A definite change is now visible in India, says PM Narendra Modi
Change in the economic and social content, represents the essence of the New Rules for the New India and the New Economy: PM
India, once mentioned among the ‘Fragile Five’ is now rapidly moving towards becoming a “Five Trillion Dollar” economy: PM
India is playing a key role in the entire world’s growth, the country’s share of the world GDP has risen from 2.4% in 2013, to 3.1% in 2017: PM
A new approach and a new work culture has developed in India: PM Narendra Modi
Speed + Scale + Sensitivity = Success: PM Narendra Modi
Unprecedented investment is being made today in infrastructure, agriculture, technology, health sector, and education sector: PM
  • इकॉनॉमिक टाइम्स जागतिक  व्यापार परिषदेत येथे देश विदेशातून आलेले पाहुणे, उपस्थित सर्व महानुभाव,

    देवी आणि सज्जनहो !

    नवीन इंडियाच्या  या संकल्पाच्या  कालखंडात ‘नवीन अर्थव्यवस्था – नवीन नियम’  या विषयावर मंथन करायला आपण सर्व एकत्र आलो आहोत. प्रश्न हा आहे कि यात नवीन काय आहे ?

    इकॉनॉमिक टाइम्स रोजच छापण्यात येतो पेपरचा दर्जा, प्रिंटिंगचा दर्जा  रोज तसाच असतो. बॅनरवर आपण जे वृत्तपत्रांचे नाव लिहिता त्याचा फॉन्ट आणि स्टाईल पण सारखीच असते तरीही आम्ही म्हणतो की, रोज नवीन वृत्तपत्र छापण्यात येत. न्यूजपेपर मध्ये छापण्यात येणारी माहिती रोज वेगळी असते हा फरक असून या आधारावरच लोक म्हणतात ताजी खबर आहे नवीन खबर आहे.

    मित्रांनो,

    पुढील काही महिन्यात आमचे सरकार चार वर्ष पूर्ण करत आहे. देश तोच, लोक तेच, लोकशाही तीच तरीही, एक स्पष्ट बदल देश विदेशात आढळून येत आहे. देशातील आर्थिक आणि सामाजिक  माहितीमध्ये  आलेल्या या फरकात नवीन भारताचे, नवीन अर्थव्यवस्था आणि नवीन कायदे समाविष्ट आहेत.

    आपल्याला आठवत असेल, चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात जेंव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेची चर्चा व्हायची  तेंव्हा म्हटले जायचे की भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती आहे. तेंव्हा लोक आम्हाला हसायचे आणि डोळे वर करून म्हणायचे कि हा देश स्वत: डुबेल आणि आम्हालाही डुबवेल. आज फ्राजील फाईव्ह ची नाही तर भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टाची चर्चा  होत आहे. आता जग भारताबरोबर खांद्याला खांदा लावून चालण्याला उत्सुक आहे.

    मित्रांनो,

    भारताचा विकास पूर्ण जगाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहे.

    • मागील तीन-चार वर्षात भारताने आपल्या बरोबर पूर्ण जगाच्या आर्थिक वृद्धीला मजबुती दिली आहे.
    • जागतिक जीडीपी च्या अनुषंगाने आपण जर सांकेतिक दृष्टीकोनातून बघितले तर खूपच अद्दभूत तथ्य समोर येतात. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या  आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षात, जागतिक सकल घरेलू उत्पन्नात भारताच्या वाट्यात 2013 च्या 2.4 टक्क्यांवरुन 2017 मध्ये 3.1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
    • जगाच्या अर्थव्यवस्थेतील सहभागासाठी  भारताला  आठ वर्ष लागलीत, जी आमच्या सरकारने फक्त चार वर्षात करून दाखविले. यापेक्षाही जास्त चकित करणारे तथ्य आईएमएफच्या  सांख्यिकी मधून बाहेर येतात. जागतिक अर्थव्यवस्थेत मागील चार वर्षात जी वृद्धी झाली, त्यातील 21 टक्के वृद्धी भारताने केलेल्या वृद्धीमुळे झाली आहे.
    • आता आपण अनुमान लावू शकता की एक देश जो जगाच्या जिडीपीच्या केवळ 3 टक्के हिस्सा आहे त्याने ७ पटीने जास्त  जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये सहभाग दिला आहे.

     

    आज आपण कुठलेही मॅक्रो – इकॉनॉमिक पॅरामीटर बघा, मग ते चलनवाढ, चालू लेखा तूट, चालू आर्थिक तूट असो किंवा, जिडीपी वृद्धी , व्याज दार, एफडीआई अंतस्त्रोत असू दे भारत सर्व दूर चांगली कामगिरी  करत आहे.

    • देशाची चालू लेखा तूट जी 4 टक्क्यांच्या धोकादायक पातळीवर होती ती, आमच्या सरकारने पहिल्या तीन साडे तीन वर्षात कमी करून 1 टक्क्यांपर्यंत आणली.
    • आधीच्या सरकारच्या वेळी चालू तूट 4.5 टक्क्याच्या जवळ पास होती ती आमच्या सरकारने 3.5 टक्क्यांपर्यंत आणली.
    • आमच्या सरकारच्या साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात जवळपास 209 बिलियन डॉलर सकल  थेट प्रत्यक्ष गुंतवणूक मिळाली जी आधीच्या सरकारच्या कालावधीत  फक्त 117 बिलियन  गुंतवणूक भारतात  आली होती .
    • आज देशाचा राखीव विदेशी विनिमय जवळपास 300 बिलियन डॉलर वाढून 419 बिलियन डॉलर वर पोहचला, जेंव्हा की, 2013 च्या आर्थिक संकटादरम्यान विशेष विदेशी चलन गैर निवासी भारतीयांद्वारे  करण्यात आलेली जमा म्हणजे एफसीएनआरच्या जवळपास 24 बिलियन डॉलरची देय रक्कमेची भारताने परतफेड केली आहे
    • चालू आर्थिक तूट नियंत्रित राखल्यामुळे आणि उच्च उत्पादन वृद्धीमुळे रुपयाचा  दर्जा व्यवस्थित राखण्यात आला आहे. व्याज दारात  एक टक्क्यांपेक्षा जास्त  कमतरतेचा लाभ ग्राहकांना, गृह क्षेत्र किंवा इतर उद्योगांना होत आहे.

 

प्रत्येक वर्षी आमच्या सरकारला स्थूल आर्थिक निर्देशांकाना सुधारण्यात यश आले आहे. पण काय हे जुन्या चाली रीतींमध्ये शक्य होतं?  नाही .. जुन्या संकल्पनांना धरून हे शक्य नव्हते.

देशात हा बदल या साठी आला कि देशाने एक नवीन कार्य संस्कृती अवलंबिली आहे आणि आपले सामर्थ्य, आपल्या संसाधनांवर विश्वास ठेऊन नवीन भारताच्या संकल्पनेसह भारत पुढे जात आहे.

मागील तीन वर्षात देशाच्या आर्थिक जगताने एक नवीन गोष्ट शिकली आहे. आणि ती म्हणजे स्पर्धा.

जेंव्हा पुढे जाण्याची जिद्द नसेल, सुदृढ स्पर्धा नसेल तर वेग येणार नाही आणि आपण नव्या उंचीवर जाऊन विचार करू शकणार नाही

मित्रांनो,  आज भारताच्या या स्पर्धेला पूर्ण जग मुल्यांकित करत आहे. सॅल्यूट देत आहे.

  • जागतिक गुंतवणूक अहवालानुसार, भारत जगाच्या विशेष थेट प्रत्यक्ष गुंतवणूक स्थळांपैकी एक आहे.
  • भारत हा जगातील तीन मोठ्या शीर्ष अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.
  • विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या विश्वास निर्देशांकात भारत जगातील सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या दोन देशांपैकी एक आहे.
  • जागतिक बँकेच्या व्यापारातील सुलभता क्षेत्रात फक्त तीन वर्षांत आम्ही 42 अंकांची सुधारणा केली आहे. आज आम्ही 142 क्रमांकावरून 100 क्रमांकावर पोहोचलो आहोत, तर पत मानांकन संस्थासुद्धा भारताला अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
  • भारत जगातील खुल्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे.

 

मित्रांनो, जेव्हा मी याआधी आपल्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो, तेव्हा जीएसटी फक्त एक संभावना होती. आज जीएसटी ही वास्तवता आहे. स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठया कर सुधारणा लागु होण्यालासुद्धा आता सात महिने पूर्ण होत आहेत. जीएसटीने देशाला एक सर्वोत्तम कर प्रणाली बहाल केली असून, उत्कृष्ट महसूल पद्धती दिली आहे. या प्रणालीने मालाच्या वेगवान दळणवळणाला प्रोत्साहन दिले असून, वाहतूक मूल्य कमी केले असून, निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, असे वातावरण तयार केले आहे.

  • बंधु आणि भगिनींनो आमच्या देशात 70 वर्षाच्या अप्रत्यक्ष कर पद्धतीव्यतिरिक्त जवळपास 60 लाख व्यापारी असे होते, जे अप्रत्यक्ष कर क्षेत्रामध्ये समाविष्ट होते.
  • जीएसटीने फक्त सात महिन्यात 44 लाखांपेक्षा जास्त नवीन लोकांना अप्रत्यक्ष करपद्धतीमध्ये समाविष्ट होण्याची संधी दिली आहे.
  • यामुळे देशात प्रामाणिक व्यापारी संस्कृतीला पाठींबा मिळाला असून, टॅक्सनेटच्या विस्तारामुळे प्रामाणिक करदात्यांना कमी कर हा एक पुरस्कार मिळाला आहे.

मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच आहे की, आमच्या सरकारला ट्विन बॅलन्स शीटचा वारसा कसा मिळाला? तुम्हाला आधीच्या बँकांची कार्यप्रणाली अवगत आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की, भांडवलवादातील हस्तक्षेप आपल्या अर्थव्यवस्थेत व्यापक वातावरणात कशापद्धतीने प्रवेश करता झाला. याला सुधारण्यासाठी नादारी आणि दिवाळखोरी कोड अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावरची सुधारणा आम्ही केली.

आज देशात 2000 पेक्षा जास्त नादारी व्यवसायिक आणि 62 दिवाळखोरी संस्था निरंतर 24 तास या समस्येला दूर करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. फक्त तीन महिन्यात आमच्या सरकारने 2700 पेक्षा जास्त तक्रारींचा निपटारा केला आहे.

निर्यात हा असाच एक आव्हानात्मक विषय होता. 2015-16च्या आयात-निर्यातीच्या सांख्यिकीचे निरीक्षण केले तर, लक्षात येईल की, दोन्ही क्षेत्रात जवळपास 15 टक्के घट झाली आहे. ही घट का झाली यावर अनेकांचे अनेक अभिप्राय आहेत. अशी एक संभावना आहे, ज्यावर अर्थ नीति तज्ञांनी मंथन करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, 2014 ला सरकार निवडून आल्यानंतर काळ्यापैशांच्या विरोधातील आमचा निर्णय हा एक मोठा निर्णय होता. एसआयटीची स्थापना करण्यात येऊन त्यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आयात-निर्यातीत चलन प्रत हा गंभीर विषय आहे. सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्तीची पावले उचललीत. आता हा अर्थतज्ञांसाठी अभ्यासाचा विषय झाला आहे की, व्यापार तुटीविना मोठ्या प्रमाणावर बदल कसे घडून आलेत, असे काय झाले की आयात-निर्यातीत एकाच प्रकारची घट बघायला मिळत होती. यामागे चलन प्रत हे कारण होते की मुळ प्रतीत सुधारणा करणे हे होते, हे तपासायला हवे.

विनीत जी, तुम्ही उद्या हे नका छापू की निर्यातीत घट झाल्याबद्दल मोदींनी सफाई दिली. मी एक दृष्टीकोन तुमच्या समोर ठेवतो आहे, निर्यातीत झालेल्या घटीवर तुम्हा सगळ्यांना विचार करायचा आहे. काही कलावधीनंतर आता निर्यातीत सुधारणा झाली आहे.

मित्रांनो, दुर्मुखलेल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवतो, तेव्हा एका विशिष्ट तपमानानंतर बाष्प जमायला सुरुवात होते. या तपमानावर पोहोचण्याच्या आधी ना पाणी उकळत, नाही वाफ तयार होते. याच प्रकारे सरकारांच्या प्राथमिकता लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु यासाठी यानंतर वेग, संवेदना आणि शिस्त आवश्यक आहे.

जेव्हा हा वेग, संवेदना आणि शिस्त यानुसार कामे होतात, तेव्हा यशस्वीता आपोआप दाराशी येते. आमच्या सरकारने अटकणारी-भटकणारी आणि लटकणारी संस्कृती बंद केली असून, यामुळे संपूर्ण पद्धतीत एक नवीन वेग आला आहे.

  • आधीच्या सरकारने ज्या वेगाने रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण केले त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही हे रुपांतरण करीत आहोत.
  • आधीच्या सरकारने ज्या वेगाने गावात रस्ते बांधण्याचे तसेच राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचे काम केले, त्याच्या दुप्पट वेगाने आज कामे होत आहेत.
  • आधीच्या सरकारने ज्या वेगाने विद्युत निर्मिती क्षमता जोडली, त्याच्या कितीतरी पट जास्त वेगाने आम्ही काम करीत आहोत.
  • आधीच्या सरकारने तीन वर्षाच्या मेहनतीनंतर फक्त 59 गावांमध्ये ऑप्टीकल फायबर जोडणी केली, जेव्हा आमच्या सरकारने तीन वर्षात 1 लाख 10 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबरने जोडले आहे.
  • अप्रत्यक्ष लाभ हस्तांतरणांतर्गत पहिले फक्त 28 योजनांचे पैसे बँकेत प्रत्यक्षरीत्या हस्तांतरीत केले जायचे आता 400 पेक्षा जास्त योजना डीबीटीने जोडल्या आहेत.
  • तुम्ही विचार करा एका छोट्या एलईडी बल्बचे मूल्य साडेतीनशे पेक्षा जास्त होते, ते आता 40-50 रुपयांपर्यंत आणले गेले आहे. जगातील कित्येक देशांमध्ये आजही हा एलईडी बल्ब तीन डॉलरमध्ये मिळतो. पण आमच्या सरकारने एक डॉलरपेक्षाही कमी किंमत या बल्बची ठेवली आहे.
  • 2014 च्या पहिले आमच्या देशात फक्त तीन मोबाईल निर्मिती कंपन्या अस्तित्वात होत्या. आता ही संख्या वाढून जवळपास 120 कंपन्या कार्यरत आहेत. याचा परिणाम असा की, एका वर्षात म्हणजे 2014-15 मध्ये देशात 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मोबाईलची आयात होत होती. त्यात घट होऊन आता अर्ध्यावर आली आहे.

काय हे परिवर्तन असेच आले? हा बदलही असाच मिळाला?  यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची आवश्यकता असते, जी आमच्या सरकारने दाखवली आणि हेच नवीन अर्थव्यवस्थेचे नवीन नियम आहेत.

बंधू भगिनींनो, 2014 मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही किमान संसाधननांचा वापर यावर आधारीत विकास धोरणे आणि या धोरणांवर आधारीत अंदाज पत्रकावर भर दिला आहे.

  • आज देशात पायाभूत, कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमध्ये जितकी गुंतवणूक करण्यात येत आहे, तेवढी यापूर्वी कधीही करण्यात आलेली नाही.
  • देशात सर्वप्रथम नागरी उड्डाण धोरण बनले आहे. ज्या डिफेन्स क्षेत्रात कोणीही अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबद्दल विचार करु शकत नव्हते, आमच्या सरकारने गुंतवणुकीच्या नव्या संभाव्यता डिफेन्स क्षेत्रात आणल्या.
  • आमचे सरकार देशाच्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राला 21 व्या शतकांच्या आवश्यकतेनुसार तयार राहण्यासाठी एकीकृत करत आहेत.

ही सारी गुंतवणूक, सरकारच्या योजना अनेक रोजगारांच्या संधी घेऊन येत आहेत. मागील 4 वर्षात आमच्या सरकारने जॉब सेंट्रीक बरोबर पिपल्स सेंट्रीक ग्रोथवर भर दिला आहे. एक अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये देशातील गरीबांसाठी वित्तीय आंतर्भुतता असायला हवी आणि जी मध्यम वर्गीय लोकांच्या इच्छेवरही लक्ष देईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मित्रांनो, आमच्या सरकारचा एकच नारा सबका साथ सबका विकास. सगळ्यांच्या सूचना आणि अनुभवांना गाठीशी धरुन पुढे जाणे हे आम्ही ठरविले आहे.

पहिल्या दिवसापासून आमचे प्रयत्न राहिले आहेत की, प्रशासकीय पद्धतीमध्ये समग्र समावेशकता यायला हवी, मी स्वत: बरेचदा शेतकरी, तरुण, विद्यार्थी, तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करीत असतो. आम्ही अशी व्यवस्था बनवली आहे, ज्यामध्ये लोकांचा फिडबॅक आम्हाला सरळ मिळतो. तक्रार निवारणासाठी आमच्या सरकारने खुप प्रयास केले आहेत.

मित्रांनो, बऱ्याच वेळेला सैद्धांतीक उपाय विनाचुक लक्षात येतात, परंतु काही वेळा प्रत्यक्ष समस्या या मुळ रुप धारण करतात, त्यांना अशा वेळेला समजू शकतो, जेव्हा सरकार संवेदनशीलतेसह अनेक बारीक सारीक गोष्टींचीही विचार करते.

जसे अलिकडेच बांबू वनस्पतीबाबत घेण्यात आलेले निर्णय, 100 टक्के युरियाचे निमकोटींग, ग्रुप सी आणि ग्रुप डी यांच्या नोकर भरतीच्या मुलाखती पद्धतीचा खातमा, गॅझेटेड ऑफिसरकडून साक्षांकन करण्याच्या पद्धतीला पूर्णविराम. हे संपूर्ण निर्णय आधीपण घेता येऊ शकत होते, परंतु त्यांच्यामध्ये संवेदनशीलतेची कमी होती. जनतेच्या संलग्नतेत असलेल्या कमतरतेमुळे हे होऊ दिले नाही.

मित्रांनो, आमच्याकडे आरोग्य क्षेत्र हे असे क्षेत्र आहे, जे निकोपतेपासून दूर राहिले आहे. आरोग्याशी निगडीत योजना पूर्वीही होत्या, परंतु आता चांगल्या, आरोग्य काळजीवाहू योजनांसह चांगल्या आरोग्याची हमी सुद्धा आहे.

  • मिशन इंद्रधनुष्यामुळे देशात लसीकरणाचा विस्तार झाला असून, हा वेग सात पटीने वाढला आहे.
  • तीन हजारापेक्षा जास्त जन औषधी दुकानांवर 800 पेक्षा जास्त औषधे कमी किंमतीत पुरवण्यात येत आहेत. आमच्या सरकारने स्टेंटच्या किंमती 800 टक्क्यांनी कमी केल्या असून, गुडघा रोपणाच्या किंमतीला नियंत्रित करण्यात आले आहे. डायबिटीसचे जवळपास अडीच लाख रुग्णांना 20 ते 25 लाख सेशन्स विनामुल्य देण्यात येत आहेत.
  • या अर्थसंकल्पात आम्ही देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांना फायदेशीर असणारी हेल्थ इन्शुरन्स स्कीम अर्थात आरोग्य विमा योजना ‘आयुष्यमान भारत’ची ओळख करुन दिली आहे. याअंतर्गत, गरीब कुटुंबांना गंभीर आजारात उपचारांसाठी वर्षभरात पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.

मित्रांनो, डिजिटल इंडिया मिशनचा आधार आमच्या समाजाला डिजिटली प्रोत्साहित समाजात बदलणे हा आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था ज्ञानाधारीत करण्यावर आमचा भर आहे. 100 कोटी बँक अकाऊंट्स, 100 कोटी आधारकार्ड, 100 कोटी मोबाईल फोन, हे अशी एक इको सिस्टीम बनवेल, ज्यामुळे पुर्ण जग वेगळ्या प्रकाराने दिसेल.

मित्रांनो, एमएसएमई हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, या क्षेत्राला मजबूत करण्यासाठी आम्ही निरंतर काम करीत आहेत. जास्तीत जास्त लघु उद्योगांना औपचारिक क्षेत्रात आणण्यासाठी उच्च कर्ज पाठिंबा भांडवल आणि व्याज अनुदान तसेच नाविन्यतेवर जोर देण्यात येत आहे.

यामध्ये वित्तीय तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. एमएसएमई क्षेत्राला वित्तीय अंतर्भूतता मिळावी, या क्षेत्राचा विकास आणि वेगासाठी वित्तीय तंत्रज्ञानाच्या उपयोगाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मित्रांनो, मी यापूर्वी या कार्यक्रमात जेव्हा आलो होतो, तेव्हा सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी ऊर्जा, सर्वांसाठी स्वच्छ स्वयंपाक गॅस, सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी विमा या गोष्टी सांगितल्या होत्या.

  • या तीन वर्षात गरीब आणि मध्यम वर्गासाठी जवळपास एक कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे.
  • 4 कोटी घरांमध्ये वीज पोहोचण्यासाठी सौभाग्य योजनेची सुरुवात झाली आहे.
  • फक्त 90 पैसे प्रति दिन आणि 1 रुपया महिना हप्ता असलेल्या योजनेवर आमच्या सरकारने 18 कोटीपेक्षा जास्त गरीबांना सुरक्षा कवच दिले आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून गरीबांना आता 2 हजार कोटीपेक्षा जास्त दाव्याची रक्कम देण्यात आली आहे.

मित्रांनो, आमच्या सरकारच्या निती, निर्णय, नियम या सर्वांचे एकच उद्दिष्ट असते. देशाचा विकास, देशातील गरीबांचा विकास. सबका साथ सबका विकास या मंत्रासह चालतांना आम्ही गरीबांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.

  • मागील तीन वर्षात जनधन योजनेच्या अंतर्गत, देशात 31 कोटी पेक्षा जास्त गरीबांचे बँक अकाऊंट उघडण्यात आले आहे. केवळ बँक लेखे उघडण्यात आले असे नाही, तर यामध्ये जवळपास 75 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.
  • या दरम्यान सरकारने 6 कोटी पेक्षा जास्त शौचालय निर्माण केले. ग्रामीण स्वच्छतेबाबत 2014च्या जवळपास 40 टक्के वाढ होऊन 78 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
  • सरकारने मुद्रा योजनेअंतर्गत 11 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. याअंतर्गत साडेचार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राशी विना बँक गॅरंटी देशातील तरुणांना, महिलांना देण्यात आली आहे. यामुळे देशाला जवळपास 3 कोटी नवीन उद्योजक मिळाले आहेत.
  • आतापर्यंत 11 कोटीपेक्षा जास्त सॉईल हेल्थ कार्ड वाटण्यात आले असून, 20 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिन स्थुल सिंचनांतर्गत आणण्यात आली आहे.

मित्रांनो, यावर्षी अर्थसंकल्पात नवीन अर्थव्यवस्थेशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला. अधिसूचीत उत्पादनांसाठी न्यूनतम समर्थन मूल्य म्हणजेच एमएसपी, ज्याचे लागत मूल्य कमीत कमी अडीच पटीने जास्त घोषित करण्यात आले. या लागत मूल्याद्वारे शेतकऱ्यांद्वारा घेण्यात आलेल्या दुसऱ्या श्रमिकांच्या परिश्रमाचे मूल्य, आपल्या यंत्र सामुग्रीच्या भाड्यांची राशी, मशिनचा खर्च, बियाणांचे मूल्य, सर्व प्रकारच्या खतांचे मूल्य, सिंचनावर करण्यात आलेला खर्च, राज्य सरकारांना दिला गेलेला जमिन महसूल, खेळत्या भांडवलावर देण्यात आलेले व्याज, पट्‌ट्यावर घेण्यात आलेल्या जमिनीसाठी देण्यात आलेले भाडे आणि अन्य खर्च समाविष्ट आहे. एवढच नाही, तर शेतकऱ्यांद्वारे स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबियांद्वारे देण्यात आलेल्या श्रमाचे मूल्य उत्पादन मूल्यामध्ये जोडण्यात आले आहे.

देशातील परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी जोडणारे हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. जेव्हा की, काही अर्थतज्ञ मूल्यवर्धनाचा संकेत देत आहेत.

मित्रांनो, अशा अर्थशास्त्रज्ञांना हा पण विचार करायला हवा की, आमचे अन्नदाता, आमचे शेतकरी यांच्या प्रती आमच्या जबाबदाऱ्या काय असायला हव्या? मला असे वाटते की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचे आम्ही समर्थन केले पाहिजे. सरकारने या प्रयत्नांना उत्पन्न स्रोतासाठी चिन्हीत करावे, ज्यामुळे आपला वाटा र्नि:संकोचपणे वाढला जाईल.

मित्रांनो, मागील तीन वर्षात प्रामाणिकपणाने संस्थांत्मक कार्य केले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व व्यवस्थांना पारदर्शी बनविण्यात येत आहे. गळतीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

  • डीबेटच्या माध्यमातून सरकारने 57 हजार कोटी रुपये जास्त चुकीच्या लोकांच्या हातात जाण्यापासून बचावले आहेत.
  • 2 लाख पेक्षा जास्त संदिग्ध कंपन्यांची नोंदणी रद्द करुन या कंपन्यांच्या संचालकांचे लेख बंद करण्यात आले आहे. तसेच यांचे कुठल्याही अन्य कंपनीचे संचालक बनण्याच्या सर्व प्रयत्नांवर रोख ठेवण्यात आली आहे.

मी यावेळी देशातील उद्योग जगतातील, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना, प्रत्येक व्यावसायिकाला आग्रहाने सांगू इच्छितो की, देशाची वर्तमान आवश्यकता काय आहे, भविष्यातील गरजा काय आहेत, याचा विचार करुन भविष्यात वागण्याचा प्रयत्न करा.

मी अशीही विनंती करु इच्छितो की, विभिन्न वित्तीय संस्थांमधील नियम आणि तत्व यांचा राखरखाव करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांनी पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य निभवावे.

मी असे स्पष्ट करु इच्छितो की, हे सरकार आर्थिक विषयाशी संबंधित अनियमिततेविरुद्ध कडक कारवाई करेल. जनतेच्या पैशांचा अनियमित वापर, या पद्धतीला स्वीकार होणार नाही. हाच नवीन अर्थव्यवस्थेच्या नवीन नियमांचा मूलमंत्र आहे.

मित्रांनो, इथे नवीन अर्थव्यवस्थेसंदर्भात चर्चा होत आहे. मी येथे चालणाऱ्या वेगवेगळ्या सत्रांबाबत माहिती मिळवली. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की, देशाच्या अर्थ व्यवस्थेशी संबंधित हा मुद्दा असून, मला असे वाटते की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकदम घेतल्यास देशावर सकारात्मक आर्थिक प्रभाव पडेल. या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

हा विषय फक्त भारतापर्यंत मर्यादित नाही, विदेशी कंपन्यासुद्धा यामुळेच प्रभावित होतात. यामुळेच गुंतवणुकही प्रभावित होते. खुपशा देशांचा निवडणुकीचा वेळ, महिना आणि दिवस ठरविलेला असतो. त्या देशांच्या औद्योगिक विकासावर याचा काय परिणाम होतो, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे.

भारताचा आर्थिक विकास, भारताचा गुड गव्हर्नरसाठीचे निरंतर प्रयत्न, भारतातील वैश्विक मापदंड मिळवण्यासाठी आयोजिलेले कार्यक्रम आणि निती, जगाच्या बरोबर आर्थिक आणि व्यापारी भागिदारी संबंधातील व्यापक सहमतीसाठी आवश्यक असलेले प्रयत्न, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीनीकरण केंद्रांमध्ये शाश्वत विकासासाठी देण्यात येणारी प्राथमिकता या सर्व गोष्टी संपूर्ण जग आज समजून घेत आहे आणि यामुळेच भारताकडे आकर्षित होत आहेत.

आधुनिक गुंतवणूक, नवीन जागतिक परिदृश्यात भारत फ्रंटलाईन फोर्स होऊ शकतो. तंत्रज्ञान, नुतनीकरण या प्रकरणांमध्ये जगाचे नेतृत्व करु शकतो.

आमच्या जवळ असे सामर्थ्य आहे, असे संसाधन आहे की, आम्ही न्यू इंडियाचे स्वप्न खरे करुन दाखवू शकू. आमचा विकास केवळ आमचा न राहता तो पूर्ण जगासाठी समृद्धी घेऊन येईल.

चला, आपल्या समक्ष उपस्थित प्रत्येक आव्हानांना संधीमध्ये बदलून आम्ही न्यू इंडियाची निर्मिती करु आणि आपल्या संकल्पांना सिद्ध करु.

पुन्हा एकदा सर्वांना या आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद.

सर्वांना खुप खुप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Modi blends diplomacy with India’s cultural showcase

Media Coverage

Modi blends diplomacy with India’s cultural showcase
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text Of Prime Minister Narendra Modi addresses BJP Karyakartas at Party Headquarters
November 23, 2024
Today, Maharashtra has witnessed the triumph of development, good governance, and genuine social justice: PM Modi to BJP Karyakartas
The people of Maharashtra have given the BJP many more seats than the Congress and its allies combined, says PM Modi at BJP HQ
Maharashtra has broken all records. It is the biggest win for any party or pre-poll alliance in the last 50 years, says PM Modi
‘Ek Hain Toh Safe Hain’ has become the 'maha-mantra' of the country, says PM Modi while addressing the BJP Karyakartas at party HQ
Maharashtra has become sixth state in the country that has given mandate to BJP for third consecutive time: PM Modi

जो लोग महाराष्ट्र से परिचित होंगे, उन्हें पता होगा, तो वहां पर जब जय भवानी कहते हैं तो जय शिवाजी का बुलंद नारा लगता है।

जय भवानी...जय भवानी...जय भवानी...जय भवानी...

आज हम यहां पर एक और ऐतिहासिक महाविजय का उत्सव मनाने के लिए इकट्ठा हुए हैं। आज महाराष्ट्र में विकासवाद की जीत हुई है। महाराष्ट्र में सुशासन की जीत हुई है। महाराष्ट्र में सच्चे सामाजिक न्याय की विजय हुई है। और साथियों, आज महाराष्ट्र में झूठ, छल, फरेब बुरी तरह हारा है, विभाजनकारी ताकतें हारी हैं। आज नेगेटिव पॉलिटिक्स की हार हुई है। आज परिवारवाद की हार हुई है। आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मज़बूत किया है। मैं देशभर के भाजपा के, NDA के सभी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई देता हूं, उन सबका अभिनंदन करता हूं। मैं श्री एकनाथ शिंदे जी, मेरे परम मित्र देवेंद्र फडणवीस जी, भाई अजित पवार जी, उन सबकी की भी भूरि-भूरि प्रशंसा करता हूं।

साथियों,

आज देश के अनेक राज्यों में उपचुनाव के भी नतीजे आए हैं। नड्डा जी ने विस्तार से बताया है, इसलिए मैं विस्तार में नहीं जा रहा हूं। लोकसभा की भी हमारी एक सीट और बढ़ गई है। यूपी, उत्तराखंड और राजस्थान ने भाजपा को जमकर समर्थन दिया है। असम के लोगों ने भाजपा पर फिर एक बार भरोसा जताया है। मध्य प्रदेश में भी हमें सफलता मिली है। बिहार में भी एनडीए का समर्थन बढ़ा है। ये दिखाता है कि देश अब सिर्फ और सिर्फ विकास चाहता है। मैं महाराष्ट्र के मतदाताओं का, हमारे युवाओं का, विशेषकर माताओं-बहनों का, किसान भाई-बहनों का, देश की जनता का आदरपूर्वक नमन करता हूं।

साथियों,

मैं झारखंड की जनता को भी नमन करता हूं। झारखंड के तेज विकास के लिए हम अब और ज्यादा मेहनत से काम करेंगे। और इसमें भाजपा का एक-एक कार्यकर्ता अपना हर प्रयास करेगा।

साथियों,

छत्रपति शिवाजी महाराजांच्या // महाराष्ट्राने // आज दाखवून दिले// तुष्टीकरणाचा सामना // कसा करायच। छत्रपति शिवाजी महाराज, शाहुजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाला साहेब ठाकरे, ऐसे महान व्यक्तित्वों की धरती ने इस बार पुराने सारे रिकॉर्ड तोड़ दिए। और साथियों, बीते 50 साल में किसी भी पार्टी या किसी प्री-पोल अलायंस के लिए ये सबसे बड़ी जीत है। और एक महत्वपूर्ण बात मैं बताता हूं। ये लगातार तीसरी बार है, जब भाजपा के नेतृत्व में किसी गठबंधन को लगातार महाराष्ट्र ने आशीर्वाद दिए हैं, विजयी बनाया है। और ये लगातार तीसरी बार है, जब भाजपा महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है।

साथियों,

ये निश्चित रूप से ऐतिहासिक है। ये भाजपा के गवर्नंस मॉडल पर मुहर है। अकेले भाजपा को ही, कांग्रेस और उसके सभी सहयोगियों से कहीं अधिक सीटें महाराष्ट्र के लोगों ने दी हैं। ये दिखाता है कि जब सुशासन की बात आती है, तो देश सिर्फ और सिर्फ भाजपा पर और NDA पर ही भरोसा करता है। साथियों, एक और बात है जो आपको और खुश कर देगी। महाराष्ट्र देश का छठा राज्य है, जिसने भाजपा को लगातार 3 बार जनादेश दिया है। इससे पहले गोवा, गुजरात, छत्तीसगढ़, हरियाणा, और मध्य प्रदेश में हम लगातार तीन बार जीत चुके हैं। बिहार में भी NDA को 3 बार से ज्यादा बार लगातार जनादेश मिला है। और 60 साल के बाद आपने मुझे तीसरी बार मौका दिया, ये तो है ही। ये जनता का हमारे सुशासन के मॉडल पर विश्वास है औऱ इस विश्वास को बनाए रखने में हम कोई कोर कसर बाकी नहीं रखेंगे।

साथियों,

मैं आज महाराष्ट्र की जनता-जनार्दन का विशेष अभिनंदन करना चाहता हूं। लगातार तीसरी बार स्थिरता को चुनना ये महाराष्ट्र के लोगों की सूझबूझ को दिखाता है। हां, बीच में जैसा अभी नड्डा जी ने विस्तार से कहा था, कुछ लोगों ने धोखा करके अस्थिरता पैदा करने की कोशिश की, लेकिन महाराष्ट्र ने उनको नकार दिया है। और उस पाप की सजा मौका मिलते ही दे दी है। महाराष्ट्र इस देश के लिए एक तरह से बहुत महत्वपूर्ण ग्रोथ इंजन है, इसलिए महाराष्ट्र के लोगों ने जो जनादेश दिया है, वो विकसित भारत के लिए बहुत बड़ा आधार बनेगा, वो विकसित भारत के संकल्प की सिद्धि का आधार बनेगा।



साथियों,

हरियाणा के बाद महाराष्ट्र के चुनाव का भी सबसे बड़ा संदेश है- एकजुटता। एक हैं, तो सेफ हैं- ये आज देश का महामंत्र बन चुका है। कांग्रेस और उसके ecosystem ने सोचा था कि संविधान के नाम पर झूठ बोलकर, आरक्षण के नाम पर झूठ बोलकर, SC/ST/OBC को छोटे-छोटे समूहों में बांट देंगे। वो सोच रहे थे बिखर जाएंगे। कांग्रेस और उसके साथियों की इस साजिश को महाराष्ट्र ने सिरे से खारिज कर दिया है। महाराष्ट्र ने डंके की चोट पर कहा है- एक हैं, तो सेफ हैं। एक हैं तो सेफ हैं के भाव ने जाति, धर्म, भाषा और क्षेत्र के नाम पर लड़ाने वालों को सबक सिखाया है, सजा की है। आदिवासी भाई-बहनों ने भी भाजपा-NDA को वोट दिया, ओबीसी भाई-बहनों ने भी भाजपा-NDA को वोट दिया, मेरे दलित भाई-बहनों ने भी भाजपा-NDA को वोट दिया, समाज के हर वर्ग ने भाजपा-NDA को वोट दिया। ये कांग्रेस और इंडी-गठबंधन के उस पूरे इकोसिस्टम की सोच पर करारा प्रहार है, जो समाज को बांटने का एजेंडा चला रहे थे।

साथियों,

महाराष्ट्र ने NDA को इसलिए भी प्रचंड जनादेश दिया है, क्योंकि हम विकास और विरासत, दोनों को साथ लेकर चलते हैं। महाराष्ट्र की धरती पर इतनी विभूतियां जन्मी हैं। बीजेपी और मेरे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य पुरुष हैं। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज हमारी प्रेरणा हैं। हमने हमेशा बाबा साहब आंबेडकर, महात्मा फुले-सावित्री बाई फुले, इनके सामाजिक न्याय के विचार को माना है। यही हमारे आचार में है, यही हमारे व्यवहार में है।

साथियों,

लोगों ने मराठी भाषा के प्रति भी हमारा प्रेम देखा है। कांग्रेस को वर्षों तक मराठी भाषा की सेवा का मौका मिला, लेकिन इन लोगों ने इसके लिए कुछ नहीं किया। हमारी सरकार ने मराठी को Classical Language का दर्जा दिया। मातृ भाषा का सम्मान, संस्कृतियों का सम्मान और इतिहास का सम्मान हमारे संस्कार में है, हमारे स्वभाव में है। और मैं तो हमेशा कहता हूं, मातृभाषा का सम्मान मतलब अपनी मां का सम्मान। और इसीलिए मैंने विकसित भारत के निर्माण के लिए लालकिले की प्राचीर से पंच प्राणों की बात की। हमने इसमें विरासत पर गर्व को भी शामिल किया। जब भारत विकास भी और विरासत भी का संकल्प लेता है, तो पूरी दुनिया इसे देखती है। आज विश्व हमारी संस्कृति का सम्मान करता है, क्योंकि हम इसका सम्मान करते हैं। अब अगले पांच साल में महाराष्ट्र विकास भी विरासत भी के इसी मंत्र के साथ तेज गति से आगे बढ़ेगा।

साथियों,

इंडी वाले देश के बदले मिजाज को नहीं समझ पा रहे हैं। ये लोग सच्चाई को स्वीकार करना ही नहीं चाहते। ये लोग आज भी भारत के सामान्य वोटर के विवेक को कम करके आंकते हैं। देश का वोटर, देश का मतदाता अस्थिरता नहीं चाहता। देश का वोटर, नेशन फर्स्ट की भावना के साथ है। जो कुर्सी फर्स्ट का सपना देखते हैं, उन्हें देश का वोटर पसंद नहीं करता।

साथियों,

देश के हर राज्य का वोटर, दूसरे राज्यों की सरकारों का भी आकलन करता है। वो देखता है कि जो एक राज्य में बड़े-बड़े Promise करते हैं, उनकी Performance दूसरे राज्य में कैसी है। महाराष्ट्र की जनता ने भी देखा कि कर्नाटक, तेलंगाना और हिमाचल में कांग्रेस सरकारें कैसे जनता से विश्वासघात कर रही हैं। ये आपको पंजाब में भी देखने को मिलेगा। जो वादे महाराष्ट्र में किए गए, उनका हाल दूसरे राज्यों में क्या है? इसलिए कांग्रेस के पाखंड को जनता ने खारिज कर दिया है। कांग्रेस ने जनता को गुमराह करने के लिए दूसरे राज्यों के अपने मुख्यमंत्री तक मैदान में उतारे। तब भी इनकी चाल सफल नहीं हो पाई। इनके ना तो झूठे वादे चले और ना ही खतरनाक एजेंडा चला।

साथियों,

आज महाराष्ट्र के जनादेश का एक और संदेश है, पूरे देश में सिर्फ और सिर्फ एक ही संविधान चलेगा। वो संविधान है, बाबासाहेब आंबेडकर का संविधान, भारत का संविधान। जो भी सामने या पर्दे के पीछे, देश में दो संविधान की बात करेगा, उसको देश पूरी तरह से नकार देगा। कांग्रेस और उसके साथियों ने जम्मू-कश्मीर में फिर से आर्टिकल-370 की दीवार बनाने का प्रयास किया। वो संविधान का भी अपमान है। महाराष्ट्र ने उनको साफ-साफ बता दिया कि ये नहीं चलेगा। अब दुनिया की कोई भी ताकत, और मैं कांग्रेस वालों को कहता हूं, कान खोलकर सुन लो, उनके साथियों को भी कहता हूं, अब दुनिया की कोई भी ताकत 370 को वापस नहीं ला सकती।



साथियों,

महाराष्ट्र के इस चुनाव ने इंडी वालों का, ये अघाड़ी वालों का दोमुंहा चेहरा भी देश के सामने खोलकर रख दिया है। हम सब जानते हैं, बाला साहेब ठाकरे का इस देश के लिए, समाज के लिए बहुत बड़ा योगदान रहा है। कांग्रेस ने सत्ता के लालच में उनकी पार्टी के एक धड़े को साथ में तो ले लिया, तस्वीरें भी निकाल दी, लेकिन कांग्रेस, कांग्रेस का कोई नेता बाला साहेब ठाकरे की नीतियों की कभी प्रशंसा नहीं कर सकती। इसलिए मैंने अघाड़ी में कांग्रेस के साथी दलों को चुनौती दी थी, कि वो कांग्रेस से बाला साहेब की नीतियों की तारीफ में कुछ शब्द बुलवाकर दिखाएं। आज तक वो ये नहीं कर पाए हैं। मैंने दूसरी चुनौती वीर सावरकर जी को लेकर दी थी। कांग्रेस के नेतृत्व ने लगातार पूरे देश में वीर सावरकर का अपमान किया है, उन्हें गालियां दीं हैं। महाराष्ट्र में वोट पाने के लिए इन लोगों ने टेंपरेरी वीर सावरकर जी को जरा टेंपरेरी गाली देना उन्होंने बंद किया है। लेकिन वीर सावरकर के तप-त्याग के लिए इनके मुंह से एक बार भी सत्य नहीं निकला। यही इनका दोमुंहापन है। ये दिखाता है कि उनकी बातों में कोई दम नहीं है, उनका मकसद सिर्फ और सिर्फ वीर सावरकर को बदनाम करना है।

साथियों,

भारत की राजनीति में अब कांग्रेस पार्टी, परजीवी बनकर रह गई है। कांग्रेस पार्टी के लिए अब अपने दम पर सरकार बनाना लगातार मुश्किल हो रहा है। हाल ही के चुनावों में जैसे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, हरियाणा और आज महाराष्ट्र में उनका सूपड़ा साफ हो गया। कांग्रेस की घिसी-पिटी, विभाजनकारी राजनीति फेल हो रही है, लेकिन फिर भी कांग्रेस का अहंकार देखिए, उसका अहंकार सातवें आसमान पर है। सच्चाई ये है कि कांग्रेस अब एक परजीवी पार्टी बन चुकी है। कांग्रेस सिर्फ अपनी ही नहीं, बल्कि अपने साथियों की नाव को भी डुबो देती है। आज महाराष्ट्र में भी हमने यही देखा है। महाराष्ट्र में कांग्रेस और उसके गठबंधन ने महाराष्ट्र की हर 5 में से 4 सीट हार गई। अघाड़ी के हर घटक का स्ट्राइक रेट 20 परसेंट से नीचे है। ये दिखाता है कि कांग्रेस खुद भी डूबती है और दूसरों को भी डुबोती है। महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटों पर कांग्रेस चुनाव लड़ी, उतनी ही बड़ी हार इनके सहयोगियों को भी मिली। वो तो अच्छा है, यूपी जैसे राज्यों में कांग्रेस के सहयोगियों ने उससे जान छुड़ा ली, वर्ना वहां भी कांग्रेस के सहयोगियों को लेने के देने पड़ जाते।

साथियों,

सत्ता-भूख में कांग्रेस के परिवार ने, संविधान की पंथ-निरपेक्षता की भावना को चूर-चूर कर दिया है। हमारे संविधान निर्माताओं ने उस समय 47 में, विभाजन के बीच भी, हिंदू संस्कार और परंपरा को जीते हुए पंथनिरपेक्षता की राह को चुना था। तब देश के महापुरुषों ने संविधान सभा में जो डिबेट्स की थी, उसमें भी इसके बारे में बहुत विस्तार से चर्चा हुई थी। लेकिन कांग्रेस के इस परिवार ने झूठे सेक्यूलरिज्म के नाम पर उस महान परंपरा को तबाह करके रख दिया। कांग्रेस ने तुष्टिकरण का जो बीज बोया, वो संविधान निर्माताओं के साथ बहुत बड़ा विश्वासघात है। और ये विश्वासघात मैं बहुत जिम्मेवारी के साथ बोल रहा हूं। संविधान के साथ इस परिवार का विश्वासघात है। दशकों तक कांग्रेस ने देश में यही खेल खेला। कांग्रेस ने तुष्टिकरण के लिए कानून बनाए, सुप्रीम कोर्ट के आदेश तक की परवाह नहीं की। इसका एक उदाहरण वक्फ बोर्ड है। दिल्ली के लोग तो चौंक जाएंगे, हालात ये थी कि 2014 में इन लोगों ने सरकार से जाते-जाते, दिल्ली के आसपास की अनेक संपत्तियां वक्फ बोर्ड को सौंप दी थीं। बाबा साहेब आंबेडकर जी ने जो संविधान हमें दिया है न, जिस संविधान की रक्षा के लिए हम प्रतिबद्ध हैं। संविधान में वक्फ कानून का कोई स्थान ही नहीं है। लेकिन फिर भी कांग्रेस ने तुष्टिकरण के लिए वक्फ बोर्ड जैसी व्यवस्था पैदा कर दी। ये इसलिए किया गया ताकि कांग्रेस के परिवार का वोटबैंक बढ़ सके। सच्ची पंथ-निरपेक्षता को कांग्रेस ने एक तरह से मृत्युदंड देने की कोशिश की है।

साथियों,

कांग्रेस के शाही परिवार की सत्ता-भूख इतनी विकृति हो गई है, कि उन्होंने सामाजिक न्याय की भावना को भी चूर-चूर कर दिया है। एक समय था जब के कांग्रेस नेता, इंदिरा जी समेत, खुद जात-पात के खिलाफ बोलते थे। पब्लिकली लोगों को समझाते थे। एडवरटाइजमेंट छापते थे। लेकिन आज यही कांग्रेस और कांग्रेस का ये परिवार खुद की सत्ता-भूख को शांत करने के लिए जातिवाद का जहर फैला रहा है। इन लोगों ने सामाजिक न्याय का गला काट दिया है।

साथियों,

एक परिवार की सत्ता-भूख इतने चरम पर है, कि उन्होंने खुद की पार्टी को ही खा लिया है। देश के अलग-अलग भागों में कई पुराने जमाने के कांग्रेस कार्यकर्ता है, पुरानी पीढ़ी के लोग हैं, जो अपने ज़माने की कांग्रेस को ढूंढ रहे हैं। लेकिन आज की कांग्रेस के विचार से, व्यवहार से, आदत से उनको ये साफ पता चल रहा है, कि ये वो कांग्रेस नहीं है। इसलिए कांग्रेस में, आंतरिक रूप से असंतोष बहुत ज्यादा बढ़ रहा है। उनकी आरती उतारने वाले भले आज इन खबरों को दबाकर रखे, लेकिन भीतर आग बहुत बड़ी है, असंतोष की ज्वाला भड़क चुकी है। सिर्फ एक परिवार के ही लोगों को कांग्रेस चलाने का हक है। सिर्फ वही परिवार काबिल है दूसरे नाकाबिल हैं। परिवार की इस सोच ने, इस जिद ने कांग्रेस में एक ऐसा माहौल बना दिया कि किसी भी समर्पित कांग्रेस कार्यकर्ता के लिए वहां काम करना मुश्किल हो गया है। आप सोचिए, कांग्रेस पार्टी की प्राथमिकता आज सिर्फ और सिर्फ परिवार है। देश की जनता उनकी प्राथमिकता नहीं है। और जिस पार्टी की प्राथमिकता जनता ना हो, वो लोकतंत्र के लिए बहुत ही नुकसानदायी होती है।

साथियों,

कांग्रेस का परिवार, सत्ता के बिना जी ही नहीं सकता। चुनाव जीतने के लिए ये लोग कुछ भी कर सकते हैं। दक्षिण में जाकर उत्तर को गाली देना, उत्तर में जाकर दक्षिण को गाली देना, विदेश में जाकर देश को गाली देना। और अहंकार इतना कि ना किसी का मान, ना किसी की मर्यादा और खुलेआम झूठ बोलते रहना, हर दिन एक नया झूठ बोलते रहना, यही कांग्रेस और उसके परिवार की सच्चाई बन गई है। आज कांग्रेस का अर्बन नक्सलवाद, भारत के सामने एक नई चुनौती बनकर खड़ा हो गया है। इन अर्बन नक्सलियों का रिमोट कंट्रोल, देश के बाहर है। और इसलिए सभी को इस अर्बन नक्सलवाद से बहुत सावधान रहना है। आज देश के युवाओं को, हर प्रोफेशनल को कांग्रेस की हकीकत को समझना बहुत ज़रूरी है।

साथियों,

जब मैं पिछली बार भाजपा मुख्यालय आया था, तो मैंने हरियाणा से मिले आशीर्वाद पर आपसे बात की थी। तब हमें गुरूग्राम जैसे शहरी क्षेत्र के लोगों ने भी अपना आशीर्वाद दिया था। अब आज मुंबई ने, पुणे ने, नागपुर ने, महाराष्ट्र के ऐसे बड़े शहरों ने अपनी स्पष्ट राय रखी है। शहरी क्षेत्रों के गरीब हों, शहरी क्षेत्रों के मिडिल क्लास हो, हर किसी ने भाजपा का समर्थन किया है और एक स्पष्ट संदेश दिया है। यह संदेश है आधुनिक भारत का, विश्वस्तरीय शहरों का, हमारे महानगरों ने विकास को चुना है, आधुनिक Infrastructure को चुना है। और सबसे बड़ी बात, उन्होंने विकास में रोडे अटकाने वाली राजनीति को नकार दिया है। आज बीजेपी हमारे शहरों में ग्लोबल स्टैंडर्ड के इंफ्रास्ट्रक्चर बनाने के लिए लगातार काम कर रही है। चाहे मेट्रो नेटवर्क का विस्तार हो, आधुनिक इलेक्ट्रिक बसे हों, कोस्टल रोड और समृद्धि महामार्ग जैसे शानदार प्रोजेक्ट्स हों, एयरपोर्ट्स का आधुनिकीकरण हो, शहरों को स्वच्छ बनाने की मुहिम हो, इन सभी पर बीजेपी का बहुत ज्यादा जोर है। आज का शहरी भारत ईज़ ऑफ़ लिविंग चाहता है। और इन सब के लिये उसका भरोसा बीजेपी पर है, एनडीए पर है।

साथियों,

आज बीजेपी देश के युवाओं को नए-नए सेक्टर्स में अवसर देने का प्रयास कर रही है। हमारी नई पीढ़ी इनोवेशन और स्टार्टअप के लिए माहौल चाहती है। बीजेपी इसे ध्यान में रखकर नीतियां बना रही है, निर्णय ले रही है। हमारा मानना है कि भारत के शहर विकास के इंजन हैं। शहरी विकास से गांवों को भी ताकत मिलती है। आधुनिक शहर नए अवसर पैदा करते हैं। हमारा लक्ष्य है कि हमारे शहर दुनिया के सर्वश्रेष्ठ शहरों की श्रेणी में आएं और बीजेपी, एनडीए सरकारें, इसी लक्ष्य के साथ काम कर रही हैं।


साथियों,

मैंने लाल किले से कहा था कि मैं एक लाख ऐसे युवाओं को राजनीति में लाना चाहता हूं, जिनके परिवार का राजनीति से कोई संबंध नहीं। आज NDA के अनेक ऐसे उम्मीदवारों को मतदाताओं ने समर्थन दिया है। मैं इसे बहुत शुभ संकेत मानता हूं। चुनाव आएंगे- जाएंगे, लोकतंत्र में जय-पराजय भी चलती रहेगी। लेकिन भाजपा का, NDA का ध्येय सिर्फ चुनाव जीतने तक सीमित नहीं है, हमारा ध्येय सिर्फ सरकारें बनाने तक सीमित नहीं है। हम देश बनाने के लिए निकले हैं। हम भारत को विकसित बनाने के लिए निकले हैं। भारत का हर नागरिक, NDA का हर कार्यकर्ता, भाजपा का हर कार्यकर्ता दिन-रात इसमें जुटा है। हमारी जीत का उत्साह, हमारे इस संकल्प को और मजबूत करता है। हमारे जो प्रतिनिधि चुनकर आए हैं, वो इसी संकल्प के लिए प्रतिबद्ध हैं। हमें देश के हर परिवार का जीवन आसान बनाना है। हमें सेवक बनकर, और ये मेरे जीवन का मंत्र है। देश के हर नागरिक की सेवा करनी है। हमें उन सपनों को पूरा करना है, जो देश की आजादी के मतवालों ने, भारत के लिए देखे थे। हमें मिलकर विकसित भारत का सपना साकार करना है। सिर्फ 10 साल में हमने भारत को दुनिया की दसवीं सबसे बड़ी इकॉनॉमी से दुनिया की पांचवीं सबसे बड़ी इकॉनॉमी बना दिया है। किसी को भी लगता, अरे मोदी जी 10 से पांच पर पहुंच गया, अब तो बैठो आराम से। आराम से बैठने के लिए मैं पैदा नहीं हुआ। वो दिन दूर नहीं जब भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनकर रहेगा। हम मिलकर आगे बढ़ेंगे, एकजुट होकर आगे बढ़ेंगे तो हर लक्ष्य पाकर रहेंगे। इसी भाव के साथ, एक हैं तो...एक हैं तो...एक हैं तो...। मैं एक बार फिर आप सभी को बहुत-बहुत बधाई देता हूं, देशवासियों को बधाई देता हूं, महाराष्ट्र के लोगों को विशेष बधाई देता हूं।

मेरे साथ बोलिए,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय!

वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम ।

बहुत-बहुत धन्यवाद।