पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12.30 वाजता दूरस्थ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन करतील.
राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ झाशी येथे असून बुंदेलखंडातील एक प्रमुख संस्था आहे.
विद्यापीठाने 2014-15 मध्ये पहिले शैक्षणिक सत्र सुरू केले आणि कृषी, फलोत्पादन आणि वनीकरण या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
मुख्य इमारती तयार होत असल्यामुळे सध्या हे विद्यापीठ झाशी येथील ग्रासलँड अँड फॉडर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून कार्यरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या विविध विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधतील.