‘का हाल बा’ ?
नेदरलँड मधील माझ्या प्रिय अप्रवासी भारतीय बंधू आणि भगिनींनो मी महापौर आणि उपमहापौर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी माझे स्वागत केले आणि स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार मानतो.
हा जो आवाज तुम्हाला चौफेर ऐकू येत आहे, जो उत्साह दिसत आहे. भारतात टीव्ही वर जे लोकं हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना नक्कीच आश्चर्य वाटत असेल की छोट्याश्या हेग मध्ये भारतीयांचा इतका दबदबा आहे.सुरीनाम मध्ये जी लोकं आहेत त्यांचे मी विशेषतः अभिनंदन करू इच्छितो. खूप वर्षां आधी मला सुरीनामला जाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते.
सुरीनामाचे लोक दरवर्षी ५ जून मोठ्या उत्साहात साजरा करतात. जगात जिथे जिथे भारतवासी गेले त्या सर्वांसाठी हे आमचे सुरीनामचे बंधू भगिनी किंवा त्या कालखंडात जगाच्या ज्या ज्या देशात मजदूर म्हणून लोकांना नेण्यात आले होते; मग ते मॉरीशस असो, सुरीनाम असो किंवा गयाना असो, दीडशे वर्ष उलटली आहेत.चार-चार पिढ्या झाल्या. परंतु आज देखील भारताची भाषा, भारताची संस्कृती, भारताची परंपरा या सर्वांचे त्यांनी जतन केले आहे. मी त्यांचे लक्ष लक्ष अभिनंदन करतो, आणि आपण आपल्या त्या पूर्वजांना देखील नमन केले पाहिजे ज्यांनी भारताचा किनारा सोडल्यानंतर कधी त्यांना भारताकडे बघण्याची संधी मिळाली नाही परंतु आपल्या सोबत ज्या भारतीयतेला ते घेऊन गेले होते आज चौथी, पाचवी, सहावी पिढी असेल त्या सर्वांनी आपल्या कुटुंबात ही भारतीयता जिवंत ठेवली आहे. नाहीतर आज एका पिढीतच सर्वकाही बदलते, आपली भाषा देखील मागे सुटते आणि कधी कधी आई वडील गर्वाने सांगतात माझ्या मुलाला भारतीय भाषा येत नाही. या सर्व गोष्टीं सोबत, आपल्या मुळाशी जोडलेले राहिल्याने आपल्याला एक ताकद मिळते. लोखंडाचा गोळा कितीही जड असुदे, कितीही मोठा असुदे, कितीही मजबूत असुदे परंतु व्यवस्थितपणे जर २ लहान मुलांनीही त्याला धक्का मारला तर तो हळूहळू पुढे सरकतो, परंतु वृक्ष ज्याची मूळ जमिनीशी जोडलेली असतात, त्याची ताकद काही वेगळीच असते, ते हलत देखील नाही आणि सावली पण देते आणि म्हणूनच मुळांशी जोडलेले राहिल्याने ताकद काय असते हे सुरीनामच्या बंधू भगिनींकडून शिकू शकतो. त्याचप्रकारे तुमच्यापैकी बरेच लोकं असतील ज्यांनी अजून भारत पहिला नसेल. तुमच्यापैकी असे बरेच लोकं असतील ज्यांचे आजोबा, पणजोबा भारत सोडून आले असतील, ते कुठून आले, त्यांचे गाव कोणते होते, त्यांचे नातेवाईक कोण होते हे काहीच माहित नाही; परंतु त्यांच्या मनात आजही भारत जिवंत आहे. तुम्ही आज जे काही आहत ते तुमचे कर्तुत्व आहे, मेहनत आहे, सामर्थ्य आहे. परंतु असे असले तरी तुमच्या मनात हे नेहमी असते की भारताचे काही कर्ज आहे तुमच्यावर आणि संधी मिळाली तर हे कर्ज नक्की फेडू. मला माहित आहे याहून मोठी कोणती भक्ती असूच शकत नाही, भावना असूच शकत नाही.
इथे दोन प्रकारची लोक आहेत. एक म्हणजे जे दीडशे वर्षांपूर्वी भारत सोडून निघाले होते आणि सुरीनाम मार्गे इथे पोहोचले आणि दुसरे म्हणजे जे आत्ताच विमानाने इथे आले आहेत. जे अगदी आता इथे आले आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही कधी विचार केला आहे का जर दीडशे वर्षांपूर्वी तुमचा भारताशी संपर्क तुटला असता तर तुमच्यामध्ये ती भारतीयतेची भावना जिवंत राहिली असती का जी सुरीनामच्या लोकांमध्ये आहे. आणि म्हणूनच मी सांगू इच्छितो की इथे राहणाऱ्यांनो तुमच्या पासपोर्टचा रंग कोणताही का असु दे, पासपोर्टचा रंग बदलल्याने रक्ताची नाती बदलत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मी प्रार्थना करतो, विनंती करतो की, पासपोर्टच्या रंगाच्या आधारावर नाती जोडू नका, पासपोर्टचा रंग कोणताही असुदे त्याचे आणि माझे पूर्वज एक आहेत. ज्या भूमीची पूजा ते करतात त्याच भूमीची पूजा मी करतो. त्याच्या आयुष्यामधील दुःख हे आहे की, त्याला दीडशे वर्षांपूर्वी आपला देश सोडवा लागला. मी भाग्यशाली आहे की, अजूनही मी माझ्या देशाच्या मुळाशी जोडलेलो आहे. सुरीनामच्या लोकांना जवळ करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. आपल्यातली एकी कायम राहिली पाहिजे. आपण एकत्रितपणे कार्यक्रम केले पाहिजे. आता आपल्यामध्ये कधी दुरावा येता कामा नये. जे आता आले आहेत त्यांना कदाचित हिंदी बोलयला त्रास होत असेल परंतु सुरीनामच्या लोकांना हा त्रास होत नाही. युरोप मध्येच नाही तर कॅरिबियन देशांमध्ये देखील आपण सर्व मिळून एक अशी उर्जा भूमी निर्माण करू शकतो. हेगच्या सर्व भूभागातील भारतीयांसोबत आपले नाते जोडले जाईल, आणि आज तर तंत्रज्ञानामुळे मोबाईल फोनद्वारे या सर्व कुटुंबांसोबत आपण जोडलेले राहू शकतो. संघटनेमध्येच तर शक्ती आहे. आणि मी पहिली तुमची ताकद, माझा कार्यक्रम तर अचानक ठरला आहे. जास्त काही तयारी करण्याची संधी मिळाली नाही. दोन चार दिवसांपूर्वी तुम्हाला हे कळले असेल आणि तरीदेखील इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात. सरकारचे दूतावास असते, परराष्ट्रीय वकील असतात, सरकारी अधिकारी असतात, तुम्हाला माहित आहे त्यांना राजदूत बोलतात. हिंदी मध्ये त्यांना राजदूत बोलतात. परंतु इथे तुम्ही सर्व राष्ट्रदूत आहात. प्रत्येक भारतीय जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात राष्ट्रदूत आहे. आपल्या देशाच्या चांगल्या गोष्टींची लोकांना ओळख करून द्यायची आहे, भारत हा असा देश आहे जिथे जगातील सर्व धर्मांचा सम्मान केला जातो हे जगाला कळल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटते. जगातील छोट्यात छोटा धर्म असेल पंथ असेल त्याचे आचरण करणारे लोकं भारतात आहेत आणि ते इथे गर्वाने आपले जीवन जगत आहेत. भारतात १०० भाषा आहेत आणि १७०० हून अधिक बोलीभाषा आहेत हे जेव्हा जगभरातील लोकांना कळते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते.युरोप मध्ये देश बदलला की भाषा बदलते, भाषा बदलली की आम्हाला त्रास होतो. तुम्ही १०० भाषांमध्ये कसे वावरता. आम्हाला जोडणारी जी ताकद आहे ती आहे आमच्या मातृभूमीप्रती असलेले आमचे प्रेम. त्या भूमीच्या प्रती त्याग तपस्येच्या प्रती...... इतिहासाच्या प्रती..... परंपरां प्रती आमची ओढ आहे; आणि म्हणूनच कोणताही भारतीय जगात गर्वाने सांगू शकतो की माझा देश विविधतेने नटलेला आहे.
तुम्ही जगात जे काही अनुभवाल तेच तुम्ही माझ्या देशात देखील अनुभवू शकता. देशाची विशालता आहे. जेव्हा मी जगातील नेत्यांना भेटतो आणि मी सव्वा कोटी देशवासीयांच्या सरकारचा पंतप्रधान आहे तेव्हा ते माझ्याकडे बघत राहतात. त्यांना वाटते एका छोट्याश्या देशाचा राज्यकारभार करतांना आम्हाला त्रास होतो तुम्ही कसे करता. मी त्यांना सांगतो, तुमच्याकडे तुम्ही देश चालवता माझ्याकडे सव्वाशे कोटी देशवासी देश चालवतात. लोकशाहीची हीच खरी ताकद आहे. भारतात जेव्हा पासून मला सरकार मध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आहे, आम्ही सर्वात मोठा प्रयत्न केला तो म्हणजे लोकसहभाग. देशातल्या प्रत्येक कामात आम्ही लोकभागीदारीला प्राधान्य दिले आहे. सर्व काही सरकार करणार, सर्व समस्यांवरील उपाय सरकारकडेच आहे. देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा सर्व बुद्धी सरकारी लोकांनाच मिळाली आहे या समाजातून आता आम्ही बाहेर आलो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की, लोकसहभागातून देश कित्येकपट अधिक वेगाने प्रगती करू शकतो. जर सरकार हे ठरवते की, आम्ही शौचालय बांधणार उघड्यावर शौचास जाणे बंद करणार, शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय बांधणार, हे कार्यक्रम तर आधी देखील राबवले जात होते. परंतु ते कार्यक्रम सरकार राबवत होते. आम्ही आल्यानंतर सांगितले की हे सर्व कार्यक्रम लोकांनी चालवायचे आहेत आणि तुम्हाला हे जाणून खूप आनंद होईल की, एका वर्षाच्या आत शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र मुलांसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचे काम लोकांनी पूर्ण केले. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, देशात जे नवीन सरकार स्थापन झाले आहे त्यांनी प्रत्येक कामात लोक सहभागाला प्राधान्य दिले आहे. नाहीतर पहिले काय व्हायचे, लोकशाहीचा अर्थ खूप साधारण करून ठेवला होता......लोकशाहीचा अर्थ पाच वर्षातून एकदा जायचे ई व्ही एम मशीनचे बटन दाबायचे आणि आवडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आणि त्याला ५ वर्षाचे कंत्राट द्यायचे आणि सांगायचे की, हे बघ ५ वर्षासाठी तुला निवडून दिले आहे तुला आमची ही १० कामे कर. नाही केली तर पुढच्या ५ वर्षांसाठी दुसऱ्याला निवडून देऊ. ही लोकशाहीची मर्यादा नाही. हा तर लोकशाहीचा एक मर्यादित भाग आहे ज्यामध्ये लोकं मतदान करतात सरकार त्यांचे आहे. परंतु सरकार काम करते लोकसहभागातून.
आमच्या इथे जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर सरकरी यंत्रणा तोकडी पडते हे सगळ्यांनी पहिले आहे, परंतु लोकं, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था खाण्याचे सामान आणि इतर मदत करायला सज्ज होतात. जनशक्तीचे सामर्थ्य इतके आहे की, नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळ्यांची मदत तत्काळ पोहोचते. या सरकारचा हा प्रयत्न आहे की, सर्व कामांमध्ये लोकसहभाग करून घ्यायचा. राज्यसरकार केंद्र सरकार खांद्याला खांदा लावून कसे काम करतील आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या साच्याचा कसा विकास होईल यावर ह्या सरकारने जोर दिला.
सुप्रशासन......मला माहित आहे की, विकासासोबत सुप्रशासन आले तरच जनता जनार्दनाची स्वप्ने पूर्ण होतील. फक्त विकासाने स्वप्ने पूर्ण होत नाहीत न केवळ सुप्रशासनाने देखील होत नाहीत. विकास आणि सुप्रशासनाचा जेव्हा मेळ होतो तेव्हा जनसामान्यांचे समाधान होते. एक चांगले बस स्थानक उभारले, विकास झला, परंतु बस वेळेवर आली, बस मध्ये स्वच्छता असेल, ड्रायव्हर, कंडक्टर यांचे वागणे चांगले असेल तर हे झाले सुप्रशासन. तेव्हा सामान्य व्यक्तीला आनंद मिळतो. त्याला चांगले वाटते, हे माझे सरकार आहे, हा माझा देश आहे, ही माझी संपत्ती आहे. लोकसहभाग मजबूत व्हावे आणि लोकसहभागाच्या भरवशाने देशाचा विकास करण्याचा प्रयत्न व्हावा ही सरकारची हीच भावना आहे. तुम्ही पहिले असेल दोन वर्षांपूर्वी आमचे सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा टीव्ही वर सतत एकच बातमी येत होती. डाळ महाग झाली आहे...डाळ महाग झाली आहे. मोदी सांगा डाळीचे भाव कमी का होत नाहीत. जिथे जावे तिथे हाच प्रश्न. आता डाळीचे भाव इतके कमी झाले आहेत की कोणी विचारतच नाही. हे कसे शक्य झाले.....मी देशातील शेतकऱ्यांना विनंती केली की, तुम्ही डाळीच्या शेतीकडे देखील अधिक लक्ष द्या आणि डाळीच्या शेतीसाठी ए आर कष्ट घ्यायला लागत नाहीत पिकाच्या मध्ये लावून त्याचे उत्पन्न घेतले जाऊ शकते. हे अतिरिक्त उत्पन्न होते. आणि माझ्या देशातील शेतकऱ्यांनी हे करून दाखवले. अमाप प्रमाणात डाळीचे उत्पादन घेतले त्यामुळे आज थाळी स्वस्त झाली. मध्यमवर्गीय कुटुंबात दली जर जास्त खात असतील तर त्यांनी प्रोटीन पण जास्त मिळतात शारीरिक शक्ती वाढते, शरीराची बरीच गरज भागते. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, सरकरी प्रयत्नांपेक्षा सामान्य माणसाचे सामर्थ्य खूप मोठी भूमिका बजावते.
भारतातील महिला तर गृहिणी आहेत असा भारता बाहेर समज आहे. फार काही करत नाहीत स्वयंपाकघरात असतात. बाहेर ही कल्पना आहे, सत्य निराळेच आहे. आज देखील भारतातील पशुपालन, दुग्धोत्पादन, दुध ही सर्व क्षेत्र एका प्रकारे भारतातील महिलाच सांभाळत आहेत.पुरुषांचे योगदान खूप कमी आहे. कृषीमध्ये देखील महिलांची भागीदारी मोठ्याप्रमाणात असते. त्या शारीरिक योगदान देतात, परंतु आपली सामाजिक रचना अशी आहे की, त्याला रुपयामध्ये तोलले जात नाही. याचा अर्थ हा नाही की, भारताच्या आर्थिक विकास यात्रेत महिलांची भूमिका नाही. महिलांची भूमिका आहे. महिलांमध्ये क्षमता देखील आहे आणि म्हणूनच आमच्या सरकारने ५० टक्के लोकसंख्या असलेल्या या नारी शक्तीला भारताच्या विकास यात्रेचा एक मुख्य भाग बनवण्याचा विडा उचलला आहे. महिला सक्षमीकरण आणि इतकेच नाही तर महिला आधारित विकास. आम्ही जेव्हा बँकेत खाती उघडण्याची प्रधानमंत्री जनधन योजना सुरु केली तेव्हा देशात ४० टक्के लोक अशी होती जी कधीच बँकेत गेली नव्हती. जे औपचारिक अर्थव्यवस्थेच्या बाहेर होते. आम्ही अभियान सुरु केले आणि आनंदाची बाब ही आहे की, जेव्हा बँकेत खाती उघडली गेली तेव्हा त्यात जास्त खाती ही महिलांची होती. महिलांना असे वाटू लागले की, त्यापण अर्थव्यवस्थेचा एक हिस्सा आहेत. आता आम्ही एक योजना सुरु केली मुद्रा योजना. मुद्रा योजनेच्या माध्यमातून आम्ही उद्यमशिलतेला बळ दिले. आपल्या देशातील युवकाने रोजगार शोधक न राहता रोजगार निर्माता बनावे. तो रोजगार देणारा बनू दे. छोटी छोटी काम करत एकाला नोकरी देवू शकतो मग दुसऱ्याला देवू शकतो अशा प्रकारे तो दुसऱ्यांना रोजगार देवू शकतो; आणि म्हणूनच छोट्या छोट्या उद्योगांना मदत करण्याच्या दिशेने आम्ही मोठे अभियान सुरु केले आहे.
मुद्रा योजना....मुद्रा योजना नागरिकांना कोणत्याही हमी शिवाय बँकेतून पन्नास हजार ते दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते, यासाठी केवळ नागरिकांना बँकेत जाऊन त्यांची सर्व माहिती द्यावी लागते. अंदाजे ७ कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे आणि जवळजवळ तीन लाख कोटी रुपये या लोकांना मिळाले आहेत. कोणाल पन्नास हजार, कोणाल पंचावन्न हजार, कोणाला ऐंशी हजार आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ७० टक्के महिला आहेत.महिला सक्षमीकरण कसे होणार, महिला आधारित विकास कसा होणार हे यातून दिसून येते. आज देखील जगात अनेक पुढारलेल्या देशांमध्ये प्रसूती रजा सरासरी १२ आठवड्यांची आहे.....विकसित देशांमध्ये देखील नोकरदार महिलांसाठी प्रसूती रजा १२ आठवड्यांची आहे. भारत हा एक असा देश आहे ज्याने संसदेत कायदा संमत केला आणि आता नोकरदार महिलांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा दिली जाते.आणखी ६ महिने आणि म्हणूनच आम्ही भारताच्या भविष्याकडे पहात आहोत. आता काही लोकांना असे वाटेल की, ६ महिने घरी बसून फुकटचा पगार घेणार. परंतु ती महिला ६ महिने त्या बालकाचे पालनपोषण करते जो माझ्या देशाचे भविष्य आहे. ही गुंतवणूक आहे, म्हणजे २६ आठवडे एका नोकरदार महिलेला सुट्टी देवून पगार चालू ठेवायचा सुरवातीला असे वाटेल की, फुकटचा पैसा द्यावा लागत आहे, परंतु दूरदृष्टीने विचार केला तर लक्षात येईल की, त्या महिलेच्या कुशीत जे बालक आहे, त्याचे त्याच्या आईच्या कुशीत असे ६ महिने संगोपन झाल्यामुळे त्याचा पाया मजबूत होईल, माझे भविष्य उज्वल होईल, माझे भविष्य मजबूत होईल या दिशेने हे सर्व कार्य होईल.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी भारतात आले होते, त्यांना जेव्हा गार्ड ऑफ हॉनर देण्यात आले तेव्हा लष्कर, नौदल आणि वायुदल तिन्ही संरक्षण दलाच्या पंक्तीमध्ये महिला अधिकारी त्यांना गार्ड ऑफ हॉनर देत होत्या. हे सर्व पाहून ओबामा यांनी व्यासपीठावर मला सांगितले की, भारतामध्ये ही तर फार आश्चर्याची बाब आहे. मी सांगितले ही तर सुरुवात आहे, उद्या बघा. २६ जानेवारीचे संचलन झाले त्यानंतर सर्व जगामध्ये मुख्य बातमी होती ती म्हणजे संचालनाचे नेतृत्व महिलाच करत होती. संचलनामध्ये जे संघ होते ते महिलांचे होते. संरक्षण क्षेत्रात देखील माझ्या देशातील महिला खूप मोठी भूमिका पार पाडत आहेत. तुम्ही जर दिल्लीला गेलात किंवा देशाच्या अन्य कोणत्या मोठ्या राज्यांमध्ये गेलात जिथे पोलीस दलात ३३ टक्के महिला आरक्षण आहे आणि आमच्या या सक्षम महिला सुरक्षेची जबाबदारी देखील चांगल्या प्रकारे पार पडतील. त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत.
आता तुम्ही पहिले असेल आमच्या भगिनी आता लढाऊ विमान उडवतात. लढाऊ विमानांचे नेतृत्व महिलांच्या हातात संपूर्ण जगात याची चर्चा आहे. आज भारताने अंतराळ तंत्रज्ञानाच्या दुनियेत संपूर्ण जगात नाव कमावले आहे. आता मागील आठवड्यात एकत्रितपणे ३० नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. याआधी आमच्या वैज्ञानिकांनी जागतिक विक्रम केला होता. १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम भारताच्या अंतराळ विज्ञानाने केले. मागील महिन्यात सर्वात जास्त वजनाचा उपग्रह प्रक्षेपित केला गेला आणि वजन तर इतके की, वर्तमानपत्रवाल्यांनी लिहिले की, इतक्या इतक्या हत्तीच्या वजन इतके. तुम्हाला हे जाणून आनंद होईल. या संपूर्ण अंतराळ कार्यामध्ये ३ वैज्ञानिक महिलांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. माझ्या देशातील मते भगिनींच्या या शक्तीचा आम्हाला का वाटणार गर्व नाही? विज्ञान क्षेत्र असुदे, शिक्षण क्षेत्र असुदे, आरोग्य क्षेत्र असुदे, भारतातील कोणत्याही मोठ्या राज्यात आज जर शिक्षक परिषद असेल तर तुम्हाला एक फलक लावावा लागेल की हा कोपरा पुरुष शिक्षकांसाठी आरक्षित आहे. संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे काम आज माझ्या देशातील मत भगिनी सांभाळत आहेत. क्रीडा क्षेत्र, परिचारिका, रुग्णसेवा, वैद्यकीय क्षेत्र कुठेही गेलात तर तुम्हाला तिथे महिला काम करताना दिसून येतील. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, महिला शक्ती आणि हो.....ऑलंपिक मध्ये पदक कोणी आणले. सर्व पदक आणणाऱ्या आमच्या मुली होत्या. प्रत्येकीने भारताचे नाव रोषण केले. एव्हढेच नाहीतर पैराऑलंपिक मध्ये देखील भारताच्या झेंड्याला अभिमानाने फडकवण्याचे काम आमच्या महिला खेळाडूंनी केले आहे.
दिल्लीमध्ये एक असे सरकार सत्तेत आहे ज्याच्या मनात नेहमी भारताच्या विकास यात्रेत भारताच्या या ५० टक्के जनसंख्येला शक्तिशाली कसे बनवावे, सबलीकरण कसे करावे, भारताच्या आर्थिक विकास यात्रेत त्यांची बरोबरीची भागीदारी कशी होईल यासाठी एकामागोमाग पावले उचलत आहेत; आणि या सर्वाचे परिणाम म्हणजे आज माझ्या देशाची नारीशक्ती भारताचा झेंडा उंच फडकवण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. देशाचा विकास तर झाला पाहिजे, आधी आहे त्याहून चांगला झाला पाहिजे परंतु वेळ जास्तकाळ कोणासाठी थांबत नाही. ज्या गतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, त्या गतीने मार्गक्रमण करत जे निश्चित लक्ष्य प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे ते साध्य करू शकत नाही. आणि त्यासाठीच गती वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आधी सरकार असायची. एक काम दुसरे काम असे व्ह्यायचे ते सरकार ओळखले जायचे अशाच कार्यपद्धतीसाठी. आज दररोज एक नवीन काम केले तरी ते कमी पडत आहे इतक्या आकांक्षा वाढल्या आहेत. आणि देशाला फक्त पुढे घेऊन जाणे इतकेच पुरेसे नाही तर देशाला आधुनिक बनवणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपल्याला पुढे तर जायचे आहे परंतु आपल्याला आधुनिक देखील बनायचे आहे. २१व्या शतकातील भारत जागतिकदृष्ट्या मागे राहता कामा नये. विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात मागे राहता कामा नये. आपल्या पायाभूत सुविधा जागतिकदृष्ट्या अनुकूल असाव्या आणि जगाची बरोबरी करण्याचे सामर्थ्य भारतात असले पाहिजे. या भूमिकेसह आम्ही पुढे चालत आहोत.आज आरोग्य विषयक चिंता आहेत. पर्यावरणाच्या चिंता आहेत. प्रत्येकाला वाटते की त्याला स्वच्छ श्वास घेता यावा, स्वच्छ पेयजल मिळावे,चांगले जेवण मिळावे. ही कदाचित खूप स्वाभाविक चिंता आहे. उर्जा क्षेत्रात १७५ गिगावॅट नवीकरणीय उर्जेचा विडा भारताने उचलला आहे. तुमच्या पैकी बऱ्याचजणांसाठी गिगा वॅट शब्द नवा असेल. कारण कित्येक शतकांपासून आपण मेगावॅट च्या पुढे विचारच केलेला नाही. मेगावॅट म्हणजे आमच्यासाठी अंतिम ध्येय होते. १७५ गिगा वॅट नवीकरणीय उर्जेचे आमचे लक्ष्य आहे.
आपल्या देशाच्या गरजांमध्ये सौर उर्जा कशाप्रकारे भूमिका बजावेल, पवन उर्जा, अणुउर्जा, जैविक उर्जा खूप मोठा बदल घडवून आणत आहेत. पर्यावरणात सकारात्मक परिणाम घडवून त्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. आणि आज अशी परिस्थिती आहे की, कोळश्याच्या विजेपेक्षा सौर ऊर्जा स्वस्त होत चालली आहे. तुम्ही भविष्याची कल्पना करू शकता, जर संपूर्ण प्रणाली सौर ऊर्जेवर चालत असेल तर अर्थव्यवस्थेत किती मोठा बदल घडून येईल. देशाला आज जे आखाती देशांतून तेल आयात करावे लागत आहे, त्या आयातीमध्ये किती मोठ्याप्रमाणात घसरण होईल. देश कित्येक पटीने आत्मनिर्भर होईल आणि त्यासाठी जी सूर्यशक्ती आहे....हा सूर्य मी पंतप्रधान झाल्यानंतर आला आहे का? आणि याचसाठी संपूर्ण जीवनाला आधुनिक बनवण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.
डिजिटल इंडिया.....जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हा मी सुरवातीला शिकू इच्छित होतो. समजून घ्यायचे होते की, हे इतके मोठे नक्की काय आहे, तेव्हा मी अधिकाऱ्यांची बैठक घ्यायचो. त्यांच्याकडून आढावा घ्यायचो काय सुरु आहे,काय कमी आहे. एक दिवस मी वीज क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेत होतो, मी विचारले की, असे कोणते ठिकाण आहे का की, जिथे अजून वीज पोहोचली नाही. मी विचार केला स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर हा प्रश्न विचारायलाच नको होता. तेव्हा मी थोडे घाबरत घाबरत विचारलेच की, कोणत्या दुर्गम भागात अजूनही वीज पोहोचली नाही अशी परिस्थिती नाही ना. यावर अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले, साहेब अशी १८००० गावं आहेत जिथे अजूनही वीज नाही. तुम्ही मला सांगा २१ वे शतक आणि १८ व्या शतकामध्ये काय फरक राहिला. १८ व्या शतकात देखील लोकं विजेशिवाय सूर्य प्रकाशात किंवा चांदण्यात आपले आयुष्य चालवत होते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनतर माझ्या देशातील १८००० गावं १८व्या शतकातील जीवन जगण्यासाठी असहाय्य आहेत. आधुनिक भारताचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे.
मी विडा उचलला, मी विचारले की, सांगा केव्हापर्यंत होईल. त्यांनी सांगितले साहेब ७ वर्ष तरी लागतील. त्यांची ही हिम्मत माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. आरामात सांगितले ७ वर्ष लागतील. मी बोललो हे काम लवकर झाले पाहिजे तुम्ही असे का करत आहात का असा विचार करत आहात मी त्यांना सगळं समजावत होतो. सरतेशेवटी १५ ऑगस्टला जेव्हा मी लालकिल्यावरून सांगितले की,१००० दिवसांमध्ये आम्ही १८००० गावांपर्यंत वीज पोहोचवणार आहोत. अजून १००० दिवस पूर्ण देखील झाले नाहीत तेव्हाच १३-१४ हजार गावांपर्यंत वीज पोहोचली देखील. बंधू भगिनींनो मला आधुनिक भारत निर्माण करायचा आहे. उर्वरित गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम देखील जलद गतीने सुरु आहे.
भारतात अडीच लाख पंचायती आहेत. ६ लाख गावांमध्ये पंचायती आहेत. तुम्ही मला सांगा तुम्ही १ तास तरी मोबाईल शिवाय राहू शकता का? राहू शकता? समस्या होते ना? जर हा हक्क तुम्हाला आहे तर तो भारतातील प्रत्येक गरिबाला पण मिळाला पाहिजे का नाही. गावाला मिळाला पाहिजे का नाही.
बंधू भगिनींनो आम्ही डिजिटल इंडिया मोहीम राबवत आहोत. अडीच लाख पंचायतींमध्ये ऑप्टिकल फाइबर नेटवर्कचे काम सुरु आहे. जलद गतीने काम सुरु आहे. आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये या अडीच लाख गावांमध्ये डिजिटल प्रणाली सुरु करण्यासाठी ऑप्टिकल फाइबर नेटवर्क उभे केले जात आहे. ज्या सुविधा शहरांमध्ये उपलब्ध आहेत त्या ज्ञानाच्या सुविधा गावात देखील उपलब्ध होतील त्या आम्ही काम करत आहोत त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत. म्हणजेच भारताचा विकास होईल परंतु भारत कशाप्रकारे आधुनिक बनेल त्यावर आम्ही जास्त जोर देउन कार्य करीत आहोत. आणि त्या कार्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत.
बंधू भगिनींनो, अशा खूप गोष्टी असतील ज्यामुळे तुम्हाला भारतात रस असेल, परंतु मी तुम्हाला विनंती करतो, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही नेदरलँडमध्ये राहता. सुरीनाम वरून लोकं आली आहेत. डच नागरिक आहेत. ओ सी आय कार्ड काढायला तुम्हाला काही त्रास आहे का? तुमची इच्छा नाही का हे नाते जोडायची. मला जेव्हा कळले की, इथे इतक्या मोठ्या संख्येने भारतीय लोकं राहतात तेव्हा मला आश्चर्य वाटले, परंतु इथे केवळ १० टक्के लोकांकडेच ओ सी आय कार्ड आहे. तुम्ही मला वाचन द्या की, या २६ जानेवारीच्या आधी तुम्ही प्राधान्यक्रमाने हे काम पूर्ण कराल. केलेच पाहिजे मी इथल्या दूतावासाला देखील सांगतो. हे बघा हे ओ सी आय कार्ड तुमचे आणि भारताचे शेकडो वर्षांपूर्वी पासूनच्या नात्याचा बंध आहे त्याला विसरून चालणार नाही.आणि त्याला पैशाच्या तराजूत तोलले नाही पाहिजे. मी दोन दिवसांपूर्वी पोर्तुगाल मध्ये होतो.
तिथले पंतप्रधान सार्वजनिकरीत्या आपले ओ सी आय कार्ड दाखवत बोलत होते मला गर्व आहे की, माझ्याकडे ओ सी आय कार्ड आहे, मी भारताचा मूळनिवासी आहे आणि आज मी इथला पंतप्रधान आहे. सार्वजनिकरीत्या त्यांनी दाखवले. प्रत्येक भारतीयाच्या मनात हि भावना असली पाहिजे. मी आहे....माझ्याकडे ओ सी आय कार्ड आहे. अरे तुझ्याकडे नाही! हि भावना रुजली पाहिजे. आणि मला असे वाटते आणि मी आपल्या दूतावासाला विचारू इच्छितो...आता नवीन राजदूताची नियुक्ती झाली आहे.आणि मी तर हे विचारणार....किती झाले. माझी इच्छा आहे की, तुम्ही मदत करा.
कारण आपले हे काम पूर्ण झाले पाहिजे.जे २००० डच पारपत्र धारक आहेत त्यांच्यासाठी २०१५ पासून भारतात ई व्हिसा सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा लाभ तुम्ही घेत असाल. आणि मी तुम्हाला सांगत आहे. आगामी काळात डच नागरिकांना ५ वर्षांसाठी व्यापार व्हिसा देण्याच्या दिशेने देखील भारत सरकार विचार करत आहे. ५ वर्षांचा व्यापार अथवा पर्यटक व्हिसा हा डच नागरिकांना भारतासोबत जोडण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, भारतासोबत नात टिकवून ठेवण्याचे तुमचे प्रयत्न निरंतर सुरु ठेवा. आपल्या देश सोबत तुम्ही मानाने जोडलेले आहात, परंपरेने जोडलेले आहात. तुमचे जीवन इतके भारतमय आहे. त्याला भारताच्या अधिक निकट आणण्याचे प्रयत्न करत राहा. तुम्ही लोकं माझ्यासोबत जोडू इच्छिता का? नक्की.....
तुम्हाला असे वाटते का देशाचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान तुमच्या खिशामध्ये असावा? अरे तुम्ही गप्प का झालात? भारताचा पंतप्रधान तुमच्या खिशात असणे हे वाईट आहे का? तुम्हाला असे वाटत नाही का की, तुम्ही गर्वाने असे बोलू शकाल की अरे भारताचा पंतप्रधान माझ्या खिशात आहे. तुम्हाला असे नाही वाटत का? मी सांगतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते.
तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये नरेंद्र मोदी ॲप डाऊनलोड करा आणि त्यानंतर मी २४ तास तुमच्या खिशात उपलब्ध असेन. आणि तुमच्या हृदयाचा प्रत्येक आवाज मझ्यापर्यंत पोहोचू शकेल चला तुमचे आणि माझे नाते घनिष्ट करूया. तुमचा माझ्यावर संपूर्ण अधिकार आहे. तुमच्या पासपोर्टच्या रंगाच्या आधारावर ते नाही ठरणार. तुमच्यापैकी ज्या कोणाच्या हृदयातून भारत माता कि जय असा आवाज निघतो त्या सर्वांसाठी माझे जीवन समर्पित आहे. इतका कमी वेळ असूनसुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.
खूप खूप धन्यवाद!