पीएम गतिशक्तीला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम मधील अनुभूती केंद्राला भेट दिली. भारताच्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रवासाला चालना देण्यात पीएम गतिशक्तीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“आज गतिशक्तीला तीन वर्षे पूर्ण होत असताना भारत मंडपम आणि अनुभूती केंद्राला भेट दिली, जिथे या उपक्रमाच्या परिवर्तनकारी शक्तीची अनुभूती झाली.”
“भारताच्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रवासाला चालना देण्यात पीएम गतिशक्तीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि कोणत्याही संभाव्य आव्हानाला तोंड देता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने केला जात आहे.”
Today, as #GatiShakti completed three years, went to Bharat Mandapam and visited the Anubhuti Kendra, where I experienced the transformative power of this initiative. pic.twitter.com/XNseB9jnkZ
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2024
PM #GatiShakti has played a critical role in adding momentum to India’s infrastructure development journey. It is using technology wonderfully in order to ensure projects are completed on time and any potential challenge is mitigated. pic.twitter.com/vdQOwIVEe2
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2024