आदरणीय सभापती महोदय,
सर्वप्रथम सदनातर्फे आणि माझ्याकडूनही नवनिर्वाचित उपसभापती हरिवंशजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. प्रकृती ठीक झाल्यानंतर आपले अरुण जी आपल्या समवेत उपस्थित आहेत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
आज 9 ऑगस्ट आहे. ऑगस्ट क्रांती, स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलेला एक महत्वाचा टप्पा होता आणि त्यामध्ये ‘बलिया’ची महत्वाची भूमिका होती. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापासून ‘बलिया’ स्वातंत्र्याच्या क्रांतीचे रणशिंग फुंकण्यात आणि प्राण अर्पण करण्यात अग्रेसर आहे. मंगल पांडे, चित्तु पांडे आणि चंद्रशेखर यांच्यापर्यंतच्या परंपरेत आणि त्याच भागात हरिवंश आहेत. त्यांचा जन्म जयप्रकाशजी यांच्या गावात झाला आणि आजही ते या गावाशी जोडलेले आहेत. जयप्रकाशजी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जो ट्रस्ट चालवला जातो त्याचे विश्वस्त म्हणून काम करत आहेत.
हरिवंश अशा लेखणीचे धनी आहेत ज्यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की ते बनारसचे विद्यार्थी होते. त्यांचे शिक्षण बनारसला झाले. तिथे अर्थशास्त्रात त्यांनी एम ए केले. रिझर्व्ह बँकेने त्यांना पसंती दिली होती मात्र त्यांनी रिझर्व्ह बँकेला पसंती दिली नाही. मात्र त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत काम करायला सुरुवात केली. सभापती महोदय, आपल्याला हे ऐकून आनंद होईल की त्यांनी जीवनातली दोन महत्वपूर्ण वर्षे हैदराबाद मध्ये काम केले. कधी मुंबई, कधी हैदराबाद कधी दिल्ली, कधी कोलकाता मात्र ही झगमगती मोठी मोठी शहरे त्यांना भावली नाहीत. ते कोलकात्याला गेले ‘रविवार’ वर्तमानपत्रात काम करायला, आपण सर्वजण एस. पी. सिंह हे मोठे नाव आहे हे जाणतोच. दूरचित्रवाणीच्या जगतात त्यांची एक ओळख होती. त्यांच्यासमवेत हरिवंश यांनी काम केले.
एक प्रशिक्षणार्थी म्हणून, पत्रकार म्हणून धर्मवीर भारती यांच्या समवेतही काम केले. जीवनाची सुरवात तिथून केली. दिल्लीमध्ये चंद्रशेखर यांच्या समवेत काम केले. चंद्रशेखर यांचे ते चाहते होते. पदाची प्रतिष्ठा आणि मूल्ये यांच्याबाबत त्यांचे वैशिष्ट आहे. चंद्रशेखर यांच्यासमवेत अशा पदावर होते, जिथून त्यांना सर्व गोष्टी माहीत असत. चंद्रशेखर राजीनामा देणार आहेत ही गोष्ट त्यांना आधीच कळली होती मात्र स्वतः एका वर्तमानपत्राशी संबंधित असूनही, पत्रकारितेशी जोडलेले असूनही त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राला जाणवूही दिले नाही की चंद्रशेखर राजीनामा देणार आहेत. आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत ती गोष्ट त्यांनी गुप्त राखली. आपल्या वर्तमानपत्रात ही बातमी छापून आपल्या वर्तमानपत्राचे नाव मोठे करावे असे त्यांनी घडू दिले नाही.
हरिवंश यांनी बिहारमधील “रविवार’ मध्ये वृत्तपत्रात नोकरीला सुरुवात केली, तेव्हा संयुक्त बिहार होता. त्यानंतर झारखंडची निर्मिती झाली. ते रांची इथे गेले. प्रभात खबर साठी त्यांनी काम सुरू केले तेव्हा त्याचा खप होता अवघा चारशे. त्यांच्या जीवनात इतक्या संधी आल्या, बँकेत काम करायला गेले तिथेही संधी होत्या. प्रतिभावान व्यक्तित्व होते, चारशे खप असलेल्या वर्तमानपत्राशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले. चार दशकांच्या पत्रकारितेचा प्रवास असलेली समर्थ पत्रकारिता आहे आणि ती समाजकारणाशी जोडलेली आहे, राजकारणाशी नव्हे. हरिवंश यांच्या नियुक्तीमध्ये सर्वात मोठे योगदान असेल ते म्हणजे त्यांची पत्रकारिता समाजकारणाशी जोडलेली आहे, राजकारणाशी जोडलेल्या पत्रकारितेपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले.जन आंदोलन म्हणून ते वर्तमानपत्र चालवत असत. परमवीर अल्बर्ट एक्का देशासाठी शहीद झाले. एका वर्तमानपत्रात वृत्त आले की त्यांची पत्नी हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. हरिवंश यांनी जबाबदारी स्वीकारत लोकांकडून निधी जमा केला आणि चार लाख रुपये जमवून शहीदाच्या पत्नीकडे सुपूर्द केले. एकदा एका प्रतिष्ठीत व्यक्तीचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले. हरिवंश यांनी आपले वर्तमानपत्राचे स्त्रोत होते. त्यांच्या माध्यमातून मोठ्या हिंमतीने नक्षली भागात गेले होते. लोकांना समजावले आणि अखेर त्यांना सोडवून आणले. आपले आयुष्य पणाला लावले. एक असे व्यक्तिमत्व ज्यांचे वाचनही अफाट आहे आणि ज्यांनी अफाट लिखाण करत अनेक पुस्तके लिहिली आहेत. वर्तमान पत्रे चालवणे, पत्रकारांकडून काम करून घेणे हे सुलभ असेल. समाजकारणाचा एक अनुभव आणि राजकारणाचा अनुभव दुसरा आहे.
एक खासदार म्हणून सफल कारकिर्दीची दर्शन आपण सर्वांना घडवले आहे. मात्र सदनात अनेकदा खेळाडूंपेक्षा पंच जास्त त्रासलेले असतात. त्यामुळे सर्व सदस्यांना नियमानुसार खेळण्यासाठी भाग पाडणे हे महत्वाचे आणि आव्हानात्मक काम आहे.मात्र हरिवंश हे काम निश्चितच पूर्ण करतील.
हरिवंश यांच्या पत्नी आशाजी या चंपारण इथल्या आहेत म्हणजे संपूर्ण परिवार कुठे जेपी तर कुठे गांधीजी यांच्याशी निगडीत आहे. त्या राज्यशास्त्रातल्या एम. ए. आहेत, त्यांचे शैक्षणिक ज्ञान आपल्याला आता आणखी मदत करेल. मला विश्वास आहे की सदनाच्या सर्व सदस्यांचा आता मंत्र बनेल हरिकृपा.आता सर्व काही हरीच्या भरवश्यावर. मला विश्वास आहे की आपण सर्व या बाजूचे असोत वा त्या बाजूचे, सर्व सदस्यांवर हरिकृपा कायम राहील. एकाच्या पुढे बी के होते, बीके हरी, यांच्याकडे बी के वगैरे काही नव्हते. मात्र मी बी के हरिप्रसाद यानाही धन्यवाद देतो, लोकशाहीची प्रतिष्ठा राखत आपली जबाबदारी पार पाडल्याबद्दल. सर्व जण म्हणत होते की निकाल माहित आहे मात्र प्रक्रिया करणार. नव्या लोकांचे मतदान करण्याचे प्रशिक्षणही झाले
सदनाच्या सर्व आदरणीय सदस्यांचे, ही सर्व प्रक्रिया उत्तम रितीने पार पाडल्याबद्दल आभार मानतो, सभापतीजी, मला विश्वास आहे की त्यांचा अनुभव, समाजकारणाप्रती अनुभव, समाजकारणाप्रती समर्पण या पदाची प्रतिष्ठा उंचावेल. हरिवंश यांचे एक वैशिष्ट्य होते त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात एक सदर चालवले होते. आपला खासदार कसा असावा याबाबतचे. तेव्हा तर त्यांना माहीतही नव्हते की आपण खासदार बनू. तेव्हा त्यांनी खासदार कसा असावा याबाबतची मोहीम चालवली होती. त्यांची जी स्वप्ने होती ती पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली आहे, आपणा सर्व सदस्यांना आपल्या माध्यमातून प्रशिक्षण मिळेल आणि दशरथ मांझी यांच्याबाबत हिंदुस्तानात कधी-कधी चर्चा ऐकायला मिळते, फार कमी लोकांना माहित असेल की त्या दशरथ मांझी यांची कथा, शोध घेऊन प्रथम कोणी मांडली असेल तर ते काम हरिवंश यांनी केले आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत जोडले गेलेले आज आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
माझ्याकडून त्यांचे खूप-खूप अभिनंदन आणि अनेक-अनेक शुभेच्छा.