प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना, परवडण्याजोगे कार्डिॲक स्टेंट आणि गुडघे प्रत्यारोपण लाभार्थींशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून 7 जून रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी संवाद साधणार आहेत.
या उपक्रमांमुळे विशेषत: गरीब कुटुंबातील रुग्णांच्या आयुष्यात कशाप्रकारे सकारात्मक बदल घडवून आले हे जाणून घेणे आणि प्रत्यक्ष लाभार्थींकडून प्रतिक्रिया जाणून घेणे, हा या संवादामागचा हेतू आहे.
नमो ॲप, यूट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल मिडिया मंचावर हा संपूर्ण संवाद उपलब्ध होईल.