"मातेचे जीवन हे एक यशस्वी शतायुष्यी जीवन असून, ते आज ईश्वरचरणी विश्रान्त झाले आहे", असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आज पंतप्रधानांच्या मातोश्री श्रीमती हीराबेन मोदी यांचे निधन झाले.तपस्वी आचरण, निस्वार्थ कर्मयोग आणि मूल्यांना समर्पित जीवन अशा त्रिगुणांचा त्या जीवनात समावेश होता,याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.
प्रत्येक कार्य शहाणीवतेने केले पाहिजे आणि जीवन विशुद्धतेने जगले पाहिजे,या त्यांनी
आपल्या 100 व्या वाढदिवशी पंतप्रधानांना केलेल्या उपदेशाचेही त्यांनी स्मरण केले.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"एका समर्पित शतायुषी जीवनाचा ईश्वरचरणी शानदार विराम..., एक तपस्वी जीवन यात्रा, निष्काम कर्मयोगाचे प्रतीक आणि मूल्यांवरील अचल निष्ठा यांना हे जीवन समर्पित झाले होते.
मी जेव्हा त्यांना 100 व्या वाढदिवसाच्या दिवशी भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, जी नेहमी माझ्या स्मरणात राहील, 'कार्य करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धिने' म्हणजे प्रत्येक कार्य शहाणीवतेने केले पाहिजे आणि जीवन विशुद्धतेने जगले पाहिजे"
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022