भारत माता की जय।
भारत माता की जय।
मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ,
अपने सब मोकामावासी के प्रणाम। भगवान परशुराम की पावन धरती पर अपने सबके सादर प्रणाम। हमें मोकामा में आ के धन्य हो गे लियो।
संपूर्ण देश दिवाळी मनवण्याची तयारी करीत आहे. छठ पूजेची तयारीही चालू आहे. मी आपण सर्वांना दिपावली आणि छठ पूजेच्या शुभेच्छा देऊन ठेवतो. या पावन पर्वावर जवळ पास सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या विकासाची संधी देखील आज या बिहारच्या धरतीला मिळत आहे.
बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आमच्या गडकरीनी , आमच्या भारत सरकारने सुरु केलेल्या रस्ते क्षेत्रातील, रस्त्याच्या बांधणी संबंधी सखोल माहिती सांगितली , त्याचे वर्णन इतके सविस्तर होते कि मला काय तुम्हाला हि आश्चर्य वाटले असेल कि इतक्या कमी वेळात बिहारचे भाग्य बदलविण्यासाठी एवढ्या सर्व योजना कशा काय चालू केल्यात ? पण आम्ही हे करून दाखविले.
मी नितिशजी, आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे हृदयापासून आभार मानतो की, त्यांनी भारत सरकारच्या सर्व योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले. आमच्यावर जर काही कठीण प्रसंग आला तर तो दूर करणे, त्यासाठी चिंता करणे हे त्यांचे काम होते . केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही खांद्याला खांदा लावून आज बिहारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव लावून काम केले आहे आणि त्याचे परिणाम आता आम्हाला दिसू लागतील.
नितिशजीनी अनेक विषयांना स्पर्श केला, त्यांचे अनेक वर्षांपासून खासदार म्हणून राहणे हे या क्षेत्रातील त्यांचे योगदान असल्याने शक्य झाले आहे . बिहारच्या जनतेप्रती त्यांचा विशेष लगाव असल्याने प्रत्येक काम तडीस नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते या मातीशी संवेद्नात्मक रित्या बांधले गेले असल्याने प्रत्येक काम, विकास झालाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो मी त्यांच्या या कष्टाळू , भावनिक बांधिलकीचा आदर करतो आणि विश्वास देतो की, भारत सरकार बिहारच्या कोटी कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीसह बरोबर राहील आणि विकास यात्रेला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यास मदत करेल.
बंधू आणि भगिनींनो, आज ज्या पुल निर्मितीच्या शिलान्यासाचा कार्यक्रम झाला, त्यानिमित्याने मला मोकाम येथे येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी जेंव्हा वरती येत होतो त्या वेळी मला आमचे नितीशजींनी या प्रकल्पाचे डिझाईन दाखविले , त्याचे मॉडेल ते दाखवीत होते, मला विश्वास आहे की, या प्रकारचा पूल हे संपूर्ण बिहारचे आकर्षणाचे केंद्र असेल. हा पूल बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ. कृष्णजीच्या कर्म भूमी असलेल्या बेगू सारायला राजधानी पाटणासह जोडणारा असेल. बेगू सराय येथे रेफाईनरी , खाते, औष्णिक वर्ग आणि बरौनी डेअरी ची स्थापना करून बिहारला औद्योगिक राजधानी बनविणाऱ्या अशा व्यक्तीला मी आदरपूर्वक नमन करतो.
आज मी त्या भूमीवर आलेलो आहे, जेथून शंभर मीटर वर पवित्र तीर्थ धाम आहे, ते शिक्षणाचे क्षेत्र आहे, ज्याने राष्ट्र कवि दिनकर यांचे बाल्यावस्थेत संस्कार संस्करण केले होते. आणि जेव्हा दिनकर जी ची आठवण येते, तेव्हा त्यांच्या भावनां आजही आम्हाला प्रेरणा देतात. अंध-श्रद्धा सोडून मुक्तिसाठी मार्ग दर्शवितात. दलित, पीडित, शोषित, गरीब, वंचित … गावकर्यांनो, शेतकऱयांनो मजदुरांनो, त्यांच्या प्रति एक आदर भाव जागृत होतो. दिनकरजीची बोली अभिव्यक्तीमध्ये आम्ही अनुभवतो. ज्या धरती वर दिनकर जी लहानाचे मोठे झालेत , ज्यांचे जन्म स्थान सुद्धा अगदी जवळ आहे, एकदा दिनकरजीनी सांगितले होते कि –
‘आरती लिये तो किसे ढूंढता है मूर्ख, अंध-श्रद्धा के खिलाफ चोट पहुंचाते थे।
‘‘आरती लिये तो किसे ढूंढता है मूर्ख, मंदिरों, राज प्रसादों में, तहखानों में,
अरे देवता कहीं सड़कों पर गिट्टी तोड़ रहे, देवता मिलेंगे, खेतों में खिलहानों में’’।।
आज ज्या रस्त्यांचं बांधकाम होत आहे, त्या ठिकाणी, तोच देव गिट्टी तोडणार आहे , आमचे भाग्य बनविणार आहे. भारत सरकारने दिनकरजीच्या स्वप्नांला पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
बंधू भगिनींनो, हे स्थान भगवान परशुराम यांची तपोभूमी आहे. प्राचीन काळातील तीन महाजनपद अंग, मगध व मिथिला यांच्या संगमावर स्थित आहे. गंगेचे पवित्र सिमरिया किनारा हा गौरवशाली इतिहास विसरलेला नाही. हा मंच, पवित्र सिमरिया किनाऱ्याला नमस्कार करण्याचे भाग्य मला मिळाले . मी श्रद्धेने नमस्कार करतो. हि ती धरती आहे जी वीर शिरोमणि बाबा चौहरमल,ज्यांच्या नावाने दरवर्षी थोड्या अंतरावर मेळा लागतो, लोकांची गर्दी असते, मी अशा पवित्र भूमीला नमस्कार करतो.
बिहारच्या माझ्या प्रिया बंधू भगिनींनो, मला सर्व दूर माणसं च माणसं दिसत आहे.
जितके लोक या पेंडाल मध्ये आहेत त्या पेक्षा दुप्पट -तिप्पट लोक बाहेर उभे आहेत. हे सर्व लोक उन्हात तापले जात आहेत, इतक्या वेळ पासून उभे आहेत, इतके कष्ट घेत आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. मी आपल्या सर्वाना नमस्कार करतो. आपले अभिनंदन करतो , परंतु माझ्या बिहारवासियों हे जे तुम्ही तप आरंभिले आहे , उन्हात तापत आहात, मी तुम्हाला विश्वास देतो कि भारत सरकार आणि राज्य सरकार तुमच्या तपस्येला वाया जाऊ देणार नाही.
आमच्या देशातील अशा काही जनतेच्या संकुचित मनोवृत्तीमुळे देशाची पीछेहाट झाली आहे. जर कोणी रस्ते बांधणीचे काम केले तर हि मंडळी म्हणायची कि रस्त्यांचे काय काम? रस्त्यांवरून तर कारवाली मंडळी फिरतात. मी हे सर्व पेपर मधून वाचायचो. आमच्या गरिबांजवळ गाडी कुठे ? मला रस्त्यांची काय गरज? रोड ची काय गरज? अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी देशाची नासाडी केली ज्याची आपण कल्पना ही करू शकत नाही. आज आपण कुठल्याही गावात जा जिथे रस्ते नाही आणि जर रस्ते नसतील तर…. मला खासदार भेटायला येतात. ते हेच म्हणतात कि साहेब माझ्या क्षेत्रातील अजून काही गावांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना लागू झालेली नाही या वेळी आमच्या गावांना प्राथमिकता द्या. बंधू आणि भगिनींनो, मागील तीन महिन्यात आम्ही बजेट मध्ये इतकी वाढ केली आहे , कामात इतका वेग आणला आहे कि आधी जितके रोड बनले होते, एक दिवसात आज त्याचे डबल रोड बनविण्याच्या दिशेने आम्ही यशस्वी झालो आणि गावांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हे रोड चे काम चालू आहे. परंतु ग्रामीण रस्ते केवळ पर्याप्त नाहीत. , जिथे मोठे मोठे आर्थिक केंद्र असतात, जी वृद्धी केंद्र असतात, जिथे अर्थव्यवस्था चालते त्यानां सुद्धा या आंतरिक स्थानांशी जोडणे आवश्यक आहे.
आज जे हजारो कोटी रुपयांच्या योजनांचे शिलान्यास झाले आहे ते केवळ त्यावरून गाड्या हाकण्या साठी नाही तर या रस्त्यांची निर्मिती आर्थिक जीवन बदलण्यासाठी आहे. याच रस्त्यांवरून आर्थिक समृद्धी ओढून आणण्याचे आमचे प्रयत्न असून हेच रस्ते सम्रुद्धीचे क्षेत्र, पर्व निर्माण करण्यामध्ये योगदान देतील.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, गंगेशी आमचे जीवन जोडले गेले आहे जर आज माँ गंगा नसती तर आपल्या भू भागाची काय अवस्था असती याचा विचार हि करवत नाही परंतु ती गंगा वाचविण्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले नाही , आम्ही उदासीनता अवलंबिली. गंगेला वाचविणे म्हणजे आपल्या भावी पिढयांना वाचविणे आहे . गंगेला निर्मल करू,गंगेला अविरत करण्यात कोणी रोखु शकणार नाही आणि यासाठी सरकार अब्जावधी रुपये खर्च करून गंगेची सफाई करून घेत आहे. नद्यांसाठी पुन्हा एकदा तोच श्रद्धा भाव जागविण्यात येईल. नद्यांना वाचविण्याची धडपड चालेल हिंदुस्थानच्या प्रत्येक नदीप्रति जागरूकता येईल. भारतात , भविष्यात पाण्याच्या संकटापासून वाचायचे असेल तर हाच मार्ग आहे ज्याला आपल्याला गंभीरतेने घ्यावे लागेल यासाठी गंगा सफाई चे जे अभियान चालविण्यात येत आहे , गंगोत्री पासून बंगालच्या सागरापर्यंत जे कुठले राज्य याबरोबर जोडले आहे वेगवेगळे करून गंगा घाणेरडी व्हायला नको सर्व प्रथम प्राथमिकता यावर देण्यात आली केमिकलयुक्त पाण्याला रोखण्यासाठी अभियान चालवण्यात आले आहे. आज बिहार मध्ये एक साथ अनेक प्रकल्पांचा शिलान्यास होतो आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये गंगे बाबत जो आमच्या मनात आदर भाव आहे त्याच प्रकारे बघण्यात येईल. आणि जेव्हा गंगा आमच्या स्वप्नांनुसार असेल, तेव्हा छठ पूजेत एक वेगळा आनंद असेल तसेच भक्तीची एक अद्वितीय भावना असेल.
बंधू आणि भगिनीनो , गेल्या काही दिवसांमध्ये भारत सरकारच्या, रेलवे मंत्रलयाने, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांसाठी एक महत्वाची ट्रेन चालू केली असून जिच्यामुळे दिवाळी आणि छठ पुजेच्या कालावधीत ही रेलवे खूपच लाभदायी ठरत आहे. मुंबईहून गोरखपूरपर्यंत, धावणारी अंत्योदय एक्सप्रेस देशातील पहिली रेल्वे, आणि केवल एक आठवड्यापूर्वी , मी, सूरत ते पटना जयनगर या दुसऱ्या अंत्योदय एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली, ही व्यवस्था यासाठी की देशातील गरिबातील गरीब व्यक्ति विनाआरक्षण या रेलवे ने प्रवास करू शकेल.
आम्ही बडोदा ते बनारस पर्यंत महामना एक्सप्रेस ने जोडले आहोत. सुरत, बडोदा आणि अंकलेश्वर येथे काम करणारे लोक, महाराष्ट्रात काम करणारे लोक, हे दिवाळी आणि छठ पूजेसारख्या मोठ्या उत्सवांसाठी त्यांच्या घरी आरामात पोहचू शकतात. सरकारने या चार महत्वाच्या रेल्वे गाड्यांची ओळख केवल बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांना जोडण्यासाठी फार वेगाने केली आहे जी दिवाळी आणि छठ पूजा दरम्यान तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल
बंधू भगिनीनो, नितिन गडकरी यांनी तुम्हाला एक स्केच सदर केले. तथापि , यासारखे महत्वाचे ईमारत बांधणीचे कार्य एवढ्या कमी कालावधीत बिहारमधे या पूर्वी कधीही झाल्याचे ऐकिवात नाही. जसे की , आत्ताच नीतिनजींनी सांगितले की, जर केवळ रस्ते बांधणीचा विचार करता , ५३००० कोटि रुपये मूल्य असलेले काम एक तर चालू व्हायला पाहिजे हवे होते किंवा मंजूरी तरी मिळायला हवी. तुम्ही फक्त कल्पना करा की अशा प्रकारच्या योजनांमुळे किती तरी पायभूत सुविधाची तरतूद होईल.
आम्हाला माहित आहे की, भविष्यात जोड़नीविणा आपण तसु भरही विकासाच्या दिशेने पुढे सरकु शकणार नाही. रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे , इंटरनेट , गॅस ग्रीड, वीज जोडणी आणि स्वच्छ पाण्याच्या नळाची आज गरज आहे. कनेक्टिव्हिटीचे हे मुद्दे गरीब लोकांशी संबंधित असल्याने त्यांच्यासाठी खास ग़डकरीजींच्या नेतृत्वाखाली जलमार्गांचा एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आपण यशस्वीरित्या जलमार्ग अंमलात आणल्यास आपण नद्याचे महत्त्व बघू शकाल. जे लोक आर्थिक क्षेत्रातले आहेत, ते नद्यांसंदर्भातील स्वत:च्या भावनांशी जुळवून घेण्याची गरज टाळण्यास सक्षम असतील परन्तु भारतीय अर्थव्यवस्थेत जल प्रकल्पामुळे असे अनेक बदल घडून येणार आहेत ज्यामुळे गरिबांना त्यांच्या घरापर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा माफक दरात होईल. ह्या सर्व गोष्टी माँ गंगेच्या किनारया वरुन केवल जलमार्ग आहे म्हणून शक्य होतील.
ब्रिटीश कालखंडात हा जलमार्ग तेथे होता, त्या वेळी मोकामाला मिनी कलकत्ता म्हणून ओळखले जात होते. हे मोठ्या आर्थिक आणि वाहतूक गतिविधिचे केंद्र होते. भारत सरकारने या प्रतिष्ठेच्या पुनर्संचयित कामाचा ताबा घेतला असून भविष्यात पुनर्रक्रियान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे.
आपण असे पाहिले असेल की, आम्ही अशा गावांना वीज पुरवण्यासाठी एक प्रचंड मोहीम सुरु केली आहे. जिथे वीज उपलब्ध नव्हती अशी 18,000 गावे होती, आम्ही 1,000 दिवसांमधे या गावानां विजपुरवठ्याचे स्वप्न पाहिले. आमच्याकडे अजूनही काही महिने आहेत परंतु आतापर्यंत आम्ही जवळजवळ 15,000 गावांचे विद्युतीकरण केले आहे आणि उर्वरित 2.5 ते 30000 गावांचे विद्युतीकरणासाठी आम्ही वेगाने काम करीत आहोत. याबरोबरच आम्ही अलीकडेच प्रधानमंत्री सौभाग्य योजनेला सुरवात केली आहे.
मी, बिहारला विनंती करतो की, या प्रधान मंत्री सौभाग्य योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा प्रधानमंत्री सौभाग्य योजने अंतर्गत, भारत सरकार आणि सर्व राज्य सरकारे वीज जोडणी नसलेल्या घरांना वीज पुरवण्यासाठी एकत्र काम करणार आहे. जर कोणी या योजनेपासून वंचित राहतो आणि या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक असल्यास त्याला विदूयत बल्ब देण्यात येईल. यापूर्वी जर एखाद्याने विदूयत जोडणी योजने संबंधी विचारले तर सरकार त्याला सांगायचे की, त्या तिकडे विदूयत खांब आहे जर तुला विदूयत पुरवठा हवा असल्यास आम्हाला या जागेवरून १० विदूयत खाम्बे उभारावे लागतील ज्याचे मूल्य ३०००० रुपये असेल. त्यानंतर विज मिळेल.
बंधू अणि भगिनींनो,
भारतातील कुठलेही कुटुंब आता १८ व्या शतकातील स्थिति नुसार राहणार नाही असे आम्ही ठरविले आहे. विदूयत जोडणी विनामूल्य देण्यात येईल. जर विदूयत खांबे रोवण्याची वेळ आल्यास सरकार ते काम करेल , सरकार विदूयत वायर टाकण्याचेही काम करेल. आणि घरांना विदूयत पुरवठा करण्यात येईल. पहिली विदूयत जोडणी विनामूल्य असेल जेणेकरून कुटुंब प्रमुख, मुलांच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा विचार करू शकेल. अणि विकासाच्या नव्या पायवाट चोखंदळेल.
आम्ही स्वछता मोहिंम सुरु केली आहे. मी सर्वाना फ़ोन करणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याना , शिक्षित युवकांना, आर्थिक दृष्टया सक्षम कुटुंबियांना सांगणार आहे की, तुम्ही स्वछता या बाबीवर विचार करा , विचार करा त्या आया – बहिणींचा ज्या खेड़्यांमधे राहतात ज्या शहराच्या अशा वस्ती मध्ये राहतात आणि त्यांना शौच्याला खुल्या जागी जावे लागते, ज्यांच्या कड़े शौच्यालय नाही, काय करतील त्या ? सूर्योदय होण्याच्या पूर्वी त्यांना आपले शौच्य अंधारात जाऊन आटोपून घ्यावे लागत असणार. जर दिवसभरात पुनः शौच्यला जायचे असेल तर रात्र होण्याची वाट पहायला लागत असेल, की केंव्हा अंधार होतो आणि आपल्याला आडोशाला जाता येईल. माझ्या गरीब माता आणि बहिणींच्या आरोग्यावर याचे कोणते प्रतिकूल परिणाम होत असतील ? आमच्या माता , बहिणींची परिस्थिती आज काय आहे? आणि म्हणूनच मी देशातील प्रत्येक राज्यांना विनंती करतो की, जर आपण आपली जबाबदारी नाकारली तर आम्ही शौचालय बांधू शकणार नाही. आम्हाला प्रामाणिकपणे पुढे जायला हवे आणि आमच्या माता, बहिणीं साठी, त्यांच्या सन्मानासाठी आपण सर्व ठिकाणी शौचालय बांधण्याचे काम पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले पाहिजे, जर आपल्याला त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता असेल तर.
आज आम्ही पाच कोटी कुटुंबांना शौचालयंद्वारे जोडले आहे. जिथे आवश्यकतेच्या ५०% पेक्षा कमी स्वच्छतेच्या सोई उपलब्ध आहेत आज आम्ही जवळपास ८०% सोई उपलब्ध केल्या आहेत. आणि म्हणूनच मी बिहारच्या जनतेला विनंती करतो की, त्यांनी आपल्या खेड्याची काळजी घ्यावी आज देशातील २. ५ लाख गावांनी हागणदारी मुक्त ग्राम असे स्वयं घोषित केले आहे. आणि म्हणूनच मी बिहारला आमंत्रित करतो की, त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याने , ग्रामपंचायतीने, शहराने हागणदारी मुक्त असे स्वयं घोषित करावे आणि येत्या काही दिवसात, अशा भूमीवरून जिथे महात्मा गांधींनी चंपारण्य चळवळ चालवली, स्वच्छता,स्वावलंबनाचा संदेश दिला अशी हि भूमी जी आज तुमच्या कडून अपेक्षा करते. तुम्ही सुद्धा जबादारी घ्यायला हवी आणि बिहारला एका नव्या उंचीवर न्यायला हवे. कार्य केवळ सरकारी पैशाच्या आधारावर पूर्णत्वाला जात नाही परंतु जेव्हा लोक निर्णय घेतात तेव्हा ते काम आपोआपच होते आणि म्हणूनच मी तुम्हा लोकांना या कार्यात सहभागी होण्या साठी आमंत्रित करतो.
माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मोठ्या संख्येनी आज उपस्थित राहून मला आशीर्वाद दिला आहे मी पुन्हा एकदा माझी कृतज्ञता व्यक्त करतो. मी आश्वासन देतो की सरकार पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आम्ही विकसित केलेल्या विकास मॉडेल अंतर्गत, मग ते पूर्व उत्तर प्रदेश असो, बिहार किंवा पश्चिम बंगाल असो किंवा आसाम असो किंवा ओडिशा असो किंवा उत्तर पूर्व असो, हे सर्व प्रदेश विकासाच्या नवीन उंची गाठतील. आपल्या क्षेत्रातील खत प्रकल्पाची स्थापना करण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. आमच्या शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे.
तुम्ही या सर्व विकासाच्या प्रवासात सहभागी व्हाल या एकेरी अपेक्षेसह पूर्ण शक्तीनिशी माझ्या बरोबर म्हणा.
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
खूप खूप धन्यवाद !