पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लखनौ येथे दोन दिवसीय उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषद 2018 चे उद्घाटन करणार आहेत. राजनाथ सिंह, अरुण जेटली, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, व्ही.के.सिंग, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या परिषदेत सहभागी होऊन राज्यासाठी गुंतवणूक आणण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पंतप्रधान 21 फेब्रुवारीला शिखर परिषदेचे उद्घाटन करतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समारोपाच्या सत्राला उपस्थित राहतील.
उत्तर प्रदेशमधल्या गुंतवणुकीच्या संधी आणि क्षमता यांचे दर्शन घडवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंत्री, कॉर्पोरेट जगतातले नेते, धोरणकर्ते, आंतरराष्ट्रीय संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांना एकत्रित येण्यासाठी जागतिक व्यासपीठ या कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी फिनलॅन्ड, जपान, झेक रिपब्लिक, थायलंड, स्लोव्हाकिया आणि मॉरिशस ही सात राष्ट्रे भागीदार देश म्हणून ओळखली जाणार आहेत. या परिषदेदरम्यान अनेक सांमजस्य करारावर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत.
राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपापल्या क्षमतांचे दर्शन घडवत गुंतवणुकदारांना आकर्षित करत, राज्यांनी सहकार्याच्या आणि स्पर्धात्मक संधीयवाद भावनेने काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते त्याला अनुसरुन ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आपली प्रतिबद्धता राखत पंतप्रधानांनी गुवाहाटी येथे 4 फेब्रुवारीला जागतिक गुंतवणुकदार परिषदेचे तर 18 फेब्रुवारीला मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे उद्घाटन केले.