श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना शपथ दिली.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर लिहिले आहे:
“संध्याकाळी समारंभपूर्वक पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.आता 140 कोटी भारतीयांची सेवा करण्यास आणि भारताला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी आमच्या मंत्रिमंडळासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.
ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन करतो. मंत्र्यांच्या या समूहात तरुणाई आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचे उत्तम मिश्रण आहे आणि आम्ही लोकांचे जीवनमान सुधारण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.
Took oath as Prime Minister at the ceremony earlier this evening. I look forward to serving 140 crore Indians and working with the Council of Ministers to take India to new heights of progress. pic.twitter.com/xx1e5vUP1G
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2024
शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व परदेशी मान्यवरांबद्दल मी आभार व्यक्त करतो. मानवी प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी भारत आपल्या या मौल्यवान भागीदारांसोबत नेहमीच काम करेल."
राष्ट्रपति भवन के प्रांगण में आज शाम हुए समारोह में मैंने प्रधानमंत्री पद की शपथ ली। मैं और मंत्रिपरिषद के मेरे सहयोगी, 140 करोड़ देशवासियों की सेवा करने और देश को विकास की नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए प्रतिबद्ध हैं। pic.twitter.com/TKNNomHf0r
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2024