माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आज संपूर्ण जग नाताळचा सण साजरा करीत आहे. भगवान येशू ख्रिस्ताचा प्रेम आणि करुणेचा संदेश हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीचा एक उत्तम मार्ग आहे. जगभरातील सर्व नागरिकांना नाताळच्या अनेक शुभेच्छा. आज दोन भारतरत्नांचा देखील वाढदिवस आहे. एक आहेत भारतरत्न महामहिम मदन मोहन मालवीय जी आणि दुसरे आहेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी.
आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जेव्हा एखादे पंतप्रधान कोणत्याही राज्यात जातात तेव्हा त्या राज्यातील जनता आनंदी होते, त्यांना चांगले वाटते, परंतु मी कोणत्याही दुसऱ्या राज्यात आलो नाही, मी माझ्या स्वत: च्या राज्यात आलो आहे. उत्तर प्रदेशने मला स्वीकारले आहे, दत्तक घेतले आहे, माझे पालन पोषण केले आहे. मला शिकवले आहे आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार केले आहे. हेच ते उत्तर प्रदेश आहे, बनारसच्या जनतेने मला खासदार बनवले, पहिल्यांदा खासदार बनवले आणि उत्तर प्रदेशातील याच 22 कोटी जनतेने देशाला स्थिर सरकार देण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली आणि मला पंतप्रधान म्हणून तुमची सेवा करण्याचा बहुमान मिळाला.
बंधू आणि भगिनींनो!
बोटॅनिकल गार्डनपासून मला मेट्रोने प्रवास करण्याचे सौभाग्य मिळाले, आणि आजच्या युगात कनेक्टिव्हिटी नसेल तर संपूर्ण आयुष्य गोठून जाते. संपर्काशिवाय सगळे आयुष्य विखुरलेले वाटते. ही मेट्रो, आजच्या युगात सुरु झाली, चांगले आहे. इतका मर्यादित अर्थ नाही. कोट्यावधी रुपये खर्च होतात. हे अतिशय बारकाईने अंमलात आणणे गरजेचे आहे, भविष्यात येणाऱ्या प्रत्येक पिढीला शंभर वर्षांपर्यंत या सेवेचा लाभ मिळाला पाहिजे. ही व्यवस्था खूप दूरगामी आहे. नोएडावासी म्हणून, उत्तरप्रदेशचा नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून, ही व्यवस्था सामान्य लोकांसाठी खऱ्या अर्थाने सर्वजण-हिताय सर्वजण-सुखाय आहे.
आपल्या देशात बऱ्याचदा असे अनेक विषय असतात ज्याला राजकारणाशी जोडले जाते म्हणून कधी कधी विकासाची सर्वोत्कृष्ट काम देखील जनहिताच्या तराजूत तोलण्याऐवजी राजकीय पक्षांच्या हितांच्या तराजूत तोलल्या जातात. आजही, आपण देशात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. देशाचे भरपूर पैसे त्यात खर्च होतात. 2022 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत परदेशातून पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, दुसरीकडे आपल्या देशाची गरज वाढत आहे. ही गरज 2022 मध्ये वाढणार आहे. आम्ही काही उपाय योजू इच्छितो. ही वाढती गरज आहे हे आम्हाला माहित आहे, परंतु असे असले तरीही, आज आपण जे आयात करीत आहोत त्या काही प्रमाणात कमी करू शकतो. देशातील संपत्ती देशातच जतन करू शकतो का? आणि म्हणूनच मास ट्रान्सपोर्टेशन, रॅपिड ट्रान्सपोर्टेशन, मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्टेशन ही काळाची गरज आणि मागणी आहे. आज, पैसा खर्च करण्यामध्ये कधी काही अडचणी येतात, प्राधान्यक्रम थोडा बदलला पाहिजे. भविष्यात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाला सौर उर्जेने जोडले आहे. सौर ऊर्जेपासून जवळजवळ दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल, ही उर्जा सूर्यापासून निर्माण केली जाईल. यामुळे मेट्रोचा खर्च कमी होईल. या मेट्रोमुळे, खासगी वाहनांमधून प्रवास करणारे लोकं साहजिकच मेट्रोने प्रवास करतील आणि त्यांच्या खाजगी वाहनांमध्ये जे पेट्रोलियम उत्पादन खर्च व्हायचे त्याची देखील बचत होईल. पर्यावरणाला यामुळे फायदा होईल. माझी अशी इच्छा आहे की, मेट्रोने प्रवास करणे हा आपल्या देशात प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. प्रत्येकजण अभिमानाने बोलला पाहिजे, नाही, मी कारने प्रवास करत नाही, मला मेट्रोमधून जायला आवडते. हे सर्व आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणेल. मग आपण देशाला बऱ्याच समस्यांपासून वाचवू शकु. 24 डिसेंबर 2002 रोजी अटलबिहारी वाजपेयी या देशातले मेट्रोने प्रवास करणारे पहिले प्रवासी होते. आज या घटनेला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळी सुरु झालेले हे जाळे आज 100 किलो मीटरपेक्षा अधिक पसरले आहे आणि येत्या काही काळात याचा आणखी विस्तार होणार आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्या या मेट्रो नेटवर्कचे नाव जगातील पहिल्या पाच मेट्रो नेटवर्कमध्ये घेतले जाईल. देशासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरेल.
आज, अटलबिहारी वाजपेयींचा जन्मदिवस आपण सुप्रशासन दिन म्हणून देखील साजरा करत आहोत. हे सगळं असंच चालणार, असंच राहणार, राहू दे कोण हे सर्व करणार. आपण नेहमी म्हणतो की, आपला देश खूप गरीब आहे, काय करणार आपल्याकडे काही नाही. परंतु हे सत्य नाही मित्रांनो, हा देश समृद्ध आहे परंतु, देशातील लोकांना या संपन्न्तेपासून आणि समृद्धीपासून दूर ठेवले आहे. आणि म्हणूनच, बारकाईने या सगळ्याकडे पहिले तर लक्षात येईल की, या समस्यांच्या मुळामध्ये एक महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे प्रशासनाचा अभाव. सुशासनाचा अभाव. होत आहे, सुरु आहे, माझे, परके, तुमचे यामध्येच सगळे अडकले आहेत. कोणतेही काम घेऊन जा प्रत्येकजण समोर बघून विचारतो माझे काय? विचारले जाते की नाही? हीच सवय आहे ना? आणि समोरून जर उत्तर आले की तुझे काही नाही तर मग तो सरळ हात वरती करतो आणि सांगतो मग मी काय करू? तू तुझे बघून घे. ही परिस्थिती देशाला डबघाईला नेत आहे. आणि मी ही व्यवस्था बदलण्याचा विडा उचलला आहे.
मला माहित आहे की या गोष्टी करणे किती कठीण आहे मला चांगलेच माहित आहे. परंतु मला सांगा राजकीय फायद्याचेच निर्णय घ्यायचे का? राजकीय फायदा नसेल तर निर्णय घ्यायचा नाही का? देशाला असेच मध्येच सोडून द्यायचे का? आणि म्हणून भारताच्या बंधू आणि भगिनींनी अशा सरकारची निवड केली आहे जी धोरणांचे पालन करते. स्वच्छ चारित्र्याने काम करू इच्छिते. आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या उद्देशाने काम करत आहे. आमचे सर्व निर्णय सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी घेण्यात येत आहेत.
आज या मेट्रोचं उद्घाटन करण्यात येत आहे. कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. भारतातले पहिले 10 मोठे उद्योगपती यातून प्रवास करतील असे मला नाही वाटत. यात प्रवास करणारे तर तुम्ही लोकं आहात. मोठ्या अभिमानाने प्रवास करणारे लोकं आले आहेत, आणि मी इथे तुमच्यासाठी आलो आहे.
सुप्रशासन, तुमच्या हे लक्षात आले असेल की, ज्या राज्यांमध्ये शासनाच्या ताकदीवर सुप्रशासनाचा प्रयत्न केला जात आहे तिथे चांगली प्रगती होत आहे. जेथे-जेथे शासनात सुधारणा होत आहे तिथे शासन प्रणालीमध्ये सुधारणा होऊन सरकार जबाबदार बनत आहे. सर्व अधिकारी जबाबदार होतात. संपूर्ण व्यवस्था, प्रशासन जेव्हा जबाबदार बनते तेव्हा अशा समस्याही कमी दिसतात. अटलबिहारी वाजपेयी जी यांनी आपल्या कार्यकाळात सुप्रशासनावर भर दिला, कनेक्टिव्हिटीवर भर दिला. आज संपूर्ण देशात तुम्ही कोणत्याही आमदारांना भेटा कोणत्याही खासदारांना भेटा, एका गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे आणि ती म्हणजे ‘प्रधान मंत्री ग्राम सडक योजना’.
या देशात, त्या गोष्टी सोयीस्करपणे विसरण्याचा प्रयत्न झाला आहे. अखेरीस, प्रत्येक गावापर्यंत रस्ता पोहोचवण्याचे स्वप्न कोणी बघितले होते. फारच थोड्या लोकांना हे माहित आहे की हे स्वप्न अटलबिहारी वाजपेयी यांचे होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कोणी सुरु केली असेल तर ती वाजपेयीजींनी आणि आज त्यामुळेच भारतातील प्रत्येक गाव पक्या रस्त्याने जोडले जात आहे. आणि जेव्हापासून आमचे सरकार आले आहे तेव्हापासून आम्ही 2019 प्रत्येक गावाला पक्या रस्त्याने जोडून, वाजपेयीजींनी ज्या कामाला सुरुवात केली होती त्याला तडीस नेण्याचा विडा उचलला आहे.
‘स्वर्णिम चुतुष्क’ संपूर्ण भारताला रस्त्यांनी जोडण्याचे काम इतिहासात केले गेले त्यासाठी आपण नेहमी शेरशाह सुरी यांचे नाव ऐकत आलो आहोत. त्यानंतर वाजपेयीजींनी संपूर्ण भारताला जोडण्याचे एक सोनेरी स्वप्न पहिले. स्वत:च्या कार्यकाळात त्यांनी या कार्याला वेग दिला. आज, संपूर्ण देश, या नवीन कनेक्टिव्हिटीशी, नवीन रस्त्यांशी जोडला जात आहे, तेव्हा त्याला नक्कीच आपण जगासोबत बरोबरी करत आहोत असे वाटत असेल. या मेट्रोचे स्वप्न बघितलेले पहिले प्रवासी अटलबिहारी वाजपेयी होते. आज भारताच्या अनेक शहरांमध्ये मेट्रोचं काम चालू आहे. 50हून अधिक शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. जगाला आश्चर्य वाटत आहे की, एका देशात मेट्रो नेटवर्कसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. आणि जगभरातील गुंतवणूकदार यात आपली रुची दाखवत आहेत.
1200 कायदे….मी जेव्हा निवडणूक लढत होतो. आधीच्या सरकारला ही अभिमानाची बाब वाटायची. आम्ही हा कायदा बनवला,आम्ही तो कायदा बनवला. म्हणून मी एकाच ठिकाणी एका भाषणात म्हटले होते की, कायदे तयार करणे ही संसदेची विशेष जबाबदारी आहे आणि काळाच्या गरजेनुसार कायदे तयार देखील करायल हवे. मी एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले होते की, मी पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येक दिवशी एक कायदा रद्द करणार. कायद्यांचे हे क्लिष्ट जाळेच सुप्रशासनातील मोठा अडथळा आहे. एकाच कामासाठी तुम्हाला तीन कायदे मिळतील. अधिकाऱ्याला तुमचे काम करायचे असेल तर एक कायदा असेल, तुम्हाला लटकयाचे असेल तर दुसरा कायदा असेल आणि जर तुम्हला लाथाडायचे असेल तर मग तिसरा कायदा समोर येईल. सामान्य जनतेला यामुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते आणि म्हणूनच सरकारने आतापर्यंत 1200 कायदे रद्द केले आहेत.
सुप्रशासनाच्या दिशेने…..जेव्हा मी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा मला चांगले आठवते की, वर्तमानपत्रात चौकटीत विशेष बातमी छापली जायची. मोदी पंतप्रधान झाल्यापासून लोक वेळेवर कार्यालयात येऊ लागले. आता मला सांगा की ही चांगली बातमी आहे की एक वाईट बातमी आहे? बरेच लोक आनंदी आहेत की, चला मोदिजी पंतप्रधान झाल्यापासून लोक वेळेत येऊ लागले, परंतु मला हे बघून दु:ख झाले की, माझा देशाची काय हालत झाली आहे.एखादा अधिकारी वेळेवर कार्यालयात जातो या गोष्टीने माझा देश आनंदी होत आहे. त्याने किती दु: ख सहन केले आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे.
आपले दमदार मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. उत्तम पद्धतीने ते उत्तर प्रदेशला पुढे घेऊन जात आहेत. सर्व बाजूंनी विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.सुप्रशासनावर जोर देत आहे. परंतु त्यांचा पेहराव बघितला तर लोकांना असे वाटेल की त्यांचे विचार आधुनिक नसतील. पौराणिक ग्रंथ, रूढी परंपरा यांचा पगडा त्यांच्यावर असेल.परंतु नोएडाच्या बाबतील जी एक प्रतिमा झाली होती की, कोणी मुख्यमंत्री इथे येणार नाही. योगीजींनी आपल्या आचरणातून ही सर्व मिथ्य बाबी दूर केल्यात. आधुनिक युग हे असे असेल हे त्यांनी दाखवून दिले आणि म्हणुनच मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
जर एखाद्या ठिकाणी गेलो तर आपले मुख्यमंत्रीपद जाईल या भीतीने जगणाऱ्यांना मुख्यमंत्री बनण्याचा हक्क नाही. अपरिपक्वतेत समाज प्रगती करू शकत नाही. आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत, विज्ञान युगात जगत आहोत. श्रद्धेचे आपले स्वतःचे एक स्थान आहे परंतु इथे अंधश्रद्धेला थारा नाही. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री बनलो, ही समस्या केवळ उत्तरप्रदेशात आहे असे नाही. भारतात अशी अनेक राज्य आहेत, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ते समजुतींमधून माहित नाही काय काय केले जाते. तुम्ही पहिले असेल की, एका मुख्यमंत्र्यांनी कर विकत घेतली. मी आधुनिक युगाबद्दल बोलत आहे आणि कोणीतरी त्यांना कारच्या रंगाविषयी काहीतरी सांगितले, त्यानंतर त्यांनी गाडीला लिंबू-मिरची बांधायला सुरवात केली. हे लोक देशाला काय प्रेरणा देणार? अशा अंधविश्वासू लोकांमुळे देशाचे खूप नुकसान होते. संपूर्ण देशभरात अशा समजुतींमध्ये अडकलेली अनेक सरकारे आहेत आणि अनेक मुख्यमंत्री आहेत.
जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री बनलो, तेव्हा माझ्या हे लक्षात आले की अशा सहा ते सात जागा आहेत जिथे कोणी गेले नाही. जर तिथे कोणी मुख्यमंत्री गेला तर त्याचे मुख्यमंत्री पद जाते. मी पुढाकार घेतला. मी म्हटलं की पहिल्या वर्षी मी या सर्व ठिकाणांचा दौरा करणार. मी गुजरातमधील त्या सर्व ठिकाणांना भेट दिली जिथे या प्रकारच्या समजुतींमुळे मागील तीन-चार दशकांपासून अशा ठिकाणी कोणी मुख्यमंत्री गेले नव्हते. सर्वत्र गेलो, अभिमानाने गेलो.आणि त्यानंतरही मला प्रदीर्घ कालावधीपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाली. आता त्या गावाचा, तालुक्याचा, शहराचा काय दोष आहे? नोएडाच्या माथी देखील जो असा कलंक लागला होता त्याला तुम्ही दूर केले. तुम्ही खरच अभिनंदनासाठी पात्र आहात.
बंधू भगिनींनो सुप्रशासन…..अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस. जेव्हा मी सुप्रशासना बद्दल बोलतो, तेव्हा मला तुमच्यासमोर काही तथ्य मांडायची आहेत. युरियाचा कारखाना सुरु होऊन युरियाचे उत्पादनात वृद्धी झाली पाहिजे हे तर एखद्या लहान मुलाला देखील माहित आहे परंतु, देशात नविन युरिया कारखाना सुरू केल्याशिवाय, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर सुप्रशासनावर जोर देण्यात आला, आवश्यक धोरणे राबवण्यात आली, आराखडा तयार करण्यात आला आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. युरियाचा एकही नवीन कारखाना सुरु न करता, सुमारे 20 लाख टन अधिक युरिया उत्पादन झाले. तेच कारखाने, त्याच मशीन, तोच कच्चामाल, तेच कामगार सरकार बदलल्यानंतर सुशासनावर जोर दिला. नविन कारखाना सुरु न करता, जुन्या व्यवस्थेतच 18 ते 20 लाख टन युरियाची वाढ होणे हे केवळ सुप्रशासानामुळेच शक्य आहे.
बंधू भगिनींनो ! रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम रेल्वेचे कर्मचारी करतात, त्यांची संख्या तितकीच आहे. तेच रस्ते आहेत. तोच रेल्वे विभाग आहे. निर्णय घेणारी लोकं तीच आहेत. कागदपत्रांवर निर्णय घेण्याची पद्धती देखील तीच आहे. असे असूनही काय कारण काय आहे की, आधी जितके रेल्वे रूळ टाकण्याचे काम व्हायचे आमचे सरकार आल्यानंतर त्यात दुप्पट वाढ झाली आहे. याचे उत्तर आहे, आमचे धोरण स्पष्ट आहे आणि चारित्र्य स्वच्छ. सुप्रशासनाचाच हा परिणाम आहे.
बंधू आणि भगिनींनो, पहिले, एका दिवसात जितके रस्ते, मार्ग, महामार्ग बांधले जायचे, सरकारकडे आता अचानक काही पैसे आले नाहीत. परंतु प्रत्येक पैशाच सर्वोत्तम उपयोग व्हावा, प्रत्येक मशीनचा उत्तम उपयोग, वेळेचा चांगला वापर झाला पाहिजे. सुप्रशासानाच्या मूलभूत तत्वांचाच परिणाम आहे की, आधीच्या सरकारच्या कार्यकाळात एका दिवसात जेवढे राष्ट्रीय महामार्गाचे काम व्हायचे आमच्या सरकारच्या कार्यकाळात ते दुप्पट झाले आहे. कारण सुप्रशासन.
बंधू आणि भगिनींनो सध्याचे युग हे जागतिक व्यापाराचे युग आहे. समुद्र किनाऱ्यांचे, आपल्या बंदराचे महत्व आहे. आपल्या इथे कार्गो हँडलिंग नकारात्मक होते. वाढ होत नव्हती उलट जे होते त्यातही घट होत होती. आम्ही आल्यानंतर जग बदलले नाही, आम्ही बदललो आहोत, सरकार बदलली आहे, उद्देश बदलला आहे, सुप्रशासनावर जोर दिला आहे. आणि जी कार्गो हँडलिंग नकारात्मक होती त्यात आज 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण आम्ही सुप्रशासन आणले आहे.
बंधू आणि भगिनींनो नवीकरणीय ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प या सर्व क्षेत्रांत आपण आज ज्या पद्धतीने कार्य करतो. आधीच्या तुलनेत नवीकरणीय ऊर्जेची क्षमता दुप्पट झाली आहे. बंधू आणि भगिनींनो हे सुप्रशासनामुळे झाले आहे.
आधीच्या सरकारच्या कार्यकाळात जर तुम्ही एलईडी बल्ब घेतलात, ज्याने विजेचे बिल कमी येते. तुम्ही हे ऐकल्यावर आश्चर्यचकित व्हाल की, साडे तीन वर्षांपूर्वी एलईडी बल्बची किंमत तीनशे रुपये होती. आज, त्याची किंमत 40 ते 50 रुपये आहे. आज 14,000 कोटी रुपयांचे 28 लाख एलईडी बल्ब देशातील घरांमध्ये पोहचले आहेत. ज्यांच्या घरात आज एलईडी बल्ब आहे त्यांच्यापैकी कोणाच्या विजेच्या बिलात 200 रुपये, 500 रुपये तर एखाद्याच्या 1000 रुपये, एखाद्याचे 2000 रुपये कपात झाली आहे. इतकेच नाही तर एलईडी बल्बची किंमत कमी झाल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे जवळजवळ सहा हजार कोटी रुपये वाचले आहेत. सुप्रशासन असेल तर कशाप्रकारे बदल घडतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
बंधू आणि भगिनींनो ! जर सुप्रशासन असेल तर निर्धारित वेळेत काम होते. देश धोरणांच्या आधारे चालतो.कोणाच्याही लहरी स्वभावानुसार चालत नाही. धोरण चांगले आणि वाईट असते आणि यामुळे भेदभावाला कुठेही जागा उरत नाही. भेदभाव नसल्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते.
बंधू आणि भगिनींनो, सुप्रशासानाच्या माध्यमातून, अटलबिहारी वाजपेयींच्या जीवन तपस्येतून प्रेरणा घेऊन आम्ही देशाला नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन पुढे जात आहोत. आणि जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा विकास सर्वसमावेशक असावा, विकास व्यापक असावा,सबका साथ सबका विकास – सर्वांचा सहभाग या मंत्रांशी जोडलेला असावा. विकास हा भविष्याचा विचार करून केला जावा. आणि म्हणूनच आम्ही विकासोन्मुख सुप्रशासनावर भर देऊन पुढे मार्गक्रमण करत आहोत. अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्या प्रकारे देशाला जोडण्याचे काम केले. कनेक्टिव्हिटीचे काम केले, रस्ते तयार करण्याचे काम केले, आणि म्हणूनच मी हे सांगू इच्छितो की, सुप्रशासानाच्या दृष्टीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दल जर एका वाक्यात सांगायचे असेल तर, मी म्हणेन की, भारताचा मार्ग-विधाता. अटलबिहारी वाजपेयी भारताचे मार्ग विधाता. रस्त्यांच्या दुनियेला एक नवीन उंचीवर घेऊन जाणे, लोकांशी जोडले जाणे हे सर्व वाजपेयीजींमुळे झाले आहे. आज, त्यांच्या जन्मदिनी, नाताळच्या पवित्र सणाच्या दिवशी, महामहिमजी यांच्या जयंती दिनी उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणारा मेट्रो प्रकल्प देशाला समर्पित करतांना मला अभिमान वाटत आहे. या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा उत्तरप्रदेश सरकारचे आभार मानतो. नोएडाच्या लोकांचे आभार मानतो.
खूप खूप धन्यवाद!