पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन आज संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील स्थितीचे, विशेषतः खारकीवमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्याविषयी पुनरावलोकन केले. भारतीय नागरिकांना युद्धजन्य प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्याविषयी उभयतांमध्ये चर्चा झाली.