बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारिक अहमद सिद्दिक यांनी आज पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान मार्च 2021 मधील आपल्या बांग्लादेश भेटीच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच पंतप्रधान शेख हसीना यांच्याप्रती सदिच्छा व्यक्त केली.
भारत व बांग्लादेश मधील मैत्रीचे संबंध बळकट करण्यासाठी, तसेच कोविड-19 महामारीदरम्यान बांग्लादेशच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी सिद्दीक यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशची सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करत असल्याची प्रशंसा करत पंतप्रधानांनी यापुढेही भारत बांग्लादेश यांच्यातील मैत्री बळकट करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची वचनबद्धता प्रकट केली.