आम्ही, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, दारूस्सलाम, इं‍डोनेशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, अमेरिका आणि व्हिएतनाम हे  हिंद- प्रशांत क्षेत्रातले देश आमच्या वाढत्या  क्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील  समृदधता आणि विविधता मान्य करतो. आम्ही मुक्त, खुल्या आणि निष्पक्ष,सर्वसमावेशक, परस्परांना जोडलेल्या, लवचिक, सुरक्षित आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध आहोत. ज्यामध्‍ये शाश्‍वत आणि सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी साध्‍य करण्‍याची क्षमता आहे. आम्हाला माहिती आहे की, या क्षेत्रातल्या आमच्या आर्थिक धोरणाचे हितसंबंध एकमेकांमध्‍ये गुंतलेले आहेत. त्याचबरोबर भागीदारांमधील आर्थिक कटिबद्धता वाढवणे हे निरंतर वाढ, शांतता आणि समृदधीसाठी महत्‍वाचे आहे.

लवचिकता, शाश्‍वतता, आणि सर्वसमावेशकता यावर आर्थिक पुनर्प्राप्ती आणि प्रगती  सुनिश्चित करण्यासाठी ए‍कत्रित काम करण्‍याची आवश्‍यकता कोविड -19 महामारीने अधोरेखित केली. आमचे कामगार, महिला, मध्‍यम आणि लघु-उद्योग आणि आमच्या समाजातील सर्वात असुरक्षित गटांच्या नोकरी-व्यवसायाला चालना देताना आणि आर्थिक संधींमध्‍ये सुधारणा घडवून आणताना, आर्थिक स्पर्धात्मकता आणि सहकार्य मजबूत करणे आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळी सुरक्षित करण्‍याचे महत्व या महामारीमुळे समजले; त्यामुळे या कामावर भर दिला आहे.

दीर्घकालीन, आर्थिक स्पर्धात्मकेची व्याख्‍या प्रामुख्‍याने तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची क्षमता, नवसंकल्पनांना चालना देणे, डिजिटल अर्थव्यवस्‍थेमध्‍ये सहभागी होणे, उर्जा प्रणालींमध्‍ये न्याय्य संक्रमण करणे व  उर्जा सुरक्षितता प्राप्त करणे आणि समतोल, सर्वसमावेशक वाढ करणे,  हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाण्‍यासाठीचे प्रयत्न या आधारे केली जाईल जी न्याय्य ,समावेशी  विकास  रुजवेल  आणि सामाजिक-आर्थिक कल्याणामध्‍ये सुधारणा करेल.

भविष्यासाठी आमच्या अर्थव्यवस्था सज्ज  करण्‍यासाठी , आम्ही समृद्धीसाठी हिंद-प्रशांत आर्थिक मंच  स्थापित करण्‍याची प्रक्रिया सुरू करीत आहोत.

या मंचाचा उद्देश आपल्या अर्थव्यवस्थेमध्‍ये लवचिकता,शाश्‍वतता, सर्वसमावेशकता, आर्थिक वृद्धी, निष्‍पक्षपणा आणि स्पर्धात्मकता वाढवणे, हा आहे. या उपक्रमाव्दारे हिंद-प्रशांत क्षेत्रामध्‍ये सहकार्य, स्थिरता, समृद्धी, विकास आणि शांतता यासाठी योगदान देण्‍याचे आमचे ध्‍येय आहे.

जे या क्षेत्रासाठी आमची उद्दिष्‍टे, स्वारस्य आणि महत्वाकांक्षा सामायिक करतात अशा आणखी  हिंद- प्रशांत क्षेत्रातल्या भागीदारांनी सहभागी व्हावे, यासाठी आम्ही आमंत्रित करतो. जे तांत्रिक सहाय्य आणि क्षमता वाढीचे महत्व मान्य करतात, त्यांना आम्ही आमच्या मंचामध्ये येणाऱ्या भागीदारांना अशा प्रकारे सहयोग करण्‍यासाठी वचनबद्ध आहोत. ते आम्हाला एक लवचिक दृष्टिकोन ठेवण्‍याची परवानगी देतील आणि आमच्या लोकांसाठी प्रत्यक्ष फायदे देतील.

आज, आम्ही पुढील महत्वाच्या स्‍तंभांवर भविष्‍यातील वाटाघाटींसाठी एकत्रित चर्चा सुरू करतो. मंचातील  भागीदार ही उद्दिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी आर्थिक सहकार्य मजबूत करण्‍याचे  विविध मार्ग सूचवून या  चर्चेत सहभागी होतील आणि आम्ही इतर इच्‍छुक हिंद- प्रशांत भागीदारांना आमच्यामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी आमंत्रित करतो.

व्यापार :- उच्च मानक, सर्वसमावेशक, मुक्‍त आणि न्याय्य व्यापार वचनबद्धता आणि व्यापार व  तंत्रज्ञान धोरणामध्‍ये नवीन आणि सर्जनशील दृष्टिकोन  विकसित करण्‍याचा आमचा प्रयत्न आहे ; जो आर्थिक क्रियाकलाप आणि गुंतवणुकीला चालना देणाऱ्या, शाश्‍वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणारी उद्दिष्‍टे पूर्ण करून कामगार तसेच ग्राहकांना लाभ देणारा आहे. आमच्या प्रयत्नांमध्‍ये डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्याचा समावेश आहे. परंतु ते इतकेच मर्यादित नाही.

पुरवठा साखळी:- आम्ही आमच्या पुरवठा साखळ्यांमध्ये पारदर्शकता, विविधता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरून त्या अधिक लवचिक आणि चांगल्या प्रकारे जोडल्या जातील. आम्ही आपत्ती  प्रतिसाद उपायांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो; व्यवसायातील सातत्य अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित करतानाच व्यत्ययांचे परिणाम कमी करण्यासाठी सहकार्याचा विस्तार करू.  तार्किक कार्यक्षमता आणि पाठबळ  सुधारणे; आणि मुख्य कच्चा  माल आणि प्रक्रिया केलेले साहित्य, अर्धसंवाहक, महत्वाची  खनिजे आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान सुनिश्चित केले  जाईल.

स्वच्छ ऊर्जा, ‘डिकार्बोरायझेशन’ आणि पायाभूत सुविधा :- आमच्या पॅरिस कराराच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने आणि आमच्या लोकांच्या आणि कामगारांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, आम्ही आमच्या अर्थव्यवस्थांना डिकार्बोनाइज करण्यासाठी आणि हवामानाच्या परिणामांना सामोरे जाण्यायोग्य  करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि उपयोजनाला गती देण्याची योजना आखत आहोत. यामध्ये तंत्रज्ञान, सवलतीच्या अर्थसाह्यांसह निधी  संकलित करणे आणि शाश्वत आणि टिकाऊ पायाभूत सुविधांच्या विकासित करण्यासाठी पाठबळ  देऊन आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करून स्पर्धात्मकता सुधारण्याचे आणि संपर्क यंत्रणा  वाढवण्याचे मार्ग शोधणे,  यावर सहकार्य वाढवणे समाविष्ट आहे.   

कर आणि भ्रष्टाचाराला आळा :-विद्यमान बहुपक्षीय जबाबदाऱ्या, मानके आणि करचोरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी करारांसमवेत प्रभावी आणि मजबूत कर, पैशाची अवैध देवाण-घेवाण विरोधी आणि लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्था लागू करून निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये कौशल्याची देवाणघेवाण करणे आणि उत्तरदायित्व आणि पारदर्शक प्रणालींना पुढे नेण्यासाठी आवश्यक क्षमता वाढीसाठी पाठबळ देण्याचे  मार्ग शोधणे समाविष्ट आहे.

प्रादेशिक आर्थिक संपर्क यंत्रणा आणि एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या सामायिक हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी भागीदारांमधील सल्लामसलतींवर आधारित सहकार्याची अतिरिक्त क्षेत्रे ओळखणे सुरू ठेवत आहोत. आमच्या अर्थव्यवस्थांमधील वाणिज्य, व्यापार आणि गुंतवणुकीच्या प्रवाहाला चालना देण्यासाठी, गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आमच्या संयुक्त बाजारपेठेतील आमचे कामगार, कंपन्या आणि लोकांसाठी संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी आम्ही संयुक्तपणे अनुकूल वातावरण तयार करण्यास उत्सुक आहोत.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s $14 trillion investment journey since 1947: More than half of it came in last decade - Details

Media Coverage

India’s $14 trillion investment journey since 1947: More than half of it came in last decade - Details
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi thanks President of Guyana for his support to 'Ek Ped Maa ke Naam' initiative
November 25, 2024
PM lauds the Indian community in Guyana in yesterday’s Mann Ki Baat episode

The Prime Minister, Shri Narendra Modi today thanked Dr. Irfaan Ali, the President of Guyana for his support to Ek Ped Maa Ke Naam initiative. Shri Modi reiterated about his appreciation to the Indian community in Guyana in yesterday’s Mann Ki Baat episode.

The Prime Minister responding to a post by President of Guyana, Dr. Irfaan Ali on ‘X’ said:

“Your support will always be cherished. I talked about it during my #MannKiBaat programme. Also appreciated the Indian community in Guyana in the same episode.

@DrMohamedIrfaa1

@presidentaligy”