कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात रामायण दर्शनम् प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
12 जानेवारी हा सामान्य दिवस नाही, असं सांगातनाच स्वामी विवेकानंदाचे तेजस्वी विचार आजही मनं घडवण्याचे कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आजचा भारत हा युवा देश आहे आणि त्याचा अध्यात्मिक आणि भौतिक असा दोन्ही विकास साधला पाहिजे. राष्ट्र उभारणीत, स्वामी विवेकानंदाचे विचार युवा पिढीसाठी सदैव स्फूर्तिदायी ठरतील असे पंतप्रधान म्हणाले.
संत तिरुवल्लूवर आणि विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली. शिक्षणाची प्रक्रिया सदैव सुरू राहिली पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.