक पोलिस अधिकारी देखील इथून प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. आणि आपापल्या देशांमध्ये परत आल्यावर हे अधिकारी आज आपला देश आणि समाज सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वापरत आहेत. आज सर्वांसाठी , गुजरातमध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की त्याच्या भूमीवरील एक विद्यापीठ त्यांच्या प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या बळावर जागतिक सुरक्षेत एवढी निर्णायक भूमिका बजावत आहे.
मित्रांनो, आजच्या या युगात, हे अगदी आवश्यक आहे की प्रत्येक नवीन व्यवस्थेने स्वतःला आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदलत राहायला हवे. यात डिजिटल तंत्रज्ञानाचे नक्कीच महत्त्वाचे योगदान आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने न्यायवैद्यक विज्ञानाला नवीन ताकद दिली आहे. पूर्वी तर सर्व चाचण्या, तपास शारीरिकदृष्ट्याकरावे लागायचे. आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे काम सोपे आणि अगदी अचूक केले आहेआणि मला वाटते की या क्षेत्रात नवनवीन सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या , डिजिटल साधनांचा वापर वाढवायला अजूनही खूप वाव आहे. आणि या दिशेने देखील अधिक विस्तृतपणे विचार केला पाहिजे. मित्रांनो, एका बाजूला, इंटरनेटने आपल्या सर्वांचे जगणे सुलभ केले आहे, तर दुसरीकडे, सायबर गुन्हा हा नवीन प्रकारचा गुन्हा जन्माला आला आहे. हा सायबर गुन्हा देशाच्या नागरिकांच्या खासगी जीवनासाठी एक आव्हान आहे. आपल्या वित्तीय संस्था असतील, ऊर्जा केंद्र असतील, रुग्णालये असतील या सर्वांना ते प्रभावित करते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील, केवळ हिंदुस्थानासाठी नव्हे, जगातील प्रत्येक देशासाठी हे खूप मोठे आव्हान आहे.
आज, या प्रसंगी, सर्व सायबर आणि डिजिटल तज्ज्ञांना विनंती करतो की, त्यांनी डिजिटल भारत अभियानात सहभागी होऊन देशाला आणि समाजाला सुरक्षित करण्यासाठी, त्यांना सशक्त करण्यासाठी मदत करावी. सरकारकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी अशा गुन्हेगारांमधे भय निर्माण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. सायबर फॉरेन्सिक लॅबलादेखील बळकटी मिळाली आहे, परंतु त्याचबरोबर आपल्यासारख्या अनुभवी तज्ज्ञांचीही देशाला खूप खूप गरज आहे. जे कमीत कमी वेळेत अशा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणांना मदत करतील.
मित्रांनो, बदलत्या काळात केवळ गुन्हेगारीच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये न्यायवैद्यक विज्ञानाचे महत्व वाढत आहे. उदा. विमा क्षेत्र असेल, विमा कंपन्यांकडे दाव्याच्या सेटलमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात, त्यांच्यासाठी मोठे आव्हान असते ते म्हणजे जो दावा करत आहे तो खरा आहे किंवा नाही . न्यायवैद्यक विज्ञानाबद्दलची माहिती त्यांना त्यात मदत करु शकते. त्याचप्रमाणे, आरोग्य क्षेत्रात काम करणा-यांना न्यायवैद्यक विज्ञानाची माहिती असेल तर ते देखील न्यायवैद्यक गरजेनुसार कार्य करतील. एखादा अपघात झाल्यानंतर किंवा गुन्हा झाल्यानंतर एखादी जखमी व्यक्ती रुग्णालयात पोहचते तेव्हा ती तिच्याबरोबर अनेक न्यायवैद्यक पुरावे घेऊन येते.
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना , परिचारिकांना जर न्यायवैद्यक विज्ञानाची चांगल्या प्रकारे माहिती असेल तर हे पुरावे वाचवण्यात ते खूप मदत करू शकतात. न्यायवैद्यक विज्ञानाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मानवी बुद्धिमत्तेच्या सूक्ष्मता विकसित करणे फार महत्वाचे आहे. तुमच्यापैकी काहींनी येथे गुजरात आणि राजस्थान विशेषतः पागी समाजाबद्दल ऐकले असेल. कच्छ आणि सीमेकडील भागात पागी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या त्यांच्या मानवी बुद्धीमत्तेसाठी ओळखले जातात. जसे उंटाच्या पावलाचा ठसा पाहून सांगतात की उंट एकटा होता का त्याच्यावर कुणी प्रवासी बसलेला होता का त्यांच्याबरोबर काही सामान होते आणि मी तर कुठेतरी वाचले होते की, जो पगी समाज असतो तो लहानपणापासून स्वतःच्या पाचही संवेदना विकसित करण्यासाठी, आणि पारंपारिक प्रशिक्षण मिळवण्यासाठी त्यांच्या कुणबात राहात असतो आणि म्हणूनच गंभीर गुन्ह्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी काही भागात, पोलिस अजूनही या प्रकारच्या पगी समाजातील लोकांना बोलावून त्यांची मदत घेतात. मी विद्यापीठ आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की, काहीवेळा या सर्व गोष्टींचा उपयोग जगात झाला आहे, मानवी बुद्धीने वापरला आहे. न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ अनेक विषयांवर काम करत आहे.
पारंपारिकरित्या , आपल्या देशात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि जुन्या काळातील जी परंपरा होती , पूर्वी जेव्हा डिजिटल तंत्रज्ञान नव्हते तेव्हा लोक बोटांचे ठसे एकत्र करून आपले मत द्यायचे. हस्तलिखितावरून ओळखणारे तज्ञ असायचे ते मत द्यायचे, मानसिक स्थितीचे विश्लेषण व्हायचे, ते मानसिक स्थितीची माहिती तयार करून द्यायचे. या ज्या पारंपरिक गोष्टी भारतात होत्या आणि प्रत्येक राज्यात होत्या, त्या जर न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाद्वारे एकत्र केल्या आणि त्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्याला नव्या आयामावर कसे घेऊन जाता येईल? मला वाटते केवळ भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक देशात अशी कोणती ना कोणती विद्या आहे. त्याचा जर वापर केला तर आपण या गोष्टी खूप पुढे नेऊ शकतो. उदाहरणार्थ, जे सायको प्रोफाइल तयार करतात, मनोविश्लेषण करतात. एकेकाळी ते एकत्र भेटून चर्चा करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारून ठरवायचे. आज ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होते. जसे पारंपरिक ज्ञानाने अधिक तंत्रज्ञान कार्यक्षमता,आणली आहे, परिपूर्णता आणली आहे. मला वाटते आपल्या न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ संशोधनाचे एक क्षेत्र असायला हवे . पारंपारिक ज्ञान, मानवी बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपण या क्षेत्रात कशा प्रकारे काम करू शकतो त्या दिशेने आपल्या विद्यापीठाने काम करायला हवे.
मित्रानो, गुन्हेगार आणि गुन्हा करण्याच्या पद्धती सतत बदलत असतात. वेगाने बदलणाऱ्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला हे स्पष्ट करणारे नवीन तंत्र विकसित करावेच लागेल. गुन्हेगारांना वाचवले जाणार नाही. डीएनए प्रोफाइलिंगने न्यायवैद्यक तपासणीत नवीन परिमाण स्थापन केले आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, अशी अनेक प्रकरणे सोडवली गेली आहेत ज्यांचे अन्यथा निराकरण झाले नसते. न्यायिक तज्ञांना मी आवाहन करतो की त्यांनी डीएनए प्रोफाइलिंगचा शक्य तितका वापर करून न्यायिक व्यवस्थेला मदत करावी जेणेकरून गुन्हेगारांना त्वरित शिक्षा मिळेल आणि पीडितांना न्याय मिळेल. न्यायवैद्यक तपासणीमध्ये डीएनए तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन आमच्या सरकारने डीएनए तंत्रज्ञानाचा (वापर आणि अनुप्रयोग) विनियमन विधेयक 2018 मंजूर केले आहे. या विधेयकानुसार, सर्व डीएनए चाचण्या विश्वासार्ह राहतील आणि माहिती सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेऊ. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात डीएनए विश्लेषण प्रयोगशाळा बळकट करण्याचे सरकारने ठरविले आहे. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत, चंदिगढ येथे निर्भया योजनेअंतर्गत, कला प्रयोगशाळेची स्थापना केली जात आहे. मला खात्री आहे की येत्या काळात आम्ही महिलांवरील अत्याचारांसह निर्घृण गुन्ह्यांचा, जलदगतीने आणि अचूकपणे बिमोड करू शकू.
आता जसे आपण अलिकडच्या काळात वर्तमानपत्रात वाचले असेल , मध्य प्रदेश मध्ये मंदसौर येथील न्यायालयाने फक्त दोन महिन्यांच्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील कटनी येथे एका न्यायालयाने पाच दिवसात सुनावणी करून या राक्षसांना फाशीची शिक्षा सुनावली होती. राजस्थानमध्येही न्यायालयानी अशाच प्रकारची जलद कारवाई केली आहे. बलात्कारासारख्या भयंकर गुन्ह्यात आपल्या न्यायालयांनी जलद गतीने निर्णय घ्यावेत यासाठी न्यायवैद्यक विज्ञान आणि तुमच्यासारखे तज्ज् खूप मोठी सेवा करू शकतात. खूप मोठा प्रभाव निर्माण करू शकतात. सरकारने कायदे कडक केले, पोलिसांनी तपास केला मात्र न्यायवैद्यक विज्ञानाने न्यायालयाला जलद निर्णय घेण्यासाठी एक मजबूत वैज्ञानिक मदत यंत्रणा दिली. न्यायालयीन प्रक्रियेत अशा प्रकारची तत्परता आणि गुन्हेगाराला वाचवण्याची कोणतीही संधी न देणे आणि मला वाटते तुमची योग्यता मोठ- मोठे गंभीर गुन्हे नियंत्रित करून समाजाची एक उत्तम सेवा करू शकतात.
मित्रानो, देशाच्या प्रत्येक राज्यात न्यायवैद्यक विज्ञान अधिक मजबूत करण्यावर , त्याच्या विस्तारासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. देशाच्या पोलीस दलात आधुनिकीकरण करण्याच्या या योजनेमध्ये सरकारने गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचा दर्जा सुधारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि प्रादेशिक स्तरावर उत्कृष्टतेचे केंद्र आणि एक नवीन संस्था स्थापन करण्याचे काम सुरु झाले आहे. या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये खर्च केले जातील, त्यापैकी 60 टक्के केंद्र सरकार देणार आहे. आणि मी आनंदी आहे की गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी सुमारे 50 कोटी रुपये देखील दिले आहेत. ही रक्कम न्यायवैद्यक विज्ञान तंत्राचे आधुनिकीकरण आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी वापरली जाईल.
मित्रांनो, तुम्ही अभ्यासासाठी अतिशय योग्य विषय निवडला आहे. न्यायवैद्यक विज्ञान वर्गातील काही तत्त्वे भिन्न संदर्भांमध्ये तुम्हाला जीवनाच्या वर्गामध्ये मदत करतील. त्यांनी तुम्हाला व्यक्तिमत्वाचे नियम शिकवले, ते तत्व आयुष्यात कधीही विसरू नका. स्वामी विवेकानंद म्हणायचे की प्रत्येक आत्मा संभाव्यतः दैवी आहे. याचाच अर्थ आपल्यापैकी प्रत्येकात , आपल्यामध्येच प्रचंड सामर्थ्य आहे ज्याचा आपण शोध घ्यायला हवा. ही ताकद दर्शविण्याच्या दिशेने पहिले पाऊल विश्वास ठेवणे हे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. लोकर्डने तुम्हाला हे शिकवले की गुन्ह्यातील गुन्हेगार काहीतरी गुन्हेगारीच्या क्षेत्रात आणील आणि त्यातून काहीतरी सोडेल. मला खात्री आहे की तुम्ही नेहमीच गुन्हे सोडवाल. परंतु लक्षात ठेवा, तुमच्यातील प्रत्येकजण आपल्या समाजासाठी देखील चांगले मूल्य जपतो. आणि, मूल्य जोडताना, इतरांकडूनही शिकण्याचे विसरू नका. आपले विचार नवीन कल्पना, दृष्टी आणि मते खुली ठेवा. आपल्या विचारांनी जग समृद्ध करा आणि इतरांकडील चांगले स्वीकारा.
ही विविधता तुम्हाला एक श्रीमंत व्यक्ती बनवेल. आणि जेव्हा मी ‘लॉ ऑफ प्रोग्रेसिव्ह चेंज’ असं म्हणतो तेव्हा, जेव्हा तुमचे मन स्वाभाविकपणे तुम्हाला जे काही शिकवले तिथे परत जाते. तसेच तुम्ही आगामी काळात करता. आपण अशा जगात राहात आहोत जो प्रत्येक अर्थाने वेगाने बदलत आहे. हा आजच्या काळाचा कणा आहे. नवीन कल्पना जुन्या होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. लोक आणि विशेषतः तरुण विक्रमी वेळेत चाकोरीबाहेरचे तोडगे सुचवतात. तसेच तुम्ही देखील जगभरातील बदलत्या स्थितीच्या केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. तुमचे शिक्षण आणि बुद्धिमत्तेने तुम्हाला चाकोरीबाहेरचा विचार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हे कौशल्य आपण केवळ आपल्या सभोवतालच्या बदलांशीच नव्हे तर प्रगतीशील बदल घडवून आणण्यासाठी देखील वापरले पाहिजे ज्यामुळे आपले जग एक उत्तम स्थान बनेल. भावी पिढ्या तुम्हाला यासाठी धन्यवाद देतील. मित्रांनो, युवकांच्या सहभागाशिवाय कोणतीही योजना किंवा उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. मला विश्वास आहे की तुम्ही येथे मिळवलेले ज्ञान प्रभावीपणे देशाची सेवा आणि व्यावसायिक यश प्राप्त करण्यास तुम्हाला मदत करेल. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा कायम राखाल. मी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना एक तेजस्वी आणि सशक्त भविष्य मिळो अशी प्रार्थना करतो.
आणि मी विशेषतः पाहत होतो क्वचितच कुणी मुलगा नजरेस पडत होता. सर्व पुरस्कार मुलीं घेत होत्या. पहा, हे बदलत्या काळाचे प्रतीक आहे. मी विशेषत: त्या मुली आणि त्यांचे पालक यांचे अभिनंदन करतो आणि या मुलींना रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा देतो. खूप- खूप धन्यवाद !