नमस्कार !
भारत माता की जय!
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी, माझे संसदेतील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील क्रीडा राज्यमंत्री हर्ष संघवी जी, संसदेतील माझे सहकारी हसमुख भाई पटेल जी. , नरहरी अमीन आणि अहमदाबादचे महापौर किरीट कुमार परमार जी, इतर मान्यवर आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे तरुण मित्र!
माझ्यासमोर असलेला हा तरुणाईच्या उत्साहाचा सागर, हा जोश, या उत्साहाच्या लाटा,हे स्पष्टपणे सांगत आहेत की, गुजरातच्या तरुणांनो, तुम्ही सर्वजण आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहात. हा केवळ क्रीडा क्षेत्राचा महाकुंभ नाही तर हा गुजरातच्या युवाशक्तीचा महाकुंभ आहे. 11व्या क्रीडा महाकुंभासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.या भव्य कार्यक्रमासाठी मी गुजरात सरकारचे विशेषत: यशस्वी मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचेही अभिनंदन करतो.कोरोनामुळे खेळाचा हा महाकुंभ दोन वर्षे होऊ शकला नाही , पण भूपेंद्रभाईंनी ज्या भव्यतेने या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले आहे. यामुळे युवा खेळाडूंमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.
मित्रांनो,
मला आठवते, 12 वर्षांपूर्वी 2010 मध्ये गुजरातचा मुख्यमंत्री या नात्याने , मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात क्रीडा महाकुंभ सुरू झाला आणि आज मी म्हणू शकतो की, मी जे स्वप्न पेरले होते, त्याचा आज वटवृक्ष होताना दिसत आहे. आज मी त्या बीजाला एवढ्या मोठ्या वटवृक्षाच्या रूपात आकार घेताना पाहत आहे. गुजरातने 2010 मध्येच 16 खेळांमध्ये 13 लाख खेळाडूंच्या सहभागासह खेळातील पहिल्या महाकुंभची सुरुवात केली होती. भूपेंद्रभाईंनी मला सांगितले की, 2019 मध्ये झालेल्या खेळांच्या महाकुंभमध्ये 13 लाख ते 40 लाख तरुणांचा सहभाग होता. 36 क्रीडा प्रकार आणि 26 पॅरा क्रीडा प्रकारात 40 लाख खेळाडू आणि ! कबड्डी, खो-खो आणि टग ऑफ वॉर ते योगासन आणि मल्लखांब पर्यंत ! स्केटिंग आणि टेनिसपासून ते तलवारबाजीपर्यंत प्रत्येक खेळात आज आपली तरुणाई अप्रतिम कामगिरी करत आहे आणि आता हा आकडा 40 लाख ते 55 लाखांच्या पुढे पोहोचला आहे.'शक्तीदूत' सारख्या कार्यक्रमातून क्रीडासंबंधी महाकुंभातील खेळाडूंना पाठबळ देण्याची जबाबदारीही सरकार उचलत आहे.आणि हे जे अथक प्रयत्न आहेत ,खेळाडू जो सराव करतात आणि खेळाडू जेव्हा प्रगती करतो तेव्हा त्या मागे एक दीर्घ तपश्चर्या असते. जो संकल्प गुजरातच्या जनतेने एकत्रितपणे केला होता, त्याची पताका आज जगभरात फडकत आहे.
माझ्या तरुण मित्रांनो,
गुजरातच्या या युवा शक्तीचा तुम्हाला अभिमान आहे ? गुजरातचे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत, तुम्हाला अभिमान वाटतो का ? खेळ महाकुंभातून उदयाला आलेले देशातील आणि गुजरातचे तरुणयुवा खेळाडू ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांसह अनेक जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये आज आपली कामगिरी दाखवत आहेत. या महाकुंभातूनही तुमच्यातील अशाच क्रीडा प्रतिभेचा उदय होणार आहे.खेळाडू तरुणांना तयार करतात.खेळाच्या मैदानात त्यांची कामगिरी बहरते आणि आणि संपूर्ण भारताचा झेंडा जगात फडकतो.
मित्रांनो,
एक काळ असा होता की, क्रीडा विश्वात भारताची ओळख केवळ एक-दोन खेळांवरच आधारलेली होती. त्याचा परिणाम असा झाला की, देशाचा अभिमान आणि अस्मिता ज्या खेळांशी निगडीत आहे,त्यांचाही विसर पडला.त्यामुळे खेळाशी निगडीत संसाधने वाढवणे, क्रीडा पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावर भर द्यायला हवा होता, जो प्राधान्य द्यायला हवा होता, तो एक प्रकारे थांबला होता. इतकेच नव्हे तर राजकारणात जसा घराणेशाहीचा शिरकाव झाला तसा क्रीडाविश्वातही खेळाडूंच्या निवडीतील पारदर्शकतेचा अभाव हादेखील मोठा घटक होता.खेळाडूंची सर्व प्रतिभा समस्यांशी लढण्यातच खर्ची पडत होती. त्या भोवऱ्यातून बाहेर पडून आज भारतातील तरुण आकाशाला गवसणी घालत आहे.. सोन्या-चांदीची चमक देशाचा आत्मविश्वास देखील चमकवत आहे आणि तुम्हाला चमत्काराची अनुभूती देखील देत आहे.जगातील सर्वात तरुण देश क्रीडा क्षेत्रातही एक शक्ती म्हणून उदयाला येत आहे.टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंनी हा बदल सिद्ध केला आहे.टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच 7 पदके जिंकली आहेत.हाच विक्रम भारताच्या मुलामुलींनी टोक्यो पॅरालिम्पिकमधेही केला. या जागतिक स्पर्धेत भारताने 19 पदके जिंकली.पण मित्रांनो, ही तर केवळ सुरुवात आहे. भारत कधीही थांबणार नाही आणि थकणारही नाही. माझा माझ्या देशाच्या युवा शक्तीवर विश्वास आहे, माझा माझ्या देशाच्या युवा खेळाडूंच्या तपश्चर्येवर विश्वास आहे, माझ्या देशातील युवा खेळाडूंच्या स्वप्नांवर, दृढनिश्चयावर आणि समर्पणावर माझा विश्वास आहे.आणि म्हणूनच आज लाखो तरुणांसमोर मी हिंमतीने सांगू शकतो की, भारताची युवा शक्ती याला खूप पुढे घेऊन जाईल. तो दिवस दूर नाही, जेव्हा अनेक खेळांमध्ये एकाच वेळी अनेक सुवर्णपदक जिंकणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिरंगाही फडकेल.
मित्रांनो,
यावेळी युक्रेनमधून जे तरुण मायदेशी परत आले आहेत, ते युद्धभूमीवरून परत आले आहेत.बॉम्बगोळ्याच्या हल्ल्यातून परत आले आहेत. आल्यानंतर ते काय म्हणाले? ते म्हणाले की, आज तिरंग्याचा अभिमान - शान काय आहे, ते त्यांनी युक्रेनमध्ये अनुभवले आहे, पण मित्रांनो, मला तुम्हाला आणखी एका मुद्द्याकडे घेऊन जायचे आहे.जेव्हा आपले खेळाडू पदक प्राप्त केल्यानंतर व्यासपीठावर उभे असायचे , जेव्हा तिरंगा झेंडा दिसायचा, भारताचे राष्ट्रगीत वाजायचे, तेव्हा तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल, आपल्या खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाचे, अभिमानाचे अश्रू वाहत असायचे. ही असते देशभक्ती.
मित्रांनो,
भारतासारख्या तरुण देशाला दिशा देण्यात तुम्हा सर्व तरुणांची मोठी भूमिका आहे. केवळ तरुणच भविष्य घडवू शकतात, आणि जो दृढनिश्चय करतो तोच हे भविष्य घडवू शकतो आणि दृढनिश्चयासह समर्पणाने सहभागी होतो.आज या खेळ महाकुंभमध्ये गुजरातच्या विविध भागातून, खेड्यापाड्यातून, शहरांमधून, लाखो तरुण-तरुणी एकाचवेळी एकत्र आले आहेत. तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत करत आहात.मी तुमच्या स्वप्नांमध्ये तुमच्या प्रदेशाचे भविष्य पाहतो,मी तुमच्या जिल्ह्याचे भविष्य पाहतो. मला तुमच्या स्वप्नामध्ये संपूर्ण गुजरात आणि देशाचे भविष्य दिसते.आणि म्हणूनच, आज स्टार्टअप इंडिया ते स्टँड अप इंडिया पर्यंत ! मेक इन इंडिया ते आत्मनिर्भर भारत आणि 'वोकल फॉर लोकल' पर्यंत !नव्या भारताच्या प्रत्येक मोहिमेची जबाबदारी भारतातील तरुणांनी स्वतः पुढे येऊन घेतली आहे.आपल्या तरुणांनी भारताचे सामर्थ्य सिद्ध केले आहे.
माझ्या तरुण मित्रांनो,
आज सॉफ्टवेअरपासून अवकाश सामर्थ्यापर्यंत , संरक्षणापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारताचे वर्चस्व आहे.जग भारताकडे एक महान सामर्थ्याच्या रूपात पाहत आहे. भारताच्या या सामर्थ्याला 'क्रीडा भावना ' अनेक पटींनी वाढवू शकते.हा सुद्धा तुमच्या यशाचा मंत्र आहे.आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, जो खेळेल ! तो बहरेल ! माझा तुम्हा सर्व तरुणांसाठी सल्ला आहे – यशाचा कोणताही शॉर्टकट कधीही शोधू नका ! तुम्ही रेल्वे फलाटावर पाहिले असेल, काही लोक पुलावरून जाण्याऐवजी रुळ ओलांडतात, तेव्हा रेल्वेचे लोक तिथे लिहितात, शॉर्ट कट विल कट यु शॉर्ट .सोपा मार्ग खूप अल्पजीवी असतो.
मित्रांनो,
मित्रांनो,
यशाचा एकच मंत्र आहे - 'दीर्घकालीन नियोजन आणि निरंतर वचनबद्धता'. ना एखादा विजय हा आपला शेवट असू शकत नाही, ना पराभव! आपल्या सर्वांसाठी, आपल्या वेदांनी सांगितले आहे - 'चरैवेति- चरैवेति'. आज देशही न थांबता, न थकता आणि न झुकता अनेक आव्हाने पेलत पुढे जात आहे. आपण सर्वांनी मिळून अथक मेहनत घेऊन पुढे जायचे आहे.
मित्रांनो,
खेळांमध्ये, आपल्याला जिंकण्यासाठी 360 अंशांची कामगिरी करावी लागते आणि संपूर्ण संघाला कामगिरी करावी लागते.येथे चांगले - चांगले खेळाडू उपस्थित आहेत.तुम्हीच सांगा, क्रिकेटमधला एखादा संघ फलंदाजीत चांगली कामगिरी करतो, पण गोलंदाजीत वाईट कामगिरी करेल तर , तो जिंकू शकेल का? किंवा संघातील एखादा खेळाडू खूप चांगला खेळला मात्र बाकीच्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर विजय शक्य आहे का ,? जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सगळ्यामध्ये चांगले खेळावे लागेल.
बंधू आणि भगिनींनो,
भारतातील खेळांना यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आज देशाला अशाच 360 अंशात सांघिक कार्य करण्याची गरज आहे.म्हणूनच, देश समग्र दृष्टिकोनासह काम करत आहे.'खेलो इंडिया कार्यक्रम' हे या प्रयत्नाचे उत्तम उदाहरण आहे.पूर्वी आपली तरुण प्रतिभा दबून राहायची , त्यांना संधी मिळत नव्हती. आम्ही देशातील प्रतिभा ओळखून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करू लागलो आहे.प्रतिभा असूनही प्रशिक्षणाअभावी आपली तरुणाई मागे पडायची.आज खेळाडूंना प्रशिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. खेळाडूंना संसाधनांची कमतरता भासणार नाही हे देश सुनिश्चित करत आहे. .गेल्या 7-8 वर्षात क्रीडा क्षेत्रावर केला जाणारा खर्च सुमारे 70 टक्क्यांनी वाढला आहे. एक मोठी चिंता खेळाडूंच्या भवितव्याचीही असायची. तुम्ही कल्पना करा, जर खेळाडूला त्याच्या भविष्याची खात्री नसेल तर तो खेळाप्रती 100 टक्के समर्पित असेल का ? त्यामुळे आम्ही खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन आणि पुरस्कारांमध्येही 60 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.पदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षण देणार्या सर्व प्रशिक्षकांना आता वेगवेगळ्या योजनांद्वारे पुरस्कृत केले जात आहे.त्याचाच परिणाम म्हणजे, आज ग्रामीण भागातील , मागासवर्गीय, अगदी आदिवासी समाजातूनही क्रीडा प्रतिभा देशासाठी समोर येत आहेत., ज्याचा देशाला अभिमान आहे..
मित्रांनो,
आपल्या देशातील खेळाडूंना आणखी एक विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी तुम्ही कोणाला सांगायचा की ,मी खेळाडू आहे, तर लोक म्हणायचे की, ठीक आहे खेळाडू आहात , खेळ तर प्रत्येक मूल खेळते.पण तुम्ही प्रत्यक्षात काय करता? म्हणजेच आपल्या येथे खेळाला सहज स्वीकारता आलेले नाही.
मित्रांनो,
नाराज होऊ नका. ही समस्या केवळ तुम्हालाच भेडसावलेली नाही तर आपल्या देशातील मोठ्या खेळाडूंनाही यातून जावे लागले आहे.
माझ्या तरुण मित्रांनो,
आपल्या खेळाडूंच्या यशामुळे आता समाजाचे हे विचार बदलू लागले आहेत. आता लोकांना समजू लागले आहे की,जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणे म्हणजे केवळ खेळात करिअर करणे असे नाही, हे असे नाही आहे. खेळाशी संबंधित सर्व शक्यतांमध्ये युवा वर्ग कारकीर्द घडवू शकतो. कोणी प्रशिक्षक बनू शकतो. कोणी स्पोर्ट्स सॉफ्टवेअरमध्ये अनोखी कामगिरी करू शकतो. क्रीडा व्यवस्थापन हेदेखील खेळाशी संबंधित मोठे क्षेत्र आहे. अनेक तरुण क्रीडा लेखनात उत्तम कारकीर्द घडवत आहेत. तसेच खेळाबरोबरच प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ यांसारख्या अनेक संधी निर्माण होतात.तरुणांनी या सर्व क्षेत्रांना स्वतसाठी करिअरच्या रूपात पाहावे ,पुढे जावे , यासाठी देश व्यावसायिक संस्था निर्माण करत आहे.उदाहरणार्थ, 2018 मध्ये, आपण मणिपूरमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले. क्रीडा क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठही उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे.आयआयएम रोहतकने क्रीडा व्यवस्थापनांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे.आपल्या गुजरातमधील ‘स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठ ’ हे सुद्धा याचे उत्तम उदाहरण आहे.येथे क्रीडा व्यवस्था निर्माण करण्यात 'स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाने' मोठी भूमिका बजावली आहे. मला सांगण्यात आले आहे की, गुजरात सरकार क्रीडा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा अधिक व्यापक करण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर क्रीडा संकुल देखील बांधत आहे.या सर्व प्रयत्नांमुळे क्रीडा विश्वात गुजरात आणि भारताचे व्यावसायिकदृष्ट्या असलेले अस्तित्व आणखी बळकट होईल.माझी अशीही एक सूचना आहे की, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली किनारी संसाधने, आपल्याकडे असलेला लांब असा समुद्रकिनारा , एवढा मोठा समुद्रकिनारा आहे, आता आपल्याला क्रीडा क्षेत्रासाठी, खेळांसाठीही आपल्या या किनारपट्टीच्या प्रदेशासाठी खेळाच्या दृष्टीने पुढे यायला हवे. आपल्या इथे खूप सुंदर समुद्रकिनारे आहेत. समुद्रकिनारी खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या शक्यतांचाही विचार या खेळ महाकुंभमध्ये व्हायला हवा.
मित्रांनो,
जेव्हा तुम्ही खेळाल, तंदुरुस्त राहाल, निरोगी राहाल, तेव्हाच तुम्ही देशाच्या सामर्थ्याशी जोडले जाणार आहात. त्याचवेळी देशाच्या सामर्थ्याने तुम्हाला मूल्यवर्धन करणारे प्रावीण्यप्राप्त होईल. . आणि तेव्हाच तुम्ही राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकाल. मला विश्वास आहे की,या खेळ महाकुंभातील तुम्ही सर्व तारे आपापल्या क्षेत्रात चमकतील आणि नव्या भारताची स्वप्ने साकार करतील. मला आज तरुणांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विनंती करायची आहे. काळ खूप बदलला आहे. जर तुमच्या मुलामध्ये , मुलगा असेल किंवा मुलगी , त्याला खेळात रस असेल तर त्याच्यामधील प्रतिभा शोधून त्याला प्रोत्साहन देऊ शकता.त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा. तुम्ही त्याला पुन्हा पुस्तकांकडे मागे खेचू नका.त्याचप्रमाणे खेळ महाकुंभ सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे की, जेव्हा गावात खेळ महाकुंभाचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा संपूर्ण गावाने तिथे हजर राहावे.टाळ्यांचा कडकडाटही खेळाडूचा उत्साह वाढवतो. गुजरातमधील प्रत्येक नागरिकाने कोणत्या ना कोणत्या खेळ महाकुंभाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहायला हवे. तुम्ही बघा, गुजरातही क्रीडा जगतात आपला झेंडा फडकवणार आहे. भारताच्या खेळाडूंमध्ये गुजरातचे खेळाडूही असतील. याच अपेक्षेने मी पुन्हा एकदा भूपेंद्र भाई आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो. तरुणांना मी शुभेच्छा देतो.माझ्यासोबत म्हणा , भारत माता की जय !
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप खूप धन्यवाद!