India is the land of Lord Buddha, Mahatma Gandhi and Sardar Patel. It is the land of non-violence: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat: Violence in the name of faith is unacceptable, no one above law, says PM Modi
India is the land of diversities and our festivals reflect these diversities: PM during #MannKiBaat
Festivals are not only symbols of faith for us, but they are also associated with Swachhata: PM Modi during #MannKiBaat
Sports must become a part of our lives. It ensures physical fitness, mental alertness & personality enhancement: PM during #MannKiBaat
This Teachers’ Day, let us resolve that we would Teach to Transform, Educate to Empower, Learn to Lead: PM Modi during #MannKiBaat
#MannKiBaat:Teachers have a key role in transformation of society, says PM Modi
'Pradhan Mantri Jan-Dhan Yojana' has brought poor into the economic mainstream of India: PM Modi during #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासीयांनो, सादर नमस्कार. एकीकडे संपूर्ण देश उत्सव मनवत असतांना दुसरीकडे भारताच्या कुठल्या तरी भागातून हिंसेची बातमी येते तेंव्हा देशाची चिंता होणे स्वाभाविक आहे. हा आपला देश बुद्ध आणि गांधींचा देश आहे. देशाच्या ऐक्यासाठी आपले प्राणपणाला लावणाऱ्या सरदार पटेलांचा देश आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या पूर्वजांनी सार्वजनिक जीवन मूल्यांना, अहिंसेला, समान आदराने स्वीकार केले आहे आमच्या नसानसात ते भिनले आहे. 'अहिंसा परमो धर्मा' हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मी लाल किल्यावरून सुद्धा सांगितले होते की आस्थेच्या नावावर हिंसा खपून घेतली जाणार नाही. जरी ती सांप्रदायिक आस्था असेल किंवा राजनैतिक विचारधारेबद्दल आस्था असेल, जरी व्यक्तीबद्दल आस्था असेल, जरी परंपरेबद्दल आस्था असेल, आस्थेच्या नावावर कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले आहे त्यात प्रत्येकाला न्याय मिळवण्याची व्यवस्था आहे .

मी देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो की कायदा हातात घेणारे, हिंसेच्या मार्गानी दमण करणाऱ्या जरी त्या व्यक्ती असतील किंवा समूह असतील हा देश कधीच सहन करणार नाही आणि कोणतेही सरकार सहन करणार नाही . प्रत्येकाला कायद्या समोर झुकावेच लागेल. कायदा त्याची दखल घेईल आणि दोषींना सजा निश्चित देईल.

माझ्या प्रिय देशबांधवानो, आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि या विविधता खानपान, राहणीमान, परिधान इथपर्यंत मर्यादित नाहीत, तर जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपल्याला विविधता दिसते, इथपर्यंत की आपले सण सुद्धा विविधतेने नटलेले आहेत. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा असल्या कारणांने सांस्कृतिक परंपरा, सामाजिक परंपरा बघा, ऐतिहासिक घटना घडामोडी पहाल तर कदाचित ३६५ दिवसात एक ही दिवस शिल्लक राहत नसावा की जो सणाशिवाय राहत असेल. आता आपण हे ही पाहिले असेल की आपले सण निसर्ग चक्रानुसार चालत असतात. निसर्गाशी सरळ-सरळ संबंध असतो. आपले बहुतेक सण तर शेतकऱ्यांशी जोडलेले असतातात. मच्छीमारांशी संबंधित असतात.

आज मी सणासंदर्भात बोलतो आहे. तर सर्वप्रथम मी आपल्याला ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणू इच्छितो. जैन समाजात काल संवत्सरीचा सण साजरा करण्यात आला. जैन समाजात भाद्रमासात पर्युषण पर्व साजारा केला जातो. पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी संवत्सरीचा दिवस असतो. ही खरच एक विलक्षण परंपरा आहे. संवात्सारीचा दिवस, क्षमा, अहिंसा आणि मैत्रीचे प्रतिक आहे. ह्याला एका प्रकारे क्षमा-वाणी दिवस सुद्धा म्हंटल जात आणि ह्या दिवशी एकमेकांना मिच्छामी दुक्कडम म्हणण्याची परंपरा आहे. तसे ही आपल्या शास्त्रात ‘क्षमा वीरस्य भूषणं’ म्हणजे क्षमा वीरांचे भूषण आहे. क्षमा करणारा वीर असतो. ही चर्चा तर आपण ऐकत आलो आहोत आणि महात्मा गांधी तर नेहमी म्हणत असत - क्षमा करणे ही बलवान मनुष्याची विशेषता आहे.

शेक्सपीयरने आपल्या नाटकात ‘The Marchant of Venice’ मध्ये क्षमा भावाचे महत्व समजावतांना लिहिले आहे ‘Marcy is twice blest, it blesseth him that gives and him that takes’ म्हणजे क्षमा करणारा आणि ज्याला क्षमा केली गेली असा तो, दोघेही ईश्वराच्या आशिर्वादाला प्राप्त होतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाच्या काना-कोपऱ्यात गणेश-चतुर्थी मोठ्या आनंदाने साजरी करण्यात येत आहे. गणेश-चतुर्थी विषय येतो तेंव्हा सार्वजनिक गणेशोत्सवावर बोलणे स्वाभाविक आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १२५ वर्षांपुर्वी ह्या परंपरेला जन्म दिला. मागील १२५ वर्षे स्वातंत्र्याच्या पूर्वी ते स्वतंत्र आंदोलनाचे प्रतिक बनले आहे आणि स्वातंत्र्यानंतरही समाज-शिक्षण, सामाजिक चेतना जागविण्याचे प्रतिक बनले आहे. गणेश-चतुर्थीचा सण दहा दिवस चालतो. या महासणाला एकता, समता आणि शुचितेचे प्रतिक मानले जाते. सर्व देश बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

नुकताच केरळमध्ये ‘ओणम’ हा सण साजरा करण्यात आला. भारतातील विविधरंगी सणामधील एक ‘ओणम’ केरळचा प्रमुख सण आहे. हा सण आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्वामुळे ओळखला जातो. ओणम सण केरळची समृद्ध सांस्कृतिक परंपरा प्रदर्शित करत असतो. हा सण समाजात प्रेम, नवा विश्वास जागृत करत असतो. सध्या हे आमचे सण ही पर्यटनाच्या आकर्षणाचे कारण होताना दिसत आहेत. मी तर देशवासियांना सांगेन की जसे गुजरातमध्ये नवरात्रीचा सण किंवा बंगालमध्ये दुर्गा उत्सव हे एका प्रकारे पर्यटनाचे आकर्षण बनले आहे. तसेच आपले इतरही सण विदेशीयांना आकर्षित करण्याची एक संधी आहेत. त्या दिशेनी आपण काय करू शकतो, याचा विचार करावा लागेल.

या सणांच्या श्रृंखलेत कांहीच दिवसांनी संपूर्ण देशात ‘ईद-उल-जुहा ’ हा सण ही साजरा केला जाईल. सर्व देशवासीयांना ‘ईद-उल-जुहा’च्या हार्दिक शुभेच्छा. सण आपल्यासाठी आस्था आणि विश्वासाचे प्रतिक तर आहेतच. आपल्या नव्या भारताच्या सणानां स्वच्छतेचे प्रतिक बनवायचे आहे. कौटुंबिक जीवनात तर सण स्वच्छतेशी जोडले आहेत. सणाच्या तयारीचा अर्थ आहे -स्वच्छता ही आपल्यासाठी कांही नवीन गोष्ट नाही. परंतु हा सामाजिक स्वभाव होण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक रूपात स्वच्छतेचा आग्रह फक्त घरात नाही, संपूर्ण गावात, संपूर्ण नगरात, संपूर्ण शहरात, आपल्या राज्यात, आपल्या देशात-स्वच्छता ही सणांसोबत एक अतूट भाग बनायला हवा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आधुनिक होण्याची व्याख्या बदलत चालली आहे. सध्या एक नवीन दृष्टीकोन एक नवीन मापदंड की आपण किती संस्कारी आहोत, किती आधुनिक आहोत, आपली वैचारिक क्षमता प्रक्रिया किती आधुनिक आहे हे जाणून घेण्यासाठी एका तराजूचा वापर होत आहे आणि तो आहे इको मैत्रित्वाचा, पर्यावरणस्नेही व्यवहाराचा, जो याच्या विरोधात आहे, समाजात जर कोणी याच्या विरोधात असेल तर आज वाईट मानल जात. ‘इको फ्रेंडली गणपती’ असे मोठे अभियान उभे केले आहे. जर तुम्ही यु टयुब पहाल तर प्रत्येक घरातील मुल गणपती बनवत आहे. माती आणून गणपती बनवले जात आहेत. त्याला रंगरंगोटी केली जात आहे. कोणी भाज्यांचे रंगकाम करत आहेत, कोणी कागदाचे तुकडे चीटकवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग प्रत्येक कुटुंबात होत आहेत. एका प्रकारे पर्यावरण जागरुकतेचे इतके व्यापक प्रशिक्षण या गणशोत्सावात बघायला मिळतात. कदाचित यापूर्वी मिळालेही नसेल. माध्यम गृहे सुद्धा मोठ्या संखेत इको फ्रेंडली गणेश-मूर्तींसाठी लोकांना प्रशिक्षित करत आहेत. प्रेरित करीत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. बघा किती मोठा बदल झाला आहे आणि हा सुखद बदल आहे. जसे मी म्हणालो देश करोडो-करोडो तेजस्वी बुद्धी ने भरलेला आहे. आणि बर वाटत जेंव्हा नव-नवीन प्रयोग जाणतो. मला कोणीतरी सांगितले की कोण्या एका गृहस्थाने आहेत ते स्वतः इंजिनियर आहेत. त्यांनी एक विशिष्ठ प्रकारची माती एकत्र करून त्याला आकारबद्ध करून गणेश जी बनवायचे प्रशिक्षण लोकांना दिले. त्यानंतर एक छोट्या बादलीत गणेश विसर्जन होते, तर ते त्यात ठेवल्यावर लगेच मिसळुन जात असते आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यात एक तुळशीचे झाड लावले. तीन वर्षांपूर्वी जेंव्हा स्वच्छता अभियान सुरू केले होते, 2 ऑक्टोबरला तीन वर्ष होतील. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. शौचालय सक्ती 39 टक्क्यांवरून जवळ-जवळ 67टक्क्यांवर पोहचला आहे. 2 लाख 30 हजारांपेक्षा ही अधिक गावे उघड्यावर शौचापासून स्वतःला मुक्त घोषित केली आहेत.

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भयंकर पूर आला. बरेच लोक आपले प्राण गमवून बसले परंतु पुराचे पाणी जेंव्हा कमी झाले तेंव्हा प्रत्येक ठिकाणी जागो-जागी घाण पसरली होती. अश्या वेळी गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील धानेरामध्ये जमियात उलेमा-ए-हिंदच्या कार्यकर्त्यांनी पुरानी प्रभावित 22 मंदिरे आणि 3 मस्जिदिची क्रमबद्ध पद्धतीने साफ-सफाई केली. स्वत:चा घाम गाळला, सगळे लोक निघाले. स्वच्छतेसाठी एकतेचे उत्तम उदाहरण, प्रत्येकाला प्रेरणा देणारे उदाहरण, जमियात उलेमा-ए-हिंदच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिला. स्वच्छतेसाठी समर्पण भावनेने प्रयत्न केले. जर हा आमचा स्थायी भाव बनला तर आपला देश कुठच्या कुठे जाऊ शकेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आपणा सर्वांना एक आव्हान करतो की पुन्हा एक वेळ 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या 15-20 दिवसापूर्वी 'स्वच्छता ही सेवा' जसे आधी म्हणत होतो 'जल सेवा ही प्रभू सेवा', ' स्वच्छता ही सेवा' ही मोहीम चालवू. पूर्ण देशात स्वच्छतेचे वातावरण बनवावे. जशी संधी मिळेल, जेंव्हा मिळेल, आपण संधी शोधली पाहिजे. परंतु आपण सर्व एकत्र येऊ. याला एका प्रकारे दिवाळीची तयारी मानू, याला एक प्रकारची नवरात्रची तयारी मानू, दुर्गा पूजेची तयारी मानू, श्रमदान करू. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी एकत्र येऊ आणि एकत्र काम करू. आजू बाजूच्या वस्त्यांमध्ये जाऊ पण एका आंदोलनाप्रणाने काम करू. मी सर्व NGOsनां, शाळांना, कॉलेजांना, सामाजिक, सांस्कृतिक राजनैतिक नेतृत्वांना सरकारी अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना, सरपंचांना प्रत्येकाला आग्रह करतो की 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या अगोदर 15 दिवस आपण एक अश्या स्वच्छतेचे वातावरण बनऊ. अशी स्वच्छता उभी करू की खरच गांधींच्या स्वप्नातील 2 ऑक्टोंबर होईल. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, MyGov.in वर एक विभाग बनवला आहे जिथे शौचालय निर्माणानंतर आपले नाव आणि त्या कुटुंबाचे नाव लिहू शकता, ज्याची आपण मदत केली आहे. माझे सोशल मिडीयाचे मित्र काही रचनात्मक अभियान चालवू शकतात आणि वास्तव जगाच्या धर्तीवर काम होईल त्याची प्रेरणा बनू शकतात. स्वच्‍छ-संकल्पनेतील स्वच्‍छ-सिद्धी स्पर्धा, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालया द्वारे हे अभियान ज्यात निबंध स्पर्धा, लघु फिल्म बनविण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यात आपण विविध भाषेत निबंध लिहू शकता आणि त्यात काही वयाचे बंधन नाही. काही वयोमर्यादा नाही. आपण लघुचित्रपट बनवू शकता आपल्या मोबाईने बनवू शकता. 2-3 मिनिटांची फिल्म बनूव शकता की जी स्वच्छतेसाठी प्रेरणा देईल. ती कोणत्याही भाषेत असू शकते. ती अबोल सुद्धा असू शकते. जे या स्पर्धेत भाग घेतील त्यातील तीन लोक निवडले जातील जिल्हा पातळीवर तीन असतील राज्य पातळीवर तीन असतील त्यांना पुरस्कार देण्यात येतील. मी तर प्रत्येकाला निमंत्रण देतो की या स्वच्छता मोहिमेशी जोडले जा.

मी पुन्हा एकवार सांगू इच्छितो की यावेळी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला ' स्वच्छ 2 ऑक्टोबर' साजरा करण्याचा संकल्प करा आणि यासाठी 15 सप्टेंबर पासूनच स्वच्छता ही सेवा हा मंत्र घर-घरात पोहचवा. स्वच्छतेसाठी काही-न-काही तरी पावले उचलला. स्वतः परिश्रम करून याचा भाग व्हा. तुम्ही पहा गांधी जयंतीला ही 2 ऑक्टोबर संकल्पना कशी चमकेल. तुम्ही कल्पना करू शकता 15 दिवसाच्या या स्वच्छता अभियानंतर स्वच्छता ही सेवा नंतर 2 ऑक्टोबरला जेंव्हा गांधी जयंती साजरी करू तेंव्हा खऱ्या अर्थानी पूज्य बापूंना श्रद्धांजली देतानां आपल्याला सुखद आनंद होईल.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी आज विशेष रूपाने आपले आपले ऋण स्वीकारु इच्छितो. हृदयाच्या खोलातून मी आपले आभार व्यक्त करतो, यासाठी नाही की आपण फार काळापासून ‘मन की बात’शी जोडले गेले आहोत. मी यासाठी आभार व्यक्त करू इच्छितो, ऋण स्वीकार करू इच्छितो की ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील करोडोंच्या संख्येने लॉग जोडले जात आहेत. ऐकणाऱ्यांची संख्या करोडो आहे. परंतु लाखो लोक मला पत्र लिहीत आहेत, कधी निरोप देतात, कधी फोनवर संदेश येतात माझ्यासाठी हा मोठा खजाना आहे. देशातील जनतेच्या मनातील भावना मला समजून घेण्याची संधी मिळते आहे. तुम्ही जितकी आतुरतेने ‘मन की बात’ची वाट पाहता तितकीच मी आपल्या संदेशाची वाट पाहत असतो. मी आतुर असतो कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीतून मला काही शिकायला मिळते. मी जे काही करतो आहे ते कसोटीवर खरे उतरते की नाही हे पाहण्याची संधी मिळते. बऱ्याच गोष्टीबद्दल नव्याने विचार करण्यासाठी आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी कामाला येतात आणि म्हणून मी आपल्या योगदानाबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपले ऋण स्वीकारतो. माझा जास्तीत जास्त असा प्रयत्न असतो की, कमाल गोष्टी पाहून वाचून समजू शकू. आपण आपल्या मोबाईल फोनला सहसंबंधित करीत असाल. आपण अशा चुकीच्या सवयींचा एक भाग बनून जातो.

“प्रधानमंत्री जी ,मी पुण्यावरून अपर्णा बोलते. मी माझ्या मैत्रिणीबद्दल सांगू इच्छिते ती नेहमी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न पण तिची एक सवय पाहून मी थक्क झाले. मी एकदा तिच्यासोबत शॉपिंग मॉल मध्ये गेले होते. एका साडीवर तिने दोन हजार रुपये आरामात खर्च केले आणि 450 रुपये पिझ्यावर पण त्यापूर्वी जेंव्हा तिने मॉलमध्ये जाण्यासाठी रिक्षा केली आणि बराच वेळ पाच रुपयासाठी रिक्षावाल्याशी वाद घालत होती. तसेच मॉलमधून परत येत असताना भाजीवाल्याशी भाव करत होती अस करून 4-5 रुपये तिने वाचवले मला फार वाईट वाटले. आपण मोठ्या ठिकाणी काहीही भाव न करता पेमेंट करतो, पण आपल्या कष्टकरी बांधवांशी भांडण करतो त्यांच्यावर अविश्वास दर्शवतो. आपण ‘मन की बात’ या कार्यक्रमातून या विषयावर अवश्य बोलावे.”

आता असा फोन कॉल ऐकल्यावर मला नक्की विश्वास आहे की आपण आश्चर्य चकित झाला असाल सतर्क सुद्धा झाला असाल असे ही होऊ शकते?

काय आपल्याला असे वाटत नाही की आपल्या घराजवळ, आस पास फेरीवाले काही सामान विकणारे, छोटे दुकानदार, भाजी विकणारे यांच्याशी नेहमी संबंध येतो कधी ओटो रिक्षावाल्यांशी संबंध येतो. जेंव्हा कष्ट करणाऱ्यांशी आपला संबध येतो, तेव्हा आपण त्याच्याशी मालाचा भाव करतो. इतकेच नाही दोन पाच रुपये कमी करावयास सांगतो आणि आपणच असतो मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो की बिल सुद्धा पाहत नाही पैसे देऊन टाकतो. इतकेच नाही शोरुम मध्ये साडी विकत घेताना कधीच भाव करत नाही. गरीबाच्या मनाला काय वाटत असेल याचा कधी विचार केला आहे? त्याच्यासाठी प्रश्न रुपया रुपायाचा नाही त्यांच्या हृदयाला किती यातना होत असतील. तो गरीब आहे म्हणून त्याच्या इमानदारीवर शंका घेतली दोन-पाच रुपयांनी तुमच्या जीवनात फरक पडत नसेल पण आपली ही छोटीशी सवय त्याला किती मोठा धक्का देत असेल कधी विचार केला? मैडम मी आपला आभारी आहे आपण हृदयाला स्पर्श करणारा फोन कॉल करून मला एक संदेश दिला आहे. मला विश्वास आहे माझे देशावासी सुद्धा गरिबांशी असा व्यवहार करणे सोडून देतील.

माझ्या प्रिय नवजवान मित्रांनो, २९ ऑगस्टला पूर्ण देश राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करीत असतो. हा महान हॉकी खेळाडू आणि हॉकीचा जादुगार मेजर ध्यानचंदजीचा जन्म दिवस आहे. हॉकीसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. मी या गोष्टीचे स्मरण यासाठी ही करू इच्छितो की, मला वाटते की आपल्या देशातील नवी पिढी खेळांशी जोडली जावी. खेळ आमच्या जीवनाचा अंग बनले पाहिजे. जर आम्ही जगातील युवा देश आहोत, तर आमच्या देशातील तरुणाई खेळाच्या मैदानात दिसली पाहिजे. क्रीडा म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, बौद्धिक तत्परता, भावनिक सहसंबंधत्व. मी समजतो याच्या पेक्षा अधिक काय पाहिजे? खेळ एक प्रकारे हृदयाला जोडणारी जडीबुटी आहे. आमची युवा पिढी खेळाच्या क्षेत्रात पुढे यावी, आज संगणकाच्या युगात मी आपल्याला खेळ स्थानकांपेक्षा क्रीडा क्षेत्र महत्वाचे आहे हे सांगु इच्छितो. कम्प्युटरवर फिफा खेळ खेळा पण बाहेरच्या मैदानावर काही तरी कामगिरी करुन दाखवा. कम्प्युटरवरील क्रिकेटपेक्षा मोकळ्या मैदानातील क्रिकेटचा खेळण्याचा आनंद काही वेगळाच आहे. एक वेळ होती कुटुंबातील मुले बाहेर जात होती तर आई विचारायची तू घरी कधी येशील. आज स्थिती अशी आहे की मुले घरी येताच कोपऱ्यात बसुन मोबाईलवर गेम्स किंवा कार्टून फिल्म्स पाहातात तेंव्हा आईला ओरडून विचारावे लागते की तू बाहेर कधी जाशील?

तो ही एक काळ होता जेंव्हा आई मुलाला म्हणायची तू कधी येशील आज अशी वेळ आली आहे की बाळा तू बाहेर कधी जाशील ?

तरुण मित्रांनो, खेळ मंत्रालयाने खेळ प्रतिभेचा शोध आणि त्याला फुलविण्यासाठी म्हणून क्रीडा बौद्धिक संशोधन पोर्टल बनविले आहे जिथे देशातील कोणतीही मुले ज्याने खेळात प्राविण्य मिळवले आहे, ज्याच्यात talent आहे तो या पोर्टलवर आपली माहिती किंवा व्हिडीओ अपलोड करू शकतो. निवडक विकसनशिल खेळाडूंना खेळ मंत्रालय प्रशिक्षण देईल आणि मंत्रालय उद्याच पोर्टलचे उद्‌घाटन करेल. आपल्या तरुणांना आनंदाची बातमी आहे की ६ ते २८ ऑक्टोबरमध्ये 17 वर्षाखालील फिफा जागतिक कपचे आयोजन करण्यात येत आहे. जगभरातील २४ चमु भारतात येत आहेत.

या, जगभरातून येणाऱ्‍या आपल्या तरुण पाहुण्याचे, खेळ उत्सवासोबत स्वागत करु या, खेळ enjoy करू, देशात एक वातावरण बनु या. आज मी खेळाबद्दल बोलत असतांना मागील आठवड्यात मनाला स्पर्शुन जाणारी घटना घडली जी मी नागरिकांना सांगू इच्छितो. मला एका छोट्या वयाच्या मुलींना भेटण्याची संधी मिळाली त्यात काही हिमालयात जन्मल्या होत्या. समुद्राशी ज्यांचे कधीच नाते नव्हते, अश्या आपल्या देशातील सहा मुली ज्या नौदलात काम करत होत्या त्यांची हिम्मत आणि आत्मविश्वास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. या सहा मुली छोटी बोट घेऊन INS तारिणी त्या समुद्र ओलांडण्यासाठी निघाल्या या अभियानाला नाव देण्यात आले ‘नाविका सागर परिक्रमा ’आणि त्या पूर्ण जगाचे भ्रमण करून काही महिन्यांनी भारतात परतल्या. कधी एकावेळी ४०-४० दिवस पाण्यात घालवले.कधी ३०-३० दिवस पाण्यात घालवले. समुद्राच्या लाटांमध्ये हिंमतीने या सहा मुली. ही जगभरातील पहिलीच घटना असेल. कोण भारतीय असेल ज्याला अश्या मुलींचा गर्व वाटणार नाही! मी या मुलींच्या हिंमतीला सलाम करतो आणि मी त्यांना म्हाणालो त्यांनी हा अनुभव सर्व देशवासियांना सांगावा. मी पण नरेंद्र मोदी ॲपवर त्यांच्या अनुभावासाठी एक वेगळी जागा उपलब्ध करून देणार आहे. कारण त्यांचे अनुभव आपण जरूर वाचावेत कारण ती एकाप्रकारची साहस कथा आहे, स्वानुभवाची कथा आहे आणि मला आनंद होईल या मुलींची गोष्ट आपल्यापर्यंत पोहचविल्यास, माझ्या या मुलींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

माझ्या प्रिय देशवासियांनो ५ सप्टेबरला आपण सगळे शिक्षक दिवस साजरा करतो. आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ राधाकृष्णनजींचा जन्म दिवस आहे. ते राष्ट्रपती होते पण जीवनभर ते एक शिक्षक म्हणून स्वत:ला प्रस्तुत करीत असत. ते नेहमी शिक्षकाच्या रुपात जगणे पसंत करीत होते. ते शिक्षणासाठी समर्पित होते. एक अभ्यासू, एक राजनैतिक भारताचे राष्ट्रपती पण प्रत्येक क्षणी ते शिक्षक होते. मी त्यांना नमन करतो.

महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्सटीन म्हाणाले होते It is the supreme art of the teacher of awaken joy in creative expression and knowledge. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मक भाव आणि ज्ञानाचा आनंद जागविणे हा शिक्षकाचा महत्वाचा गुण आहे. यावेळी जेंव्हा आपण शिक्षक दिवस साजरा करू तेंव्हा आपण मिळून एक संकल्प करू शकतो? कालबद्धरितीने अभियान आपण चालू या का? परिवर्तनासाठी शिकवा प्रोत्साहनात्मक शिक्षण द्या आणि नेतृत्वासाठी शिका, या संकल्पासोबत ही गोष्ट पुढे नेऊ शकतो का? प्रत्येकाला पाच वर्षासाठी एका संकल्पाशी बांधू या, त्याला सिद्ध करण्याचा मार्ग दाखवू या आणि पाच वर्षांनी आपण संकल्प पूर्तीचा आनंद घेऊन जीवन सफल होण्याचा आनंद होऊ शकेल. असा आनंद आपल्या शाळेत, कॉलेजात आमचे शिक्षक, आमच्या शिक्षण संस्था करू शकतात आणि जेंव्हा आम्ही आपल्या देशात परिवर्तनाबद्दल बोलू तेंव्हा जसे आपल्या कुटुंबात आईची आठवण येते तशी आपल्या शिक्षकाची आठवण यावी. परिवर्तनामध्ये शिक्षकाची मोठी भूमिका असते. प्रत्येक शिक्षकाच्या जीवनात अशी एखादी घटना आहे की त्याच्या प्रयत्नांनी कोणाच्या तरी जीवनात परिवर्तनामुळे बदल झाला असेल. जर आपण सामुहिक प्रयत्न केला तर राष्ट्राच्या परिवर्तनामध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. चला परिवर्तनासाठी शिकण्याचा मंत्र घेऊन पुढे जाऊ या .

“प्रधानमंत्रीजी माझे नाव डॉक्टर अन्यन्या अवस्थी आहे. मी मुंबईत राहते हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय संशोधन केंद्रासाठी काम करते. एक संशोधक म्हणून वित्तीय समावेश या विषयात आवड आहे ज्याला आपण वित्तीय अंर्तभूतता म्हणतो त्याच्याशी संबधित सामाजिक योजनांच्या संबंधी माझा प्रश्न आहे की, २०१४ मध्ये जी जन धन योजना काढली होती ती आज तीन वर्षांनी आर्थिक रुपात जास्त सशक्त आणि महिलांना शेतकऱ्यांना मजुरांना गावा गावात मिळाली आहे का? धन्यवाद.”

माझ्या प्रिय देशवासियांनो! प्रधानमंत्री जन धन योजना आर्थिक अंर्तभूतता ही केवळ भारताचीच नाही तर पूर्ण जगातील आर्थिक जगतातील पंडितांच्या चर्चेचा विषय आहे. २८ ऑगस्ट २०१४ ला मनामध्ये एक स्वप्न घेऊन ही योजना सुरु केली होती. उद्या या योजनेला ३ वर्ष पूर्ण होत आहेत. ३० करोड नवीन कुटुंबाना जोडले गेले आहे, बँक खाते काढण्यात आली आहेत. आज मला आनंद होत आहे की समाजातील गरिबांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा हिस्सा बनवण्यात आले आहे. त्याच्या सवयी बदलल्या आहेत तो बँकेत जाऊ लागला आहे तो पैसे बचत करू लागला आहे. कधी पैसे हाताशी असतात, खिशात असतात तर खर्च करावेसे वाटतात. तो पैश्यांमुळे सुरक्षित अनुभव करतो आहे. आता एक संयमाचे वातावरण बनले आहे. त्याला ही वाटते की पैसे मुलांच्या कामी येतील. येणाऱ्‍या काळात काही चांगले काम करता येईल. इतकेच नाही तर जो गरीब आपल्या खिशात RuPay Card पाहतो तर श्रीमंतासारखा अनुभव करतो. त्याच्या खिशात ही क्रेडिट कार्ड आहे, माझ्या खिश्यात RuPay कार्ड आहे. तो एक सम्मानित अनुभव करतो. प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत ६५ हजार करोड रुपये बँकेत जमा आहेत, ही एका प्रकारे गरिबांची बचत आहे. येणाऱ्‍या काळात हीच त्यांची ताकद आहे आणि प्रधानमंत्री जनधन योजनेत ज्याचे खाते उघडण्यात आले आहे, त्याचा विमा सुद्धा उतरवण्यात आला आहे. 'प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना' एक रुपया, तीस रुपये, या मामुली हप्त्यामुळे आज गरिबांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे. कितीतरी परिवारात एक रुपायाच्या विम्यामुळे कुटुंबातील मुख्य आधाराला काही झाले तर त्याच्या परिवाराला 2 लाख रुपये मिळतील.

प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्ट अप योजना, स्टँड अप, दलित असो या आदिवासी असो महिला असो किंवा शिकून नुकताच बाहेर पडलेले युवक, करोडो करोडो युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन बँकेतून कसल्याही प्रकारचे तारण न ठेवता पैसे मिळतील आणि ते स्वत:च्या पायावर उभे राहतील इतकेच नव्हे तर प्रत्येकाने एकदा दुसऱ्याला नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न करावा. काही दिवसांपूवी बँकेतील लोक मला भेटले जन धन योजनेमुळे विम्याच्या कारणांनी, RUpay card मुळे प्रधानमंत्री योजनेमुळे सामान्य लोकांना कसा लाभ झाला आहे त्याचा त्यांनी सर्वेक्षण केले आणि फार प्रेरक घटना मिळाल्या. आज इतका वेळ नाही की परंतु मी बँकेच्या लोकांना सांगेन की My Gov.in वर अपलोड करावे. लोक वाचतील तर त्यांना प्रेरणा मिळेल की कोणती योजना व्यक्तीच्या जीवनात कसे परिवर्तन आणू शकते. कशी नवी ऊर्जा आहे, कसा नवा विश्वास उत्पन्न होत आहे, याचे शेकडो उदाहरणे माझ्या समोर आली आहेत.

आपल्या पर्यंत पोहचवण्याचा पूर्ण मी प्रयत्न करीन आणि अश्या प्रेरक घटना आहे की मीडियाचे लोक सुद्धा त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकतात ते ही अश्या लोकांच्या मुलाखती घेऊन नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकते.

माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा आपल्याला मिच्छामी दुक्कडम. खूप-खूप आभार.  

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.