परीक्षा पे चर्चा 2021 स्पर्धेसाठी तुमची नावनोंदणी करा
पंतप्रधान मोदींसमवेत व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी होण्याच्या अनोख्या संधीचा लाभ घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमात विविध स्तरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी हा कार्यक्रम पूर्णतः ऑनलाईन होणार असून तो जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी परीक्षेचा तणाव कशा प्रकारे दूर करता येईल याविषयी विद्यार्थी, पालकांबरोबरच शिक्षकांशीही बातचीत करणार आहेत.

 

पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक, शिक्षकांना परीक्षा पे चर्चा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना परीक्षा पे चर्चा 2021 स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, “ आपले शूर एक्झाम वॉरियर्स त्यांच्या परीक्षेसाठी सज्ज होत असताना, ‘परीक्षा पे चर्चा 2021’ पुन्हा येत आहे, यावेळी हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. या सर्वांनी तणाव न घेता प्रसन्न चित्ताने परीक्षा देऊया!”

 

परीक्षा पे चर्चा 2021 विषयी अत्यंत उत्साह

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये फक्त परीक्षा पे चर्चा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठीचाच उत्साह नाही तर अत्यंत प्रसन्न मनाने आणि तणावरहित वातावरणात परीक्षा कशी पार पडेल यासाठीच्या काही मोलाच्या टिप्सदेखील पंतप्रधान मोदींकडून मिळणार आहेत. तुम्हालासद्धा पंतप्रधानांना प्रश्र्न विचारण्याची आणि त्यांच्याकडून टिप्स, सल्ला घेण्याची संधी मिळू शकते.

 

परीक्षा पे चर्चा 2021 स्पर्धेत कसे सहभागी होता येईल ?

परीक्षा पे चर्चा 2021 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी MyGov या मंचावर तुमची नावनोंदणी करा. पीपीसी 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची निवड स्पर्धेद्वारे  करण्यात येईल. पीपीसी 2021 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आताच innovateindia.mygov.in/ppc-2021/ या संकेतस्थळाला भेट द्या!

पीपीसी 2021 च्या विजेत्यांसाठी खास बक्षिसे...

पीपीसी 2021 स्पर्धेच्या विजेत्यांना परीक्षा पे चर्चा 2021 या व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसमवेत सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे. प्रत्येक विजेत्याला खास तयार करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रासोबतच परीक्षा पे चर्चा हे विशेष किटदेखील दिले जाणार आहे. 

एक्झाम वॉरियर व्हा

 

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम- तरुण मुलांकरिता तणावरहित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या एक्झाम वॉरियर्स या मोठ्या चळवळीचा एक भाग आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुस्तकाद्वारे शिक्षणाविषयीचा नवा दृष्टिकोन मांडला आहे.

 

शिक्षण हा आनंददायी, समाधान देणारा आणि निरंतर सुरू असलेला प्रवास झाला पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकात दिला आहे. नमो अॅपवरील एक्झाम वॉरियर्स या विभागाच्या माध्यमातून एक्झाम वॉरियर्स चळवळीत संवादात्मक तांत्रिक घ्रटक समाविष्ट झाला असून पंतप्रधानांनी एक्झाम वॉरियर्स या पुस्तकात दिलेल्या प्रत्येक मंत्राचा मुख्य आशय त्याद्वारे समजू शकतो.

 

परीक्षेच्या काळात येणाऱ्या तणावाचा सामना करण्यास विद्यार्थ्यांना विशेषतः परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी एक्झाम वॉरियर्स पुस्तकात 25 मंत्र सांगितले आहेत. त्यांनी या पुस्तकात “वरियर नाही तर, वॉरियर व्हा”, या मुद्द्यावर अधिक भर दिला आहे. ज्ञानाची कास धरा, त्यामुळे गुण आपसूकच मिळतील, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. ज्ञान संपादनाचा प्रवास हा समृद्ध करणारा अनुभव असल्याचे सांगत कुठलाही प्रश्र्न कठीण वाटू नये यासाठी ज्ञान संपादनाची गरज विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण त्यावर लिहिले आहे.

 

पहिली परीक्षा पे चर्चा 16 फेब्रुवारी 2018 रोजी नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर पार पडली होती. दुसरी परीक्षा पे चर्चा 29 जानेवारी, 2019 रोजी तर तिसरी 20 जानेवारी 2020 रोजी तालकटोरा स्टेडियमवर झाली होती. 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In young children, mother tongue is the key to learning

Media Coverage

In young children, mother tongue is the key to learning
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 डिसेंबर 2024
December 11, 2024

PM Modi's Leadership Legacy of Strategic Achievements and Progress