This decade will be for Indian entrepreneurs: PM
Our approach is to ’Reform with intent, Perform with integrity, Transform with intensity’, says PM
Our focus is on governance that is professional and process driven: PM

आपणा सर्वांना नव वर्षाच्या खूप-खूप शुभच्छा. किर्लोस्कर समूहासाठी तर दुहेरी समारंभाचीवेळ आहे. राष्ट्र निर्माणाच्या सहयोगाची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, किर्लोस्कर समूहाला खूप-खूप शुभेच्छा.

मित्रहो, किर्लोस्कर समूहाचे यश म्हणजे भारतीय उद्योग आणि भारतीय उद्योजकांच्या यशाची ओळख आहे. सिंधू खोरे संस्कृतीपासून ते आतापर्यंत भारतीयांच्या उद्योजकतेच्या चेतनेने देशाच्या विकासाला नवी ऊर्जा, नवी गती दिली आहे. देश गुलामगिरीत अडकला होता तेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि अशा उद्योजकांनी भारताचे मनोबल कायम ठेवले, कोणत्याही परिस्थितीत ही भावना  कमजोर पडू दिली नाही.हीच भावना होती ज्यामुळे, स्वातंत्र्यानंतरही देशाची आगेकूच सुरू ठेवण्यासाठी मदत झाली.

आजचा हा दिवस लक्ष्मण राव किर्लोस्कर यांचे विचार आणि स्वप्ने यांचा उत्सव साजरा करण्याचा तर आहेच, त्याचबरोबर उद्योजकांसाठी कल्पकता आणि निष्ठा यांची प्रेरणा घेण्यासाठी एक अमूल्य संधीही आहे. आजच्या दिवशी लक्ष्मणरावांच्या चरित्राचे प्रकाशन होत आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. चरित्राचे नावही फार छान आहे.’यांत्रिक  की  यात्रा’. त्यांच्या प्रवासाचे महत्वाचे टप्पे भारताच्या युवकांना कल्पकता आणि उद्योजकतेची वृत्ती बाणवण्यासाठी प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे.

मित्रहो, काही करून दाखवण्याची ही भावना, जोखीम घेण्याची ही भावना, नव- नव्या क्षेत्रात विस्तार करण्याची ही भावना आज प्रत्येक भारतीयाची ओळख आहे.भारतातला उद्योजक, देशाच्या विकासासाठी, आपल्या क्षमता आणि सफलतेचा विस्तार करण्यासाठी आसुसला आहे.आपण विचार करत असाल की आज जागतिक अर्थव्यवस्था आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत असताना मी इतक्या विश्वासाने कसे काय सांगू शकतो.

मित्रहो, भारतीय उद्योग जगतावर, आपण सर्वांवर माझा विश्वास आहे.परिस्थिती बदलण्यासाठी, प्रत्येक आवाहनाला तोंड देण्यासाठी ज्या इच्छा शक्तीची आवश्यकता असते, ती भारतीय उद्योग जगताच्या नसा- नसात भिनलेली आहे. म्हणूनच आज आपण नव्या वर्षात प्रवेश करत आहोत, नव्या दशकात प्रवेश करत आहोत तेव्हा मी निःशंकपणे सांगू इच्छितो की हे दशक भारतीय उद्योजकांचे असेल.

मित्रहो, या दशकात, पाच ट्रीलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट हा केवळ एक टप्पा आहे.आपली स्वप्ने यापेक्षा मोठी आहेत, आपल्या आकांक्षा यापेक्षा मोठ्या आहेत, आपली उद्दिष्टे यापेक्षा मोठी आहेत. म्हणूनच 2014 नंतर देशात, भारतीय उद्योग जगताची स्वप्ने, या जगताचा विस्तार, यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.या काळात, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कार्यवाहीमागे एकच विचार आहे की भारतात काम करणाऱ्या कोणत्याही उद्योजकासमोरची प्रत्येक अडचण दूर व्हावी, त्याच्यासाठी व्यवसायाला पोषक उत्तम वातावरण निर्माण व्हावे.

मित्रहो, देशातल्या लोकांचे सामर्थ्य तेव्हाच समोर येतें, जेव्हा सरकार, उद्योग जगतासाठी, अडथळा नव्हे तरसहकार्य करणारे म्हणून उभे राहते. मागच्या वर्षांमध्ये सरकारने हाच मार्ग अनुसरला आहे. मागच्या या वर्षांमध्ये, उद्देशकेंद्री सुधारणा, प्रामाणिकपणाने काम, परिवर्तन आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. उद्योग जगताच्या समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मित्रहो, सध्या दिवाळखोरी आणि नादारी संदर्भातल्या कायद्याची खूप चर्चा होते, मात्र इतका पैसा माघारी आणला,तितका पैसे माघारी आणला यावरच ही चर्चा सीमित राहिली आहे. मात्र यापेक्षाही जास्त बाबी यामध्ये आहेत. काही परिस्थितीमध्ये व्यवसायातून बाहेर पडणे हेच समजूतदारपणाचे मानले जाते.

काही वेळा, काही परिस्थितीत धंदा-व्यवसायातून बाहेर पडणेचश्रेयस्कर समजले जाते. एखादी कंपनीयशस्वी होत नसेल तर त्यामागे काही वाईट हेतू, किंवा कारस्थानच असेल असे नाही. देशात अशा उद्योजकांसाठी एक मार्ग तयार करणे आवश्यक होते आणि आयबीसीने त्यासाठी आधार निश्चित केला. आज ना उद्या यावर नक्कीच अभ्यास होईल की आयबीसीने  किती भारतीय  उद्योजकांचे भविष्य वाचवले, त्यांना बरबाद होण्यापासुन  वाचवले.

मित्रहो, भारतातल्या कर व्यवस्थेत कोणत्या त्रुटी होत्या हे आपण जाणताच. इन्स्पेक्टर राज, कर विषयक धोरणात संभ्रम, वेग-वेगळ्या राज्यातले कर यामुळे भारतीय उद्योग जगताच्या गतीला खीळ बसली होती. देशाने आता हे गतिरोधक हटवले आहेत. आपल्या कर व्यवस्थेत  पारदर्शकता यावी, ती अधिक प्रभावी ठरावी, उत्तरदायित्व वाढावे, करदाता आणि कर विभाग यामधला मानवी हस्तक्षेप समाप्त व्हावा यासाठी एक नवी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. आज देशात कंपनी कर इतके कमी आहेत इतके कमी दर यापूर्वी कधीही नव्हते.

मित्रहो, वस्तू आणि सेवा कर सुधारणा किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक सुधारणा याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत होती, प्रत्येकाने मागणी केली होती. हे सर्व आज वास्तवात उतरले आहे, ते भारतीय उद्योग जगताच्या समोरची प्रत्येक समस्या दूर व्हावी, त्यांना विस्तार करण्याची संधी दिली जावी या दृष्टीकोनामुळे.

भारत सरकार, उद्योजकांवर बडगा उगारून चालले आहे अशी सरकारची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. काही अप्रामाणिक आणि भ्रष्टाचाऱ्याविरोधात केलेल्या कारवाईला, भारतीय उद्योगावर बडगा उगारल्याचे रूप देणे म्हणजे सर्वात मोठा अपप्रचार आहे. भारतीय उद्योग, एका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात, कोणत्याही अडथळ्याविना आगेकूच करत राहावा, देशासाठी, स्वतःसाठी या उद्योगाने संपत्ती निर्माण करावी हाच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. भारतीय उद्योग जगत, कायद्याच्या जंजाळात अडकून राहू नये यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून, देशातले दीड हजारहून जास्त जुने कायदे रद्द करण्यात आले. कंपनी कायद्यातल्या छोट्या-छोट्या तांत्रिक चुकांसाठीही उद्योगपतींवर फौजदारी खटला होत असे. मी याच्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. यासंदर्भातल्या अशा अनेक बाबी आता  गुन्ह्यातून वगळण्यात आल्या आहेत. कामगार न्यायालयाबाबत आता सुरु असलेले काम म्हणजे, सुलभीकरण असून यामुळे उद्योग, कामगार या दोन्हीनाही याचा लाभ होणार आहे.

मित्रहो, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, देशात तात्कालिक उपायांबरोबरच दीर्घ कालीन उपायांवरही काम सुरु आहे. देशासाठी असे निर्णय घेतले जात आहेत ज्यामुळे, केवळ वर्तमानच नव्हे तर भावी  पिढ्यांनाही  त्याचा लाभ होईल.

मित्रहो, गेल्या पाच वर्षात, देशात संपूर्ण निष्ठेने काम करण्याचे,  इमानदारीने काम करण्याचे, पारदर्शकतेने, काम करण्याचे वातावरण पाहायला मिळते. यामुळे  मोठी उद्दिष्टे  ठेवून ती वेळेवर साध्य करण्याचा उत्साह मिळाला आहे. 21 व्या शतकात भारतात,पायाभूत संरचनेसाठी, 100 लाख कोटी  रुपयांपेक्षा जास्त  गुंतवणूक व्हावी, लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक स्तरावर योजना असाव्यात, देशाच्या मनुष्यबळावर गुंतवणूक व्हावी, अशा सर्व आघाड्यांवर काम सुरु आहे आणि खूप वेगाने काम सुरु आहे.

मित्रहो, मी ज्या परिवर्तनाच्या गतीबाबत बोलत आहे त्याची झलक आपल्याला आकड्यातूनही दिसत आहे. सर्व स्तरापर्यंत वेगाने काम करण्याचा परिणाम म्हणजे, केवळ पाच वर्षात व्यवसाय सुलभता क्रमवारीत79 अंकांची सुधारणा झाली आहे. कल्पकता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी, ज्या वेगाने धोरण आखण्यात आले, निर्णय घेण्यात आले त्याचा परिणाम म्हणून केवळ पाच वर्षात जागतिक नाविन्यता निर्देशांकात आपली 20 अंकांची सुधारणा झाली आहे. सलग अनेक वर्षे, जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या सर्वोत्तम 10 देशांमध्ये कायम राहणे ही भारतासाठी, मोठी कामगिरी आहे.

मित्रहो, गेल्या काही वर्षात देशात आणखी एक महत्वाचे परिवर्तन घडले आहे. हे परिवर्तन आहे ते युवा उद्योजकांच्या संख्येमध्ये. आज देशातले युवा उद्योजक, नव्या कल्पना, व्यापारासाठी नवी  मॉडेल  घेऊन समोर येत आहेत. उद्योगांमध्ये, खाण, आणि काही विशिष्ट क्षेत्रांवर भर राहण्याचा काळ आता मागे पडला आहे. आपले युवक आता नव्या क्षेत्रांचाही विस्तार करत आहेत. त्यातही महत्वाची बाब म्हणजे, छोट्या-छोट्या शहरातून येऊन हे युवक, उत्तुंग यश प्राप्त करत आहेत.

मित्रहो, एका काळात बॉम्बे क्लब देशातल्या उद्योजकांचे, त्यांच्या व्यापार स्वारस्याचे प्रतिनिधित्व करतो असे म्हटले जायचे. आज असा क्लब झाला तर त्याला भारत क्लब असे म्हटले जाईल, ज्यामध्ये, वेग-वेगळ्या क्षेत्रातले जेष्ठ तज्ञआणि नवे उद्योजक, असे सर्वांचे प्रतिनिधित्व असेल. भारताची बदलती व्यापार संस्कृती, त्याचा विस्तार, त्याचे सामर्थ्य याचे हे उत्तम उदाहरण असेल. म्हणूनच भारताचे सामर्थ्य, भारतीय उद्योजकांचे सामर्थ्य कोणी कमी लेखत असेल तर ती चूक ठरेल. नववर्षाच्या सुरवातीला या मंचावरून मी भारतीय उद्योग जगताला पुन्हा सांगू इच्छितो की आपल्या आसपास निराशेला थाराही देऊ नका. नव्या उर्जेने वाटचाल करा, विस्तारासाठी आपण देशाच्या ज्या भागात जाल, तिथे भारत सरकार आपल्या खांद्याला खांदा भिडवून आपल्यासमवेत राहील.आपला मार्ग काय असेल, कोणता असला पाहिजे याबाबत लक्ष्मणराव यांच्या जीवनापासून प्रेरणा घेत मी विस्ताराने सांगू इच्छितो.

मित्रहो, लक्ष्मणराव देशातल्या प्रेरक व्यक्तींपैकी एक  होते, ज्यांनी भारताच्या गरजांनुसार तंत्रज्ञाना वापर आणि  यंत्र निर्मिताचे आव्हान स्वीकारले. देशाच्या आवश्यकता आणि त्याच्याशी संबंधित निर्मिती याचा विचार, भारताच्या विकासाची गती आणि भारतीय उद्योगाच्या विकासाची गती वेगवान करेल. आपल्याला ‘झिरो डीफेक्ट झिरो इफेक्ट’ हा मंत्र ध्यानात ठेवून जागतिक स्तराची उत्पादन निर्मिती करावी लागेल, तेव्हाच आपण निर्यात वृद्धिगत करू शकू, जागतिक बाजारपेठेत आपला विस्तार करू शकू. ‘इंडियन सोल्युशन, ग्लोबल एप्लिकेशन’ बाबत आपण विचार केला पाहिजे, त्याच अनुषंगाने आपल्या योजना अमलात आणाव्या लागतील. मी इथे दोन योजनांची चर्चा करू इच्छितो. एक आहे वित्तीय व्यवहाराशी जोडलेली युपीआय योजना आणि दुसरी आहे देशभरात एलईडी बल्ब पोहोचवणारी उजाला योजना.

मित्रहो, आज भारताला वेगवान बँकिंग व्यवहार आणि तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग हवा आहे.  केवळ तीन वर्षात युपीआयच्या वाढत्या जाळ्याने ही इच्छा पूर्ण केली आहे. आज 24 तास, आठवड्याचे  सातही दिवस, देश सुलभ आणि ऑनलाइन  व्यवहार करत आहे. आज भीम ऐप मोठा ब्रान्ड झाला आहे.

मित्रहो, 2018-19 या वित्तीय वर्षात युपीआय मार्फत सुमारे 9 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या वित्तीय वर्षात डिसेंबर पर्यंत,सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे व्यवहार युपीआय मार्फत झाले आहेत. यावरून देशात किती वेगाने डिजिटल व्यवहार होत आहेत याचा आपल्याला अंदाज येईल.

मित्रहो, देशाला अशा तोडग्याची गरज होती ज्यामुळे विजेवर खर्च कमी आणि उजेड जास्त त्याचवेळी किमतही कमी असेल.यातूनच उजाला योजना  सुरु झाली. एलईडी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली. धोरणात बदल घडवण्यात आले. यामुळे बल्बची किंमत कमी झाली आणि एकदा लोकांनी याचा फायदा अनुभवल्यानंतर मागणीत वाढ झाली. कालच उजाला योजनेला 5 वर्षे पूर्ण झाली. यादरम्यान देशभरात 36 कोटीपेक्षा जास्त एलईडी बल्बचे वितरण झाले आहे याचा मला आनंद आहे. एव्हढेच नाही तर पारंपारिक पथ दिवे प्रणाली एलईडी आधारित करण्यासाठी 5 वर्षापासून कार्यक्रम सुरु आहे. याअंतर्गत एक कोटीपेक्षा जास्त एलईडी पथ दिवे बसवण्यात आले आहेत. या दोनही प्रयत्नामुळे सुमारे 5500 कोटी किलोवेट/तास विजेची बचत दर वर्षी होत आहे. यामुळे दर वर्षी हजारो कोटी रुपयांचा विजेचा खर्च कमी होत आहे आणि कार्बनडाय ऑक्सइड उत्सर्जनही कमी होत आहे.  भारतातून सुरु झालेले हे नाविन्यपूर्ण उपक्रम मग उजाला असेल किंवा युपीआय, जगातल्या अनेक देशांसाठी प्रेरणा ठरले आहेत ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

मित्रहो, अशा यशोगाथा आपल्या मेक इन इंडिया अभियान, आपल्या उद्योग जगताची शक्ती आहे, ताकद आहे. अशाच यशोगाथा मला भारतीय उद्योग जगताकडून, प्रत्येक क्षेत्रातून हव्या आहेत. जल-जीवन मिशन असो, नवीकरणीय उर्जा असो, इलेक्ट्रिक मोबिलिटी असो, आपत्ती व्यवस्थापन असो, संरक्षण असो, प्रत्येक क्षेत्रात आपल्यासाठी अनेक यशोगाथा आपली प्रतीक्षा करत आहेत. सरकार सर्व बाजूनी आपल्या समवेत आहे.

आपण या वातावरणाचा संपूर्णपणे लाभ घ्या. निरंतर नाविन्यता आणत राहा, गुंतवणूक करत राहा, राष्ट्र सेवेत आपले योगदान देत राहा. याच अपेक्षेने संबोधन समाप्त करतो, किर्लोस्कर समूहाला, किर्लोस्कर कुटुंबाला पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो. शानदार शतकासाठीही खूप-खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Private equity investments in Indian real estate sector increase by 10%

Media Coverage

Private equity investments in Indian real estate sector increase by 10%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India