पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी आज नेपाळमधील लुंबिनी मठ येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीचा शिलान्यास केला.
2.नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) यांना लुंबिनी येथे लुंबिनी विकास ट्रस्टने (एलडीटी) दिलेल्या भूखंडावर आयबीसीतर्फे हे केंद्र उभारले जाईल. आयबीसी आणि एलडीटी यांच्यात मार्च 2022 मध्ये भूखंडाबाबत करार झाला होता.
3. तीन प्रमुख बौद्ध परंपरा म्हणजे थेरवाद, महायान आणि वज्रयान यांच्या भिख्खूंच्या हस्ते शिलान्यास कार्यक्रम झाल्यानंतर, उभय पंतप्रधानांनी केंद्राच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.
4.एकदा हे केंद्र पूर्ण झाल्यावर, जगभरातून बौद्ध धर्माच्या अध्यात्मिक पैलूंचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांचे स्वागत करणारे जागतिक दर्जाचे केंद्र असेल. ही आधुनिक इमारत असणार आहे आणि उर्जा, पाण्याचा वापर आणि कचरा हाताळणीच्या बाबतीत नेट झिरो निकषांनी युक्त असेल. या इमारतीत प्रार्थना सभागृह, उपासना केंद्र, ग्रंथालय, प्रदर्शन हॉल, कॅफेटेरिया, कार्यालये आणि इतर सुविधा असतील.