पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पंतप्रधान टपाल तिकिट आणि विशेष पाकिट जारी करतील. तसेच एनएचआरसीच्या संकेतस्थळाची नवीन आवृत्तीचा शुभारंभ ते करतील. हे संकेतस्थळ विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना वापरायला सुलभ असेल.
पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.