We have set the aim to eradicate TB from India by 2025, says PM Modi
Today I'm confident that in the duration of 1 year we'll be able to achieve 90% immunisation: PM Modi at End TB Summit
Whether the mission of getting relief from TB is in India or in any country, frontline TB practitioners & workers have a large role: PM
Several ministers from all states & concerned officers are present in the event, indicate how we, as Team India, are determined to eradicate TB from India: PM at End TB Summit

भारताचे आरोग्यमंत्री,

नायजेरियाचे आरोग्यमंत्री,

इंडोनेशियाचे आरोग्यमंत्री,

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक,

व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर,

संपूर्ण जगभरामधून आलेले पाहुणे,

भगिनी आणि सद्गृहस्थहो,

‘एंड टीबी समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण भारतामध्ये आलेले आहात, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो.

मित्रांनो,

ट्युबरकलोसिस म्हणजेच टी.बी.ला याआधी जवळपास 25 वर्षांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने घातक आणि आपदा निर्माण करणारा आजार म्हणून घोषित केले होते. त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत टी.बी.चा वाढता प्रसार रोखण्यासाठी अनेकविध प्रयत्न करण्यात आले आहेत. या क्षेत्रामध्ये काम करताना आपण सर्वांनी निश्चितच खूप लांबपर्यंत प्रवास केला आहे. टी.बी.चा प्रसार रोखण्यासाठी भरपूर काम केले आहे. आता इतकं काम करूनही आपण सगळेजण टी.बी.चा प्रसार रोखण्यामध्ये आत्तापर्यंत पूर्णपणे यशस्वी होवू शकलो नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

मित्रांनो,

जे कार्य सलग दहा वर्षे, वीस वर्षे करूनही आपल्याला त्यामध्ये जर अपेक्षित यश मिळत नसेल, अपेक्षित परिणाम त्या कामाचा दिसून येत नसेल तर मला असं वाटतं की ते काम करण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. चांगल्या परिणामांसाठी काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून ते काम केले पाहिजे. सध्या ज्या पद्धतीने काम केले जात आहे, ज्या पद्धतीने योजना लागू केली जात आहे, प्रत्यक्षामध्ये ज्याप्रमाणे काम केले जात आहे, त्याचे अतिशय विस्तृत, व्यापक प्रमाणामध्ये विश्लेषण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्यावेळी आपण गांभीर्याने जुन्या प्रक्रियांचे विश्लेषण करतो, त्यावेळीच आपल्याला नवीन मार्ग दिसतो, नवी दिशा मिळते.

आता या विचाराबरोबरच भारताचे आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय,जागतिक आरोग्य संघटनेचा दक्षिण पूर्व आशिया क्षेत्र आणि ‘स्टाॅप टी.बी.’ यांच्या सहभागीतेमधून अशिया, आफ्रिका आणि जगातील इतर अनेक देशांचे प्रतिनिधी आज या व्यासपीठावर एकत्रित आले आहेत, याचा मला आनंद झाला आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीची पूर्वतयारी म्हणून आज या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मानवतेच्या दृष्टीने विचार केला, तर या परिषदेला खूप महत्व आहे. आज होत असलेली ही ‘दिल्ली एंड टी.बी. समिट’ या भूमीवरून टी.बी.ला कायमचे हद्दपार करण्यासाठी एक वेगळी दिशा देईल आणि त्या मार्गातील एक मैलाचा दगड असेल, अशी मला आशा आहे.

 

मित्रांनो,

भारताने टी.बी.च्या समूळ उच्चाटनासाठी ज्या दिशेने पावले उचलली, त्याला अलिकडेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी ‘दिल्ली काॅल फाॅर अॅक्शन टू एंड टी.बी. इन द डब्ल्यूएचओ साऊथ ईस्ट एशिया रिजन बाय 2030’’ या प्रस्तावाचा सर्वानुमते स्वीकार केला होता. या प्रस्तावानंतर प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. दक्षिण पूर्व अशिया क्षेत्रामधून टी.बी. उच्चाटन करण्याच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत, हे दिसून आले आहे. टी.बी.मुळे ज्याप्रकारे लोकांच्या जीवनावर, सामाजिक स्वास्थ्यावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि देशाच्या भविष्यावर परिणाम होत आहे, ते पाहिल्यानंतर, आता वाटते की, आपण एक विशिष्ट कालमर्यादा आखली पाहिजे आणि त्या समयसीमेच्या आतमध्ये टी.बी.चे पूर्णपणे उच्चाटन करण्याची अतिशय आवश्यकता आहे. भारतामध्ये तसं पाहिलं तर संसर्गजन्य रोगांमध्ये टी.बी.चा प्रभाव सर्वात जास्त आहे. आणि या रोगाचा जणू विळखाच गरीबांना घातला आहे. आणि म्हणूनच टी.बी.चे उच्चाटन करण्यासाठी उचललेेले प्रत्येक पावूल हे थेट गरीबांच्या जीवनाशी जोडले गेले आहे.

मित्रांनो,

संपूर्ण जगामधून टी.बी.चे उच्चाटन करण्यासाठी 2030पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

परंतु आज मी या व्यासपीठावरून घोषणा करतो की, भारत वर्ष 2030 च्या आधीच पाच वर्षे म्हणजे 2025 पर्यंत आपल्या देशातून टी.बी. ला पूर्णपणे हद्दपार करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. आमच्या सरकारचा नवा दृष्टिकोन, नवी रणनीती, काम करण्याची नवीन पद्धत यामुळे भारतामधून टी.बी.समाप्त करण्याच्या मोहिमेचे काम वेगात सुरू आहे. भारत सरकारच्या वतीने ज्या नवीन रचनात्मक पद्धतीने आता काम सुरू केले आहे, त्याची एक झलक आपल्यासमोर आज केलेल्या सादरीकरणातून आपल्याला नक्कीच दिसून आली असेल. टी.बी.उच्चाटनासाठी करावयाच्या कार्यासाठी, ज्या ज्या घटकांची आवश्यकता आहे, ज्या संस्था या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत, त्यांनी एकजूट होवून, समन्वयाने काम करावे यासाठी आमचे सरकार प्रोत्साहन देत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारतामधून टी.बी. 2025 पर्यंत हद्दपार झाला पाहिजे, यासाठी जो राष्ट्रीय नियोजनात्मक आराखडा तयार केला आहे, त्यानुसार आता संपूर्ण कार्यवाही केली जात आहे. टी.बी.साठी ज्या योजना तयार करण्यात आल्या आहेत, त्यासाठी सरकारच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद सातत्याने वाढवण्यात येत आहे. आमच्या सरकारने या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी पौष्टिक भोजन मिळावे यासाठी अतिरिक्त 100 दशलक्ष डॉलर दरवर्षी खर्च करण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. रुग्णांना पौष्टिक पूरक अन्न खरेदी करताना आर्थिक अडचण निर्माण होवू नये म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारच्यावतीने थेट लाभ हस्तांतर करण्यात येत आहे. टी.बी.च्या रूग्णांची नेमकी म्हणजे रूग्णाचा आजार कोणत्या टप्प्यावर आहे, किती जुना आहे याविषयी माहिती सरकारकडून जमा केली जात आहे. टी.बी.बाधितांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना शक्य तितक्या लवकर, आजार जास्त बळावण्यापूर्वीच औषधे देण्यात येत आहेत. त्याचबरोबर एखाद्या रूग्णाला दिलेली औषधे लागू पडतात की नाही, का त्याचा आजार औषधांना दाद देत आहे की नाही, याचीही माहिती व्यापक प्रमाणावर जमा करण्याचं काम सरकार करीत आहे. ‘प्रत्येक टी.बी.रूग्णाला उत्कृष्ट औषधोपचार देणं, हीच या रोगाच्या निर्मूलनाची पहिली संधी आहे.’ या सिद्धांतानुसार सरकारने या योजनांमध्ये खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेत आहे. याबरोबरच आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना यांचाही जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यावर भर दिला आहे. ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ला आधार बनवून ‘स्टेट ऑफद आर्ट,‘इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नाॅलाॅजी सिस्टम’ आणि त्यासंबंधित विषयांचा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात येत आहे. टी.बी. उच्चाटन कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी, आजारावर लक्ष ठेवण्यासाठी, देण्यात येत असलेल्या औषधोपचाराविषयी निरीक्षणांच्या नोंदी ठेवण्यासाठी, त्याचबरोबर मोबाईल आरोग्य सुविधा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.

आम्ही डिजिटल एक्स-रे रिडिंगसाठी स्वदेशी मॉलेक्युलर डायग्नोस्टिक मशिनही विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या यंत्राचे ‘ट्रू नॉट’ असे नामकरण केले आहे. हे यंत्र ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेला बळ देत आहे. टी.बी.शी संलग्न असलेल्या इतर विषयांचा म्हणजेच लसीकरण, चांगले औषधोपचार, रोगाचे अचूक निदान आणि त्याच्यावर करावयाच्या उपायांची योजना, या सर्व गोष्टी अधिक चांगल्या, नेमक्या आणि तातडीने कशा करता येतील, याचा गहन विचार सरकार करीत आहे. त्यासाठी भारत सरकारने ‘इंडिया टी.बी. रिसर्च कन्सॉर्टियम’ची स्थापना करण्यात आली आहे.

टी.बी. चे भारतामधून समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी राज्य सरकारांचीही मोठी भूमिका आहे. यासाठी सहकारी महासंघाची भावना अधिक दृढ करून या मोहिमेमध्ये राज्य सरकारांना आपल्याबरोबर घेवून पुढे जाण्यासाठी मी स्वतः देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या अभियानामध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. आज या परिषदेमध्ये राज्यांच्यावतीने आलेेले मंत्री आणि संबंधित विभागांच्या पदाधिकारींची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती पाहून लक्षात येईल की, आम्ही ‘टीम इंडिया’ बनून आमच्या देशातून टी.बी. हद्दपार व्हावा, यासाठी कार्यरत आहोत. आमचा देश टी.बी.मुक्त व्हावा असा आम्ही दृढसंकल्प केला आहे.

मित्रांनो,

टी.बी.पासून मुक्ती ही मोहीम मग भारतामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही देशामध्ये असेल. अगदी आघाडीवर टी.बी. फिजिशियन आणि वर्कर्स यांची भूमिका महत्वपूर्ण असते. याचबरोबर जी व्यक्ती टी.बी. रोगग्रस्त आहे, आणि अगदी नियमित औषधे घेत आहे, आपले उपचार करून घेत आहे आणि या रोगाला हरवून, नमवून त्यापासून सुटका मिळवत आहे. या सर्वांचे कौतुक केले पाहिजे. टी.बी.चा जो रूग्ण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारावर विजय मिळवतो, तोसुद्धा इतरांना प्रेरणा देण्याचं काम करीत असतो. रूग्णांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि टी.बी. क्षेत्रात काम करीत असलेल्या आरोग्य सेवकांच्या मदतीमुळे भारताबरोबरच जगातील प्रत्येक देश आपले लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी होईल, असा माझा दृढ विश्वास आहे. भारतामधील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि आज इथं उपस्थित असलेल्या सेवकांना माझा आग्रह आहे की, त्यांनी आपले सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे. कारण टी.बी.मुक्त भारताचे लक्ष्य 2030 नाही, तर 2025 आहे. योग्यप्रकारे नियोजन केले आणि अतिशय काटेकोरपणाने प्रत्यक्षामध्ये काम केले आणिआपण तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे कार्यरत राहिलो, तर हे लक्ष्य प्राप्त करण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही.

मित्रांनो,

जास्तीत जास्त लोकांना जोडून, स्थानिक पातळीवर लोकांना जागरूक करून, टी.बी. तपासणीच्यापद्धती, टी.बी.चे औषधोपचार, म्हणजेच अशाप्रकारे बहुक्षेत्राचा विचार करून सरकार आणि प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर यामध्ये पंचायत, नगरपालिका, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, अशा सर्वांनी आपआपल्या स्तरावर टी.बी.मुक्त गाव, पंचायत, जिल्हा अथवा राज्य बनवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावली पाहिजे. यासाठी सर्व स्तरावर पूर्ण शक्तिनिशी प्रयत्न केले गेले पाहिजेत.

मित्रांनो,

भारताला 2025पर्यंत टी.बी. मुक्त करण्याचे लक्ष्य गाठणे, काही लोकांना निश्चितच कठीण वाटत असेल. परंतु ते अशक्य अजिबात नाही. गेल्या चार वर्षात ज्यापद्धतीने आमच्या सरकारने नवा दृष्टिकोन समोर ठेवून काम केले आहे, ते पाहिले तर देशाला आपले लक्ष्य गाठणे शक्य होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आपण कोणत्याही समस्यांना, आव्हानांना तुकड्या-तुकड्यांमध्ये पहात नाही. ज्यावेळी अतिशय समग्र विचार करून त्या आव्हानांना पेलण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचे परिणामही चांगले मिळतात. मला कोणत्याही प्रकारच्या टीकेचा विचार करायचा नाही. आपल्याकडे ज्यापद्धतीने लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो, त्याविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो. भारतामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम 30-35 वर्षांपासून सुरू आहे. तरीही इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही आपण 2014पर्यंत संपूर्ण देशामध्ये लसीकरण करण्याचे लक्ष्य प्राप्त करू शकलो नव्हतो. काही क्षेत्रामध्ये लसीकरणाची मोहीम पोहोचलीही नव्हती. ज्या वेगाने लसीकरणाच्या कामाची व्याप्ती वाढत होती, तो वेग पाहता, भारताचा संपूर्ण भूभाग लसीकरणाअंतर्गत येण्यासाठी आणखी 40 वर्षे लागली असती.

मित्रांनो,

प्रारंभी आमचे लसीकरणाच्या क्षेत्रवाढीचा वेग फक्त एक टक्क्याने वाढत होते. आता केवळ साडेतीन वर्षामध्ये हाच वेग प्रतिवर्षी 6 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. आणि आगामी एक वर्षामध्ये आम्ही 90 टक्के क्षेत्रामध्ये लसीकरण पोहोचले जाईल, यासाठी लक्ष्य निश्चित केले आहे. आता आम्ही इतक्या मोठ्या क्षेत्रापर्यंत कसे पोहोचणार, उद्दिष्ट साध्य करणे कसे शक्य आहे? असा विचार आमचे पाहुणे करत असतील.

मित्रांनो,

ज्यावेळी मी नवादृष्टिकोन असे म्हणत असतो, त्यामागे काही विशिष्ट कारण आहे. आमच्या देशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लसीकरण होवूच शकले नाही, त्या जिल्हयांची यादी आधी आम्ही तयार केली. ज्या क्षेत्रामध्ये लसीकरणाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री नोंदी केल्या जात होत्या, त्यांची सूची बनवली. या क्षेत्राकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले. त्या भागामध्ये आमच्या सरकारने ‘मिशन इंद्रधनुष्य’ सुरू केले. लसीकरणाबरोबरच काही नवीन औषधांचा पुरवठाही केला. आणि अगदी प्राथमिक स्तरावर जावून कामाला प्रारंभ केला. आज त्याचा परिणाम आपण सगळेच पाहत आहोत.

मित्रांनो,

असाच नवीन दृष्टिकोन समोर ठेवून आमचे सरकार स्वच्छ भारत मोहिमेचे काम करत आहे. याचा परिणाम म्हणजे 2014 मध्ये देशाच्या ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचीव्याप्ती जवळपास 40 टक्के होती, ती आता वाढून जवळपास 80 टक्के झाली आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये आम्ही दुप्पट क्षेत्रामध्ये पोहोचण्याचं काम केलं आहे. आम्ही लवकरच ऑक्टोबर 2019 पर्यंत उघड्यावर शौचमुक्त भारत बनवण्याचं लक्ष्य पूर्ण करणार आहोत, त्या दिशेने आमची वेगाने वाटचाल सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ही दोन्ही उदाहरणे देण्यामागे काही कारणे आहेत. मोठे आणि गाठण्यास अशक्य वाटणारी लक्ष्य प्राप्त करणे शक्य असते. हे मला जाणीवपूर्वक दाखवून द्यायचे आहे. अर्थात त्यासाठी सर्वात प्रथम काहीतरी लक्ष्य निश्चित करण्याची आवश्यकता असते. जर लक्ष्य निश्चित केले नसेल तर, मग ते गाठण्याचा वेग कसा असेल, आणि ते लक्ष्य गाठण्यासाठी दिशा तरी कशी असणार किंवा आपण जाण्याचे नेमके स्थान नक्की केले नसेल, तर मग जाणार तरी कुठे? असे प्रश्न निर्माण होतात.

मित्रांनो,

भारत 2025 पर्यंत टी.बी.मुक्त करण्याचं लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आम्ही संपूर्ण शक्ती पणाला लावणार आहे. त्यामुळेच आमचा संकल्प निश्चितच पूर्ण होणार, असा माझा दृढ विश्वास आहे. मित्रांनो, आपण सगळेचजण आरोग्य क्षेत्रातले तज्ञ आहात. त्यामुळे कोणताही आजार संपुष्टात आणण्यासाठी बहुविध क्षेत्रांनी संयुक्तपणे कार्य करण्याची आवश्यकता असते, आपण सर्वजण चांगल्याप्रकारे जाणून आहात. टी.बी.च्या बाबतीत मी औषधोपचार, औषधे, देखरेख, संशोधन, पौष्टिक आहारासाठी आर्थिक मदत यासारख्या विविध घटकांचा विचार संयुक्तपणे करण्याची गरज आहे, असं मी आपल्याला सांगितलं. परंतु याबरोबरच भारतामध्ये आणखी काही गोष्टींचाही विचार करावा लागणार आहे. कारण त्या इतर गोष्टींचाही प्रभाव टी.बी.सारखे आजार बरे होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये एक आहे स्वच्छ भारत मोहीम, यासंबंधी मी आपल्याला विस्ताराने सांगितले आहेच. याचबरोबर भारत सरकारच्या उज्ज्वला योजनेची मदतही टी.बी.चे आजार कमी करण्यामागे मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत,सरकार 8 कोटी गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी देण्याचं काम करीत आहे. घरामध्ये एलपीजी आल्यानंतर महिला, त्यांची मुले, त्यांचे कुटूंब यांची लाकडाच्या धुरापासून मुक्तता होत आहे, त्याचबरोबर त्यांना धुरामुळं होत असलेल्या टी.बी.चा धोकाही कमी होत आहे. चार दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमच्या सरकारने राष्ट्रीय स्तरावर पोषण मोहीमही सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश फक्त लोकांना पौष्टिक भोजन देणे इतका मर्यादित नाही. आमचे लक्ष्य नवीन चांगली ‘इको-सिस्टम’ तयार करणेआहे. या कार्यप्रणालीमध्ये कुपोषण होण्याची शक्यता कमीत कमी असणार आहे.

मित्रांनो,

यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये भारताने संपूर्ण जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. ही योेजना आहे, ‘आयुष्मान भारत’ म्हणजे भारतीय दीर्घायुषी व्हावेत. या माध्यमातून आमचे सरकार देशामध्ये प्राथमिक, दुस-या स्तरावरील आणि भौगोलिक आरोग्य सुविधा प्रणाली अधिक चांगली, मजबूत करण्याचे काम करणार आहे. सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये आरोग्य आणि ‘वेलनेस’ केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. ही वेलनेस केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रांप्रमाणे काम करणार आहेत. या केंद्रांमध्ये रोग निदान सेवा उपलब्ध करून दिली जाईल आणि त्याचबरोबर लोकांना त्यामधून स्वस्त दरामध्ये औषधेही मिळू शकतील. याशिवाय 10 कोटी गरीब कुटुंबांना गंभीर आजारपणामध्ये उपचारासाठी 5 लाख रूपयांचा दरवर्षाचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आपले भारत दर्शन आणि भारतीय पुरातन विज्ञान आरोग्याच्या बाबतीत नेहमीच खूप स्पष्ट आणि उपयोगी ठरलेले आहे. आपल्याकडे असं म्हणतात की-

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिदृदुःखभाग्भवेत.

म्हणजेच,

सर्वांनी आनंदी असावं, सर्वांना आजारपणापासून मुक्तता मिळावी,

सर्वांना शुभ, वैभवशाली असं सर्व काही मिळावं, मात्र कोणाच्याही वाट्याला दुःख, वेदना,त्रास येवू नयेत.

दार्शनिकांच्या या सदिच्छेमुळेच आणि म्हणण्यामुळेच भारत भूमीवर आयुर्वेद आणि योग यासारख्या वैज्ञानिक पद्धतींचा जन्म झाला. शेकडो वर्षांपासून हे भारतीय जनमानसामध्ये हे विचार भिनलेले आहेत. गुणकारी, संवर्धनकारी आणि प्रतिबंधकारी या भारतीय आरोग्य सेवांना आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळत आहे. आमचे सरकारही पुरातन भारतीय चिकित्सा पद्धतींना बरोबर घेवून पुढे जात आहे. आरोग्य मंत्रालयाला माझा आजही आग्रह आहे की, टी.बी.च्या निदानामध्ये आयुर्वेदाच्या योगदानाविषयी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यात यावी. आणि त्याचे जे काही निष्कर्ष निघतील त्याची माहिती आमच्या या सर्व सहकारी देशांनाही द्यावी. ‘‘सबका साथ, सबका विकास’’ हा आमचा मंत्र आहे, आणि त्याला कोणतीही भौगोलिक मर्यादा नाहीत. ‘टी.बी.मुक्त विश्व’ बनवण्यासाठी भारत प्रत्येक देशाबरोबर खांद्याला खांदा लावून पुढे वाटचाल करण्यासाठी सहर्ष तयार आहे. टी.बी.विरूद्ध लढा देण्यासाठी ज्या ज्या देशांना पहिल्या स्तरावरील औषधे, वस्तू आणि तंत्रज्ञानाची मदत लागणार आहे, त्यांना आम्ही तत्परतेने ही मदत पुरवण्यास सिद्ध आहोत.

मित्रांनो,

राष्ट्रपिता महात्मा गांधीने म्हटले होते की, कोणतीही योजना यशस्वी झाली की अयशस्वी झाली ही गोष्ट लक्षात घ्यायची असेल तर काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. त्यामध्ये समाजातला सर्वात अखेरचा घटक, गरजवंत असतो, त्याला त्या योजनेचा किती लाभ मिळतो, हे पाहिले पाहिजे. आमच्या योजना समाजातल्या त्या अखेरच्या गरजवंतापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि या योजनांमुळे त्याचे राहणीमान उंचावले पाहिजे. आमचे सरकार यासाठी कटिबद्ध आहे.

आज या परिषदेच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सरकार, प्रत्येक संस्था, सामाजिक संस्थेशी संलग्न असलेले प्रत्येक प्रतिनिधी या सगळ्यांनीएक संकल्प करण्याचा मी आग्रह करतो. टी.बी.ग्रस्त अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी, टी.बी. मुक्त भारत बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

टी.बी. मुक्त भारत बनवण्याचा संकल्प, टी.बी. मुक्त विश्व बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सहायक ठरणार आहे.

या इतक्या मोठ्या संकल्पासाठी खूप-खूप शुभेच्छा देवून मी आपलं बोलणं थांबवतो. टी.बी. मुक्तीसंबंधी परिषद आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो.

धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s digital economy surge: Powered by JAM trinity

Media Coverage

India’s digital economy surge: Powered by JAM trinity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
President of the European Council, Antonio Costa calls PM Narendra Modi
January 07, 2025
PM congratulates President Costa on assuming charge as the President of the European Council
The two leaders agree to work together to further strengthen the India-EU Strategic Partnership
Underline the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA

Prime Minister Shri. Narendra Modi received a telephone call today from H.E. Mr. Antonio Costa, President of the European Council.

PM congratulated President Costa on his assumption of charge as the President of the European Council.

Noting the substantive progress made in India-EU Strategic Partnership over the past decade, the two leaders agreed to working closely together towards further bolstering the ties, including in the areas of trade, technology, investment, green energy and digital space.

They underlined the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA.

The leaders looked forward to the next India-EU Summit to be held in India at a mutually convenient time.

They exchanged views on regional and global developments of mutual interest. The leaders agreed to remain in touch.