पंतप्रधान नरेंद्र मोदी लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांचा दौरा करणार आहेत. ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.
भारत कोविड-19 विरूद्ध लढ्याच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश करीत असतानाच पंतप्रधानांनी या सुविधा केंद्रांना भेट देऊन शास्त्रज्ञांशी चर्चा केल्याने लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि रोडमॅप यांची प्रथमदर्शनी माहिती त्यांना प्राप्त करता येईल.