पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष एच .इ जोको विडोडो यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संभाषण केले.
पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या सुलावेसी येथे अलीकडेच भूकंप आणि त्सुनामीमुळे प्राण गमावलेल्या लोकांना
भारताच्या नागरिकांतर्फे आणि स्वतः पंतप्रधानांतर्फे हृदयापासून श्रद्धांजली अर्पण केली.
या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्तिथीत इंडोनेशियाच्या नागरिकांनी दाखविलेल्या
सहनशीलता आणि धैर्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले .
इंडोनेशियाने आंतरराष्ट्रीय मदतीसाठी केलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून पंतप्रधानांनी इंडोनेशियाचे समुद्रीय शेजारी राष्ट्र आणि इंडोनेशियाचे
मित्र म्हणून भारताकडून शक्य तितकी मदत देण्याची तयारी दर्शविली. राष्ट्राध्यक्ष विदोडो यांनी सहानुभूती आणि सहकार्यासाठी पंतप्रधानांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी भारता ने केलेल्या मदत सहाय्याची माहिती राजनैतिक आणि अधिकृत माध्यमांद्वारे देण्याला सहमती दर्शविली.