एसटी म्हणजेच सौराष्ट्र तामिळ संगमम अंतर्गत गुजरात आणि तामिळनाडू या दोन राज्यातील प्राचीन बंध साजरे केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे. हा एसटी संगमम, “एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना साजरा करत आहे, असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
"हा #STSangamamगुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन बंध साजरे करत आहे. कित्येक शतकांपूर्वी गुजरातच्या लोकांनी तामिळनाडू हे त्यांचे घर बनवले होते आणि तिथली स्थानिक संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. तामिळ लोकांनीही त्यांचे खुल्या मनाने स्वागत केले होते. हा संगमम, “एक भारत श्रेष्ठ भारत” ही संकल्पना साजरी करत आहे.’"
The #STSangamam celebrates an ancient bond between Gujarat and Tamil Nadu. Centuries ago people from Gujarat made Tamil Nadu their home and embraced the local culture. The Tamil people also welcomed them with open arms. This Sangamam celebrates ‘Ek Bharat Shreshtha Bharat.’ https://t.co/9oimjbLFLs
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2023