Constitution of India is the soul of our democracy: PM Narendra Modi during #MannKiBaat
Our Constitution is comprehensive. Equality for all and sensitivity towards everyone are its hallmarks: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat: Baba Saheb Ambedkar ensured welfare of every section of society while drafting the Constitution, says Prime Minister Modi
India will never forget the terrorist attacks in Mumbai that shook the country 9 years back on 26/11: PM Modi during #MannKiBaat
Terrorism is the biggest threat to humanity. Not only is it a threat to India but also to countries across the world; World must unite to fight this menace: PM during #MannKiBaat
India being the land of Lord Buddha, Lord Mahavira, Guru Nanak, Mahatma Gandhi has always spread the message of non-violence across the world: PM during #MannKiBaat
#MannKiBaat: Our rivers and seas hold economic as well as strategic importance for our country. These are our gateways to the whole world, says PM
What if there is no fertile soil anywhere in this world? If there is no soil, there would be no trees, no creatures and human life would not be possible: PM during #MannKiBaat
Our Divyang brothers and sisters are determined, strong, courageous and resolute. Every moment we get to learn something from them: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat: It is our endeavour that every person in the country is empowered. Our aim is to build an all-inclusive and harmonious society, says PM
Whether it is the Army, the Navy or the Air Force, the country salutes the courage, bravery, valour, power and sacrifice of our soldiers: PM Modi during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनोनमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली. टाईम्स ग्रुपच्या ‘विजय कर्नाटका’ वर्तमानपत्राने एक उपक्रम राबवलाज्यात त्यांनी बालकांनापंतप्रधानांना पत्र पाठविण्याचा आग्रह केला. त्यापैकी काही निवडक पत्रे छापण्यात आली. ती पत्रे वाचल्यानंतर मला फार बरे वाटले. या अगदी लहान मुलांनाही देशातील समस्यांची जाण आहेदेशात सुरू असलेल्या चर्चाही त्यांना माहिती आहेत. अनेक विषयांवर या बालकांनी लिहिले आहे. उत्तर कन्नड मधील किर्ती हेगडे हिनेडिजीटल  इंडिया आणि स्मार्ट शहर योजनांचे कौतुक करतआपल्या शिक्षण व्यवस्थेत बदलाची गरज असल्याचे नमूद केले. हल्लीच्या मुलांना वर्गात बसून वाचन करणे आवडत नाहीत्यांना निसर्गाबद्दल जाणून घ्यायला आवडते. जर मुलांना निसर्गाबाबत अधिक माहिती दिली तर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ते भविष्यात उपयुक्त ठरेलअसेही तिने लिहिले आहे.

 

लक्ष्मेश्वरा येथील रीडा नदाफ़ नावाच्या मुलीने लिहिले आहे की ती लष्करातल्या एका जवानाची मुलगी आहे आणि तिला या गोष्टीचा अभिमान वाटतो. लष्करातल्या जवानाचा अभिमान कोणत्या भारतीयाला वाटणार नाहीआणि तुम्ही तर त्या जवानाची कन्या आहाततुम्हाला अभिमान वाटणे अगदी स्वाभाविक आहे. कलबुर्गीहून इरफ़ाना बेग़म यांनी म्हटले आहे की त्यांची शाळा त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहेत्यामुळे त्यांना घरातून लवकर निघावे लागते आणि घरी परतायलाही उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रमंडळींसोबत जास्त वेळ खेळता येत नाही. त्यांच्या घराजवळ शाळा असावीअशी सूचना त्यांनी केली आहे. देशवासियांनोएका वर्तमानपत्राने पुढाकार घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला आणि त्यामुळे ही पत्रे माझ्यापर्यंत पोहोचू शकलीती वाचायची संधी मला मिळाली. माझ्यासाठी सुध्दा हा फार चांगला अनुभव होता.

 

माझ्या प्रिय देशवासियांनोआज 26/11 आहे. 26 नोव्हेंबर हा आपला संविधान दिवस आहे. 1949 साली आजच्याच दिवशी संविधान सभेने भारताची घटना स्वीकारली होती. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारताची राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस हा संविधान सभेच्या सदस्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संविधानाची रचना करण्यासाठी त्यांनी सुमारे तीन वर्षे कठोर मेहनत घेतली. त्यावर झालेल्या चर्चा वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होते. देशाला समर्पित विचार म्हणजे कायहे त्यावरून समजते. वैविध्याने समृद्ध असलेल्या आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली असेलयाची कल्पना आहे तुम्हालायोग्य समज आणि दूरदर्शी विचार केला असेल त्यांनी. आणि ते सुद्धा अशा वेळीजेव्हा देश पारतंत्र्याच्या बेड्यांमधून मुक्त होत होतातेव्हा. याच संविधानाच्या प्रकाशातघटनेची रचना करणाऱ्यांच्या विचारांच्या प्रकाशात नव भारताची निर्मिती करणेही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपली राज्यघटना व्यापक आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्रनिसर्गातील कोणताही विषय त्यात वगळलेला नाही. सर्वांसाठी समानता आणि सर्वांप्रती संवेदनशीलताही आपल्या राज्यघटनेची ओळख आहे. आपली राज्यघटनादेशातील गरीबदलितमागासवंचितआदिवासीमहिला अशा सर्व स्तरांतील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करते आणि त्यांचे हित अबाधित राखते. आपल्या राज्यघटनेचे अक्षरश: पालन करणेहे आपले कर्तव्य आहे. नागरिक असो वा प्रशासकप्रत्येकाने संविधानाला अनुसरूनच वर्तन केले पाहिजे. कोणाचेहीकशाही प्रकारचे नुकसान होऊ नयेहाच राज्यघटनेचा संदेश आहे. आजसंविधान दिनाच्या प्रसंगीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येणेही स्वाभाविक आहे. या संविधान सभेत महत्वपूर्ण विषयांसंदर्भात 17 स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्यात आली होती. यातील मसुदा समिती ही एक सर्वात महत्वाची समिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. फार मोठी भूमिका ते निभावत होते. आज ज्या राज्यघटनेचा आपल्याला अभिमान वाटतोत्याच्या निर्मितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाचा अमिट ठसा आहे. समाजातील प्रत्येक वर्गाचे कल्याण होईलयाची खातरजमा त्यांनी केली. 6 डिसेंबर रोजीत्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण त्यांचे स्मरण करतोत्यांना वंदन करतो. देशाला समृद्ध आणि सशक्त करण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. 15 डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतीथी आहे. शेतकऱ्याचा सुपुत्र ते लोह पुरूष अशी ओळख निर्माण करणारे सरदार पटेल यांनीही देशाला एका समान सूत्रात बांधण्याचे असामान्य कार्य केले. सरदार पटेल सुद्धा संविधान सभेचे सदस्य होते. ते मूलभूत अधिकारअल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्या साठीच्या सल्लागार समितीचेही अध्यक्ष होते.        

 

26/11 हा आपला संविधान दिवस आहे. मात्र नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 26/11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होताहे सुद्धा देश विसरू शकत नाही. आजच्या दिवशी ज्या शूर नागरिकांनीपोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी आपले प्राण गमावले होतेत्यांना देश वंदन करतो आहेत्यांचे स्मरण करतो आहे. त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. दहशतवादाने आजजगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी आणि एका अर्थानेजवळ-जवळ रोजच होणाऱ्या घटनेचे रूप धारण केले आहे. आपणम्हणजेच भारत तर गेली 40 वर्षे दहशतवादामुळे बरेच काही सोसत आहे. आमच्या हजारों निर्दोष नागरिकांनी आपले प्राण गमावले. काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत दहशतवादाबाबत जगासमोर चर्चा करत असेदहशतवादाच्या भयंकर संकटाबाबत चर्चा करत असेतेव्हा जगातील अनेक लोकांना त्याचे गांभिर्य वाटत नव्हते. मात्र आजदहशतवादाने त्याच देशांमध्ये थैमान घालायला सुरूवात केल्यानंतर जगातील प्रत्येक सरकारखरे तर मानवतेवरलोकशाहीवर विश्वास असणारी सर्वच सरकारे दहशतवादाकडे एक मोठे आव्हान म्हणून पाहत आहेत. दहशतवादाने जगातील मानवतेलाच आव्हान दिले आहे. मानवी शक्ती नष्ट करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आणि म्हणूनच केवळ भारतानेच नाही तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाला पराभूत केले पाहिजे. या भूमीवर जन्मलेले भगवान बुध्दभगवान  महावीरगुरु नानकमहात्मा गांधी यांनीच जगाला अहिंसा आणि प्रेमाचा संदेश दिला आहे. दहशतवाद आणि उग्रवाद आमच्या सामाजिक रचनेला कमकुवत करूनती उध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच मानवतावादी शक्तींनी अधिक जागरूक राहावेही काळाची गरज आहे. 

 

माझ्या प्रिय देशवासियांनो4 डिसेंबर रोजी आपण नौदल दिवस साजरा करू. भारतीय नौदल आपल्या सागरी किनाऱ्यांचे संरक्षण करते. नौदलाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. नद्यांच्या किनारी परिसरातच आपल्या संस्कृती विकसित झाल्या आहेतहे आपणास माहिती असेलच. सिंधु नदी असोगंगा नदी असोयमुना असो किंवा सरस्वती असो. आपल्या नद्या आणि समुद्र हे आर्थिक आणि सामरिकअशा दोन्ही बाबतीत महत्वाचे आहेत. संपूर्ण जगासाठीची ही प्रवेशद्वारे आहेत. या देशाचाआपल्या या भूमीचा महासागरांशी अतूट संबंध आहे. जेव्हा आपण इतिहासावर नजर टाकतोतेव्हा 800-900 वर्षांपूर्वी चोळ वंशाच्या काळात सर्वात समर्थ नौदलांमध्ये चोळ राजाच्या नौदलाची गणना केली जात असे. चोळ साम्राज्याच्या विस्तारातसाम्राज्याला त्या काळी आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपाला आणण्यात त्यांच्या नौदलाचा सिंहाचा वाटा होता. चोळ नौदलाच्या मोहिमासंशोधन यात्रांची अनेक उदाहरणेसंगम साहित्यात आजही उपलब्ध आहेत. जगभरातील बहुतेक नौदलांमध्ये फार नंतरच्या काळात महिलांच्या समावेशाला परवानगी देण्यात आलीहे फार कमी लोकांना ठाऊक असेल. मात्र चोळ नौदलातआणि ते सुद्धा 800-900 वर्षांपूर्वी महिलांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अगदी युद्धातही या महिला सहभागी झाल्या होत्या. चोळ शासकांकडे जहाज बांधणीचे अद्ययावत ज्ञान होते. नौदलाचा उल्लेख होत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नौदलाचे सामर्थ्यही कसे विसरता येईलसागरी वर्चस्व असणारा कोकणचा भूभाग शिवाजी महाराजांच्या राज्यात समाविष्ट होता. शिवाजी महाराजांशी संबंधित सिंधुदुर्गमुरुड-जंजिरास्वर्णदुर्ग असे अनेक किल्ले तर समुद्र किनारी भागात होते किंवा मग समुद्रातच उभे होते. मराठ्यांचे नौदल या किल्ल्यांचे संरक्षण करत होते. मराठ्यांच्या या आरमारात मोठ्या आणि लहान नौकांचा समावेश होता. त्यांचे नौसैनिक कोणत्याही शत्रुवर हल्ला करण्यास आणि हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यात पारंगत होते. मराठा आरमाराची चर्चा व्हावी आणि कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख नसावाहे तर केवळ अशक्य. त्यांनी मराठ्यांच्या आरमाराला नवे वैभव मिळवून दिले आणि अनेक ठिकाणी मराठा सैनिकांचे तळ उभारले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतीय नौदलाने अनेकदा पराक्रम गाजवला. गोवा मुक्ती संग्राम असो किंवा १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध असो. जेव्हा नौदलाचा उल्लेख होतो तेव्हा केवळ युद्धच नजरेसमोर येते. मात्र भारतीय नौदलाने मानवतेसाठीही मोलाचे काम केले आहे. याच वर्षी जून महिन्यात बांग्लादेश आणि म्यानमारवर मोरा चक्रीवादळाचे संकट ओढवले होते. आपल्या नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने तातडीने बचावासाठी मदत केली आणि अनेक मच्छिमारांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून बांग्लादेशकडे सुपूर्द केले. याच वर्षी मे-जून महिन्यात श्रीलंकेमध्ये मोठा पूर आला तेव्हा आमच्या नौदलाच्या तीन नौका तातडीने तेथे पोहोचल्या आणि त्यांनी तेथील सरकार आणि जनतेचे सहाय्य केले. बांग्लादेशमध्ये रोहिंग्यांसंदर्भात आपल्या नौदलाच्या आयएनएस घडियाल या युद्ध नौकेने मानवी सहाय्य केले होते. जून महिन्यात पापुआ न्यू गिनी सरकारने आम्हाला SOS संदेश दिला आणि त्यांच्या मच्छिमारी नौकेवरच्या मच्छिमारांना वाचवण्यासाठी आपल्या नौदलाने मदत केली. 21 नोव्हेंबर रोजी पश्चिम गल्फमध्ये एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळीसुद्धा आपल्या नौदलाची आयएनएस त्रिकांड ही युद्ध नौका मदतीसाठी धावून गेली. फिजीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे असोतातडीची मदत करायची असो किंवा शेजारी देशांना मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करायची असोप्रत्येक वेळी भारतीय नौदलाने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. आपण सर्व भारतीयआपल्या या संरक्षण दलांबद्दल नेहमीच गौरव आणि आदराची भावना बाळगतो. लष्कर असोनौदल असो किंवा वायुसेना असोआपण सर्व देशवासी आपल्या जवानांचे शौर्यधाडसपराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करतो. सव्वाशे कोटी भारतीयांना शांततेनेसुखाने जगता यावेयासाठी हे जवान आपले तारूण्यआपले आयुष्य देशावरून ओवाळून टाकतात. दर वर्षी 7 डिसेंबर रोजी सुरक्षा दले ध्वज दिन साजरा करतात. देशाच्या सुरक्षा दलांप्रती अभिमान आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. या वर्षी संरक्षण मंत्रालयाने 1 ते 7 डिसेंबर दरम्यान एक विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील नागरिकांपर्यत पोहोचून त्यांना सुरक्षा दलांबाबत माहिती दिली जाणार आहेत्यांच्या कामाबाबत जनजागृती केली जाणार आहे. संपूर्ण आठवडाभर लहान मुलेमोठी माणसेसर्वांनी राष्ट्रध्वज लावा. देशभरात सैन्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एक आंदोलन व्हावे. या प्रसंगी आपण लष्करी दलाचे ध्वज वितरीत करू शकतो. आपल्या अवती-भवतीआपल्या परिचयातील कोणीही सैन्यदलाशी संबंधित असतील तर त्यांचे अनुभवत्यांच्या धाडसी कारवायात्यांच्याशी संबंधित चित्रफिती आणि छायाचित्रे #armedforcesflagday (hashtag armedforcesflagday) येथे पोस्ट करू शकतात. शाळांमध्येमहाविद्यालयांमध्ये सैन्यातील लोकांना आमंत्रित करून त्यांच्याकडून सैन्याच्या कामाबाबत अधिक माहिती घेता येईल. आपल्या नव्या पिढीला सैन्याबाबत अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ही फार मोठी संधी आहे. आपल्या संरक्षण दलातील सर्व जवानांच्या कल्याणासाठी धन संकलित करण्याचीही हीच संधी आहे. सैनिक कल्याण मंडळामार्फत युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठीजखमी सैनिकांच्या कल्याणासाठीत्यांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. आर्थिक योगदान देण्यासाठी ksb.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. आपण यासाठी रोखरहित पेमेंटसुद्धा करू शकता. याआज या प्रसंगी आपल्या सशस्त्र सैन्यदलाचे मनोबल उंचावण्यासाठी आपणही योगदान देऊ या. त्यांच्या कल्याणासाठी आपणही हातभार लावू या.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस आहे. माझ्या शेतकरी बंधु-भगिनींनाही मी काही सांगू इच्छितो. मृदा अर्थात माती हा पृथ्वीचा एक महत्वपूर्ण घटक आहे. आपण जे काही खातोते सर्व काही या मातीशी संबंधित आहे. एका प्रकारे संपूर्ण अन्नसाखळीच मातीशी जोडलेली आहे. कल्पना कराजर जगात पोषक मातीच नसेल तर काय होईलकल्पना सुद्धा भितीदायक वाटते ना. माती नसली तर झाडे-झुडुपे उगवणार नाहीतमग मानवी आयुष्याची तर कल्पनाच करायला नको. सजीव कसे तग धरणारआपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वी याबाबत विचार करण्यात आला आणि त्याचमुळे मातीच्या महत्वाबाबत आपण फार पूर्वीपासूनअगदी प्राचिन काळापासून सजग आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये एकीकडे शेतीप्रतीमातीप्रती भक्ती आणि आदराची भावना लोकांच्या मनात अगदी स्वाभाविकपणे असेलयाचे सहज प्रयत्न होत राहिले आणि त्याचबरोबर अनेक वैज्ञानिक पद्धतींच्या वापरामुळे मातीचे पोषणही होत राहिले. या देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात दोन बाबींना फार महत्व आहेआपल्या मातीविषयी भक्तीभाव आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोनातून तिची योग्य देखभाल. आपल्या देशातील शेतकरी परंपरांशी जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाप्रतीही सजग आहेतत्याचा शेतीमध्ये वापर करतातयाचा आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील टोहू गावभोरंज ब्लॉक आणि तेथील शेतकऱ्यांबद्दल मी ऐकले आहे. तेथील शेतकरी पूर्वी असंतुलीत पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करत होतेत्यामुळे तेथील मातीचा दर्जा खालावला होता. उत्पादन घटत गेलेत्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटले आणि मातीची उत्पादकताही कमी होत गेली. गावातील काही जागरूक शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले आणि त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण केले. जेवढी खतेपोषक तत्वे आणि जैविक खते वापरण्याचा सल्ला त्यांना देण्यात आलातो त्यांनी मान्य केला. परिणाम ऐकून आपणा सर्वांनाही आश्चर्य वाटेल की मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी माहिती देण्यात आलीजे मार्गदर्शन मिळालेत्याच्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. रब्बी 2016-17 मध्ये गव्हाच्या उत्पादनात एकरी तीन ते चार पटीने वाढ झाली आणि उत्पन्नातही एकरी चार ते सहा हजार रूपये इतकी वाढ झाली. त्याचबरोबर मातीचा दर्जाही सुधारला. खतांचा कमी वापर झाल्यामुळे आर्थिक बचतही झाली. माझे शेतकरी बांधव मृदा आरोग्य कार्डवर दिलेल्या सल्ल्यावर अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आलेहे पाहून मला मनापासून आनंद झाला आहे. सकारात्मक परिणाम पाहून या शेतकऱ्यांचा उत्साहही वाढत आहे. पिकाबद्दल काळजी वाटत असेल तर मातीची काळजी घेतली पाहिजे. आपण या जमिनीचीधरणी मातेची काळजी घेतली तर ती सुद्धा आपली काळजी घेईलहे आता शेतकऱ्यांनाही पटू लागले आहे. आपल्या मातीची अधिक चांगली माहिती मिळावी आणि त्यानुसार पिक घेता यावेयासाठी देशभरातल्या 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य कार्ड तयार करून घेतली आहेत. आपण धरणी मातेची भक्ती करतो मात्र युरीयासारखी खते या धरणीमातेच्या आरोग्यासाठी किती अपायकारक आहेतयाचा विचार आपण केला काआवश्यकतेपेक्षा जास्त युरीयामुळे जमिनीची हानी होतेहे अनेक वैज्ञानिक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. शेतकरी तर या धरणी मातेचा सुपुत्र आहे. मग तो आपल्या मातेला आजारी कसे पडू देईलमाता आणि पुत्राचे हे संबंध पुनरूज्जीवीत करणे ही काळाची गरज आहे. 2022 सालापर्यंतम्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होतीलतोपर्यंत आपल्या शेतीसाठीच्या युरीयाचा वापर निम्म्यावर आणण्याचा संकल्प आमचे शेतकरी करू शकतील काएकदा धरणी मातेच्या सुपुत्रांनीशेतकऱ्यांनी हा संकल्प केला की धरणीच्याजमिनीच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होईलउत्पादनातही वाढ होईल. शेतकऱ्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येईल.

 

जागतिक तापमान वाढवातावरणातील बदलहे आता आपण अनुभवू लागलो आहोत. एक काळ असा होताजेव्हा दिवाळीपूर्वी थंडी सुरू होत असे. आता डिसेंबर येऊन ठेपला आहे आणि अगदी सावकाश थंडी सुरू होते आहे.  थंडी सुरू झाली की अंथरूणातून बाहेर पडावेसे वाटत नाहीहा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. मात्र अशा ऋतूतही जागरूक असणारे लोक परिणामकारक काम करतात आणि त्यांची उदाहरणे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देतात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की मध्य प्रदेशमधील तुषार या अवघ्या ८ वर्षांच्या दिव्यांग बालकाने आपले गाव शौचमुक्त करण्याचा निर्धार केला. इतक्या मोठ्या स्तरावरचे काम आणि एवढा लहानसा मुलगा. मात्र निर्धार आणि संकल्प या सर्वांपेक्षा मोठा होतासशक्त होता. आठ वर्षांचा मुलगा बोलू शकत नव्हतापण त्याने शिट्टीचा आधार घेतला. सकाळी 5 वाजता उठून हा मुलगा गावातील घराघरात जाऊन हातवारे करून उघड्यावर शौच न करण्याबद्दल सांगत होता. रोज किमान 30-40 घरांमध्ये जाऊन स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या या बालकाच्या प्रयत्नांमुळे हे कुम्हारी गाव उघड्यावरील शौचमुक्त झाले. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी या लहानशा बालकाने खरोखरच प्रेरणादायी काम केले. स्वच्छतेच्या आग्रहाला वय नसतेमर्यादा नसतेहे यावरून दिसून येते. लहान असो किंवा मोठेस्त्री असो वा पुरूषस्वच्छता प्रत्येकासाठी महत्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमचे दिव्यांग बंधु-भगिनी दृढ-निश्चयी आहेतसमर्थ आहेतधाडसी आहेत आणि संकल्पाचे पक्के आहेत. प्रत्येक क्षणी काही नवे शिकायला मिळते. आज ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. खेळ असोस्पर्धा असोसामाजिक उपक्रम असोआमचे दिव्यांग कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. आपणा सर्वांना आठवत असेलरियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या दिव्यांग खेळाडूंनी उत्तम खेळ करत 4 पदकांची कमाई केली होती आणि अंधांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटचा विश्वचषकही त्यांनी पटकावला. देशभरात अनेक प्रकारच्या स्पर्धा सुरू असतात. काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे 17 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध भागांमधून आलेले दिव्यांग बंधू-भगिनी या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांनी आपले कौशल्य दाखवले. त्यात गुजरातमधील 19 वर्षांचे जीगर ठक्कर यांचाही समावेश होता. त्यांच्या शरीराच्या 80 टक्के भागात मांसपेशी नाहीतमात्र त्यांचे धाडससंकल्प आणि मेहनत बघा. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले 19 वर्षांचे जीगर ठक्करत्यांच्या शरीराच्या 80 टक्के भागात मांसपेशी नाहीत आणि त्यांनी 11 पदके जिंकली.  70 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या याच कौशल्यामुळे 20-20 पॅरालिम्पीकसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांची निवड केली. 32 पॅरा जलतरणपटूंमध्ये त्यांचा समावेश आहे आणि या सर्वांना गुजरातमधील उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवा जीगर ठक्कर यांच्या या धाडसाला मी अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज दिव्यांगांसाठीच्या उपलब्धतेवर आणि त्यांना संधी प्राप्त करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सशक्त असावीयासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एका समावेशक समाजाची निर्मिती व्हावी. ‘सम’ आणि ‘मम’ भावनेतून समाजातील समरसता वाढावी आणि सर्वांनी एकत्रितपणे पुढे चालत राहावे.

 

काही दिवसांनंतर ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ साजरी केली जाईल. या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद साहेबयांचा जन्म झाला होता. मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईदचा हा सण समाजात शांतता आणि सद्‌भावना वाढविण्यासाठी आपल्या सर्वांना नवी प्रेरणा देईलनवी उर्जा देईलनवा संकल्प करण्याचे सामर्थ्य देईलअशी आशा मला वाटते.    

 

(फोन-कॉल)

 

नमस्कार प्रधानमंत्री जी मी कानपुरहून नीरजा सिंग बोलते आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही वर्षभरात ‘मन की बात’च्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्यात्यातील सर्वात चांगल्या दहा गोष्टी पुन्हा एकदा आम्हाला सांगा. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी पुन्हा आठवतील आणि आम्हाला आणखी काही नवे शिकता येईल. धन्यवाद.

 

(फोन-कॉल समाप्त)

 

आपण योग्य तेच बोलताय. 2017 वर्ष संपते आहे2018 ची चाहूल लागली आहे. आपण फारच चांगली सूचना केली आहे. आपले बोलणे ऐकल्यानंतर मला त्यात आणखी भर घालावीशी वाटतेबदल करावासा वाटतो. आपल्याकडे गावात जी जुनी-जाणती माणसे असतातती नेहमी सांगतातदु:ख विसरासुखाचा विसर पडू देऊ नका. दु:ख विसरासुखाचा विसर पडू देऊ नका. मला वाटतेआपण या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे. आपणही 2018 मध्ये शुभ गोष्टींचे स्मरण करत शुभ संकल्प करत प्रवेश करावा. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडेकदाचित जगभरातही वर्षाच्या अखेरीस सर्व जण आढावा घेतातचिंतन-मनन करतातमंथन करतात आणि पुढच्या वर्षासाठी योजना तयार केल्या जातात. आपल्याकडे प्रसार माध्यमे तर वर्षभरातील स्मरणीय घटनांच्या आठवणी नव्याने ताज्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मकही असतात. मात्र 2018 मध्ये प्रवेश करताना आपण चांगल्या गोष्टी आठवतचांगले करण्याचा विचार करावाअसे तुम्हाला वाटत नाही कामी आपणा सर्वांना एक सल्ला देतो. ज्या काही 5-10 चांगल्या सकारात्मक बाबी आपण ऐकल्या असतीलपाहिल्या असतीलअनुभवल्या असतील आणि ज्या जाणून घेतल्यावर लोकांच्या मनातही शुभ भावना जागतील. आपण यात योगदान देणार काया वर्षी आपण आपल्या आयुष्यातील 5 सकारात्मक अनुभव आम्हाला सांगू शकता कामग ते छायाचित्र असोलहानसा किस्सा असोगोष्ट असो किंवा लहानशी ध्वनीचित्रफीत असो. मी निमंत्रित करतो की 2018 चे स्वागत आपल्याला शुभ वातावरणात करायचे आहेशुभ आठवणींसोबत करायचे आहे. सकारात्मक विचारांसह करायचे आहे. सकारात्मक गोष्टींना उजाळा देऊन करायचे आहे.

 

    या, NarendraModi App वर, MyGov वर किंवा social media वर #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) सह सकारात्मक बाबी शेअर करा. इतरांना प्रेरणा देणाऱ्या घटनांना उजाळा द्या. चांगल्या गोष्टी कराल तर चांगले करावेअसे मनातून वाटेल. चांगल्या गोष्टींमधून अधिक चांगले करण्याची उर्जा मिळते. शुभ-भावनाशुभ-संकल्पांची प्रेरणा देतात. शुभ-संकल्पशुभ-परिणाम प्रदान करतात.

 

याया वेळी #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) पहा. बघाया वर्षी आपण सगळे मिळून एक जबरदस्त सकारात्मक वातावरण निर्माण करून नव वर्षाचे स्वागत करू. या एकत्रित प्रयत्नांची ताकत आणि त्याचा प्रभाव आपण सगळे मिळून पाहू. मी निश्चितच ‘मन की बात’ च्या पुढच्या अध्यायात#PositiveIndia (हॅशटॅग Positive India) वर आलेले अनुभव देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.

 

माझ्या प्रिय देशवासीयांनोपुढच्या महिन्यात, ‘मन की बात’ साठी पुन्हा एकदा आपणा सर्वांशी संवाद साधेन. अनेक गोष्टी बोलायची संधी मिळेल. अनेकानेक आभार!! 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government