व्यासपीठावर उपस्थित सर्व मित्रगण आणि मोठ्यासंख्येने आलेले माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य. मी थोडा विवंचनेत होतो की, गुजराती मध्ये संवाद साधू की, हिंदी मध्ये बोलू, परंतु नंतर माझ्या मनात विचार आला की, तुम्ही सर्वांनी जे इतके मोठे काम केले आहे ते सर्वांना माहिती झाले पाहिजे. येथे दानशुरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ५०० कोटी, ५०० कोटी खूप कौतुक होत आहे, परंतु मी कौतुक नाही करणार. ह्यांनी काही काम नाही केले. तुम्हाला धक्का बसला ना, मी तुम्हाला सांगतो ह्यांनी जरी ५०० कोटी नाही ५ हजार कोटी दिले असते तरी काही नाही, कारण हे सगळे असे लोकं आहेत जे गुजरातच्या शेतांमध्ये मातीत राबून मोठे झाले आहेत. हे सगळे असे लोकं आहेत जे आपल्या सवंगड्यांसोबत बालपणीचे खेळ खेळायचे. झाडावर चढणे उतरणे हीच त्यांची जिम होती. सायकलच्या टायरचा खेळ करण्यात मजा होती, हेच बालपण होते. वर्षभर आई वडील घरात हेच बोलायचे ह्यावेळी पाऊस चांगला झाला तर बर होईल. मुलगा अभ्यास करेल की नाही याची चर्चा नसायची. घरात एकाच चर्चा असायची देव करो आणि ह्यावेळी पाऊस चांगला पडो. दुसरी प्रार्थना करायचे की, जे आमच्याकडे एक दोन जनावर आहेत ते कधी उपाशी राहू नये. अशा कुटुंबातील ही मुल आहेत, ही अशी मुले आहेत ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पहिले आहे, ज्यांनी आपलं बालपण ह्या सगळ्या परीस्थित घालवले आहे.
पाऊस कमी झाला असेल, कुटुंबाला जितकी गरज आहे त्यापेक्षा कमी पिकं आलं असेल, तरीसुद्धा जर धान्याच्या राशी शेतात तयार असतील, तर चोर खाऊ दे, मोर खाऊ दे, आलेला पाहुणा खाऊदे, त्यानंतर जे वाचेल ते धनी खाईल. हे संस्कार ज्या कुटुंबांवर आहेत. स्वतःच्या घामाने पिकवलेले धान्य चोराने जरी नेले तरी त्यांना राग येत नाही, पशु पक्ष्यांनी खाल्ले तरी त्यांना आनंद आहे. कोणी पाहुणा आला त्याची झोळी भरून दिली. आणि त्यानंतर काही वाचले तर ते घरी मुलांसाठी घेऊन यायचे आणि त्याच्यावर संपूर्ण वर्ष घालवायचे, हे गुजरातमधील माझ्या खेडूत परिवाराचे संस्कार आहेत. ही त्यांचीच मुले आहेत ज्यांच्या आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिंता काढून दुसऱ्याचे पोट भरण्यात धन्यता मानली. त्यांच्यासाठी ५०० कोटी काहीच नाहीत. हे देण्याचे संस्कार घेऊनच जन्माला आले आहेत. हे जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत त्यांना रात्री शांत झोप लागणार नाही; आणि मी ह्याचं परिवारांमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. मी इतर ठिकाणी जातो तेव्हा कधी कधी मला वाटते की, लोकांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. प्रत्येकाच्या नजरेत मी पंतप्रधान झालो आहे, परंतु ह्या सर्वाला एक अपवाद असेल तर ते आहे माझे सुरत. मी इथे जेव्हा कधी लोकांना भेटतो मला तेच प्रेम तीच आपुलकी मिळते. पंतप्रधान पदाचा कोणताही छाप इथे दिसून येत नाही. इथे मला माझ्या कुटुंबात असल्यासारखे वाटते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाहेरच्या लोकांना देखील कदाचित आश्चर्य वाटेल. ही सर्व धनी कुटुंब आहेत. अरबो खरबो मध्ये खेळणारी लोकं आहेत. जेव्हापासून माझे सुरतमध्ये येणे निश्चित झाले आहे. ज्या ज्या कुटुंबांसोबत माझे जवळचे संबंध आहेत, ते तर आता अरबो खरबो पती झाले आहेत. कधीतरी त्यांच्या आईच्या हाताची बाजरीची भाकरी खाल्ली आहे. कधी खिचडी खाल्ली आहे. मला फोन आला की, आज रात्री तुम्ही सर्किट हाऊस मध्ये थांबणार आहात तर बाजरीची भाकरी पाठवू का? खिचडी पाठवू का? आज सकाळी देखील मला जो नाश्ता आला होता तो आमच्या एका जुन्या स्नेह्यांनी पाठवला होता. आपल्या सौराष्ट्रामध्ये जी जाडी भाकरी बनवतात ती पाठवली होती. त्यांना माहित आहे, पंतप्रधानाला काय खायचे आहे, काय खायचे नाही, काही कठीण काम नाही. परंतु हे कुटुंबाचे प्रेम आहे, ज्याच्या प्रत्येक कुटुंबातील आईने, ज्यांनी कधीना कधी तरी माझी काळजी घेतली होती. ही त्याच कुटुंबातील लोकं आहेत जी माझी काळजी घेत आहेत. मला माहित आहे जीवनात याहून मोठे सौभाग्य नाही. पदामुळे माणूस मोठा होत नाही, हे प्रेमच आहे जे मोठेपणाला आपल्या हृदयात स्थान देते, जे प्रेम तुम्ही लोकांनी मला दिले आहे त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
आज एका रुग्णालयाचे लोकार्पण होत आहे. आधुनिक रुग्णालय आहे. जेव्हा मी इथे होतो तेव्हा मी सांगायचो की, याचा शिलान्यास मी करणार, याचे उद्घाटन मी करणार, तेव्हा लोकांना वाटायचे की, हा खूप अहंकारी आहे. हा अहंकार नव्हता. ही माझ्या मनाची वचनबद्धता होती की, पायाभरणी करून पाट्या लावण्याची परंपरा समाप्त झाली पाहिजे. जे काम सुरु करायचे ते पूर्णत्वास न्यायचे. जर ते काम पूर्ण होणार नसेल तर ते सुरूच करू नये. इथे तुम्हा सर्वांना जितका आनंद होत आहे मला त्याहून अधिक आनंद होत आहे, कारण विजयादशमीचा तो दिवस होता. भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. मी त्यावेळी संपूर्ण देशात धावपळ करत होतो, परंतु तरी देखील माझे विजयादशमीचे आणि नवरात्रीचे उपवास पूर्ण झाले होते. मी ठरवले होते मला कितीही त्रास झाला तरी मी सुरतला जाणारच आणि मी आलो देखील होतो. त्यादिवशी हे लाल जी बादशाह माझ्या बाजूला उभे राहून फोटो काढू इच्छित होते. भूमिपूजन सुरु करायचे होते, त्यावेळी मी बादशहा ला सांगितले ५० कोटी द्याल तर फोटो काढून देईन नाही तर नाही. या अधिकार वाणीने मी तुमच्यामध्ये काम केले आहे. मी जेव्हा या रुग्णालयाचे भव्य रूप पाहतो तेव्हा माझ्यासाठी याहून आनंदाची कोणती बाब असूच शकत नाही. आणि हे काम इतक्या चांगल्या पध्दतीने पूर्ण केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो.
मला माहित आहे की हे रुग्णालय दात्यांनी दिलेल्या देणगीतून नाही उभे राहिले तर हे रुग्णालय कुटुंबातील आपुलकीच्या मेहनतीतून उभे राहिले आहे. पैश्याहून अधिक मौल्यवान कष्ट असतात, घाम असतो, पैशांवर घामाचा अभिषेक केला आहे. सामान्यतः मी जेव्हा एखाद्या हिऱ्याच्या कारखान्याचे उद्घाटन करतो तेव्हा मी सांगतो की तुमच्या कारखान्याची भरभराट होऊ दे. तुम्ही वस्त्रोद्योग करत असाल तर मी शुभेच्छा देतो, परंतु आज मी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. माझी इच्छा आहे की कोणी रुग्णालयात येवू नये. आणि जर कोणी एकदा आले तर त्याला इतके ताकदवर बनवून पाठवा की इथे पुन्हा येण्याची गरज भासू नये, अशा मी शुभेच्छा देतो.
आपल्या देशात डॉक्टरांची कमी, रुग्णालयांची कमी, महागडी औषधे. आज कोणत्याही मध्यवर्गीय कुटुंबात एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या घराचे सर्व अर्थकारण बिघडते.एक व्यक्ती जर आजारी पडली तर, घर घ्यायचे आहे, घेऊ नाही शकत. मुलीचे लग्न करायचे आहे, नाही करू शकत. आणि अशावेळी सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवेचा लाभ मिळाला पाहिजे. भारत सरकारने आताच आरोग्य धोरण जाहीर केले आहे. अटलजींच्या सरकार नंतर १५ वर्षांनी या सरकारने आरोग्य धोरण आणले आहे. मध्यंतरीच्या काळात बरीच कामे राहिली होती, जी मला करायला लागत आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे की मी जेव्हा गुजरात मध्ये होतो तेव्हा बऱ्याच लोकांना नाराज करायचो, आता दिल्लीला गेलो आहे तर देशातल्या पण बऱ्याच लोकांना नाराज करत असतो. प्रत्येक दिवशी असे काहीतरी काम करतो की कोणी ना कोणीतरी माझ्यावर नाराज होतेच. आता ज्या औषध कंपन्या आहेत, ज्या इंजेक्शनचे ते कधी १२०० रुपये घ्याचे, ज्या गोळ्यांचे ते ३०० ते ४०० रुपये घ्यायचे, आम्ही सर्वांना बोलवले आणि विचारले की, तुम्ही हे काय करताय किती गुतंवणूक करता, किती खर्च होतो? आणि जे औषध १२०० रुपयांना मिळायचे ते ७० ते ८० रुपयांना कसे मिळेल, जे औषध ३०० रुपयांना मिळायचे ते ३० रुपयांना कसे मिळेल याबाबत काही नियम बनवले. अंदाजे ७०० औषधांचे दर निश्चित केले जेणेकरून गंभीर स्वरूपाच्या आजारातही गरीबातील गरीब व्यक्तीला स्वस्त औषध उपलब्ध होईल, हे काम केले आहे. औषध निर्माते माझ्यावर किती नाराज असतील याचा तुम्ही अंदाज लावू शकता.
आज हृदय रोगी..... प्रत्येक कुटुंबात चिंता असते हृदयाची. प्रत्येक घरात जेवणाच्या टेबलवर जेवणाविषयी चर्चा होते. वजन कमी करा, कमी खा, फक्त चर्चा होते करत कोणीच नाही. प्रत्येकाला हृदयविकाराच्या झटक्याची चिंता असते आणि हृदयात स्टेंट लावणे, आता आपण काही त्यातले तज्ञ नाही, डॉक्टर सांगतात हे लावा तर ३०- ४० हजार रुपये खर्च होईल, रुग्ण विचारतो की आयुष्याचे काय होईल, डॉक्टर सांगतो हे लावले तर ४-५ वर्ष काही त्रास होणार नाही. नंतर दुसरा दाखवतात हे इम्पोर्टेड आहे हे लावले तर दीड लाख रुपये खर्च येईल आणि आयुष्यभर बघावे लागणार नाही. गरीब व्यक्ती देखील विचार करतो की ४०००० रुपये कहरच करून ४ वर्ष जगायचे तिथे दीड लाख खर्च करून आयष्य चागल्या प्रकारे जगता येईल आणि तो दीड लाख खर्च करतो. मी स्टेंट बनवणाऱ्यांना बोलावले आणि विचारले की, स्टेंट बवायला किती खर्च येतो तुम्ही इतकी किंमत मागता. वर्षभर त्यंच्या सोबत चर्चा सुरु होती शेवटी २ महिन्यांपूर्वी आम्ही निर्णय घेतला जो स्टेंट ४०००० रुपयांना मिळतो तो ६ ते ७ हजार रुपयांना विकावा लागेल. जो दीड लाखाला देता तो २० ते २२ हजाराला द्यव लागेल जेणेकरून गरीबातील गरीब व्यक्तीला ते परवडू शकेल.
कधी कधीतर सामान्य माणसाला अशीच समस्या होते, त्याला गोष्टींचे ज्ञान नसते आणि कोणी न कोणीतरी लोकं.... आणि यामुळे समाजातील एक वर्ग, खूप ताकदवर वर्ग आहे, त्यांची माझ्यावर नाराजगी वाढणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु गरिबांसाठी मध्यमवर्गासाठी आरोग्यसेवा सुचारू पद्धतीने उपलब्ध व्हावी त्या दिशेने सरकार एक एक पाऊल उचलत आहे. आता जे विजयजी सांगत होते. आम्ही रुग्णालयांमध्ये स्वस्त औषध उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी प्रकल्प सुरु करत आहोत जेणेकरून खूप स्वस्त दरात.....आता देखील मी पहिले आहे की, डॉक्टर अशाप्रकारे औषधाची चिट्ठी लिहितात की, गरीब माणसाला काही समजत नाही आणि तो औषध विकत घ्यायला एखाद्या औषधाच्या दुकानात जातो जिथे महागडी औषधे मिळतात. आम्ही असा कायदा करणार आहोत जिथे डॉक्टरांना हे लिहिणे बंधनकारक असेल की ह्या व्यक्तीला जेनारिक औषध द्यावीत दुसऱ्या औषधांची गरज नाही. तेव्हाच गरीब व्यक्ती स्वस्तात औषध खरेदी करू शकेल. ज्याप्रकारे आरोग्य सेवेमध्ये आजारपणा नंतरची चिंता असते, त्याआधी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत चिंतन होणे आवश्यक आहे.
माझे स्वच्छता अभियान थेट आरोग्याशी निगडीत आहे. जगातील सर्व सर्वेक्षण हेच सांगतात की, साबणाने हाथ धुतल्याशिवाय जर मुल जेवली तर जगातील करोडो मुलांचा जीव या कारणामुळे धोक्यात आला आहे. आपण एक चांगली सवय लावू शकत नाही? आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता. सुरतच्या लोकांना स्वच्छतेचे धडे शिकवण्याची गरज नाही. सुरत मध्ये जेव्हा महामारी आली होती त्यानंतर सुरतने स्वच्छता अंगिकारली आहे. स्वच्छता ही सुरतची सवय बनली आहे. देशासाठी प्रेरणा आहे. मी काल येथे रोड शो करत होतो, माझ्यासोबत दिल्लीवरून जे अधिकारी आले होते ते रोड शो बघत नव्हते स्वच्छता बघत होते. बोलले इतकी स्वच्छता ह्यांच्या डोक्यात स्वच्छता बसली आहे. मी सांगितले तुम्ही जिथे जिथे जाल तिथे सर्वांना हे सांगा. सुरत ही सवय लावून घेताली आहे.स्वच्छता जर भारताची सवय झाली तर आपले अरबो खरबो रुपये आजारावर खर्च होणार नाहीत. आपल्या देशातील गरीब व्यक्ती जेव्हा आजारी पडतो, एक रिक्षाचालक आजारी पडतो तेव्हा केवळ तो व्यक्ती आजारी पडत नाही त्याचे संपूर्ण कुटुंब ३ दिवस उपाशी राहते, घरात दुसरी कोणी कमावणारी व्यक्ती नसते; आणि म्हणूनच स्वच्छता.....मी योग साठी संपूर्ण जगात आंदोलन छेडले आहे. २१ जून ला सुरतदेखील दिमाखदार योग कार्यक्रमाचे आयोजन करेल. निरोगीपणासाठी योग, शरीर स्वास्थ्यासाठी योग आज जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. आम्ही इंद्रधनुष्य योजनेंतर्गत देशभरातल्या त्या मातांना, त्या बालकांना शोधत आहोत ज्यांचे लसीकरण झालेले नाही. लसीकरणाचे अभियान राबवत आहोत. २ कोटींहून अधिक अशा माता भगिनींना शोधले आहे ज्यांच्या गावात लसीकरण सुरु आहे परंतु त्यांनी लसीकरण केलेले नाही. लोकांना शोधून त्यांची सेवा करण्याचा विडा सरकारने उचलला आहे. परंतु जेव्हा आंदोलनाची आवश्यकता असते तेव्हा जन सहकार देखील गरजेचा असतो.
कधी कधी आपण हा विचार करतो की, स्वातंत्र्यानंतर देशात एक असे वातावरण तयार झाले आहे की, सगळे काही सरकार करणार, परंतु आपला देश त्याचे चरित्र वेगळे आहे. आपला देश ना सरकारांनी बनला आहे ना चालवला आहे. आपलं देश ना राजांनी बनवला आहे ना चालवला आहे. आपल देश ना नेत्यांनी बनवला आहे ना चालवला आहे. आपला देश मार्गक्रमण करत आहे जनशक्तीच्या विश्वासावर, जेनसेवेच्या विश्वासावर. तुम्ही मला सांगा गावा गावांमध्ये धर्मशाळा दिसतात. प्रत्येक तीर्थयात्रे नंतर हजारो लोकं राहू शकतील इतक्या धर्मशाळा आहेत. जगातील कोणत्याही मोठ्या हॉटेलपेक्षा जास्त खोल्या या धर्मशाळांमध्ये आहेत. आपल्या देशात २-२ हजार खोल्यांच्या धर्मशाळा आहेत. कोणी बांधल्या? सरकारने नाही बांधल्या. जनता जनार्दनने बांधल्या. गावांमध्ये पाणी नसायचे, विहिरी असायच्या. कोणी बांधल्या? सरकारने नाही बांधल्या. जनता जनार्दनने बांधल्या. गो शाळा काय सरकारने बांधल्या? जनता जनार्दनने बांधल्या. पुस्तकालय सरकारने बांधली?जनता जनार्दनने बांधली. आपल्या देशाचा हा मूळ स्वभाव आहे. समाजातील सर्व कामे करणे हे समाजातील सामुहिक शक्तीचा स्वभाव होता. परंतु स्वातंत्र्यानंतर हळूहळू चित्र बदलत गेले. परत एकदा ती परिस्थिती तयार होत आहे. पुन्हा एकदा कोणाला तरी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होत आहे.सामुहिक पध्दतीने काहीतरी करण्याची, समाजाच्या भल्याचे काहीतरी करण्याची इच्छा होत आहे, त्यादिशेने आज काम सुरु आहे. मी सुरत मध्ये बसलेल्या विशेषतः सौराष्ट्राचे जितकी लोकं आहेत. मी छोट्यातील छोट्या कलाकाराच्या मनात देखील पहिले आहे की, आपल्या गावासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी तो त्याचे योगदान देत असतो. तो छोटासा कलाकार आहे. त्याचे उत्पन्न जास्त नाही. खूप कष्टाने महिन्याचा खर्च चालतो. परंतु स्वतःच्या गावात काही होत असेल तर, मी सुरत मध्ये राहतो. गाववाले सांगतात की शाळेसाठी हे थोडे काम कर तेव्हा तो कलाकार कष्ट सहन करून देखील ते काम करतो. इथे बसलेल्या सर्व मोठ्या लोकांनी आपापल्या गावासाठी सर्वोत्तम कार्य केले आहे. काहींना काहीतरी आपल्या आई वडिलांच्या नावावर, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर कार्य केले आहे. गावातील विकास कार्यात योगदान दिले आहे. आणि आज ही गावासोबत तेच नातं टिकवून आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये जर सौराष्ट्रात जायचे असेल तर बसची तिकीट मिळत नाही. ही जी ओढ आहे ते एका चांगल्या समाजाचे चिन्ह आहे. आणि माझी इच्छा आहे की येणाऱ्या पिढ्यांमध्ये देखील ही ओढ अशीच राहू दे. जुन्या पिढीतील लोकं आहेत तोवर हे सुरु राहील असे होता कामा नये येणाऱ्या पिढ्यांनी देखील ती परंपरा पुढे चालू ठेवावी. हा संपूर्ण गुजरातचा ठेवा बनावा. या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्वांमध्ये येण्याची मला संधी मिळाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आणि ज्याप्रकारे मथुरादास सांगत होते, इथून बयाणाला जात आहे, तिथे देखील पाण्याचा कार्यक्रम आहे. गुजरातने पाण्यालाच स्वतःची एक ताकत बनवली आहे आणि या ताकतीच्या सहाय्यानेच तो पुढे जात आहे आणि पुढे जात राहील. याच विश्वासासोबत मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतो.
जुलै मध्ये मी इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहे. तुमच्या पैकी सर्वांचे इस्रायल सोबत नातं आहे. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे जो इस्रायलला भेट देणार आहे. हिऱ्याचा कारोबार आणि इस्रायलचे थेट नाते आहे आणि म्हणूनच मी तिथे तुमचा प्रतिनिधी बनून जात आहे. खूप खुप धन्यवाद.