कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. रायसीना चर्चेत सहभागी होण्यासाठी हार्पर भारतात आले आहेत.
भारत-कॅनडा संबंधांचा विकास, जागतिक स्तरावरचे मुख्य मुद्दे, लोकशाहीमधले सहकार्य यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.