पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या राजकोटशी असलेल्या दृढ संबंधांचे स्मरण करत मोदी आर्काइव्हमधील X या समाज माध्यमावरील पोस्ट सामायिक केली.

मोदी आर्काइव्हने एका पोस्टद्वारे खास क्षणाची आठवण करून दिली, जेव्हा 22 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2002 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट II मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून पहिल्यांदाच आमदार म्हणून गुजरात विधानसभेत पाऊल ठेवले होते.

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले;

“राजकोटचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान असेल. या शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला पहिली निवडणूक जिंकून दिली. तेव्हापासून जनता जनार्दनाच्या आकांक्षांना न्याय देण्याचे काम मी निरंतर करत आलो आहे.  हा देखील एक सुखद योगायोग आहे की मी आज आणि उद्या गुजरातमध्ये असेन आणि राजकोटमध्येच आयोजित, 5 एम्स राष्ट्राला समर्पित करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होईन.”

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Govt bolsters Agri Stack with ₹6,000 crore allocation to empower farmers

Media Coverage

Govt bolsters Agri Stack with ₹6,000 crore allocation to empower farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 जून 2025
June 14, 2025

Building a Stronger India: PM Modi’s Reforms Power Infrastructure, Jobs, and Rural Prosperity