पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 जानेवारी 2019 रोजी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते गांधीनगर, अहमदाबाद आणि हजीराला भेट देणार आहेत.

उद्या होणाऱ्या पहिल्या कार्यक्रमात गांधीनगर येथे महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचे पंतप्रधान उद्‌घाटन करतील. या प्रदर्शनात 25 हून अधिक औद्योगिक आणि व्यापार क्षेत्र एकाच छताखाली उपलब्ध असतील.

संध्याकाळी ते अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे उद्‌घाटन करतील. अहमदाबाद महानगरपालिकेने हे अत्याधुनिक अतिविशिष्ट सरकारी रुग्णालय बांधले आहे. यामध्ये आधुनिक सुविधा तसेच एअर ॲम्ब्युलन्सचा समावेश आहे. 78 मीटर उंच ही इमारत असून कौशल्य, व्याप्ती आणि वेग यांचे खरे मिश्रण आहे. डिजिटल भारताच्या अनुषंगाने हे रुग्णालय पूर्णपणे कागदरहीत असेल. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत हे रुग्णालय सामान्य माणसाच्या सेवेसाठी उपलब्ध असेल.

पंतप्रधान या रुग्णालयातील सुविधांची पाहणी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

त्यानंतर संध्याकाळी उशीरा पंतप्रधान अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल 2019 चे उद्‌घाटन करतील. व्हायब्रंट गुजरातच्या बरोबरीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान व्हायब्रंट गुजरात अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवलच्या मॅसकॉटचे उद्‌घाटन करतील. अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच महोत्सव आहे. शहरातील उद्योगांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी यामुळे संधी मिळेल. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान गांधी नगर येथे महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे उद्‌घाटन करतील. 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातला पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनवण्यासाठी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमुळे जागतिक, सामाजिक, आर्थिक विकास, ज्ञानाचे आदान-प्रदान आणि उपयुक्त भागीदारी करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे. 19 जानेवारी 2019 रोजी हजीरा बंदूक कारखान्याच्या स्थापनेसाठी पंतप्रधान हजीराला भेट देतील.

हजीरा येथून पंतप्रधान दादरा-नगर हवेली मधील सिल्वासाला भेट देतील. तिथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील.

आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान 19 जानेवारी रोजी मुंबईला भेट देतील. भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होईल.  

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi visits the Indian Arrival Monument
November 21, 2024

Prime Minister visited the Indian Arrival monument at Monument Gardens in Georgetown today. He was accompanied by PM of Guyana Brig (Retd) Mark Phillips. An ensemble of Tassa Drums welcomed Prime Minister as he paid floral tribute at the Arrival Monument. Paying homage at the monument, Prime Minister recalled the struggle and sacrifices of Indian diaspora and their pivotal contribution to preserving and promoting Indian culture and tradition in Guyana. He planted a Bel Patra sapling at the monument.

The monument is a replica of the first ship which arrived in Guyana in 1838 bringing indentured migrants from India. It was gifted by India to the people of Guyana in 1991.