सुस्वागतम्!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये लिहिलेल्या 'एक्झाम वॉरिअर्स', अर्थात 'परीक्षा वीर' या पुस्तकाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून चांगले स्वागत झाले.
अरुणाचल प्रदेशातील अलीना तायांग या तरुण परीक्षा वीरांगनेने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिला हे पुस्तक खूप आवडल्याचे तिने कळविले होते. या पुस्तकात पालक आणि शिक्षकांसाठीही काही मंत्र समाविष्ट करता आले असते, असेही मत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केले होते. लोकांचे पंतप्रधान असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राष्ट्राला उद्देशून केलेल्या 'मन की बात'मधून या गोष्टीचा उल्लेख करीत या पुस्तकात आणखी कोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल याविषयी आपले मत नोंदविण्याचे आवाहन सर्वांना केले होते. परीक्षा, सध्याच्या काळात विद्यार्थ्यांसमोर असलेली आव्हाने, त्या आव्हानांना तोंड देण्याचे उपाय यासारख्या गोष्टींवर तुमचे काही नवे दृष्टीकोन असू शकतात.
कृपया तुमचे मत आणि इतर संबंधित माहिती खालील भागात नोंदवा आणि सबमिट वर क्लिक करा