पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडी आणि त्याचा प्रदेश तसेच जगावर परिणाम यासंदर्भात उभय नेत्यांनी चर्चा केली. मोठी जिवीतहानी झालेल्या काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी स्पष्टपणे निषेध केला. स्थिर आणि सुरक्षित अफगाणिस्तानचे महत्त्व अधोरेखित करत या संदर्भात भारत आणि युरोपियन महासंघ काय संभाव्य भूमिका घेऊ शकतात यावर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर विशेषत: अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली.
Spoke with @eucopresident Charles Michel, President of the European Council, about the evolving situation in Afghanistan. Also reiterated our commitment to further strengthening India-EU relations.
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2021