Press Council was ceased to exit during Emergency. Things normalised after Morarji Desai became PM: Shri Modi
Press is responsible for upholding free speech: PM Modi
Media has played pivotal role in furthering message of cleanliness across the country: PM Modi

आज ज्या मान्यवरांचा सत्कार झाला आहे, त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रेस कौन्सिलला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, पण हे देखील खरे आहे की या दरम्यान एक असाही कालखंड आला होता ज्या काळात प्रेस कौन्सिलला संपवण्यात आले होते. त्यामुळे असेही होऊ शकते की या कालखंडाची यात भर घातली तर दोन वर्षांनी पुन्हा एकदा 50 वे वर्ष साजरे करता येईल. तसे पाहिल्यास 1916 मध्ये स्वीडनमध्ये या दिशेने काम झाले, पण त्या वेळी त्याचे नाव होते “ कोर्ट ऑफ ऑनर फॉर द प्रेस आणि त्यानंतर त्याचे नाव बदलत बदलत प्रेस कौन्सिल बनले आणि आज ते संपूर्ण जगात प्रेस कौन्सिल याच नावाने ओळखले जाते. ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे आणि मुख्यत्वे  या क्षेत्राची स्वायत्तता टिकवून ठेवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि काही समस्या निर्माण झाली तर स्वतः पुढाकार घेऊन तिचे निराकरण करणे, स्वतःहून आपल्यात बदल करवून घेणे अशी कामे ती करत आहे. जुन्या काळात इतकी आव्हाने नव्हती जितकी ती आताच्या काळात आहेत.

पत्रकारितेशी संबधित असलेले ज्येष्ठ जे लोक आहेत, त्यांच्याकडे विचार करण्यासाठी वेळ होता, जेव्हा ते आपल्या वार्तांकनाचा वृत्तांत कार्यालयात छापण्यासाठी जमा करून घरी परतत असत तेव्हासुद्धा त्यांच्या डोक्यात त्या वृत्तांताचे विचार घोळत असायचे. जसे की आपण आज जो वृत्तांत कार्यालयात दिला आहे तो उद्या छापून येणार आहे पण त्यात हा शब्द योग्य वाटत नाही, तेव्हा ते घरी जाऊन पुन्हा प्रयत्न करायचे की कार्यालयात जो प्रमुख असेल त्यांच्याशी संपर्क साधायचा की संपादकांशी संपर्क साधायचा, आता मी लिहून तर आलो आहे पण कदाचित हा शब्द योग्य वाटणार नाही, हा दुसरा शब्द चांगला वाटेल. त्या काळात दूरध्वनीने संपर्क साधण्याचीही सोय नव्हती. कधी ते रात्रीसुद्धा परत कार्यालयात जात असत, पान छापण्याच्या वेळी जाऊन बघा काही होत असेल तर असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्याकडे काही लिहिल्यानंतरही सकाळी छापून येईपर्यंत त्यांच्यावर दबाव असायचा, त्यांच्या मनात चिंता असायची की मी जे वार्तांकन केले आहे, मी जे लिहिले आहे त्याचे काय काय परिणाम होतील, माझे शब्द योग्य होते की नाही? ही बातमी ठळक बातमी बनवण्याचा माझा प्रयत्न होता, तो योग्य आहे का? आणि त्यात सुधारणार करण्यासाठी तेप्रयत्नही करत होते. आजच्या लोकांकडे ही संधी नाही आहे. इतक्या जलद गतीने त्यांना धावावे लागत आहे. बातम्यांचीही स्पर्धा आहे, उद्योग समुहांमध्ये देखील स्पर्धा आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहायचे, की आता बोलणाऱ्‍यांना जे बोलायचे होते ते बोलून झाले, दाखवणाऱ्‍यांना जे दाखवायचे होते

ते त्यांनी दाखवूले झाले आणि छापणारे अजून छापत आहेत. त्यामुळेच  आता त्यांना देखील ऑनलाइन मिडीया चालवावा लागत आहे, इतक्या झपाट्याने बदल झाला आहे.

परिवर्तनाच्या या स्थितीमध्ये अशा प्रकारच्या संस्थांना कशा प्रकारे मदत मिळू शकेल, त्यांच्या समस्या कशा प्रकारे दूर होतील? ज्येष्ठ लोकांनी नव्या पिढीच्या लोकांना कशा प्रकारे उपयोगी ठरेल अशी यंत्रणा तयार करावी.  याबद्दल विचार होणे गरजेचे आहे . कारण  या क्षेत्राबाबत महात्मा गांधी देखील सांगायचे की अनियंत्रित लेखणी एक मोठे संकट निर्माण करू शकते, पण महात्मा गांधी बाह्य नियंत्रण या क्षेत्राचा विनाश करेल आणि म्हणून बाह्य नियंत्रणाचा विचार त्या समाजाला पुढे नेणारा विचार असूच शकत नाही. स्वातंत्र्य, त्याची अभिव्यक्ती, त्याचे स्वातंत्र्य, त्याच्या सिद्धांताना आत्मसात करणे, पण त्याचबरोबर अनियंत्रित व्यवस्था, आपण किती ही निरोगी असलो तरीही आई सांगतच असते की अरे बाबा, थोडे कमी खा किंवा हे खाऊ नको. कोणतीही आई शत्रू नसते. पण ती आई घरात आहे म्हणून हे सांगत असते. बाहेरच्या कोणी सांगितले तर? तुम्ही कोण होता माझ्या मुलाची चिंता करणारे, मी आहे ना? असे  ती म्हणेल. म्हणून ही व्यवस्था कुटुंबाच्या आतच नीट प्रकारे हाताळली गेली पाहिजे. सरकारांनी तर त्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करता कामा नये. तुम्ही लोकांनीच एकत्र बसून अशा कौन्सिलसारख्या व्यवस्थेच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ लोकांच्या अनुभवातून समाजाचे सर्वांगीण  हित लक्षात घेऊन आपण या व्यवस्थांना कशा प्रकारे विकसित करू शकू? याचा विचार केला पाहिजे. खरेतर हे फारच अवघड आहे , कारण आपल्याच लोकांमध्ये बसून आपल्यावरच  टीका कशी काय करायची? कोणी बाहेरच्या व्यक्तीने टीका केली तर आपण लगेच त्याचे वार्तांकन करायला सज्ज असतो. पण आपणच बसून टीका कशी करणार? म्हणूनच हे काम अतिशय अवघड असते. आत्मपरीक्षण अतिशय अवघड काम असते. मला अगदी चांगल्या प्रकारे आठवण आहे, मी जेव्हा दिल्लीमध्ये राहात होतो, माझ्या पक्षाचे, संघटनेचे काम करत होतो, त्यावेळी कंदाहार प्रकरण घडले होते. आता कंदाहार प्रकरण घडले, विमानाचे अपहरण झाले आणि आपल्या देशातील इलेक्ट्रॉनिक मिडीया त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात होता, त्यामुळे त्यांचाही तसा एकदम दोष नव्हता जे काही झाले त्यात तो सुरुवातीचा कालखंड होता. त्यावेळी ज्या कुटुंबातील लोक विमानात अडकले होते, त्यांच्या बातम्या; त्यांची कुटुंबे मोर्चा काढत होते, सरकारच्या विरोधात घोषणा देत होते आणि फक्त त्यांना सोडवा हीच मागणी होती आणि जसजसा त्यांचा संताप वाढत होता, तसतसे दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढत चालले होते की हो का, भारतातील स्थिती अशी आहे तर, मग काय आता आपण हवे ते करू शकतो अशी भावना दहशतवाद्यांमध्ये निर्माण झाली होती.पण हे प्रकरण सुरू राहिले. पण माझ्या माहितीनुसार नंतर प्रसारमाध्यमांमधील सर्व नेते लोक एकत्र होते, सर्व प्रमुख लोक बसले होते. अंतर्गत बैठकीसाठी बसले होते आणि प्रेस कौन्सिल बहुतेक त्यात नव्हती. स्वतःहून बसले होते आणि बसून स्वतःहूनच आपले डोक आपटून घेतले होते. मला असे वाटते की ही काही लहान घटना नाही. अनेक लोकांना तर आठवतच असेल की अशा-अशा प्रकारे असे वार्तांकन झाले होते. आपण कोणती चूक केली, का केली, कशी हानी झाली, आम्ही कसे वाहावत गेलो?  आणि सर्वांनी मिळून काही निकषांचे पालन केले पाहिजे याची व्यापक चर्चा केली होती. अरुणजीही  येथे आहेत. कदाचित त्यांना माहिती असेल की त्यांच्या काळात सुरुवात झाली होती आणि त्यांनी काही निकष निश्चित केले होते. मला वाटते की सेवा करण्याची ही एक मोठी संधी होती.

दुसरी संधी आली होती, 26/11 ची. त्यानंतर जेव्हा मुंबईची घटना घडली त्या बैठकीतही त्याचा संदर्भ आला, अफगाणिस्तानच्या घटनेचा. पण त्या बाबतीत इतके वेगवेगळे दृष्टिकोन झाले त्यांना धड आत्मपरीक्षण करता आले नाही, असे नाही की त्यांना करायची इच्छा नव्हती, ते बसले होते ते करण्यासाठीच, स्वतःहून बसले होते, पण काम अर्धवटच राहिले. पण जोपर्यंत अशा प्रकारच्या संवेदनशील मानसिकता असलेले नेतृत्व माध्यमांच्या जगात आहे, प्रसारमाध्यमांच्या विश्वात आहे, चुका आमच्याकडूनही होतात, चुका तुमच्याकडूनही होतात, इतरांकडूनही होतात हे मला मान्य आहे. चुकांच्या आधारे प्रसारमाध्यमांचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. पण यामध्ये एक आनंदाची बाब आहे की,  एक खूपच प्रगल्भ, जबाबदार वर्ग आहे ज्यांची इच्छा आहे की या सर्वांवर आपणच एकत्र भेटून या दोषांपासून आपला बचाव कसा करता येईल आणि अधिक सामर्थ्यवान कसे बनता येईल याचा विचार केला पाहिजे. हा स्वतःहून केलेला एक अतिशय चांगला प्रयत्न आहे आणि ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहिली पाहिजे, मात्र बाह्य नियंत्रणांनी , बाहेरील नियमांनी परिस्थितीत बदल होणार नाही.

जेव्हा देशात आणीबाणी आली त्यावेळी प्रेस कौन्सिललाच संपवण्यात आले होते म्हणजेच मुलभूत गोष्टच संपवण्यात आली होती आणि सुमारे दीड वर्षांपर्यंत हे कौन्सिल बंद राहिले होते. नंतर  1978मध्ये जेव्हा मोरारजी भाईंचे सरकार आले तेव्हा या व्यवस्थेचा पुनर्जन्म झाला आणि त्याच काळात प्रसारमाध्यमांच्या बाबतीत मोठे उदारतेचे वातावरण होते आणि  आतापर्यंत तसेच कायम राहिले आहे. या प्रेस कौन्सिलशी संलग्न असलेल्या प्रसार माध्यमांशी  संबंधित असलेल्या लोकांचे हे देखील दायित्व बनते की आपण काळानुरूप परिवर्तन आणण्यासाठी काय काय करू शकतो? नव्या पिढीला तयार करण्यासाठी काय करू शकतो? सरकारला देखील, एक तर असे असते की, रोज आमचे जे क्षेत्र आहे त्या द्वारे आम्हाला सरकारचे जे म्हणणे आहे ते सांगत राहतो, पण त्याशिवाय देखील एक व्यवस्था असू शकते का?  की ज्यामध्ये सरकारच्या माहितीच्या अभावी कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात ? सरकारला माहिती देण्याचे मार्ग जर 30 वर्षे जुने असले तरी कसे काय चालेल? पण सरकारमध्ये हे बदल घडवून आणण्यासाठी देखील प्रेस कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य मदत करू शकतात. माहिती देण्याचे प्रकार आपण कशा प्रकारे बदलू शकतो? आणि ही सर्व सरकारांची जबाबदारी आहे.

 

जे दिसते, जे ऐकू येते, त्याशिवाय देखील काही तरी शोधत राहणे हा पत्रकारितेचा एक अविभाज्य भाग आहे,  हा एक महत्त्वाचा पैलू आहे हे देखील नाकारता येणार नाही. पण कमीत कमी जे दिसते आहे ते देखील नीट दिसले पाहिजे, ऐकू आले पाहिजे आणि वेळेवर ऐकू आले पाहिजे आणि वेळेवर दिसले पाहिजे, ही जबाबदारी प्रामुख्याने सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे. पण मी हे पाहात आहे की या संपर्कामध्ये असलेल्या तफावतीला प्रत्येक वेळी पहात आहे.  कारण माझी पत्रकार विश्वातील अनेकांशी जुनी मैत्री असल्याने, त्यांची नेहमीच काही समजतच नाही काय चाललय ते. त्यांना 10% च माहिती हवी आहे बाकी 90 तर तो आपली आपण कुठेतरी पोहोचून घेऊन येईल. त्याला फक्त माहिती पाहिजे की हे चांगले होत आहे तो नंतर तिथे पोहोचेल. त्यांची तक्रार या पहिल्या 10%च्या संदर्भात आहे. पण दुर्दैव हे देखील आहे की सरकारांमध्येही निवडक बातम्या फोडण्याचा शौक तयार होतो. जे चांगले प्रिय वाटतात,ज्यांच्याकडे सरकारची प्रशंसा केली जाते त्यांना जरा माहिती देऊन टाका, असे सरकारचे ही दोष, त्रुटी असतात. किंवा कधी कधी बिगर-गंभीर वृत्तीमुळेही बदलाची गरज निर्माण होते.

प्रेस कौन्सिलमध्ये अशाही काही चर्चा जर झाल्या आणि त्या सरकारसमोर मांडल्या, सरकार करेल, करू शकणार नाही हे मी सांगू शकणार नाही. पण कमीत कमी हे तरी झाली पाहिजे कारण तुम्हा प्रसारमाध्यमवाल्यांची अगदी सकाळी जाग आल्यापासूनच तक्रार असते. पण आमची तक्रार तरी सरकारने ऐकली पाहिजे. हे दोन मार्गी माध्यम जर आपल्या प्रमाणे असेल तर बदलाच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या दोन्ही बाजूंनी असलेल्या अपेक्षा आहेत आणि त्यांचा फायदा जनतेला झाला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाला, सत्तेला किंवा सत्तेमध्ये असलेल्या व्यक्तीला मिळता कामा नये. जो काही फायदा आहे तो जनतेला मिळाला पाहिजे, जो काही फायदा आहे तो भविष्य घडविण्याच्या  दिशेने गेला पाहिजे. उज्वल भविष्यासाठी, पाया रचण्यासाठी असला पाहिजे. जर आपण हे करू शकलो तर अशा संस्था, अशा संधींचा खूप उपयोग होतो अशा संधी खूप कमी असतात त्या संधींचा वापर आपण केला पाहिजे.

सध्याच्या काळात, विशेष करून प्रसारमाध्यम क्षेत्राशी संबंधित लोकांच्या, गेल्या काही दिवसात ज्या हत्येच्या बातम्या आल्या होत्या, त्या खरोखरच वेदनादायक आहेत. कोणत्याही व्यक्तीची हत्या अतिशय दुःखदायक असते. मात्र, प्रसारमाध्यम क्षेत्रातील व्यक्तींची हत्या होण्याचे कारण जर ते सत्य प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, हे असेल तर ही बाब जास्तच गंभीर मानावी लागेल. जेव्हा आमची मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती तेव्हा मी आग्रहाने हा विषय मांडला होता की,  आम्ही फक्त मुक्ततेचे पुरस्कर्ते आहोत, स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत, आपले सिद्धांत आपण मांडत असतो पण एवढे पुरेसे नाही. आपल्या सरकारांचे हे उत्तरदायित्व आहे की अशा लोकांशी जे काही चुकीचे वर्तन केले जाते त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे आणि ही बाब सरकारांच्या प्राधान्यक्रमाच्या बाबींमध्ये असली पाहिजे. नाहीतर सत्याला दडपून टाकण्याची ही दुसरी महाभयंकर पद्धत आहे. एखाद्या वेळी कोणी संतापाच्या भरात एखाद्या प्रसारमाध्यमावर टीका केली तर बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, नकारात्मक भाग आहे, असे म्हणून सर्व लोक माफ देखील करतील. पण जर कोणी हात उचलला, कोणाच्या शरीरावर घाव केले, तर हा स्वातंत्र्यावर झालेला सर्वात मोठा क्रूर जुलूम आहे. म्हणून या बाबतीत सरकारांनी देखील तितकेच संवेदनशील झाले पाहिजे, त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या बाबींना समजून घेतले पाहिजे, हे अतिशय आवश्यक आहे. आज आपल्या शेजारीपाजारी असलेल्या देशांमधील मान्यवर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. कारण एक प्रकारे आपण आज एका विस्तारलेल्या जगात आहोत ज्याच्या कोणत्याही सीमा नाहीत. परस्परांच्या समन्वयाने जितके प्रयत्न होतात, तितक्या प्रमाणात त्यांचा जास्त फायदा होतो.

नेपाळमधील भूकंपाच्या बातमीमुळे संपूर्ण भारताला नेपाळच्या मदतीसाठी धाव घ्यायला प्रेरित केले होते. मात्र, इतर कोणत्याही देशाची बातमी आली असती तर हो आहे एक बातमी असे वातावरण राहिले असते. कदाचित ज्या वेगाने नेपाळला मदत करण्यासाठी भारतामध्ये जी लगबग झाली ती कदाचित संपूर्ण समाजात इतर वेळी झाली नसती कारण कोणाला कळलेच नसते. पण जशी नेपाळची बातमी आली आणि भारताच्या प्रसारमाध्यमांनी नेपाळच्या जनतेच्या समस्या भारताच्या लोकांपर्यंत पोहोचवल्या संपूर्ण देशामध्ये नेपाळसाठी काही केले पाहिजे, अशी भावना निर्माण झाली होती. मानवतेचे एक मोठे काम झाले. म्हणजेच आज आपल्या सीमा राहिलेल्या नाहीत. अशा प्रकारे आपण एकमेकांना पूरक बनले पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे. यामुळे देखील या संपूर्ण भू-भागात सहकार्याचे वातावरण निर्माण होईल. अशा प्रकारे मिळून मिसळून कशाची पडताळणी करायची असेल तर ती पडताळणी अगदी सहजपणे होऊन जाते.

कधी कधी, प्रत्येक देशात प्रत्येक प्रतिनिधी तर असेलच असे नाही, पण संपर्क झाला तर त्यांच्याशी बोलता येते, विचारले जाते , चौकशी केली जाते की असे काही ऐकले आहे ते खरे आहे का, जरा सांगशील का. मग ते सांगतात अर्ध्या एक तासात सांगतो, मी बघून सांगतो, माझे दोन तीन स्रोत आहेत, त्यांना विचारतो. पण आपल्याला गरज आहे ती अशा प्रकारे आपला समन्वय जितका वाढेल आणि विशेष करून आपल्या शेजारी देशांसोबत ज्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण व्यवहार खूप जास्त आहेत, ते आपल्या सुखदुःखाचे सोबती आहेत, त्या सर्वांशी आपण मिळून-मिसळून राहिलो तर असे होऊ शकेल की या संपूर्ण भू-भागामध्ये आपल्याला एक सकारात्मक ओळख निर्माण करण्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल.

एक निकोप स्पर्धा समाजजीवनात अतिशय आवश्यक झालेली आहे आणि निकोप स्पर्धा एका उत्प्रेरकाच्या रूपात प्रसारमाध्यमांची खूप मोठी सेवा करू शकते. सध्याच्या काळात आपण पाहिले असेल इंडिया टुडेने तर खूप आधीपासून सुरू केले होते. त्यांनी राज्यांना मानांकन द्यायची सुरुवात केली होती, की कोणते राज्य कशा प्रकारे कामगिरी करत आहे. हळूहळू राज्यांसाठी एक मापदंड बनू लागला की चला आपणही काही गोष्टींमध्ये मागे आहोत आणि आपल्याला पुढे गेले पाहिजे, आपण काही तरी करुया.

हे एक सकारात्मक योगदान राहिले. यामुळे एका निकोप स्पर्धेचे वातावरण तयार झाले.

सध्याच्या काळात प्रसारमाध्यमांकडून जो त्यांच्या क्षेत्रातील विषय नाही त्या स्वच्छतेसाठी पुरस्कार दिले जात आहेत, स्वच्छतेच्या विषयाच्या संदर्भात लोकांना सन्मानित केले जात आहे, स्वच्छतेच्या विषयावर परीक्षक बनून विविध भागांची पाहणी केली जात आहे, हे सर्व प्रसारमाध्यमांकडून होत आहे. हे सरकारकडून होत नसून मला असे वाटते की हे जे वातावरण तयार झाले आहे ते भारताला नवी ताकद देऊ शकते. यामुळे एक स्पर्धात्मक वातावरण तयार होऊ लागले आहे. म्हणजे त्या राज्याने केले का, तर मग आम्ही हे करणार, या शहराने केले का, मग आम्हीही करणार, अशा प्रकारचे सकारात्मक वातावरण तयार होऊ लागले आहे.

स्वच्छतेच्या चळवळीमध्ये यांनी नक्कीच खूप मोठे योगदान दिले आहे. पण आपल्या समाज-जीवनातही चांगुलपणाची अजिबात कमतरता नाही आणि मी यापूर्वी देखील बोललो आहे आणि हे टीकेच्या स्वरूपात बोललेलो नाही. जीवनाच्या वस्तुस्थितीसंदर्भात बोललो आहे की जे टीव्हीच्या पडद्यावर जसा दिसतो तोच केवळ देश नाही आहे.त्याशिवायही देश खूप मोठा आहे, जे वर्तमानपत्राच्या पानांवर झळकत असतात तेच केवळ नेते नाहीत, ज्यांची नावे वर्तमानपत्रात येत नाहीत, ते सुद्धा वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले नेतृत्व करणारे लोक असतात आणि म्हणूनच या शक्तींना जगासमोर आणले आणि भारतासारख्या देशांमध्ये एक असे स्पर्धात्मक सकारात्मक वातावरण तयार करायला आपण बळ दिले तर समाजाला सुद्धा वाटते की चला आपणही काही तरी चांगले करुया,आपण चांगले करू शकतो.

मला खात्री आहे की आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आत्मपरीक्षण करण्याबरोबरच आणखी सशक्त बनण्यासाठी उपयुक्त ठरावा, मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी उपयोगी पडावा, भारताच्या भावी पिढीसाठी आपण एका अशा पायाला भक्कम करत जाऊ , जो भावी पिढीला मानवी मूल्यांच्या रक्षणाची सहज अनुभूती देऊ शकेल.म्हणूनच आजच्या साठी,आजच्या या प्रसंगी पुन्हा एकदा या क्षेत्राला समर्पित सर्व मान्यवरांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report

Media Coverage

Bad loans decline: Banks’ gross NPA ratio declines to 13-year low of 2.5% at September end, says RBI report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 डिसेंबर 2024
December 27, 2024

Citizens appreciate PM Modi's Vision: Crafting a Global Powerhouse Through Strategic Governance