पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 4 सप्टेंबर 2020 रोजी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेड सोहळ्यात, त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत हा कार्यक्रम होईल.
या अकादमीत आयपीएस तुकडीचे 131प्रशिक्षणार्थी, ज्यात 28 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, त्यांनी 42 आठवड्यांचा मूलभूत अभ्यासक्रम-टप्पा- एकचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
आयपीएस सर्व अधिकाऱ्यांनी 17 डिसेंबर 2018 रोजी या अकादमीत प्रवेश घेतला होता. त्याआधी, त्यांनी मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी तसेच तेलंगणातील डॉ मारी चन्नारेड्डी एचआरडी इन्स्टिट्यूटमधून आपला पहिला अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आयएएस, आयएफएस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा हा पहिला अभ्यासक्रम पूर्ण झाला.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत या प्रशिक्षणार्थींना विविध प्रशिक्षणाअंतर्गत आणि बाह्य विषय, जसे की कायदा, तपास, न्यायवैद्यक शास्त्र, नेतृत्व आणि व्यवस्थापन, गुन्हेगारीशास्त्र, सार्वजनिक सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा, मूल्ये आणि मानवाधिकार, आधुनिक भारतीय पोलीस व्यवस्था, फिल्ड क्राफ्ट आणि कौशल्ये, शस्त्रास्त्रे प्रशिक्षण आणि बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.