ईशान्य भागातील आदिवासी उत्पादनांच्या जाहिरातीसाठीची विपणन आणि लॉजिस्टिक्स विकास योजना, (पीटीपी-एनईआर) ही एक अतिशय चांगली योजना असून, ईशान्य भारतातील प्रतिभावान कारागिरांचे जीवन सुधारणे, हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या योजनेमुळे ईशान्य प्रदेशातील उत्पादनांना चांगली ओळख मिळेल असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री, अर्जुन मुंडा यांनी ट्विट थ्रेडमध्ये माहिती दिली आहे की, आदिवासी कारागीरांच्या उत्पादनांची खरेदी, लॉजिस्टिक्स आणि विपणनाची कार्यक्षमता वाढवून, त्यांच्या उपजीविकेच्या संधी बळकट करणे, हे पीटीपी-एनईआर योजनेचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
“(पीटीपी-एनईआर) ही एक अतिशय चांगली योजना असून, ईशान्य भारतातील प्रतिभावान कारागिरांचे जीवन सुधारणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे ईशान्य भारतातील उत्पादनांना चांगली ओळखही निश्चितपणे मिळेल. याचा विशेष फायदा आदिवासी समुदायांना मिळेल.”
PTP-NER is a great scheme, aimed at improving the lives of the talented artisans belonging to the Northeast. It will also ensure great visibility to products from the Northeast. The tribal communities will particularly benefit due to this. https://t.co/lfqZB2Pocn
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2023