भारत परिक्रमा पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सिताराम केडिलया यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केडिलया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 9 ऑगस्ट 2012 रोजी कन्याकुमारी येथून भारत परिक्रमा पदयात्रेला सुरुवात केली आणि यावर्षी 9 जुलै रोजी कन्याकुमारी येथे ही यात्रा पूर्ण केली.
केडिलया म्हणाले की, या यात्रेदरम्यान त्यांनी 9 हजार गावांना प्रत्यक्ष भेट दिली. यात्रेचा संदेश आणखी 20 हजार गावांपर्यंत अप्रत्यक्षपणे पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रवासात त्यांनी लाखो शेतकरी आणि ग्रामीण युवकांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी केडिलया यांच्या प्रयत्नाची प्रशंसा केली आणि भविष्यातील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.