पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 फेब्रुवारी 2019 रोजी बिहारला भेट देणार आहेत. बरौनी येथे ते विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.
या प्रकल्पांमुळे पाटणा शहर आणि लगतच्या परिसराच्या जोडणीला प्रोत्साहन आणि विकासाला चालना मिळणार आहे
शहर विकास आणि स्वच्छता:-
पाटणा आणि लगतच्या परिसरातील वाहतूक सुगम करण्यासाठीच्या पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करतील.
96.54 कि.मी. कारमलिचाक मलनिस्सारण नेटवर्क विस्तार प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करतील.
बाऱ्ह, सुलतानगंज आणि नौ गाचिया येथे मलनिस्सारण संयंत्राशी संबंधित कामांचा प्रारंभ पंतप्रधान करतील. विविध ठिकाणच्या 22 अमृत प्रकल्पांसाठी पायाभरणी ते करतील.
रेल्वे :-
पुढील क्षेत्रावरील रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणाचे उद्घाटन पंतप्रधान करतील.
बरौनी-कुमेदपूर,
मुझफ्फरपूर-रक्सॉल
फतुहा-इस्लामपूर
बिहारशरीफ-दनियावन
रांची-पाटणा वातानुकूलित साप्ताहिक एक्सप्रेसचे उद्घाटनही यावेळी होईल.
तेल आणि गॅस:-
जगदीशपूर-वाराणसी नैसर्गिक गॅस पाईपलाईनच्या फुलपूर-पाटणा टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करतील.
पॅराद्विप-हल्दिया-दुर्गापूर एलपीजी पाईपलाईन, दुर्गापूर ते मुजफ्फरपूर आणि पाटण्यापर्यंत विस्तारणासाठी पायाभरणी पंतप्रधान करतील.
आरोग्य:-
छप्रा आणि पूर्णिया इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी पंतप्रधान करतील. भागलपूर आणि गया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत करण्यासाठी पायाभरणी पंतप्रधान करतील.
खते:-
बरौनी येथे अमोनिया-युरिया खत संकुलाची पायाभरणी पंतप्रधान करतील.