पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.
यावेळी भूतानच्या पंतप्रधानांनी, कोविड -19 महामारीच्या विरूद्धच्या लढ्यात भारत सरकार आणि भारतीय जनता यांच्यासोबत एकता दर्शवली. पंतप्रधानांनी, भूतान सरकार आणि तेथील जनतेचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल आभार मानले.
तसेच पंतप्रधानांनी भूतानच्या महामहिम राजांच्या नेतृत्त्वात या महामारीच्या विरूद्धच्या लढ्यातील भूमिकेबद्दल भूतानची प्रशंसा केली आणि त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांसाठी लियोनचेन यांचे अभिनंदन केले.
या दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली की सध्याचे संकट भारत आणि भूतानमधील विशेष मैत्रीला आणखी चालना देऊ शकते. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध, परस्पर समन्वय, परस्पर आदर, सामायिक सांस्कृतिक वारसा आणि लोकांमध्ये सुसंवाद यावर आधारित आहेत.