पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्व-भारतीच्या दीक्षांत समारंभास संबोधित करतील. पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि विश्वभारतीचे मुख्याधिष्ठाता (रेक्टर) जगदीप धनखार; केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक आणि केंद्रीय शिक्षणमंत्री संजय धोत्रे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. समारंभात एकूण 2535 विद्यार्थी पदवी प्राप्त करतील.
विश्व-भारती विषयी
विश्व भारतीची स्थापना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये केली. हे देशातील सर्वात जुने केंद्रीय विद्यापीठ आहे. मे 1951 मध्ये संसदेमध्ये कायदा पारित करून विश्व भारती हे केंद्रीय विद्यापीठ आणि "राष्ट्रीय महत्वाची संस्था" म्हणून घोषित करण्यात आले. गुरुदेव टागोरांनी आखलेल्या अध्यापनशास्त्राचे विद्यापीठाने अनुसरण केले, हळूहळू आधुनिक विद्यापिठांनुसार यामध्ये बदल होत गेले. पंतप्रधान हे विद्यापीठाचे कुलगुरु देखील आहेत.