पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2018 रोजी हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल एका पुस्तिकेचे प्रकाशन ते करतील. कांगडा जिल्ह्यातल्या धरमशाला येथे होणाऱ्या सभेला पंतप्रधान संबोधित करतील. तसेच सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील.