पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता दिवंगत हरमोहन सिंग यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करतील.
हरमोहन सिंग यादव (18 ऑक्टोबर 1921 - 25 जुलै 2012) हे यादव समाजाचे एक मोठे व्यक्तिमत्व आणि नेते होते. त्यांनी शेतकरी, मागासवर्गीय आणि समाजातील इतर घटकांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून या कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग आहे.
हरमोहन सिंग यादव हे दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिले आणि त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य, विधानसभेतील आमदार, राज्यसभा सदस्य आणि 'अखिल भारतीय यादव महासभे'चे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. त्यांनी त्यांचे पुत्र सुखराम सिंग यांच्या मदतीने कानपूर आणि आसपास अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.
1984 च्या शीख विरोधी दंगलीत अनेक शिखांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी शौर्य दाखविल्याबद्दल हरमोहन सिंग यादव यांना 1991 मध्ये शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आज शाम 4.30 बजे देश के सम्मानित नेता और पूर्व सांसद हरमोहन सिंह यादव जी की 10वीं पुण्यतिथि पर आयोजित एक कार्यक्रम में वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए भाग लूंगा। हरमोहन जी ने अपना जीवन देशसेवा में समर्पित कर दिया और हमेशा किसानों, गरीबों, पिछड़ों और वंचितों के लिए कार्य किया।
— Narendra Modi (@narendramodi) July 25, 2022