मंचावर विराजमान, ओदिशाचे राज्यपाल,प्रोफेसर गणेशीलाल जी, राज्याचे मुख्यमंत्री, माझे मित्र नवीन पटनायक,केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी जुअल ओराम,धर्मेंद्र प्रधान,संसदेतले माझे सहकारी सत्पती, इथले आमदार ब्रजकिशोर प्रधान आणि माझ्या बंधू-भगिनींनो,
यानंतर मला एका विशाल जनसभेला संबोधित करायचे आहे म्हणून इथे विस्ताराने चर्चा न करता मोजक्या शब्दात माझ्या भावना व्यक्त करत,आज या शुभ प्रसंगी,प्रसन्नता व्यक्त करतो.निर्धारित वेळेतच हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या संकल्पासह या प्रकल्पाशी संबंधित सर्वाना माझ्या अनेक शुभेच्छा देतो.
एक प्रकारे पुनरुद्धाराचे काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. काही दशकांपूर्वी अनेक स्वप्ने पाहिली गेली, मात्र काही न काही कारणाने ती सारी स्वप्ने धुळीला मिळाली. हा प्रकल्प,या क्षेत्राला पुनरुज्जीवन प्राप्त होईल का? याचीइथल्या लोकांनी आशा सोडली होती.
मात्र आम्ही संकल्प केला आहे की, देशात नव्या चैतन्याने,नव्या गतीने,देशाला नव्या उंचीवर न्यायचे आहे आणि त्यासाठी असे अनेक मोठे प्रकल्प,अनेक अभियाने, यांच्यात ऊर्जा हवी,चैतन्य हवे,त्यांच्यात गती हवी आणि त्याच्यात संकल्प शक्तीही हवी.
त्याचाच परिणाम म्हणजे सुमारे 13 हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे काम इथे सुरू होत आहे.
संपूर्ण हिंदुस्तानसाठी हे नवे तंत्रज्ञान आहे. कोळसा गॅसिफिकेशन द्वारा इथल्या काळ्या सोन्याद्वारे केवळ इथल्या क्षेत्रालाच नव्हे तर देशालाही नवी दिशा मिळणार आहे.देशाला बाहेरून नैसर्गिक गॅस आणावा लागतो, दुसऱ्या देशातून युरिया आणावा लागतो त्यातून मुक्ती तर मिळेलच आणि बचतही होईल.
या क्षेत्रातल्या युवकांसाठी रोजगाराच्याही मोठ्या संधी आहेत. सुमारे साडेचार हजार लोक या प्रकल्पाशी जोडले जाणार असून यातून आसपासच्या परिसरात अनेक व्यवस्था विकसित होतात,त्याचा लाभ या परिसराला होईल.
विकासाची दिशा कशी बदलता येते,धोरण स्पष्ट असेल,देशहिताला सर्वोच्च प्राधान्य असेल तर निर्णयही उत्तम होतात.आपल्या देशात, नवरत्न,महारत्न अशा अनेक सरकारी सार्वजनिक उपक्रमांची आपण चर्चा ऐकत आलो आहोत. कधी चांगली तर कधी वाईट बातमी येत असते.
मात्र,त्यांना एकत्र करून एक नवशक्ती करून एखादा प्रकल्प कसा पुढे नेता येऊ शकतो याचे नवे उदाहरण देशापुढे असेल.अशी रत्न, महारत्न एकत्र करून प्रकल्पाची जबाबदारी घेत असतील ,या सर्वांचे कौशल्य आणि या सर्वांचा निधी या कामासाठी उपयोगात आणला जाईल आणि ओदिशाचे जीवन आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे एक साधन ठरेल.
मला माहिती देण्यात आली,मी अशा प्रकल्पात जातो तेव्हा मी उत्पादनाची तारीख विचारतो.त्यांनी मला 36 महिने सांगितले. 36 महिन्यानंतर मी इथे पुन्हा येईन आणि त्याचे उदघाटन आपण सर्वांसह करेन याची मी खात्री देतो. या विश्वासासह मी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे भाषण इथे पूर्ण करतो.
खूप-खूप धन्यवाद !