12 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी कल्पना आणि सूचना शेअर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2022 रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भाषणासाठी तरुणांना त्यांच्या सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात यापैकी काही सूचनांचा समावेश करतील.
देशभरातील तरुण यानिमित्त होणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणासाठी आपल्या सूचना आणि नावीन्यपूर्ण कल्पना शेअर करू शकतात. पंतप्रधान आपल्या भाषणात काही सूचनांचा समावेश करू शकतात. कृपया खालील कमेंट्स विभागात आपल्या कल्पना आणि सूचना सामायिक करा.
राष्ट्रीय युवा महोत्सव आणि समिट बद्दल:
आपल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांची खरी क्षमता प्रकट करण्यासाठी तसेच राष्ट्र उभारणीकरिता तरुणांना उद्युक्त करणे, चेतना निर्माण करणे, संघटित करणे आणि सक्रिय करणे हे भारतातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या तरुणांची उपस्थिती असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
सहस्राब्दी लोकांच्या मनाला प्रज्वलित करणे आणि त्यांना उत्तेजन देणे आणि कोविड पश्र्चात युवा नेतृत्वाचा साचा तयार करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जगासाठी एक अस्सल भारतीय नेतृत्व धोरण तयार करणे हे देखील महोत्सवाचे उद्दिष्ट आहे
भारतातील विविध संस्कृतींना पुढे आणणे आणि त्यांना समरसतेच्या आणि संवादी दृष्टिकोनाद्वारे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या एकात्म धाग्यात गुंफणे हा 13 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा परिषदेचा उद्देश आहे. ज्ञानाच्या प्रसारासाठी आणि बुद्धीला आकार देण्याकरिता स्वदेशी आणि जागतिक आयकॉन्स आणि तज्ञांसोबत कल्पनांचे आदान प्रदान करण्याकरिता युथ समिट सत्रांचे आयोजन केले जाणार आहे..
Comment 0